✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कविता एक लांबचा प्रवास

र
रामदास यांनी
Tue, 06/03/2008 - 03:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
52220 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

प
पिवळा डांबिस Tue, 06/03/2008 - 03:51 नवीन

मस्त!

मस्तच लिहिलंय! काही काही लिखाण असं असतं की त्यावर सविस्तर प्रतिक्रिया न देता नुसतं शांत बसून ते संवेदावं असं वाटतं... त्यापैकीच हे एक. चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे जियो! असेच लिहीत रहा!! -पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
प
प्रास Tue, 11/08/2011 - 22:18 नवीन

सहमत

सध्या इतकंच. पिडांकाकांच्या इतकं पर्फेक्ट पीन-पॉईण्ट बोलणं जमणारच नाही मला म्हणून....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 06/03/2008 - 04:03 नवीन

सहमत...

मलाही आवडले... तुमची रेंज छान आहे. आधी पिसिजेसि आणि आता हे... दोन्ही प्रकार तुम्ही छान हाताळले आहेत. "बुवा समजत नाही हो गवळण ". बुवा हसले .म्हणाले"राधा व्हावं लागतं हो त्यासाठी'..एवढ्यात कसं जमणार ते?". (लग्न, बोडणं , सत्यनारायण होता होता तोफ फुटायची वेळ आली होती ही एक वेगळीच गोष्ट) एकेका वळणावर कविता भेटत राहीली आणि मनाचा उथळ प्रवाह डोह झाला, खोल झाला पण अंधारत ही गेला. मस्त... बिपिन.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 06/03/2008 - 05:48 नवीन

आशयसंपृक्त

असे दिवस असतात की कवितेला आपण पारखे होतो. दिवसाला जोडून दिवस निघून जातात ..दिन गेले काव्याविण सारे गेल्यासारखे. आणि कधी "भलत्या वेळी , भलत्या मेळी असता मन भलतीचकडे " असताना "आज अचानक गाठ पडल्या"सारखे होते. तसे हे तुमचे लिखाण. वेड्यासारखे धावणारे आयुष्य नि त्या आयुष्यामागे धावणारे आपण हे विसरतोच की ठायलयीत , संथ प्रवाहात आपल्याला पुन्हा काव्याचा सहवास घडू शकेल ... या सहवासाबद्दल लेखकाचे अनेक आभार . तुमचा हा लेख पुनःपुन्हा वाचला. जेव्हढा वाचला तेव्हढे शांत , तृप्त वाटले.
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Tue, 06/03/2008 - 07:09 नवीन

कविता

कडकडीत उन्हातून घरात आल्याआल्या वाळा घातलेले माठाचे पाणी घटाघटा पिऊन उरलेले चेहर्‍यावर शिंतोडून तसेच डोळे मिटून पंख्याखाली पडून राहिल्यासारखे वाटले. सगळे शब्द सगळ्या संदर्भांसह समजले पाहिजेत या अट्टाहासाला कवितांच्या राज्यात अर्थ नाही. खानोलकर, रेगे, ग्रेस, रॉय किणीकर यांच्या कवितांचे (a+b)2 = a2+2ab+b2 असे विश्लेषण करता येईलच असे नाही. ते तसे करण्याचे गरजही नाही. एकेक कविता उशाला घेऊन झोपून जावे. हळूहळू स्वतःच्या मनाच्या तळाशी सूर मारायला लावणारा लेख. एक गद्य कविताच. सन्जोप राव
  • Log in or register to post comments
फ
फटू Tue, 06/03/2008 - 07:11 नवीन

सुंदर...

पुन्हा एकदा ज्युनियर कॉलेजमध्ये मराठीच्या तासाला बसल्यासारखं वाटलं... प्राध्यापक एखादा आशयघन ललीत लेख तन्मयतेने शिकवत आहेत... आणि आपणही अगदी त्या लेखामध्ये हरवून गेलो आहोत... अगदी असंच झालं तुमचा हा लेख वाचताना... एक अप्रतीम लेख मिपाकराना देण्याबद्दल धन्यवाद... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 06/03/2008 - 07:41 नवीन

गद्य चित्र

>>>>चित्रकला माझा काही हातखंडा विषय नव्हता तुम्ही सादर केलेले अप्रतीम गद्य चित्र पाहून असे वाटत नाही. तुमचा शब्द कुंचला ताकदवान आहे. अरूण मनोहर
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 06/03/2008 - 08:10 नवीन

नि:शब्द!

झालो. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 06/03/2008 - 08:35 नवीन

जीयो

"मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे" हे फार आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
व
विसोबा खेचर Tue, 06/03/2008 - 08:26 नवीन

कुठल्या शब्दात?

रामदासराव, आपल्या लेखाचे कुठल्या शब्दात वर्णन करू? अत्यंत उच्च दर्जा असलेले लेखन इतकंच म्हणेन. वाचून खूप समाधान वाटलं, तृप्त वाटलं..! या लेखामुळे मिपाचा दर्जा अधिकच उंचावला आहे एवढं निश्चित म्हणेन...! कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. क्या बात है! गाण्याचंही अगदी तसंच आहे. एखादा राग, एखादा स्वर आयुष्यभर पुरतो! आयुष्य पुरी पडतं परंतु यमनातला गंधार प्रत्येक वेळेला नव्यानेच भेटत राहतो...! अवांतर - पण कवितेचा पिच्छा सोडला नाही.आणि कवितेनं पण आपला हट्ट सोडला नाही. बागेश्रीच्या आलापासारखी कायम आर्त पण गूढ ओढ लावत राहिली. रागसंगीताचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा, आस्वाद वेगळा! बागेश्रीची ओढ आर्त निश्चितच असू शकते, परंतु त्यात मला तरी कधी गुढत्व जाणवलं नाही. अतिशय प्रसन्न स्वर आहेत बागेश्रीचे. शृंगाररस अगदी काठोकाठ भरला आहे बागेश्रीत! 'आर्त परंतु गुढ ओढ' ही मला प्रामुख्याने मारव्यातच दिसली/नेहमी दिसते. सोहनीतदेखील एक अनाकलनीय गुढत्व बर्‍याचदा अनुभवलं आहे! असो, अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन येऊ द्या एवढीच विनंती... आपला, (तृप्त!) तात्या.
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Tue, 06/03/2008 - 10:36 नवीन

निशब्द

निशब्द !!!!! तात्या : १००% सहमत. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 06/03/2008 - 08:36 नवीन

सुरेख

'कविता' समजावणारा सुरेख लेख. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मानस Tue, 06/03/2008 - 08:43 नवीन

जिथे शब्द थिटे पडतात

खरोखरच "नि:शब्द", कविता ही भोगावी असं म्हणतात ...... आम्हीतर अजुन कवितेतला "क" शोधतोय. आज मनापासुन वाटतय, खूप खूप जगावं, जगायचय आणि त्या जगण्याचं प्रयोजन हे असले लेख व त्यामधुन व्यक्त केलेले विचार देत असतात. इंदिरा संतांची "लिहिताना" कविता आठवली, ती इथे द्यायचा मोह आवरत नाही ................. अडखळे लिहिताना हात कधी अवचित आणि निरखून डोळे पहातात अक्षरात कानावेलांटीचा डौल, मोड तशी अक्षराची कधी द्यावी, कधी नाही रेघ अक्षरावरची नकळत उमटली कुणाची ही काय तऱ्हा इवल्याशा रेषेमाजी भावजीवनाचा झरा नव्हेतच अक्षरे ही; स्मृतीसुमनांचे झेले एकाएका अक्षरात भावगंध दरवळे म्हणूनीच लिहिताना अवचित थांबे हात; धुके तसे आसवांचे उभे राही लोचनांत
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 10/02/2015 - 08:30 नवीन

वा! सुंदर.

वा! सुंदर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानस
व
वाचक Tue, 06/03/2008 - 08:47 नवीन

काव्यात्म लेख

प्रत्येक शब्द कसा अगदी एखाद्या लयित बांधून अलगद वार्‍यावर सोडून द्यावा असा... म्हणजे नकळत कधी कानी सूर आलेच तर ओळखीचा निदान भास तरी होउ शकेल. उत्तम. निसर्ग वर्णन सुद्धा अगदी चित्रदर्शी. खानोलकरांची कविता आहे ना 'माझ्या ह्या अजाण कवितेच्या वाटेला जाउ नका, ती ज्या वाटा चालते आहे त्या आहेत तिच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या.... मोडून पडाल " किंवा 'कविता म्हणजे आकाशीची वीज - होरपळून घ्यायची तयारी हवी'
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Tue, 06/03/2008 - 08:58 नवीन

अप्रतिम!!

पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत खिळवून ठेवणारा लेख. मानसरावांनी दिलेली कविता देखिल शब्दांच्या पलीकडली..
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 06/03/2008 - 10:17 नवीन

की दारुण शोंदर. खूब भालो ....भिशोण शुंदर....आमि तोमार फॅन आछी.

रामदास भौ खूप दिवसानी काहीतरी हातातुन निसटु पहणारे चांगले वाचायला मिळाले एकाएकी टिटवीचा आलेला आवाज मला रेफ्री फायनल शिटी वाजवतो तसा आला. जमिनीवर आणले तुम्ही एका समाधीतुन..... आम्ही दोघही एकाच आरशातून बाहेर आलो. तळं अंधारलं होतं. कमळं मिटली होती.अंधारात आम्हा दोघांनाही असं वाटलं की आपल्या डोळ्यातलं तळं कुणालाच दिसत नाहीये. वाचताना माझ्याही डोळ्यात तळं जमा झाले.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 06/03/2008 - 10:43 नवीन

काय

काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाहिये. खूप दिवसांनी इतका सुंदर लेख वाचला. त्यातही.. समोर एक सुंदर तळं .त्यात कमळाची फुलं . पांढरी कमळं.मोठाली हिरवीगार पानं.कमळं पण फार मोठी नाहीत. माझ्या तळहाता एव्हढीच.शिंगाड्याचे वेल अधून मधून वळसे घालत होते.तळही फारसं खोल नसावं. हिरव्या-काळ्या रंगाचा तळ अंधूकसा दिसत होता.मधूनच छोटे छोटे अनंत मासे शाळा सुटल्यासारखे धावत होते. निळसर टेकड्या,मध्येच कसलीतरी खूप हिरवी झाडं, नजरेच्या सहज टप्प्यात नारळीची झाडं , त्याच्या आश्रयाला गवताचं ,बांबूचं छोटसं घर.चारी बाजूनी अंधाराची चाहूल पण हळूहळू. या भागात कधी अंधारेल आणि कधी उजाडेल असं काही सांगता येत नाही.आम्ही दोघंही बोलता बोलता गप्प झालो..तळ्याकाठी स्तब्ध उभे राहिलो .आमच्या चाहूलीनी एक मोठा काळा मासा अंगाला हेलकावे देत पुढे निघून गेला. हिचं लक्ष कमळाकडे.माझ्याकडे बघून मंद हसली.आणि हसतच राहिली. आमच्या मुलीला लहानपणी क म्हणता यायचा नाही.एकटा क म्हणायची पण तमळातला क यायचा नाही.मग बराच वेळ आम्ही दोघही एकएकटे हसत राहिलो. हे तर अप्रतिम. चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे खरंतर.... ही लेख म्हणजेच एक सुंदर "गद्य काव्य" आहे असे मी म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 06/03/2008 - 11:41 नवीन

वाह्!

मस्त लिहिले आहे. मुग्ध झालो वाचताना. छान. आवडले. (संतुष्ट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 06/03/2008 - 12:06 नवीन

वा..

वरील सर्वांसारखीच माझीही अवस्था झाली आहे.प्रतिक्रिया लिहायला शब्द शोधते आहे पण सापडत नाहीयेत. अप्रतिम गद्यकविता! स्वाती
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 06/03/2008 - 13:59 नवीन

लेख पुन्हा

लेख पुन्हा पुन्हा वाचला... खूप छान... आपण असेच लिहिते रहा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 06/03/2008 - 14:17 नवीन

अगदि असेच म्हणतो

पुन्हा पुन्हा वाचण्यात खरच मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
च
चतुरंग Tue, 06/03/2008 - 15:31 नवीन

रामदास,

पहाटे ५.३० वाजता आपल्या प्रतिभेचं बोट पकडून माझं मन कधी लेखात गेलं आणि तळ्याकाठी जाऊन कमळं बघायला लागलं समजलंच नाही! टीटवीच्या शिट्टीनं सुद्धा भानावर यायचं नव्हतं. कवितेच्या शोधाच्या ह्या ललितानं मला आत नेलं. अनुभव इतक्या अकृत्रिम शब्दात मांडण्याची तुमची हातोटी काव्यच आहे. माउलीनं 'एकेक ओवी अनुभवावी' म्हटल्याप्रमाणे तुम्ही कविता अनुभवलीत. असं एक कडवं समजलं धन्य झालात. कुठल्या ओळींचा संदर्भ देऊ? संपूर्ण लेखच एक भरजरी वस्त्र आहे एखाद्या धाग्याला हात घातला तर उसवायची भीती वाटते. असेच शेले विणत रहा. नकळत येऊन आम्ही आनंद घेत राहू. चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विवेक काजरेकर Tue, 06/03/2008 - 15:32 नवीन

केवळ अप्रतिम

रामदासजी, फारच सुंदर लिहिलंय. तुमची लेखणी अगदी चित्रदर्शी आहे. उथळ पाण्यात सैरावैरा पळणारे मासे कैकदा पाहिलेत. पण "मधूनच छोटे छोटे अनंत मासे शाळा सुटल्यासारखे धावत होते" असं काही वाचलं की चित्र कसं स्पष्ट डोळ्यापुढे उभं रहातं. कविता कळायला लागायला मनाची एक अवस्था यावी लागते हे स्वानुभवावरुन सांगू शकतो. एका ठराविक वयापर्यंत गाण्याच्या केवळ सुरावटीत अडकलेल्या मला जेंव्हा त्यातला गर्भितार्थ कळायला लागला तेंव्हा कळलं इतके दिवस आपण कोणत्या आनंदाला मुकत होतो ते. असेच लिहित रहा
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 06/03/2008 - 17:42 नवीन

खुप छान वाटले वाचुन.

परत परत वाचावे असे लिखाण आहे, वाचुन मन तृप्त होते.
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 06/03/2008 - 23:30 नवीन

(विषय दिलेला नाही)

Image removed.
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 06/04/2008 - 07:36 नवीन

मनापासून आभार.

मिपा मुळे लिहावेसे वाटले. संधी उपलब्ध करून दिली. वाचकांचे आभार. आपल्या प्रोत्साहनाची आवश्यकता कायम राहील. अवांतर.. काल फोटो लोड करायला शिकलो.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 06/04/2008 - 08:03 नवीन

समसमासंयोग

तुमचे हे टिपण म्हणजे तुम्हालाच नव्हे तर मिसळपावलाही गौरवाचीही बाब आहे. तुमच्यासारखे जितके जास्त गुणी लोक मिसळपाववर येतील आणि लिहीतील तितके ते मिसळपावला श्रेयास्पद ठरेल. आतापर्यंत अप्रकाशित राहिलेले तुमच्यासारखे टॅलंट प्रकाशात आणणे हे या स्थळाचे मोठे यश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 08:26 नवीन

सहमत...

तुमच्यासारखे जितके जास्त गुणी लोक मिसळपाववर येतील आणि लिहीतील तितके ते मिसळपावला श्रेयास्पद ठरेल. पूर्ण सहमत आहे! रामदासरावांनी व्यासपिठाचा उल्लेख केला आहे परंतु त्याचं विशेष काही नाही. व्यासपिठं अनेक आहेत, आणि मराठी माणसाच्या वाढत्या आंतरजालीय वावरामुळे, नव्यानव्या तांत्रिक सुविधांमुळे यापुढेही अनेक व्यासपिठं उपलब्ध होऊ शकतील. तेव्हा 'व्यासपिठ मिळवून दिलं!' हे रामदासरावांच वाक्य मिपा केवळ कृतज्ञतेच्या भावनेनेच स्वीकारत आहे! उलटपक्षी, मुक्तरावांनी मांडलेला मुद्दाच अधिक योग्य आहे. मिपावर सभासदांनी केलेल्या लेखनामुळेच मिपाचा गौरव आहे आणि मिपाचे सभासद हेच मिपाचे ऐश्वर्य आहे असेच मिपा मानते! आपला, (कृतज्ञ) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
य
यशोधरा Wed, 06/04/2008 - 07:58 नवीन

कसलं सुरेख

कसलं सुरेख लिहिलं आहेत!! खरोखर गद्य कविता केली आहेत!! चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे अतिशय सुरेख!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 06/04/2008 - 14:38 नवीन

असेच म्हणतो

नितांतसुंदर, कसदार लेखन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
भ
भडकमकर मास्तर Wed, 06/04/2008 - 09:37 नवीन

___________________________

Image removed. Image removed. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 06/04/2008 - 14:20 नवीन

तॄप्त !!

रामदास, अहो वाचन तॄप्ती काय असते ते तुमचा हा अतिशय काव्यात्मक लेख वाचताना जाणावलं. अप्रतिम लिहिलंय.... पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख आहे हा. खूप दिवसांनी असं मनाला शांत करणारं , उल्हसित करणारं वाचायला मिळालं.......असेच लिहित रहा.
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Wed, 06/04/2008 - 17:16 नवीन

लेख आवडला.

लेख आवडला. कवितेचे वेड असेच वर्षानुवर्षे तिच्यामागे जावे असे आहे. खूप वाचायला मिळेल असे वाटत असतांना लेख एकदम संपला. त्याची हुरहूर वाटली. (मी कालच प्रतिसाद दिला होता.. पूर्ण टिच़की द्यायची राहिली का? ..)
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 06/04/2008 - 21:00 नवीन

अस्वस्थ झालो....

काल घाईघाईत वाचला हा लेख आणि मनात रेंगाळत राहिला...आज निवांतपणे वाचला, आणि एक अस्वस्थता दाटून आली. माझे कवितेवर मनापासून प्रेम, गेल्या काही वर्षात मात्र अनेक कटू अनुभवानंतर, खूप ट्क्के-टोणपे खाऊन वाटत होते की आपले कवितेचे हळवे वय संपून गेले, कित्येक दिवसात, खर तर वर्षात उस्फुर्ततेने कविता लिहिताच आली नाही, कधीतरीच वर्षा-दोन वर्षात एखादी. हे वाचल्यावर मात्र आज जखम ओली झाली, बाहेरच्या जगासाठी चढवलेल्या ह्या कठीण अलिप्त वृत्तीच्या कवचामागे, एक हळवे, संवेदनशील मन आहे हे परत जाणवले. थोडे चैतन्य आणि खुपशी अस्वस्थता सळसळून गेली...ज्या जुन्या खडबडीत वाटेवर कवितेचा हळवा हात हळुच सोडला ते आठवले, पण कधी मी माझे हळवे, उत्कट प्रतिसाद विसरून व्यवहारी प्रतिसाद देऊ लागलो ते नाही आठवले. वाटत होते ते उत्कट अनुभवांचे, भावनांचे, उस्फुर्त प्रतिसादाचे कोवळे वय निघून गेले, तो उत्कटपणा आता फक्त आठवणीतच राहिल ... पण तुमच्या पन्नाशीतल्या ह्या तरल, काव्यमय लेखाने जाणवले की अजूनही तो उत्कटपणा अजूनही तीव्र आहे, राखेखालील निखारे अजून धगधगतात आहे...मनाचा तळ ढवळून निघाला, खुप काही हरवले आहे वाटणारे सापडले, एक सर्जनशील, संवेदनशील अस्वस्थता सळसळली...खूप छान वाटले त्या जाणीवेने... रामदास, अजून काय लिहू? एका अप्रतिम, तरल आणि उत्कट अनुभवाबद्द्ल शतशः धन्यवाद!
आम्ही दोघही एकाच आरशातून बाहेर आलो. तळं अंधारलं होतं. कमळं मिटली होती.अंधारात आम्हा दोघांनाही असं वाटलं की आपल्या डोळ्यातलं तळं कुणालाच दिसत नाहीये.
हे वाचले आणि माझ्या डोळ्यातील तळ्यामुळे अक्षरे धुरकट दिसू लागली. माझ्या स्वतःच्या कविता पुन्हा उमलतील की नाही माहित नाही, पण इतर कवितांचा अनुभव पुन्हा उत्कटतेने घेईन, अगदी त्यांच्या त्या हळव्या ओळींचे अर्थ तितक्याच हळूवारपणे मनात उमलेपर्यंत...हया दीर्घ, अंर्तमुख, वेडावणार्‍या, पण जाणिवा समृध्द करणार्‍या प्रवासासाठी मीही उत्सुक झालोय....
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 06/05/2008 - 00:07 नवीन

मनापासून

मनापासून लिहिलेला अप्रतिम प्रतिसाद... =D> _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
ल
लिखाळ गुरुवार, 06/05/2008 - 02:09 नवीन

आता आमोद सुनासि आले।

नमस्कार ! अतिशय ताकदवान लेख ! अभिनंदन. जिव्हाळी लागणे, घंगाळ आणि बांबू, शाळा सुटलेले मासे, तळ्यापलिकडल्या बाईचे वर्णन, असे आणि बरेच काही अतिशय आवडले. कथेच्या शेवटी कवितेच्या ओळी येतात त्या क्षणी अंगावर सरसरून काटा आला. तो भाग जबरदस्त साधला आहे. पुन्हा पुन्हा वाचावा असा. यावरून मला नंदन यांच्या अनुदिनीवरील 'आता आमोद सुनासि आले।' (http://marathisahitya.blogspot.com/2006/06/blog-post_28.html) हा लेख आठवला. पु. ले. शु. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/05/2008 - 07:54 नवीन

खूप सुंदर !!

खूप सुंदर !!
  • Log in or register to post comments
श
शार्कुला Fri, 06/06/2008 - 13:51 नवीन

भाई

सुन्दर लेख ! अभिनंदन
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 07/10/2008 - 02:14 नवीन

"रामदासी" लेख

रामदास, तुमचे सर्व जुने लेखन अधाशासारखा वाचत सुटलोय. एकापेक्षा एक सरस लेख. प्रत्येक वेळी, अप्रतीम, सुंदर, जियो, असे प्रतिसाद किती वेळा देणार ? त्यामुळे, अशा उत्कृष्ट लेखनाला "रामदासी" लेख, असे नामाभिधान देतो. आता यापुढे मिपा वर कुठले ही लेखन वाचताना त्याची ग्रेड "सर्किट-ते-रामदास" (१ ते १०) ह्यापैकी कुठली आहे, ह्याचा विचार नकळत होत राहील. - सर्किट
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 07/11/2008 - 15:16 नवीन

१००%

सहमत.. हेच म्हणतो.. (एक पंखा) केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
म
मनीषा गुरुवार, 07/10/2008 - 08:32 नवीन

कविताचित्रं

तुम्ही तर कवितेचं शब्दचित्रं रेखाटलं आहे. कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. अजून लाखो कविता बाकी आहेत.चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. खरं आहे...
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 07/10/2008 - 09:31 नवीन

दर्जेदार

मनाला भिडणारे लेखन. आणखी प्रशंसा करून माझेच शब्ददारिद्र्य दाखवत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 07/11/2008 - 15:02 नवीन

अप्रतीम

अप्रतीम !!!! कडकडीत उन्हातून घरात आल्याआल्या वाळा घातलेले माठाचे पाणी घटाघटा पिऊन उरलेले चेहर्‍यावर शिंतोडून तसेच डोळे मिटून पंख्याखाली पडून राहिल्यासारखे वाटले. अगदी अशी अवस्था झाली..... येउ देत अजुन लेख येउ देत..... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
उ
उल्हास Wed, 09/28/2011 - 00:33 नवीन

अतिशय सुंदर लेख

अतिशय सुंदर लेख वाचुन मन तृप्त झाले.
  • Log in or register to post comments
म
मैत्र Wed, 09/28/2011 - 12:44 नवीन

अप्रतिम लेख

रामदास काकांचं हे गद्य काव्य निसटून गेलं होतं वाचनातून... वर आणल्याबद्दल शतशः धन्यवाद ! कितीही कोलाहलातून शांत अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य किती वेगवेगळ्या तर्‍हेने विविध विषयांमधून दाखवतात हे रामदासी लेख... एकेका वळणावर कविता भेटत राहीली आणि मनाचा उथळ प्रवाह डोह झाला, खोल झाला पण अंधारत ही गेला. वर्षभर नखाला जिव्हाळी लागावी तसं वाटत होतं. तेव्हाच वाटत होतं की आता गाठी सोडवण्याची वर्षं सुरु झाली. आमची कमळं परत उगवतील की नाही ते कळायला मार्ग नव्हता. हातासह सोन्याची सांज गुंफताना बगळ्यांची शुभ्र फुले मिळून मोजताना कमळापरी मिटत दिवस उमलूनी तळ्यात , बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. ============================================================== कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. अजून लाखो कविता बाकी आहेत.चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे काय लिहावं ... ग्रेस च्या कवितेसारखं त्या अनाहतपणात थोडं हरवून जावं बस्स... दंडवत फक्त..
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 09/28/2011 - 12:58 नवीन

संधी

लेख वर आलाय म्हणून आता लिहितो. हा लेख तेव्हाच वाचला होता. प्रतिक्रिया द्यायला शब्दही सुचत नव्हते. आत्ताही पुन्हा वाचला. शब्दांतून मांडणं शक्य नाही, कारण हा मामला 'एक अधिक एक बरोबर दोन' असा नाही. विशेषणं आहेत, तत्सम उद्गार काढता येतात. पण वर सर्केश्वरानं म्हटलं तेच खरं. :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 02/07/2013 - 04:24 नवीन

असच अगदी असच!

नुसत भरुन आलय वाचताना. श्रामो तुमचे शब्द नसते मिळाले तर अशीच परतले असते नि:शब्द! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
साबु Wed, 09/28/2011 - 13:45 नवीन

_/\_

.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 11/08/2011 - 23:01 नवीन

त्यावेळी प्रतिक्रिया देता आली

त्यावेळी प्रतिक्रिया देता आली नव्हती. आताही तशीच अवस्था. तुमच्या लेखनाचा वेगळा विभाग केला तर आम्हाला त्यावर टिचकी मारून हवे तेंव्हा वाचन करता येईल.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा