मला सलमान खान कृत , आयेषा टाकिया पुरस्कृत "वाँटेड" ह्या चित्रपटातले " लेले लेले लेले रे मजा ले .. लेले लेले लेले रे मजा ले .. दारु का जम के मजा ले ... ( इत्यादी इत्यादी) .एम्पी३ " हे गाणी डॉली डिजिटल मधे आठवले .
>>>>>> वृत्त आणि यमक मात्र फस्कलास जमलंय हो !
नै नै वृत्त आणि गझलेची चौकट हुकली आहे असे माझे मत आहे.
मी तसा काही गजलेचा जाणकार नाही, पण तज्ञ मंडली आपलं मत व्यक्त करतीलच.
-दिलीप बिरुटे
अक्षरगणवृत्तात चरणातील अक्षरांची संख्या सारखी असते ती इथे नाही.
हं आता दोन वृत्ताचं मिश्रण आहे, असे वाटते. अक्षरगणवृतात नियमित यती (ओळीत थांबतो ती जागा) दिसतो तोही इथे दिसत नाही,असे वाटते.
आपल्याला असं का वाटतंय की वरील रचना वृत्तात आहे म्हणून ? काही लक्षणे ?
-दिलीप बिरुटे
मिश्रण असावंच. पण पहिली ओळ वगळता इतर ओळीत त र भ र य असे गण साधारणपणे एका पॅटर्नने दिसत आहेत. प्रत्येक दुसर्या ओळीत "लेले" आहेत. हे काय आहे शोधा कोणीतरी. पण कवितेचं रसग्रहण आधी करा बघू!
(य-यमाचा न-नमन त-ताराप र-राधिका म-मानावा स-समरा ज-जनास भ-भास्कर हे गण आठवले पण माहिती असलेले कोणतेही वृत्त या कवितेला लागू झाले नाही.)
ओठांतुनी निघाला चमचा तसाच उष्टा
त्या कृष्ण कुन्तलाने सांबार गाठलेले..
स्वप्नात का असेना तो मेघ प्राशलेला
आयुष्य मात्र सारे श्वानास घातलेले.
रसग्रहणाचं मनावर तुम्हीच घ्या. नै तर दोन ओळीचं तुम्ही रसग्रहण करा आणि मी दोन.
अतिशय उच्च पातळीवर, गंभीर, असं रसग्रहण करु... :)
-दिलीप बिरुटे
=))
लेले लेले हातात पेले *****गेले तिथंच मेले असे प्राचीन काळी ऐकलेले यमक ऐकून गहिवरलो. कृष्ण कुंतलाने सांबार गाठले हे ऐकून बाकी डोळे पाणावले. प्रतिमासृष्टीही उत्तम बैभत्सी आहे =))
वृत्ताचं म्हणाल तर आनंदकंद वाटते आहे चालीवरून. लघुगुरूंची अंमळ ओढाताण झाली तरी ठीक, चालीस तादृश बाध येत नाही. अन अक्षरगणवृत्ताच्या प्रत्येक चरणात अक्षरसंख्या सेमच असते असे वाटत नाही- अर्धसमवृत्त आणि विषमवृत्त या कॅटॅगिर्या अंमळ चेकवतो अन मग सांगतो माझी शंका योग्य आहे की कसे ते.
आयुष्य मात्र सारे श्वानास
शीर्षक अगदी फसवं आहे
षिर्षक वाचुन ..
आधी काहि कळलेच नाही मग
लेले.... ओक लेले काळे
लै भारी!
नै नै
गझल मला पण तशी कळत नाही
नै नै
मिश्रण असावं
या ओळी लै उच्च वाटतात म्हणतांना मजा येते.
लेलेंचे भूत आले का पुन्हा परत
गविंनी आता काथ्याकूट टाकावा!
क्या बात है!!!
लेले लेले हातात पेले ****
मस्त आणि लयबद्धसुद्धा!!
अर्धबिभत्स गझल?!!
हे