✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी

अ
अरुण मनोहर यांनी
Fri, 12/24/2010 - 07:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27635 वाचन

💬 प्रतिसाद (131)

प्रतिक्रिया

>>शहाण्या नवर्‍याने आपल्या

अरुण मनोहर
Fri, 12/24/2010 - 11:56 नवीन
>>शहाण्या नवर्‍याने आपल्या बायकोचा हात हातात धरुन चालणे<< ते सगळ्यांना कसे शक्य आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

>मुद्दाम आपल्या मागे राहून

यशोधरा
Fri, 12/24/2010 - 11:58 नवीन
>मुद्दाम आपल्या मागे राहून नवर्यावर लक्ष ठेवीत असाव्यात! त्याची गरज आहे, असे नवर्‍याच्या बायकोला अनुभवांती ठाऊक झाले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

हिहिहि

जाई अस्सल कोल्हापुरी
Fri, 12/24/2010 - 13:08 नवीन
हे मात्र मी करते.. प्रामणिक confession! माहेरुन येताना...घरचं हे...घरचं ते....म्हणुन वाढता वाढता वाढतात... आणि मग नवर्‍याचा पारा शुन्यमंडळ भेदतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

कालानुरुप बदल

kamalakant samant
Fri, 12/24/2010 - 12:44 नवीन
असे वाटते की या सर्व त्रासदायक गोष्टीमधे काळाचा मोठा हातभार असावा. लग्नान॑तर्ची काही वर्षे-त्रास जाणवत नाही. न॑तरची काही वर्षे -त्रास जाणवू लागतो. त्यान॑तरची काही वर्षे-चिडचिड सुरु. त्यापुढील काही वर्षे-तोही तिच्यासारखाच होतो कि॑वाश्रवण य॑त्र काढून ठेवतो कि॑वापूर्णपणे दुर्लक्ष.
  • Log in or register to post comments

काळाचा भाग येवढाच की

अरुण मनोहर
Fri, 12/24/2010 - 12:59 नवीन
काळाचा भाग येवढाच की लग्नानंतर एखाद वर्ष, हे असते, पण दृष्टीआड केले जाते. नंतर हळुहळु दृष्टी जास्त स्पष्ट होत जाते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kamalakant samant

एव्हढे असून सुद्धा एप्रिल -

मनीषा
Fri, 12/24/2010 - 13:05 नवीन
एव्हढे असून सुद्धा एप्रिल - मे मधे सर्व कार्यालये / हॉल्स कितीतरी आधी पासून बुक्ड असतात. जर आधी पासून बुकिंग (कार्यालय अथवा हॉल चे ) केले नाही तर लग्नाचा प्लॅन वर्ष - सहा महिन्यां साठी पोस्टपोन करावा लागतो .. म्हणजे पुढच्यास ठेच - मागचा शहाणा ही म्हण या बाबतीत लागू होत नाही तर .. असो !
  • Log in or register to post comments

सिंगल मिंगल असल्याने धाग्यावर

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/24/2010 - 13:07 नवीन
सिंगल मिंगल असल्याने धाग्यावर काही टिपणी नाही. धन्यवाद. कुशंका :- धाग्यात 'गुंतवणूक' ह्या सदराचा समावेश का करण्यात आला आहे ?
  • Log in or register to post comments

पर्‍या...

जाई अस्सल कोल्हापुरी
Fri, 12/24/2010 - 13:10 नवीन
शहाणा असशिल तर लग्न करु नको हो!...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

इण्डायरेक्टली सगळ्या

टारझन
Fri, 12/24/2010 - 13:16 नवीन
इण्डायरेक्टली सगळ्या विवाहीतांना येथे वेड्यात काढण्यात आलेलं आहे ... बघा बॉ . .. आपण नसतं ऐकुन घेतलं .. - येडा अण्णा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

शहाणा असशिल तर लग्न करु नको

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/24/2010 - 13:40 नवीन
शहाणा असशिल तर लग्न करु नको हो!...
मी शहाणाच आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

तु कधी शाना झाला ? काल

नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 15:24 नवीन
तु कधी शाना झाला ? काल तर..............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तु कधी शाना झाला ? काल

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/24/2010 - 15:59 नवीन
तु कधी शाना झाला ? काल तर..............
शानाच आहे मी. नाहितर तुमच्या खर्‍या आणि खोट्या आयडीचे आयपी तुमच्या हापिसात पाठवले नसते का? :) बाकी तुम्ही आमच्या फुकटच्या चौकशा करणे सोडून कामधंद्यात लक्ष घालाल तर मिळालीये ती नोकरी तरी टिकुन राहिल. नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

मिळाले मिळाले माझे आठच्या आठ

नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 18:46 नवीन
मिळाले मिळाले माझे आठच्या आठ आयडि कशे काय मिळाले रे तुला ? (आइला आज्काल माझ्याच लक्शात राहत नाहि, बरं झालं तु सान्गुन ठेवले ते). आनि ते ip पन एकदम बिनचुक आहेत रे, आनि हो, सल्ल्या साठि आभारि आहे. धन्य आहेत तु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

भाग्यवान आहात! सिंगल मिंगल

अरुण मनोहर
Fri, 12/24/2010 - 13:11 नवीन
भाग्यवान आहात! सिंगल मिंगल आल्वेज जिंगल्स! गुंतवणूक- हे गौडबंगाल नीट समजाऊन घेऊन भविष्यातील सुखी जीवनाची तरतूद सिंगल मिंगल्स करतील असे वाटले, तीच गुंतवणूक! किंवा मिपाच्या चालू भाषेत- गुंतवणुकीची शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

कॉलिंग युयुत्सु.....कॉलिंग युयुत्सु.....

गणपा
Fri, 12/24/2010 - 13:22 नवीन
सर्वप्रथम अरुणकाकांचा निषेध की त्यांनी युयुत्सु आजोबांच्या राखीव कुरणात तोंड घातलय. कॉलिंग युयुत्सु.....कॉलिंग युयुत्सु..... आता अरुण काकांचे आभार. त्यांनी आमच्या दु:खाला वाचा फोडुन देणारा धागा काढुन आम्हाला मंच पुरविला. सगळ्यात वाईट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट सवय कोणती असेल ते वाद विवाद करताना बाबा आदमच्या जमान्यातल्या गोष्टी उकरुन काढणे. एक तर देवाने स्मरणशक्ती कमी दिलेली त्यात्य यांचे असले जुने दाखले देउन वाद घालणे म्हणजे तोंड दाबुन मुक्क्या ( नीट वाचा क ला क जोडलाय ) मार. :( बरेच वेळा विसर भोळे पणाचा गैर फायदा घेउन आम्ही न केल्लेली विधान आमच्या माथी मारली जातात. आणि शेवटी काकांच डबल शेंचुरी बद्दल अभिनंदन. (एक इकडे आणि दुसरी शंभरी घरी भरेल ;) )
  • Log in or register to post comments

१.मॉलमध्ये एखादी गोष्टच

कानडाऊ योगेशु
Fri, 12/24/2010 - 13:35 नवीन
१.मॉलमध्ये एखादी गोष्टच घेण्यासाठी म्हणुन आपल्याला घेवुन जातात.पूर्ण मॉल फिरतात.आपल्यालाही फरफटत फिरवतात.दुनियेभराच्या वस्तु गोळा करतात.काऊंटवर गर्दी पाहुन फर्मान सोडतात तुम्ही रांगेत उभे राहा.मी ही आलेच. आणि तुम्हाला रांगेत उभे करुन पुन्हा चार वस्तु पाहायला पळतात.इकडे तुम्ही कासावीस.तुमचा नंबर येतोच आहे.मागच्याला पुढे जाऊ देऊ की आताच बिल भरु.आणि अगदी नेमक्या क्षणी बरोबर हजर होतात. (बर्याच वेळेला काऊंटरवरच घेतलेल्या वस्तुंमधील दोनचार वस्तु नको म्हणुन काढुन ठेवतात.) २.एखाद्या घेतलेल्या ड्रेसमधले तुम्हला न दिसणार/जाणवणारे वैगुण्य त्यांना नेमके घरी आल्यावरच दिसते.आणि पुन्हा मग त्या दुकानात यात्रा. ३.रात्री झोपतानाही तुमच्याशी त्यांना अगदी भरभरुन बोलायचे असते आणि तुम्ही जर का झोपलात तर "अहो तुम्ही ऐकताय ना हो?" म्हणुन तुम्हाला हलवुन जागे करतील. - (जोरू का गुलाम) योगेश.
  • Log in or register to post comments

योगेश , खरडीचा स्क्रीन - शॉट

सुहास..
Fri, 12/24/2010 - 13:44 नवीन
योगेश , खरडीचा स्क्रीन - शॉट घेउ का रे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

मॉल मधे गेल्यावर लेडिज सेक्शन

टारझन
Fri, 12/24/2010 - 13:47 नवीन
मॉल मधे गेल्यावर लेडिज सेक्शन मधे पाय दुखेपर्यत फिरलेलो आहे ... बरं तो म्हैलांसाठीचा सेक्शन असल्याने टाईमपास म्हणुन बघायला आमच्या साठी काही नसतं .. बर तासाभराने .. "तुला नक्की घ्यायचंय काय ? " असं विचारल्यावर .. "काही नाही रे .. असंच बघते आहे.. " असं उत्तर .. पण त्यातही मज्जा घ्यायला शिकलोय आम्ही :) कशी ? ते विचारु नका .. लेडिज पेश्शल मधे गेला असाल तर म्हाईत असेलंच =)) - ( प्रॅक्टिस मॅच मधे रमलेला ) तारझन
  • Log in or register to post comments

बायांची जात लई बेरकी...

योगप्रभू
Fri, 12/24/2010 - 16:01 नवीन
चीडचीड करुन काय उपयोग? बायकांना अजून पुरते जोखले नाही बाबांनो आपण. लई बेरकी जात. आपण येडे खुळे आहोत, हेच खरे. १) पेठे, लागू, गाडगीळ, तनिष्क असल्या शोरुमसमोरुन जाताना नवर्‍याला हळूच ढोसायचे आणि म्हणायचे, 'ते बघ. त्या शोकेसमध्ये लावलेली ती लॅम्पशेड आहे ना. तसे डिझाईन हॉलमध्ये करुन घ्यायचे मनात आहे. जरा गाडी थांबव बघू.' यानंतर मग 'थांबला तो संपला' या वाक्याची नक्की प्रचिती येते. २) यांची एखादी जुनी मैत्रिण वाटेत भेटली, की कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी उगाळत बसायच्या आणि रस्त्यात तासभर गप्पा मारायच्या. नवरे आपले इकडे तिकडे बघत उभे. पण तेच नवरा त्याच्या मित्राशी गप्पा मारत उभा राहिला, की पाच मिनिटातच पोरं हात खेचायला लागतात. 'बाबा! चल ना घरी लवकर. मला घाईची लागलीय.' बहुतेक बाबा लोकांना या प्रकाराचा कधीच संशय येत नाही. पण ही बायकांच्या जातीची खूप जुनी युक्ती आहे. ३) किमान शब्दात कमाल पाणऊतारा करण्याची कला यांना जन्मजात साध्य असते. एका नवर्‍याचा अनुभव सांगतो. एकदा त्याच्या बायकोला बाजारात मैत्रिण भेटली. तिचे केस अगदी दाट आणि कमरेपर्यंत लांब होते. पुढे एकदा तिचा उल्लेख निघाला असताना नवरा सहज बोलून गेला, 'आजकाल केसांची इतकी निगा राखलेली आढळणे दुर्मीळच' त्यावर बायको म्हणाली, 'हो. पण काय नशिबाचा योग बघ. हिचे केस एवढे लांबसडक आणि तिला नवरा मिळाला तो टक्कलछाप विरळ केस असलेला. निदान तुझ्यासारखे राठ केस असलेला मिळता तरी चालले असते.' (हा ज्याचा अनुभव आहे त्या नवर्‍याविषयी कृपया चौकशी करु नये. :)) हे अनुभव जनहितास्तव प्रसिद्ध केले आहेत. कळावे. श्री. विश्वास नंदीबैल
  • Log in or register to post comments

हा ज्याचा अनुभव आहे त्या

गणपा
Fri, 12/24/2010 - 16:01 नवीन
हा ज्याचा अनुभव आहे त्या नवर्‍याविषयी कृपया चौकशी करु नये.
भापो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

खी खी खी!

धमाल मुलगा
Fri, 12/24/2010 - 16:32 नवीन
आपण प्रभू आहात हे सिध्द आणि योगीही आहात हे देखील सिध्द करता आहात. :) >>यानंतर मग 'थांबला तो संपला' या वाक्याची नक्की प्रचिती येते. आयच्च्यान्! लै जोरात आवडलं हे! शप्पथ.
यांची एखादी जुनी मैत्रिण वाटेत भेटली, की कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी उगाळत बसायच्या आणि रस्त्यात तासभर गप्पा मारायच्या. नवरे आपले इकडे तिकडे बघत उभे
रोखून बघत रहायचं...मैत्रिणीकडं. न्याहाळायचं..बायकोला समजेल असं. आणि नंतर "ही ती तीच ना गं? बरीच वेगळी दिसतेय ह्यावेळी.." वगैरे काहीतरी फडतूस बोलायचं. सख्ख्या बायकोला तिच्या नवर्‍यानं जरी आज तू वेगळी दिसतेयस असं म्हणलं तरी लग्गेच विश्वास बसतो, तिथं परक्या स्त्रीबद्दल काय अविश्वास दाखवणार? ;)
पण तेच नवरा त्याच्या मित्राशी गप्पा मारत उभा राहिला, की पाच मिनिटातच पोरं हात खेचायला लागतात. 'बाबा! चल ना घरी लवकर. मला घाईची लागलीय.' बहुतेक बाबा लोकांना या प्रकाराचा कधीच संशय येत नाही. पण ही बायकांच्या जातीची खूप जुनी युक्ती आहे.
"एऽऽ..ह्याला/हिला/ह्यांना घेऊन तू घरी जा गं. मी ह्याच्यासोबत जरा जाऊन येतो.".."चल रे" असं म्हणून डायरेक्ट चालू लागायचं ;) नंतर घरी गेल्यावर काय होईल तो होईल हंगामा! अरे....मेलेलं कोंबडं काय अगीला भितं का? :D >>किमान शब्दात कमाल पाणऊतारा करण्याची कला यांना जन्मजात साध्य असते. ह्याला पर्याय नाय बा. आपण सोईस्कर बहिरे होणं हेच बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

धमु! मला एक उपाय सुचतोय..

योगप्रभू
Fri, 12/24/2010 - 16:58 नवीन
बायकोने पुन्हा कधीही आपल्याला तिच्या मैत्रिणीसमोर ताटकळत उभे करु नये म्हणून मला एक उपाय सुचतोय. आपण बिनधास्त आजच्या तरुणाईच्या भाषेत बायकोला म्हणायचे,' तुझी मैत्रिण म्हणजे अगदी रापचिक आयटम/चिकणा बिण्डा/कंडा पीस/ जबरी माल आहे नाही?' (सर्व देवींनी ह. घ्यावे. कोपू नये.) खूप शिव्या खाव्या लागतील, पण काहीतरी परिणाम नक्की दिसून येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हे त्या मत्रिणीने ऐकायला

अरुण मनोहर
Fri, 12/24/2010 - 17:01 नवीन
हे त्या मत्रिणीने ऐकायला पाहीजे अशा रितीने म्हणा. बायको रागावेल, पण मैत्रीण पटण्याचे चान्सेस खूप आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

सही जवाब...

योगप्रभू
Fri, 12/24/2010 - 17:09 नवीन
हा हा हा खरोखर मनोहर कल्पना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

खी खी खी!

धमाल मुलगा
Fri, 12/24/2010 - 17:46 नवीन
हे म्हणजे 'एक दाम मे दो काम' झालं की. लेट'स ट्राय ;) गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नायतर मोडून खाल्ली (लाथा/फटके जे असेल ते.) श्री.श्री.श्री. योगप्रभू महाराज ( ;) ), फारच सुंदर कल्पना आहे. (टीपः माझ्या बायकोच्या कोणत्याही मैत्रिणीचं नाव कल्पना नाही.) नक्कीच फायदा होईलसं दिसते. यत्न करणे आपुल्या हाती..यश देणे न देणे त्या जगनियंत्याची मर्जी! पण तो व्योमाधिपती मोठा दयाळू आहे. काही ना काही कृपा करेलच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

श्री धमाल मुलगा ; तुमच्या या

विजुभाऊ
Fri, 12/24/2010 - 17:25 नवीन
श्री धमाल मुलगा ; तुमच्या या प्रतिसादाचा स्क्रीनशॉट तुमच्या शनीवारातील घरी पाठवण्यात येत आहे. सबब आज घरी जाताना अंगभर झंडू बाम लावून जायची व्यवस्था करा. ( सध्या झंडू बामचा स्टॉक लवकर संपतो असे कळतय )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

इर्षाद!

धमाल मुलगा
Fri, 12/24/2010 - 17:38 नवीन
;) आपल्याच मित्रांनी असं वागायला लागल्यावर ह्या जगात दुष्मनाची गरजच काय? >>( सध्या झंडू बामचा स्टॉक लवकर संपतो असे कळतय ) आँ? म्हणजे? तुम्हीही प्रयत्न करुन पाहिलेला की काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

झक्कास धागा. :)

धमाल मुलगा
Fri, 12/24/2010 - 16:16 नवीन
मजा येणार. अरुणकाका, नुकताच मी नविन प्रकार शिकलोय. ह्या दहा सवयींवर बर्‍याचदा लागू पडतोय. (अर्थात नविन आहे म्हणून असेल..एक्दा सवय झाली की परत नवं शोधावंच लागेल..काय करता गरज ही शोधाची जननी आहे.) हां, तर नविन प्रकार हा, की बायकुनं असं काही विचारलं की आपण सरऽळ आध्यात्मिक व्हायचं ;) शॉल्लेड मजा येते. (पण चेहर्‍यावरचा गंभीरपणा मुळीच हटू द्यायचा नाही. फिस्सकन हसु येतं ते आवरायचं.) उदाहरण द्यायचं झालं तरः
सततची बडबड करूनही ह्यांच्या घशाला कोरड कशी पडत नाही, हे काही उमगत नाही. साधी आज घडलेली घटना सांगायची असेल तर दोन महिन्यापुर्वी घडलेल्या तिसऱ्यांच्या गोष्टी पासून सुरवात करून पूर्ण गावाच्या गप्पा ऐकवून शेवटी आज काय घडले ते सांगणारच नाही.
मांडी घालून ताठ बसा. अशा अवस्थेत छान डुलकी काढायची सवय करुन घ्या. एकदा प्रवचन सुरु झालं की सरळ माडी घालून बसायचं आणि मस्त झोप काढायची. नियमाप्रमाणं, "इतका वेळ मी काय बडबतेय? भिंतीशी बोलतेय का?" वगैरे समारोपाचे शब्द आपल्याला गदागदा हलवत आदळतातच. डोळे उघडून प्रसन्न हसायचं आणि म्हणायचं, "अरे, अचानक समाधीच लागली." ;)
कुठल्याही विषयावर बोलतांना, अचानक संदर्भ बदलून दुसरेच कुठले पुराण लावणे. चिड ह्याची देखील येते, की समोरच्या दुसऱ्या बाईला हे बदलते संदर्भ सहज कळतात, आणि आपण अतीव गोंधळात पडतो. मग "हे म्हणजे अस्से आहेत" ही टिप्पणी ठरलेलीच.
सहमत! ह्यावर उपाय नाही. आपण फक्त मान डोलवायची असते.
ह्याच्या कडची सगळी मंडळी एकजात बेरकी, छळवादी, हेकेखोर, दुष्ट आणि काय काय, तुम्ही रिकाम्या जागा भरा. अर्थात, माहेरचे सगळे सद्गुणाचे पुतळे, हे ओघाने आलेच!
आध्यात्मिक पोपटपंची फेकायची हो. "जे नजरेला दिसतं तेच सत्य मानणं हे नेहमीच सत्य आचरण नसतं. ..." वगैरे वगैरे...फुल्ल ब्याटिंग करायची.
आज मी कोणती साडी नेसू हो? कुठलेही उत्तर ह्यांच्या पसंतीस येणार नाही.
उत्तरः "देह झाकायला जे जे योग्य ते ते सारेच उत्तम! आता आस लागली आहे ती मनाची कवाडं उघडण्याची! " पाऽऽर भिंगरी करुन टाकायची राव समोरच्याची.
आधी तर चूक कबूल करायचीच नाही. जर यदाकदाचित पद्धतशीरपणे वाद घालून तुम्ही कोंडीत पकडले आणि दाखवून दिले, की तिचीच चूक आहे, तर- नुसते गप्प बसणे, अशृशस्त्र उपसणे, तिथून तरातरा निघून जाणे, असे असंख्य उपाय केले जातात. "सॉरी, माझे चुकले" असे शब्द किती वेळा बायकांकडून ऐकले आहेत?
उत्तरः "सच्चिदानंद! सच्चिदानंद!! तुझ्या तोंडूनही साक्षात भगवंतच वदतो आहे, माझ्याही तोंडून तोच वदतो आहे. सारा त्याचाच खेळ! अश्रुपात करु नकोस, त्यापेक्षा शक्तीपाताची दिक्षा का घेत नाहीस तू?"
कुणी काहीतरी ह्यांच्या मनाविरुद्ध केले असते, आणि निशाणा भलतीकडेच लावतात. पुष्कळदा नवराच ह्यात सापडतो. कधी मुले चुकून हाताशी लागली तर तीही बळी पडतात.
पर्याय नाही! :( जमलंच तर पुन्हा मांडी, पाठीचा कणा ताठ आणि झकास डुलकी..हे आपलं..समाधी! ;)
ह्यांच्या रागाचे मुख्य कारण काय, ते नेहमी लपवून ठेवणार. भलत्याच बाबतीत आदळाआपट करणार. तुम्ही बरोब्बर ओळखावे अशी अपेक्षा असते. मग तुम्ही तसे प्रयत्न करायला लागलात की जाळ्यात सापडता, आणि ह्या स्वत:ची करमणूक करून घेतात.
उत्तरः "भगवंता, तुझ्या अजाण लेकराची अशी परिक्षा घेतोस होय? तू अनादी, तू अनंत!! मी पामर काय ओळखणार? हे सद्गुरू, तूच आता त्राता. तूच मार्ग दाखव. " ;)
कितीही वेळा सांगा, तू खूप सुंदर दिसतेस, पुन्हा तोच प्रश्न वेगळ्या शब्दात तुमच्याकडे येईल. तोच प्रकार ही डीश कशी झालीय, किंवा हा ड्रेस कसा दिसतोय इत्यादी बाबतीत. तुम्ही वाचास्पती असलात तरी समाधान करणे कठीणच.
उत्तरः "माई, हे साऽरं सापेक्ष नाही का? तुझ्या मनःशांतीसाठी मी रोज प्रत्येक गोष्टीला 'छान' हे उत्तर देईनही.. तूच सांग, काय करु? मला तर आजकाल सारं जगच सुंदर दिसू लाग्लं आहे." ('माई' शब्द महत्वाचा. बायको चरकलीच पाहिजे. ;) )
स्त्रियांचे तर्कशास्त्र पूर्णपणे समजू शकणारा कोणी पुरुष दाखवा आणि लाख रुपये कमवा अशी जाहिरात दिली तर....?
'हा हा हा! तो जिवंत राहिल का? ;)
स्त्री आणि पुरुष ह्यांना समान अधिकार हवेत, म्हणजेच स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त समान हवेत अशी धारणा.
थोडे दिवस जास्त समान का? पुर्णाधिकार देऊन टाका. काहीही विचारलंच तर एकदा 'सच्चिदानंद सच्चिदानंद!'असा (किंवा तत्सम) पुकारा करुन "तूच काय ते ठरव. मला हल्ली ह्या ऐहिक जगात काहीच राम दिसत नाही की काही सुचत नाही." असं टेचदार उत्तर उत्तर द्यायचं. थोडक्यात काय, तर "आपला नवरा आता हातात राहतो, की जातो सगळं सोडून हिमालयात" अशी भिती वाटायला लागली पाहिजे. ;) टीपःभुमिकेला वजन येण्यासाठी आधी साधारण महिनाभर आध्यात्मिक विषयांवरचे निरनिराळे ठोकळे पुस्तकं घरी आणून ठेवावी. रोज त्यातलं थोडं का होईना वाचन करावं. त्याने ऐनवेळी फेकायला चांगल्या भरदार पल्लेदार वाक्य-शब्दांची बेगमी होते. तीन महिन्यांनी पुन्हा या कन्सल्टेशनसाठी. आत्ताची फी बाहेर द्या. फक्त $३०००/- ;)
  • Log in or register to post comments

हा हा हा काय चावटपणा लावलाय?

शुचि
Fri, 12/24/2010 - 16:28 नवीन
हा हा हा काय चावटपणा लावलाय? धमु तू बायकांच्या भोळेपणाचा फार गैरफायदा घेतो आहेस बरं का :) ......... हा एक तर डबल बार झाला. बायको मुद्दाम लाडीक वागणार, सेवा करणार , आपलसं करून संसारात ओढायला बघणार. नवर्‍याची मजा न काय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ही ही ही!

धमाल मुलगा
Fri, 12/24/2010 - 16:33 नवीन
;) काय करणार? गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

जगदंब! जगदंब! धम्या इश्वर

अरुण मनोहर
Fri, 12/24/2010 - 16:53 नवीन
जगदंब! जगदंब! धम्या इश्वर तुझे रक्षण करो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ख्या ख्या ख्या!

धमाल मुलगा
Fri, 12/24/2010 - 17:42 नवीन
अहो गेले दोन महिने तोच इश्वर, जगदंबा, सद्गुरू, सच्चिदानंद वगैरे सगळी मंडळी माझं रक्षण करतायत. :D 'नर्मदेऽ हर हर' पुस्तकाच्या मागच्या पानावरचा श्री.जगन्नाथ कुंटे ह्यांचा सिगारेट घेऊन असलेला फोटो दाखवून मीही टेचात सिगारेट ओढतोय...अगदी बिन्धास्त ;) वर आक्षेप आला की पुस्तकातलंच त्यांचंच वाक्य फेकतो.."शरीराचे भोग आहेत हे..भोगु दे त्याला. आपण आतुन शुचिर्भूत आहो हेच पुरेसं" वगैरे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

हा हा हा! लै भारी! ह. भ. प.

नगरीनिरंजन
Fri, 12/24/2010 - 18:20 नवीन
हा हा हा! लै भारी! ह. भ. प. धमुमहाराज बारामतीकर की जय! महाराज, तुमची दीक्षा घ्यायची इच्छा आहे. तुमचा रेट काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आम्ही आयकले की बायकास्नी

अरुण मनोहर
Fri, 12/24/2010 - 18:28 नवीन
आम्ही आयकले की बायकास्नी वेगळा, बाप्यांस्नी वेगळा. आता तुमच्या नावाने योग्य खुलासा होतो म्हना! त्यामुळे तो पीरॉब्लेम नाही. पण उत्तर आलेच तर ते वाचून इतरांनी गैरसमज करून घेऊ नाये म्हूनशान धमुबाबांच्या तर्फे खुलासा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

<दचकल्याची स्मायली>

धमाल मुलगा
Fri, 12/24/2010 - 18:30 नवीन
@निर्‍या: अंय...असल्या हलकट सवयी न्हाईत मला. :D @अरुणकाका: ओ गपा की राव. का मला खिडकीत बशिवताय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

आयला मी आपलं सरळ विचारलं राव,

नगरीनिरंजन
Fri, 12/24/2010 - 18:46 नवीन
आयला मी आपलं सरळ विचारलं राव, मनोहरकाकांनी मधीच 'हिरवा' अंगठा दाखवून तुला दचकवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हा हा हा!

धमाल मुलगा
Fri, 12/24/2010 - 19:10 नवीन
आणि तिकडं खोटं सांगतायत अंगठा 'भगवा' पडलाय म्हणून. =)) >>आयला मी आपलं सरळ विचारलं राव असं 'रेट' वगैरे म्हणू नये रे. फारच थर्डरेट वाटतं ;) कन्सल्टेशन फी म्हणावं, दक्षिणा म्हणावं, गेलाबाजार 'हे ज्ञान क्येवड्याला देनार?' असंतरी विचारावं..डायरेक्ट रेट? आँ? काय माझ्यावर लोकप्रभेत लेख छापून आणायचा डाव आहे काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

लोकप्रभेत लेख छापुन आणता

अवलिया
Fri, 12/24/2010 - 19:14 नवीन
लोकप्रभेत लेख छापुन आणता येतात? आणि साप्ताहिक सकाळचे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

लावालाव्या...

अरुण मनोहर
Fri, 12/24/2010 - 19:17 नवीन
>>आणि तिकडं खोटं सांगतायत अंगठा 'भगवा' पडलाय म्हणून. =))<< इकडचे तिकडे असे करू नाही धमु बाळा! >>असं 'रेट' वगैरे म्हणू नये रे. फारच थर्डरेट वाटत<< ह्या लीडींग वर्डमुळेच मी मिसगाईड झालो होतो. रेट लीड्स टू ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

असुद्या!

धमाल मुलगा
Fri, 12/24/2010 - 19:25 नवीन
>>इकडचे तिकडे असे करू नाही धमु बाळा! करावं. नायतर मग ह्या लेखात पडलेत तसे प्रश्न पडतात. :P >ह्या लीडींग वर्डमुळेच मी मिसगाईड झालो होतो. रेट लीड्स टू .... हौ ना राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

>>करावं. नायतर मग ह्या लेखात

अरुण मनोहर
Fri, 12/24/2010 - 19:32 नवीन
>>करावं. नायतर मग ह्या लेखात पडलेत तसे प्रश्न पडता>><< उपदेश वरवर ठीक आहे. पण डेंजरस आहे. काहीही होउ शकते. तुम्हाला काही चांगला अनुभव आहे का? (इकडचे तिकडे करून)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हौ!

धमाल मुलगा
Fri, 12/24/2010 - 19:34 नवीन
वरच उदाहरणं दिली की.. आध्यात्मातलं प्रपंचात, प्रपंचातलं आध्यात्मात ... :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

'नर्मदेऽ हर हर' पुस्तकाच्या

विजुभाऊ
Fri, 03/09/2012 - 16:56 नवीन
'नर्मदेऽ हर हर' पुस्तकाच्या मागच्या पानावरचा श्री.जगन्नाथ कुंटे ह्यांचा सिगारेट घेऊन असलेला फोटो दाखवून मीही टेचात सिगारेट ओढतोय... धम्या तुला एक आयडिया देतो. बायकोला सातारा रस्त्यावरच्या शंकर महाराज मठात ने........ तेथे उदबत्यां ऐवजी सिगारेटी लावलेल्या असतात. ( एक काळजी घे पोराला नेऊ नकोसंआयतर तुझा पाकिटातल्या सिगरेटी तुला देवघरात सापडतील )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

बायकोला जागेवर आनन्याचे

नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 19:29 नवीन
बायकोला जागेवर आनन्याचे 'धम्याचे' १०१ उपाय. पुस्तिका काढत आहे. ५०-५०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आमची कापी नोंदवायची आहे.

अरुण मनोहर
Fri, 12/24/2010 - 19:33 नवीन
आमची कापी नोंदवायची आहे. धम्या डिसकाउंट मिळेल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

आप्ल्याला एक कापि

नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 19:37 नवीन
आप्ल्याला एक कापि फ्री-गिफ्ट. आप्ल्यामुळं तर हि शिक्रेटं भायेर आलि नव्हं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

रॉयल्टी...

धमाल मुलगा
Fri, 12/24/2010 - 19:43 नवीन
समाजातील एका प्रबळ संख्येच्या, परंतु शोषित आणि हतबल अशा एका मुख्य वर्गाला जर ह्यातून आधार मिळणार असेल, होणार्‍या अन्यायाविरुध्द दृढ उभे राहणे होणार असेल तर मी लेखक ह्या नात्याने रॉयल्टी घेणेचे नाकारत आहे. पुस्तकाचे प्रकाशन आणि वितरणदेखील पारंपारिक साखळीतून न व्हावे ह्याबाबत आग्रही असेन. जेणेकरुन इतर पुस्तकांना जेव्हढा 'डिस्काउंट' मिळतो तेव्हढ्या किमतीत हे पुस्तक सर्वस्तरीय वाचकांपर्यंत पोहोचावे. कोणासही केवळ आर्थिक कारणाने वंचित रहावे लागू नये हीच इच्छा! @नरेशकुमारः ते 'बायकोला जाग्यावर आणण्याचे.' वगैरे टायटल जास्तच प्रक्षोभक होईल असं वाटत नाही का? की अशा नावाने हुल्लड व्हावी अन 'एनी पब्लिशिट्टी इज गुड पब्लिशिट्टी' ह्या न्यायाने असे शिर्षक योजले आहे? कळावे, आपला अविश्वासू धम्या बारामतकर. (व्ह.फा. फेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

धमुराव, तुम्हिह्च सान्गा काय

नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 19:49 नवीन
धमुराव, तुम्हिह्च सान्गा काय शिर्शक ठुवायचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

>>बायकोला जागेवर आनन्याचे

धमाल मुलगा
Fri, 12/24/2010 - 19:59 नवीन
>>बायकोला जागेवर आनन्याचे 'धम्याचे' १०१ उपाय 'दुर्बलांचा लढा' 'हू मूव्ह्ड माय पनीर?' 'येस! यु कॅन विन' 'यशाचे सोपान' 'द मॅन हू टर्न्ड इन टू मॉन्क' 'हे भलते अवघड नसते...' 'नवरेहितवादी ह्यांची निवडक पत्रे' ह्यातलं कोन्तं ठीक वाटतं? टीपः अर्पणपत्रिकेत २ नावं हवीत. आदरणीय श्री.युयुत्सु आणि ज्यांची विचारचक्रासाठी मोलाची मदत घडाली ते श्री. अरुणकाका मनोहर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

'दुर्बलांचा लढा' हे कसं एकदम

नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 20:07 नवीन
'दुर्बलांचा लढा' हे कसं एकदम आतुन आल्यावानि वाटतं. नाव वाचुन लढ्यात जिव झोकुन देन्याचि खुमारि येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा