✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

म सा सं - पैशे कोण देणार??

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 06/23/2008 - 10:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28620 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

ऋ
ऋषिकेश Mon, 06/23/2008 - 22:40 नवीन

सहमत

चर्चा विषयाशी १००% सहमत! पण हे सरकारला कळले तरी ते अंमलात आणायचे धाडस दाखवणार नाहि असे खेदाने म्हणावेसे वाटते :( -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 06/23/2008 - 23:17 नवीन

बीएमएम

पैशाच्या मुद्द्यावर मूळ प्रस्तावाशी सहमत आहे. हा सगळा बनाव सरकारी खर्चात अमेरिकावारी करण्याचा दिसतो. यामागे वाचक संस्कृती, सांस्कृतिक देवाणघेवाण याबद्दल फारसा विचार दिसत नाही आहे. दर दोन वर्षांनी बृहन्महाराष्ट्रमंडळाचा (बीएमएम )उत्सव अमेरिकेमधे होतच असतो. साहित्यिकांबरोबर इतर सांस्कृतिक/राजकीय/संशोधनादि क्षेत्रातील लोकांची हजेरी लागत असते. या पार्श्वभूमीवर , साहित्य संमेलनाचा पसारा मांडण्याचे कारण कळत नाही. बीएमएम च्या या सोहळ्याला अमेरिकाभरच्या मंडळांमधे सहकार्य असते. एकूण व्यवस्था , अर्थशास्त्र आणि लोकांचा प्रतिसाद या सगळ्याची सांगड घातलेली असते. मोठ्या प्रमाणात नियोजन केलेले असते. बे एरिया चे मंडळ (खरे तर सवतासुभा होऊन बनलेली २ मंडळे) कितीही मोठे असले तरी त्याना या प्रकारचा समन्वय साधण्याशिवाय पर्याय नाही. तसे काही होते आहे का हे अजून स्पष्ट झालेले दिसत नाही. "लोकांच्या २५ कोटींवर काही रावबहादूरांनी सहकुटुंब केलेली मज्जा" इतपत जर या संमेलनाचे स्वरूप रहाणार असेल तर ते अश्लाघ्य आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 06/23/2008 - 23:48 नवीन

सहमत

या मराठी साहित्य संमेलनाचा भार (विशेषतः प्रवासखर्च) भारतीय करदात्यांवर पडू नये हे नक्कीच.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त जोशि Tue, 06/24/2008 - 00:03 नवीन

परदेशात सम्मेलन नकोच....

आता पर देशात सम्मेलने घेतलि तर परदेशि सहित्यिक बनन्याचि प्रेरना तरि मिलेल...हा हा हा...जोक होता ...
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 06/24/2008 - 01:00 नवीन

घालमोडेदादा

असले संमेलन हे सॅनफ्रॅन्सिस्को किंवा भारताबाहेर होऊ नये असे वाटते. पण जरा वेगळे लिहावेसे वाटते - आधी बर्‍याच प्रतिक्रीयेतून आलेला मुद्दा - देशी सरकारी पैशाने होणारा देशी तमाशा हा देशातील रसिकांपुरताच मर्यादीत असावा हे एक कारण झाले... पण आता वाचल्याप्रमाणे बे एरीयावासी याचा खर्च उचलणार आहेत! तरी पण हे अखिल भारतीय कसे काय झाले? माझ्या दृष्टीने मुद्दा वेगळाच आहे: "अखिल भारतीय मराठी साहीत्य महामंडळ" अशी सेवाभावी संस्था (नॉन प्रॉफिट) भारताबाहेर कसे काय आधिवेशन करते? त्यांच्या घटनेत देशाबाहेर कार्यक्रमास वाव आहे का? येथे करदात्यांचा मुद्दा दोन प्रकारे आहे: एक म्हणजे सरकारी अनुदान आणि दुसरे म्हणजे अशा कार्यक्रमांना देणग्या देणार्‍यांना परत करसवलत - म्हणजे करवसुली कमी.. आत्ताच म.टा.चा या संदर्भात अग्रलेख वाचला. त्यातील काही वाक्ये खाली सांगत आहे:
....'मराठी ग्रंथकार सभे'ने १८८५मध्ये महात्मा जोतिबा फुले यांना साहित्य संमेलनाचे आमंत्रण दिले, तेव्हा त्यांनी अत्यंत रोखठोक शब्दांत आयोजकांना कसे खडसावले होते, याची आज आठवण होणे स्वाभाविक आहे. 'आमचे साहित्य आम्ही निर्माण करू आणि आमच्या ग्रंथकार सभा आम्ही घेऊ. उच्चभ्रू ब्राह्माणी ग्रंथकार स्त्री-शूदातिशूदांच्या प्रश्ानवर अवाक्षरही लिहीत नाहीत. त्यामुळे अशा ग्रंथकार सभेमार्फत देश-समाजाचा अजिबात उत्कर्ष होणार नाही,' अशा शब्दांत महात्मा फुल्यांनी त्यांना वास्तवाची जाणीव करून दिली होती. ... आता या संमेलनाच्या निमित्ताने सॅन फ्रान्सिस्को आणि बे एरिया परिसरातील 'केएफसी' (म्हणजे केंटुकी फ्राईड चिकन) व 'मॅक' (म्हणजे मॅक्डोनाल्ड!) या दुकानादुकानांत मराठीचा गजर होईल आणि इंग्लंडमधल्या नव्हे तरी अमेरिकेतल्या साहेबाला मराठी मात्रेचे चार वळसे दिल्याचे समाधान पदरी पडेल. तेवढे पुण्य पदरात पाडून 'माय'देशी परतल्यावर पुन्हा एकदा या 'महाराष्ट्र देशी 'मऱ्हाटी' भाषेला भवितव्य उरलेच नाही!' म्हणून गळे काढून रडायला महामंडळ मोकळे होईल! १८८५च्या 'ग्रंथकार सभे'ला विरोध करताना महात्मा फुल्यांनी त्या संमेलनाच्या आयोजकांची 'घालमोडेदादा' या शब्दांत संभावना केली होती. अमेरिकेतल्या या संमेलनाच्या आयोजकांसाठीही त्यापेक्षा चांगला शब्द सुचणे कठीण आहे!
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 06/24/2008 - 01:17 नवीन

प्रश्न

अर्थकारणाचा भाग वगळता , परदेशी संमेलन भरवण्याला विरोध नीटसा समजला नाही. इंदौर, ग्वाल्हेर , बडोदे , वगैरे ठिकाणी संमेलने होतात. मॉरिशसला जागतिक मराठी परिषदेचा पहिला मोठ्ठा सोहळा होतो. आणि त्यात पुल, कुसुमाग्रज, शरद पवार वगैरे वगैरे लोक आशीर्वादाला असतात. असे असल्यास मग परदेशालाच विरोध का ? शेवटी , SFO ला संमेलन होते याचा अर्थ तिकडे मराठी समाजाचा एक छोटासा तुकडा आहे हे नजरेआड करून कसे चालेल ? हे संमेलन काही आफ्रिकेतल्या एका निर्जन भागात तर होत नाही. परदेशस्थ मराठी लोकांमधे या निमित्ताने काही सांस्कृतिक दळणवळण होईल, परदेशातील मराठी वाचक संस्कृतीला या निमित्ताने थोडा उजाळा मिळेल असे काही तरी चांगले हाती लागेलच की. " कुंपणापलिकडले शेत" यासारखे, परदेशी लोकांच्या मराठी साहित्याचे संकलन निघाले सुमारे २५ वर्षांपूर्वी. त्यानंतरच्या काळात एकतासारखी मराठी प्रकाशने , महाराष्ट्र फाऊंडेशन सारख्या १ मिलियन डॉलर्स पाठवणार्‍या संस्था, बीएमेम सारखी संमेलने , परदेशस्थांनी चालवलेली मनोगत सारखी संस्थळे या सार्‍या गोष्टी , परदेशी मराठी संस्कृती जिवंतच नव्हे तर वर्धिष्णू आहे याचे द्योतक आहेत. विरोध आयते खाण्याला असावा. करदात्यांच्या पैशाच्या अपव्ययाबद्दल असावा . परदेशी भरलेली संमेलने हा प्रकार नवा नाही आणि त्याला विरोधाकरता विरोध अयोग्य वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Tue, 06/24/2008 - 03:20 नवीन

विरोध

परदेशी भरलेली संमेलने हा प्रकार नवा नाही आणि त्याला विरोधाकरता विरोध अयोग्य वाटतो. माझा मुद्दा कदाचीत मी तितकासा नीट स्पष्ट केला नाही असे वाटते. तो तात्विक असण्यापेक्षा कायद्याशी संबंधीत होता आणि आहे. अ.भा. म. सा. प. ही संस्था भारतापुरती मर्यादीत आहे. तीचे "मिशन"/"ध्येय" हे भारताबाहेर कामे करायला आणि त्यात पैसे खर्च करण्यासाठीची नाही.... त्यामुळे अशा संस्थेअंतर्गत राजरोसपणे असले कार्यक्रम करणे याने अजून एक अनिष्ठ प्रथा पडते आहे असे माझे म्हणणे आहे आणि त्याला विरोध आहे. अशा पद्धतीचा सोहळा बीएमएम खाली अथवा जागतीक मराठी परीषदे खाली झाल्यास तो योग्य आहे. (अवांतरः सध्या जागतीक मराठी परीषद काय करतेय?). थोडक्यात त्यामुळे भारतात भारतीयांसाठीचे संमेलन पण राहील ज्याचीपण गरज आहे आणि बाहेर पण संमेलन होऊ शकेल. दुसरा भाग (ज्या साठी विरोध नाही पण लॉजिस्टी़कल इश्यू नक्की वाटतो): बीएमएम आधिवेशनाला (जेंव्हा बॉस्टन मधे झाले तेंव्हा त्याच्या कार्यकारणीत सक्रीय होतो - अंदाजे ४००० लोकं जमले होते) साधारण ३ ते ५००० लोकं जमतात - कोणी नाटकात भाग घेतल्यामुळे येतो तर कोणी भाग घेतलेल्यांबरोबर. कोणी स्थानीक (म्हणजे आजूबाजूची राज्ये धरून) असतात म्हणून तर कोणी त्यातील भारतीय कलाकारांना पहायला म्हणून. पण केवळ साहीत्यासाठी म्हणून लोकं जमणे जरा अवघड वाटते. याचा अर्थ म्हणून असा प्रयत्न करूच नये असा नाही. पण मग त्यामुळे देखील ते वेगळे म्हणून करावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Tue, 06/24/2008 - 01:29 नवीन

प्रश्न : २

फुल्यांनी ब्राम्हणी वर्चस्वावर , तत्कालीन ग्रंथसभेतल्या जातीपातीआधारित व्यवस्थेवर ओढलेले कोरडे आणि प्रस्तुत साहित्यसंमेलनाला मटा सारख्या टॅब्लोईडच्या संपादकाने केलेला विरोध यातील संगती मला कळली नाही. फुले-आंबेडकर-सावरकर-टिळक यांची कुठलीही वक्तव्ये आउट्-ऑफ-कॉन्टेक्स्ट घ्यावी आणि दुगाण्या झाडाव्या हे बाकी मराठी टेब्लॉईडच्या संपादकाला शोभते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 06/24/2008 - 04:35 नवीन

प्रकाटाआ

प्रकाटाआ. - सर्किट
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 06/24/2008 - 05:15 नवीन

वरिजनल प्रतिसाद

प्रकाटाआ हाच वरिजनल प्रतिसाद होता काय हो? तसे असल्यास बे एरियात साहित्य संमेलन घेणं आत्यंतिक गरजेचं आहे. भांडणांचे धडे, मराठी बाणा इ. इ. मूळापासून गिरवायला हवेत सर्केश्वर तुम्ही! कधीतरी उगवायचं आणि प्रकाटाआ सारखे प्रतिसाद देऊन जायचं... बरं दिसत नाही हो! ;) ह. घ्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 06/24/2008 - 07:00 नवीन

ताई, मला वाचवा

ह्या उत्कृष्टविष्हयावर मला नुस्ता प्रतिसाद न देता पूर्ण लेखच लिहायला हवा, म्हणून हा अल्पमती प्रतिसाद काढून टाकला आहे. क्षमस्व. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 06/24/2008 - 07:03 नवीन

पैशे कोण देणार ?

वरील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे संएलनाचा खर्च कोटींमध्ये, आणि सरकारचे अनुदान फक्त पंचवीस लाख ? बे एरियातले दहा लोक गोळा केले, की तेवढे पैशे निघतील सहज ! - सर्किट
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 06/24/2008 - 11:55 नवीन

बातमी

साहित्य महामंडळावर "ब्लॉगविश्‍वा'तून टीकास्त्र मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
म
मयुरयेलपले Tue, 06/24/2008 - 12:11 नवीन

फक्त एवढ करा...

प्रतिक्रिया लिहायच आवरल नाहि म्हणुन.... आमच्या पंढरपुरात वारि निमित्त हजारो जादा बस गाड्या सोडतात.... १०-१२ विमान जिथ संमेलन आहे तिथ सोडलि तर कसं.. :W कारण परत "आरे भारतात आपले शाल श्रिफळ राहिले जरा घेवुन येतो.. तिकिटाला पइसे द्या " होनारच .... ;) किती प्रोब्लेम संपतिल.... :? आपला मयुर
  • Log in or register to post comments
म
मयुरयेलपले Tue, 06/24/2008 - 12:20 नवीन

आणि हो...

थोड लिहितो आजुन विमान कंपनि च्या ऐड च्या बदल्यात.. प्रवास फु़कट... वाटल्यास २५ लाख त्यांना दिले तर??? मी कर भरत नाहि... त्या मुळे मला फरक नाहि ... कर भरनार्या ना काय वाट्त??(ह.घ्या.) आपला मयुर
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Tue, 06/24/2008 - 13:08 नवीन

आनंदाची बातमी...

मिसळपावच्या जगाच्या पाठीवरील सर्व गैर- बे-एरियावासी (गैर आणि बे कसेसे वाटते. असो.) सदस्यांना सदर सहित्य संमेलनासाठी मोफत येणेजाणे, खाणेपिणे, पहाणे आणि रहाणे यांची व्यवस्था करण्यात येईल. असे बे एरिया मराठी मंडळ या संस्थेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ;) आता बोला. (ह. घ्या. हे. वे.सां. न. ल.)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा