✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वडिलांचे मुलीस पत्र

क
कच्चा पापड पक्का पापड यांनी
Tue, 01/11/2011 - 15:53  ·  लेख
लेख
प्रिय मुली, सगळ्या घरांना दार असतात, पण सगळीच नसतात मायेची कोठार हे शिकाशिलच तू कधी ना कधी. मात्र हे ही लक्षात ठेव की प्रत्येक उन्हात असते एक तरी शीतल सावली अन प्रत्येक काट्यावर एखाद कोमल फूल जीवघेण्या दरया असतात तसेच असतात झूलते पूल दुष्ट माणसंच्या मनातही असते दडलेले कोवळे मूल मला माहित आहे सगळ्या गोष्टी शिकवल्यात आईने तुला जमेल तेवढ पहात रहा उघड्या डोळ्यानी जग जगायचा प्रयत्न कर चौकाटी वाचून पण लक्षात ठेव पक्ष्यानाही कस वाटत घरात अधारल म्हणून तारुण्याची चव राखताना जागी राहू देत तुझ्या मनात प्रेमळ आईची ऊब. आणि वाटू दे घरादाराला तुझा आधार कृष्णांन उचललेल्या गोवर्धनाखाली उभ राहिल्यासारखा तुला हा धडा मिळू दे की अकारण परिस्थितिला शरण जाण हा गुन्हा असतो आणि अकारण बंड करून वादळ उठवण हा ही असतो तितकाच प्रमाद आपल्याला दुसरयान समजुन घेण्याआधी दुसरयाला आपण समजुन घेण हा ही असतो स्त्रित्वाचा महान प्रसाद पण म्हणून जळु नयेस तू परिस्थितिच्या कठोर मूर्ति समोर मूक उदबत्तीसारख आणि असू नये तुझ्या ओठांवर कडवट चव जळुन गेलेल्या उदाबत्तिच्या राखेसारखी आपल्या कल्पना आपल्या निष्ठा यावर विश्वास असावाच तुझा पण उघडी असावीत तुझी सुजाण, समंजस कवाड सर्वांना उघडी असलेल्या मंदिरा सारखी निष्ठा जपण्याची जबाबदारी असते दुसरयाची हे समजुन घेताना मिटू नयेत दार तुझ्या आत्म्याची ठिपक्या ठिपक्यन्ना जोडत साकारणार्या रांगोळीसारख जोडणार असाव तुझ अस्तित्व तहानलेल्या पाण्याइतक वाटाव घरादाराला तुझ महत्व ! शेवटी एक सांगतो बेटा प्रेम, सन्मान हे आहेत डोन्गरातुन मिळणारे प्रतिसाद प्रतिसादासाठी घालावी लागते प्रथम आपल्याच ओठातून साद तोडणे सोपे जोडणे अवघड ठावुक आहे तुला पण कधीही समजू नकोस की लग्नानंतर पाहुणी झालीस आम्हाला भावाइतकच घर अजुनही तुझ आहे पायाखालची वाळु सरकली तर माहेर तुझ भक्कम आहे झालेस काही विपरीत तर लिहशील पत्र लक्षात ठेव बापच असतो मुलीचा खराखुरा मित्र --------------------*-----------------------
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12692 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

आवडलं.

यशोधरा
Tue, 01/11/2011 - 16:05 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments

बापच असतो मुलीचा खराखुरा

नरेशकुमार
Tue, 01/11/2011 - 18:09 नवीन
बापच असतो मुलीचा खराखुरा मित्र
एकदम मनातले वाक्य. कविता काय वर्णन करु, अप्रतिम ! मागे मिपावर एका लेखात एक ऑस्कर अवार्ड मिळविलेल्या एक चलचित्राचि आठवन झाली. Oscar Awarded Father and Daughter short animation movie असे काहितरी नाव होते. कोनाला सापडेल तर द्याल का. http://www.youtube.com/watch?v=MgdsfRDxIeQ
  • Log in or register to post comments

खरच खूप आवडली कविता

विजुभाऊ
Tue, 01/11/2011 - 16:18 नवीन
खरच खूप आवडली कविता
  • Log in or register to post comments

छान लिहीलंय. अब्राहम लिंकनचे

यकु
Tue, 01/11/2011 - 16:24 नवीन
छान लिहीलंय. अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांच पत्र सारखंच. आवडलं.
  • Log in or register to post comments

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांच

अप्पा जोगळेकर
Tue, 01/11/2011 - 16:26 नवीन
अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांच पत्र सारखंच. हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

याच धरतीवर " ओबामांचे

टारझन
Tue, 01/11/2011 - 16:32 नवीन
याच धरतीवर " ओबामांचे मुषर्रफांस सुकाळी पत्र " देखील वाचायला आवडेल . .. :)
  • Log in or register to post comments

याच धर्तीवर "संपादकांचे

अवलिया
Tue, 01/11/2011 - 17:27 नवीन
याच धर्तीवर "संपादकांचे सदस्यांस पत्र" वाचायला आवडेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

बापच असतो मुलीचा खराखुरा

नरेशकुमार
Tue, 01/11/2011 - 18:20 नवीन
बापच असतो मुलीचा खराखुरा मित्र
संपादकच असतो सदस्याचा खराखुरा मित्र. असे उगा वाटुन गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

शक्यता नाकारता येत नाही.

अवलिया
Tue, 01/11/2011 - 18:20 नवीन
शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

ओके ...

छोटा डॉन
Tue, 01/11/2011 - 18:37 नवीन
>>याच धर्तीवर "संपादकांचे सदस्यांस पत्र" वाचायला आवडेल ओके, तसे तर तसे. तसा आग्रह असल्यास हे शिवधनुष्य आम्ही उचलु असे सांगतो, मात्र नंतर व्यनीतुन श्या दिलेल्या ऐकुन घेणार नाही, ओके ? अवांतर : ओरिजनल पत्र खुपच छान :) धन्यवाद. - डॉन्या लिंकन* (* नंदन, माफ कर रे बाबा, उगाच आपलं तुझ्या पदवीची झेराक्स गळ्यात बांधुन फिरतो आहे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

ओके, तसे तर तसे. तसा आग्रह

अवलिया
Tue, 01/11/2011 - 18:51 नवीन
ओके, तसे तर तसे. तसा आग्रह असल्यास हे शिवधनुष्य आम्ही उचलु असे सांगतो, मात्र नंतर व्यनीतुन श्या दिलेल्या ऐकुन घेणार नाही, ओके ? हा हा हा !! जरुर उचला शिवधनुष्य !! लिहि लिहि.. लवकर लिही निदान त्यामुळे तरी तू लिहिता होशील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हा डॉन्याच का एकटा सारखा

टारझन
Tue, 01/11/2011 - 18:58 नवीन
हा डॉन्याच का एकटा सारखा सारखा ते धणुक्ष उचिलणार ?? ते क न चालणार बाकी लोकांच्या हाडांतील कॅल्शियम काय कमी झाले आहे ? ए कोण आहे रे तिकडे ? जागुकडची खुब्याची कॅल्शियमयुक्त भाजी घरपोच करा समद्यांच्या. आणि हा , ह्या डौण्याला नका देऊ , ऑलरेडी कॅल्शियम खुप आहे त्याच्या कडे. असो , अधिक प्रकाश गगनबिहारींसारखे जाणकार टाकतीलंच . ( मिपा वरच्या बेंद्रीणींना सुर्‍याचे पत्र लिहीण्याच्या विचारात ) टार्‍या म्हात्रे ब ना ब कशी चालती ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

छान

अनुराग
Tue, 01/11/2011 - 16:59 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments

आपल्याला दुसरयान समजुन

जागु
Tue, 01/11/2011 - 17:02 नवीन
आपल्याला दुसरयान समजुन घेण्याआधी दुसरयाला आपण समजुन घेण हा ही असतो स्त्रित्वाचा महान प्रसाद हे सगळ्यांसाठीच असाव. छान आहे कविता.
  • Log in or register to post comments

कविता मस्तच

Pearl
Wed, 01/12/2011 - 08:19 नवीन
>> आपल्याला दुसरयान समजुन घेण्याआधी दुसरयाला आपण समजुन घेण हा ही असतो स्त्रित्वाचा महान प्रसाद >> हे सगळ्यांसाठीच असाव. +१ बाकी कविता मस्तच!! आणि भावाइतकच घर अजुनही तुझ आहे पायाखालची वाळु सरकली तर माहेर तुझ भक्कम आहे झालेस काही विपरीत तर लिहशील पत्र लक्षात ठेव बापच असतो मुलीचा खराखुरा मित्र या ओळी तर अप्रतिम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

छान लिहिलंय, हे असं मुलीला

५० फक्त
Tue, 01/11/2011 - 17:15 नवीन
छान लिहिलंय, हे असं मुलीला सांगु शकणारा बाप किति सुसंस्कारित असेल आणि त्याचं कुटुंब या सगळ्याचा हेवा वाटतो. हर्षद.
  • Log in or register to post comments

खूप आवडली कविता!!!!

मस्त कलंदर
Tue, 01/11/2011 - 17:56 नवीन
खूप आवडली कविता!!!!
  • Log in or register to post comments

सुंदर!!! अप्रतिम.

शुचि
Tue, 01/11/2011 - 18:14 नवीन
सुंदर!!! अप्रतिम.
  • Log in or register to post comments

कविता आवडली प्रतिसादासाठी

मराठे
Tue, 01/11/2011 - 19:05 नवीन
कविता आवडली
प्रतिसादासाठी घालावी लागते प्रथम आपल्याच ओठातून साद
+१
  • Log in or register to post comments

ओळ न ओळ भिडली मनाला. एक कन्या

स्पंदना
Tue, 01/11/2011 - 20:18 नवीन
ओळ न ओळ भिडली मनाला. एक कन्या म्हणुन , एक आई म्हणुन, एक व्यक्ति म्हणुन सार्‍या पैलुतुन झळाळुन उठणार एक उत्क्रुष्ट काव्य ! अन हे सांगणारा एक पिता ! पुलेशु कच्चा पापड .
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख!!! खूप

प्राजु
Tue, 01/11/2011 - 20:27 नवीन
अतिशय सुरेख!!! खूप आवडले. बाबांची आठवण झाली. 'मुलीचा बाप ' हे नातं इतकं गुंतागुंतीचं आहे.. या नात्याला खूप पैलू आहेत. या कवितेमध्ये त्यातले काही उलगडून दाखवले आहेत नक्कीच. :) पुलेशु.
  • Log in or register to post comments

'मुलीचा बाप ' हे नातं इतकं

ईन्टरफेल
Tue, 01/11/2011 - 21:03 नवीन
'मुलीचा बाप ' हे नातं इतकं गुंतागुंतीचं आहे.. या नात्याला खूप पैलू आहेत. या कवितेमध्ये त्यातले काही उलगडून दाखवले आहेत नक्कीच.>> +१ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

सुरेख!

स्वाती२
Tue, 01/11/2011 - 21:08 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

आवडली कविता मनापासुन कारन

मुलूखावेगळी
Tue, 01/11/2011 - 22:56 नवीन
आवडली कविता मनापासुन कारन माझे वडील पन माझे खरे मित्र आहेत
  • Log in or register to post comments

वा! मस्तच. आवडले.

मेघवेडा
Wed, 01/12/2011 - 01:12 नवीन
वा! मस्तच. आवडले.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

ज्ञानराम
Wed, 01/12/2011 - 10:00 नवीन
एक एक ओळ खरी आहे.... डोळ्यांत पाणी आलं
  • Log in or register to post comments

"दुष्ट माणसंच्या मनातही असते

Pain
Wed, 01/12/2011 - 10:10 नवीन
"दुष्ट माणसंच्या मनातही असते दडलेले कोवळे मूल " हे साफ चूक आहे.
  • Log in or register to post comments

छान आहे.

परिकथेतील राजकुमार
Wed, 01/12/2011 - 12:00 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments

खूप छान. मनाला भिड्णारी.

सविता००१
Wed, 01/12/2011 - 12:17 नवीन
खूप छान. मनाला भिड्णारी.
  • Log in or register to post comments

खूप आवडली

स्मिता.
Wed, 01/12/2011 - 12:29 नवीन
पत्र खूप आवडलं... बाबांची आठवण आली. पण कधीही समजू नकोस की लग्नानंतर पाहुणी झालीस आम्हाला पायाखालची वाळु सरकली तर माहेर तुझ भक्कम आहे या ओळी वाचून तर डोळ्यात पाणी आलं. कोणत्याही लग्न झालेल्या मुलीला कधी ना कधी आपण एकटे आहोत अशी जाणीव होते. ती जाणीव तात्पुरती आणि बहुदा बिनबुडाची असते. पण अश्या मनस्थितीत वरील ओळी किती आधार देऊन जातील.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा