निकोल किडमन दुसर्या ऑस्करकडे ~ मुलासाठी व्याकुळ झालेली बेक्का कॉर्बेट...!
हॉलीवूडमध्ये फारच थोड्या अभिनेत्रींचा प्रवास "ग्लॅमर गर्ल" ते "सीरिअस अॅक्ट्रेस" असा झाला आहे (आपल्याकडील 'रेखा' या अभिनेत्रीने असा प्रवास केला होता असे म्हणता येईल). अलिकडील काही वर्षात प्रामुख्याने नाव समोर येत आहे ते आहे "निकोल किडमन" हिचे. योगायोगाने ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या दोन्ही देशाची नागरिक बनलेल्या (निकोलचे आईवडिल ऑस्ट्रेलियन पण तिचा जन्म झाला होनोलुलू या हवाई बेटावर, त्यामुळे तांत्रिक मुद्द्यावरून 'बाय बर्थ' तिला अमेरिकेचे नागरिकत्व आपोआप मिळाले) निकोलने ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजनच्या सोप ऑपेराज् मध्ये काही काळ काम केल्यावर तिथल्याच चित्रपटसृष्टीत काही लहानमोठ्या भूमिका केल्या. पण तिथे तिचा तसा जम जरी बसला नाही तरी तिच्या देखणेपणामुळे तिला योग्य वयात हॉलीवूडमध्ये प्रवेश मिळाला आणि टॉम क्रुझ (ज्याचाबरोबर तिने पुढे दहा वर्षे संसारही केला...) समवेतचा पहिलाच चित्रपट "डेज ऑफ थंडर" ने तिला हवे ते यश आणि नाव मिळवून दिले. पुढे मायकेल कीटन, बिल पुलमन, जिम कॅरी, जॉर्ज क्लूनी आदी आघाडीच्या अभिनेत्यासमवेत झळकून तिने हॉलीवूडमधील आपले स्थान पक्के केले. पुढे 'मूलॉ रूज' ने तर तिला प्रथम क्रमांकाची आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनविले. इथपर्यंतचा तिचा प्रवास मुख्य हीरोसाठी आवश्यक असणारी सुबक बाहुलीसम हीरॉईन असाच होता. पण तिच्यातील 'अभिनेत्री' ला वाव मिळाला तो केवळ तीन नायिकांच्यावर बेतलेल्या 'द हावर्स' या चित्रपटात तिने साकारलेल्या लेखिका 'व्हर्जिनिया वूल्फ' च्या भूमिकेमुळे. या आगळ्यावेगळा कथानकाच्या (तीन नायिका पण यांचा काळ आहे अनुक्रमे १९२३, १९५१ आणि २००१....तीन प्रसंगी घडणार्या घटना पण तिघीनाही त्या घटनेने गुंफले गेले आहे...अक्षरशः "माईन्ड ब्लोईंग" म्हणावे अशी पटकथा....जी फक्त हॉलीवूडमध्येच विचारासाठी येऊ शकते....तीन टॉपच्या हीरॉइन्स पण समोरासमोर एकदाही येत नाहीत....हेही एक वैशिष्ट्यच !) चित्रपटात 'ऑल टाईम ग्रेट' मेरिल स्ट्रीप, अजून एक गुणवान अभिनेत्री ज्युलियाना मूर दोन प्रमुख भूमिकेत असूनही निकोल किडमनने २००३ चे "ऑस्कर" पटकाविले त्या याच चित्रपटातील भूमिकेसाठी... तिच्यावर असा केलेला खास मेकअपही चर्चेचा विषय झाला होता....तिचे कट्टर चाहतेही तिला व्हर्जिनियाच्या भूमिकेत ओळखू शकले नव्हते.
२००३ नंतर यंदाच्या २०११ च्या "सर्वोत्कृष्ट अभिनेत्री"च्या रेसमध्ये पुनःश्च निकोल किडमन उतरली आहे आणि तिची सर्वत्र गाजत असलेली भूमिका आहे....."रॅबिट होल" मधील मुलाच्या अकाली मृत्यूमुळे कोलमडून गेलेली एक आई...बेक्का कोर्बेट. या लेखाचा मूळ उद्देश याच चित्रपटाची ओळख करून देणे हा आहे पण त्यानिमित्ताने निकोल किडमनविषयी थोडेबहुत.
बेक्का आणि तिचा नवरा हॉवी हे एक सुखी जोडपे....जोडप्यास डॅनी नावाचा चार वर्षाचा एक गोंडस मुलगा. न्यू यॉर्कपासून दूर शांत आनंदी उपनगरात एक देखणा बंगला, हॉवी एक यशस्वी एक्झेक्युटीव्ह तर बेक्का त्या चित्रासारख्या संसारातील यशस्वी गृहिणी....एरव्ही हॉवी आपल्या मित्रपरिवारात रमतो तर बेक्का आपली मैत्रीणीसम धाकटी बहीण ईझ्झी हिच्या संसाराविषयी आईसमवेत चर्चा करत मस्त जगत असते. अशा दृष्ट लागू शकणार्या संसाराला एके दिवशी खरंच दृष्ट लागते.
छोट्या डॅनीसमवेत खेळ आणि दंग्यात रममाण असलेली बेक्का
एके दिवशी बेक्का घरकाम करत असताना आपल्या लाडक्या कुत्र्याच्या मागे धावणारा तिचा मुलगा डॅनी रस्त्यावरून जाणार्या एका कारला आडवा येतो....कार त्याला उडविते, तो जागेवरच गतप्राण. कोर्बेट कुटुंबच धक्क्याने आणि दु:खाने कोसळून जाते. पुढे नियमानुसार त्या कार ड्रायव्हरवर खटला - जो त्याच उपनगरात, थोडे लांब राहाणारा, सीनिअरच्या वर्गात शिकणारा एक विद्यार्थीच असतो. कोर्टात मात्र असे सिद्ध होते की, उपनगरात आवश्यक असणारे कार स्पीड जेसन (कार चालविणारा विद्यार्थी) ने राखले होते शिवाय रस्त्यावर वाहतुकीच्यामध्ये येण्याची चूक बेक्काच्या मुलाचीच असते. त्यामुळे प्रचलित कायद्यानुसार जेसनची अपघात केसमधून निर्दोष सुटका होते. विशेष म्हणजे कायद्याचा मान राखणार्या कॉर्बेट कुटूंबालाही स्वतःवर काही अन्याय झाल्यासारखे वाटत नाही, कारण त्यानाही मनोमनी पटलेले असते की त्या अपघातात जेसनची काहीच चूक नाही.
आपण आता दोघेच उरलो....या उदासवाण्या वातावरणात बेक्का आणि हॉवी
पण असे असले तरी वैयक्तिक पातळीवर इकडे तर बेक्का आणि हॉवीचे भावविश्व तर हादरून गेले आहे. दोनतीन महिन्यानंतर हॉवी आपल्या पत्नीचे दु:ख हलके व्हावे यासाठी उपनगरातील 'ग्रुप कम्युनिटी' चे जोडप्याचे सदस्यत्व घेतो. त्यांच्यासारखेच समदु:खी (पण वेगवेगळ्या कारणास्तव) तिथे येऊन विविध विषयांवर चर्चा करत, एकमेकाना सांभाळून घेत आपल्या मानसिक वेदना कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात. सुरुवातीला बेक्का आपल्या पतीच्या आग्रहासाठी तिथे मनाविरुद्ध का होईना भाग घेते, पण तिला तिथेही कोंडमारा वाटू लागल्याने जास्तीतजास्त वेळ ती आपल्या बागेतच फुलझाडांची निगराणी करण्यात वेळ घालवू लागते...शिवाय जोडीला धाकट्या बहिणीच्या होऊ घातलेल्या संसारातही ती मन रमवतेच. हॉवी मात्र आपल्या ऑफिसकामानंतर (आता पत्नीच्या उदासपणामुळे तसा काहीसा वैतागलेला...) ग्रुप सेंटरकडे जाऊन तिथे मन रमवितो. तिथे त्याला समदु:खी एक मैत्रीणही बर्यापैकी मन रिझविण्यासाठी मिळते, पण हॉवीचे बेक्कावर मनापासून प्रेम असल्याने त्या केन्द्र मैत्रिणीसमवेत तो शारीरिक संबंध कधीही प्रस्थापित करत नाही.
धाकटी बहीण इझ्झा आणि तिच्या नवर्यासमवेत त्यांच्या आनंदी संसाराची साक्षीदार बेक्का
इकडे एक दिवस थोडा मोकळा वेळ मिळाल्याने नगर वाचनमंदिरात जाऊन वाचनासाठी काही पुस्तके आणावीत या उद्देशाने बेक्का आपली कार घेऊन लायब्ररीकडे जात असताना एका ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबते. रेड सिग्नल असल्याने साहजिकच तिच्या कार शेजारी एक बसही थांबते. बसकडे पाहात असतानाच तिला अचानक एका सीटवर 'जेसन' (तो विद्यार्थी ड्रायव्हर, ज्याच्या गाडीखाली डॅनीचा अंत झालेला असतो...) दिसतो. का कोण जाणे, पण बेक्का "इम्पलसिव्हली" त्या बसचा त्याच्यासाठी 'फॉलो' करते. त्याच्या घराशेजारील स्टॉपजवळ जेसन उतरतो....पुढील दिवशी जाणीवपूर्वक बेक्का त्या बसचा पाठलाग करते आणि त्याच लायब्ररीमध्ये अखेरीस जेसनसमवेत तिची गाठभेट होते. जेसन अर्थातच बेक्काला ओळखतो....झाल्या घटनेबद्दल पुनश्च दिलगिरी व्यक्त करून तिची मनःपूर्वक माफीही मागतो. पण बेक्कालाही जेसनबद्दल तिटकारा वाटण्याचे काही कारण नसते, कारण तीही एक सुशिक्षित आणि कायदा मानणारी नागरिक असते. तरीही 'जेसन' मध्ये ती कळतनकळत तिचा आता हयात नसलेला "डॅनी' शोधते...त्याला (जेसनला) आईचे प्रेम देऊ इच्छिते. वास्तविक खुद्द जेसनला (जरी न्यायालयाने त्याला निर्दोष सोडले असले तरीही...) आपण एक गुन्हा केल्याची टोचणी असतेच. तो एक 'अॅनिमेशन' चा विद्यार्थी असल्याने 'डॅनी' ला केन्द्रस्थानी ठेवून एक कथा रचित असतो....त्याचेच नाव 'रॅबिट होल'.... [रॅबिट होलची कल्पना प्रथम 'अॅलिस इन वंडरलॅण्ड' मध्ये वापरली. एका सशाच्या खळग्यातून अॅलिस अदभूत आणि रहस्यमय दुनियेत प्रवेश करते आणि आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या प्रवासाची सुरूवात होते.] जेसनलाही 'डॅनी' अशाच एका 'रॅबिट होल' मधून अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेला आहे असे वाटत असते व त्याला अनुलक्षून तो एक चित्रमय कथा प्रसिद्धीसाठी तयार करीत असतो. त्याच्या तोंडून ते कथानक ऐकताना आणि ती चित्रे पाहाताना बेक्का डॅनीच्या आठवणीने हरखून जाते. दोघे त्यानंतर भेटत असतात, पण हॉवीला हे माहीत नसते. एके दिवशी हॉवी, बेक्का आणि इझ्झा घरीच असताना अचानक काहीसा आनंदित असणारा जेसन [त्याची ती कथा आता मॅगेझिनमध्ये प्रसिद्ध झालेली असते] मासिकाची ती कॉपी बेक्काला देण्यासाठी येतो. त्याला हॉवीही घरीच असल्याचे अर्थातच ठाऊक नसते. पण हॉवी त्याला आपल्या घरी पाहाताच सुन्न होतोच, पण त्याहीपेक्षा तो आपल्या बायकोला भेटायला रोज येत असतो तसेच तीही त्याला भेटत असते हे प्रत्यक्ष बेक्काच्याच तोंडून ऐकल्यानंतर संतापाने फुटूनच जातो. [हा प्रसंग प्रत्यक्ष पडद्यावर पाहणे फार परिणामकारक ठरते...]
ज्याच्या कारने 'डॅनी' ला उडविले, त्याच जेसनसमवेत बागेत आठवणीत रममाण झालेली बेक्का
पुढे काय होते....हे सांगून चित्रपटातील रंगत कमी करण्यासारखे असल्याने इथेच थांबतो. पण बेक्काच्या भूमिकेत निकोल किडमन हिने जो अप्रतिम अभिनय साकारला आहे तो तिच्या "ऑस्कर" साठी प्रबळ दावेदार ठरेल यात शंका नाही. तिला ऑस्कर मिळो वा ना मिळो....पण मिपाच्या सदस्यांनी एका मुलाच्या अकाली अपघाती मृत्यूमुळे तडफडत असलेल्या आईच्या अभिनयासाठी 'रॅबिट होल' हा चित्रपट जरूर पाहावा ही आग्रहाची विनंती.
धन्यवाद
इन्द्रा
(धाग्यातील सर्व फोटोग्राफ्स गूगलवरून साभार !)

(धाग्यातील सर्व फोटोग्राफ्स गूगलवरून साभार !)वर्गीकरण
प्रतिक्रिया
+१
गणपा शी सहमत
खरच...
चित्रपट उत्कट वाटतो आहे.
फ्लॅशबॅक तंत्र....!!
सुरेख परिक्षण!!!
छान परिक्षण!
सुरेख परिक्षण
मस्त...
छान परिक्षण
निशब्द आणि हतबुद्ध ! सुरेख
छान परीक्षण
मस्त लिहिले आहे रे इंद्रा.
मस्तं लिहीले आहेस इंद्रा.
खूप छान परिक्षण
मस्त
सुरेख
व्वा. मस्त परिक्षण. बघणारच.
छान परीक्षण
सिंथिया निक्सन...!!
छान!
विहीर आणि रॅबिट होल....!
सुंदर चित्रपट परिक्षण !!! और
मान गये उस्ताद!
अप्रतिम परीक्षण
सारांश आणि रॅबिट होल...!
सुरेख परिक्षण !!
सुरेख...
सुरेख परीक्षण.. निकोल नी फिगर
सरोगेट मदर....!!
फिगर साठि हा पर्याय निवडायला
पर्याय
अभ्यासपुर्ण उत्तरा साठि
एवढे अवांतर झालेच आहे तर
गुजरात नेहमी भारताच्या एक
पुत्रकामेष्टी....!!
रोचक माहिती. भारतीय नट्या
"मला आई व्हायचंय.... !"
थोड विषयांतर झाल आहेच आणि
फिगर
छान
मस्त