(पडुन आहे गात्र कुजुनि)
प्रियालीतैंच्या "भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य" या धाग्यावर केलेलं विडंबन आहे. तेव्हा दोनच कडवी लिहिली होती. आता पूर्ण काव्याचं विडंबन देतो आहे. सुरेश भट साहेबांच्या या अजरामर कलाकृतीचं हे बीभत्स विडंबन केल्याबद्दल त्यांची माफी मागतो. सिच्युएशन अशी आहे : प्रेयसीला सोडून प्रियकर एकटाच जळाला आहे. तिला प्रेत आणि आत्मा यांच्या वेशीवर सोडून तो एकटाच सुटला आहे.
पडुन आहे गात्र कुजुनि, राजसा जळलास का रे?
सोडुनि मज प्रेतरूपी, एकटा पळलास का रे?
अजुनही विझल्या न मसणि तव चितेच्या उग्र ज्वाला
अजुन मी जळले कुठे रे हाय तू शिजलास का रे?
आग या मसणात पडलेल्या शवाला लाव ना तू
कुजतसे अंगांग माझे, येत आहे वास का रे?
बघ जरा कुजतोच आहे, दक्षिणेचा हात माझा
नाक आणि कान कुजले, एवढा उरला घसा रे
उसळती पोटात माझ्या आम्लपित्ताच्याच लाटा
आतडे फुटले बिचारे, यकृताचीही दशा रे
गोठलेले थंड सारे, गात्र करि हे बंड सारे
विझुन गेलेल्या चितेवर अजुनही मज भरवसा रे
******************************************************************
मूळ गीत. तरूण आहे रात्र अजुनि
वाचने
6629
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
वाह वाह! वाह वाह!!
व्यॉSSSSक!!
In reply to व्यॉSSSSक!! by असुर
अगदी
In reply to व्यॉSSSSक!! by असुर
+१
In reply to +१ by सूड
+२
In reply to +२ by नंदन
+३
:-)
अति कुजकट झाले आहे
ख त र ना क !!!
मस्त!
In reply to मस्त! by राजेश घासकडवी
+१
भयानक! बीभत्स रसाला छान छान
इनो घ्यावंसं वाटतंय !!
मस्त अमोल
कळस!
मस्त रे मेव्या :
भय रसाच्या ऐवजी बीभत्स रसात
खल्लास तरूण आहे रात्र अजुनि
जबराट ... गोठलेले थंड सारे,
वॅक्क ! वॅक्क्क्क्क