✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सार काही क्षम्य असतं

व — विजुभाऊ, गुरुवार, 05/22/2008 - 14:35

प्रतिक्रिया द्या
8749 वाचन

💬 प्रतिसाद (26)
म
मनिष गुरुवार, 05/22/2008 - 14:38 नवीन

फिदा.....

कधी कातरवेळी.... संध्याकाळी ..... आठवणी जागवुन हे सगळे क्षण पुन्हा अनुभवणं... जगणं.... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......
सकस छे!!! :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 14:48 नवीन

वाह!

पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणं अन मानेच्या हालचाली बरोबर ते कानातल्या लोलकांचे डुलणं ..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं....... वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......
हाय्य !!!! खल्लास आपण.... एकदम वास्तववादी तरीही रमणीय :) सुंदर !
माझं अधांतरी जगत स्वप्नं रंगवणं.... त्या स्वप्नांना तू जमिनीवर आणणं... आणि मी कावराबावरा असताना तुझं मला स्पर्ष करणं.... त्या स्पर्षाचा निरागसपणा अनुभवणं...... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं.......
लाखमोलाची गोष्ट ४-६ ओळीत सांगितलीत भाऊ. मस्त.
कधी कातरवेळी.... संध्याकाळी ..... आठवणी जागवुन हे सगळे क्षण पुन्हा अनुभवणं... जगणं....
हम्म्म....छानच. म्हणजे, ...नकोच बुवा...नाही त्या गोष्टी नको त्या वेळी नकोत बोलायला. लगे रहो विजुभाऊ :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 05/22/2008 - 15:39 नवीन

असेच म्हणतो

सही जमलिये एकदम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मनिष गुरुवार, 05/22/2008 - 14:55 नवीन

राहवत नाही म्हणुन

अगदीच राहवले नाही म्हणून माझ्या आवडत्या ओळींचे, जमेल तसे स्वैर भाषांतर....
मेरा युंही ख्वाबों मे खोये रहेना, और तुम्हारा वो ख्वाबों की तावीर की बातें करना, मै सहम जाऊ तो वो हलकेसे मुझे छू लेना... तुम्हारे छुने का अहेसास, वो छूने की मासुमियत, ये सब इतना लुभावना है, के हजार गमों को भी इनमे बह जाना है|
विजुभाऊ - जियो!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 05/22/2008 - 15:29 नवीन

मस्त विजुभाऊ

त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं....... त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......
छान जमलंय.
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 05/22/2008 - 17:36 नवीन

वार्‍यामु

वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं....... :) हे खास ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/22/2008 - 17:40 नवीन

वा! वा!

आल्यावर डोळ्याच्या कोपर्‍यातुन मी किती रागावलोय ; याचा अंदाज घेणं..... तुझं हे असं पहाणं...... क्या बात है...! वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... मार डाला! विजूभाऊ, सुंदर कविता...! तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 05/22/2008 - 17:43 नवीन

क्या बात है विजुभाऊ!

मस्त काव्य! (स्वगत - हा विजुभाऊ स्वप्नात पाडगावकरांच्या घरी जाऊन आला की काय? :W :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 05/22/2008 - 17:47 नवीन

द॑डवत तुम्हाला.

वीजुभाऊ एकदम अफलातुन काव्य रचना,मस्त. स्वप्नातुन उतरून एवढे खतरनाक वास्तविक काव्य सही.
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 05/22/2008 - 17:48 नवीन

असेच

काव्यासाठी वेगळा विभाग सुरू करायला हवा. तात्या ऐकताय ना ?
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 05/22/2008 - 17:59 नवीन

अप्रतिम

झक्कास्.....खूपच सुंदर कविता.... वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं....... आय हाय!
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/22/2008 - 18:59 नवीन

सुंदर...

माझं अधांतरी जगत स्वप्नं रंगवणं.... त्या स्वप्नांना तू जमिनीवर आणणं... आणि मी कावराबावरा असताना तुझं मला स्पर्ष करणं.... त्या स्पर्षाचा निरागसपणा अनुभवणं...... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं....... हे अतिशय छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 05/22/2008 - 20:30 नवीन

व्वा मस्त.....

कधी कातरवेळी.... संध्याकाळी ..... आठवणी जागवुन हे सगळे क्षण पुन्हा अनुभवणं... जगणं.... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं....... या ओळी खासच... आवडल्या.... बाकी, तुम्ही काव्य कधी पासून करायला सुरवात केली? सही आहे वरील कविता...
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/22/2008 - 20:59 नवीन

वाहवा!

विजुभाऊ, सगळीच कविता इतकी आवडली कि कुठल्या १-२ ओळिच आवडल्या म्हणून उल्लेखच करू शकत नाही. एकदम मस्त. (सुंदर कविता वाचून नि:शब्द झालेला) डॅनी. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/22/2008 - 22:20 नवीन

वार्‍यामु

वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं....... आय हाय! अगदी अगदी!! एकदमच आय हाय!! मस्तच लिहीलय!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 05/23/2008 - 00:07 नवीन

मस्त कविता

रम्य कल्पना. ती शेवटच्या कडव्यातील कल्पना फार आवडली! (पण शेवटचे कडवे बाकीच्या कवितेशी प्रवाहीपणे जोडलेले वाटत नाही - माझे तसे वाटणे क्षम्य असावे... )
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/23/2008 - 17:57 नवीन

सुंदर कविता !!!

विजुभौ,

प्रेमावर कितीही वेळ बोलत राहिलो, लिहित राहिलो तरी विषय कधीच न संपणारा,
रिकाम्या वेळात तो अनुभव आपल्या मनाभोवती पिंगा घालत असतो. तशी आपली
मनभर फिरणारी....सुंदर कविता.

'' क्लासला दांडी मारुन माझं बसस्टॊप वर
विनाकारण उभे रहाणं क्षम्य असत ''

आपण  बस स्टॉपवर तासन तास  वाट पाहावी,
अन् तिने आपल्या असण्याचा  लांबून अंदाज घ्यायचा अन
निघुन जायचं, हे तर फार जिव्हारी लागतं...!!!!


'' पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणं
अन मानेच्या हालचाली बरोबर
ते कानातल्या लोलकांचे डुलणं .....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं "

बस, याचसाठी केला अट्टाहास तो क्षण सुखाचा व्हावा !!!!
अजूनही फावल्या वेळात सुंदर स्त्रीयांची  निरिक्षणे चालली,  तर कानातल्या लोलकांवर आमची  नजर हमखास जातेच.
टिकली जर चंद्रकोर असेल तर मेलोच आम्ही :)

''वार्‍यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की''

विजुभौ,  दिलसे  प्रेम ज्यानं  केलं, त्याला हे सर्व आठवतं, सुचतं.....
वा-यामुळे भुरभुरणा-या  केसांची बट मागे घेण्याची तिची अदा
जीवघेणीच..... आणि  हे सर्व केव्हा आठवतं माहित आहे

कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....
हे इतकं रम्य असतं की

डोळे खरंच भरतात की असे वाटायला लागते. या निमित्ताने  आम्हाला एका कवीच्या कवितेची आठवण होते.

" माझ्याच प्राक्तनात
का वैशाख उन आले,

जेथे विसावलो मी
तिथे तुफान आले. "

सारांश कविता तुमची असेल, पण अनुभव अनेकांचा  मांडला राव !!! लिखते रहो, विजुभौ

- दिलीप बिरुटे

  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Fri, 05/23/2008 - 20:05 नवीन

झकास्स

वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं....... हय क्या बात कही है
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/24/2008 - 05:00 नवीन

तुझ्यावर रागावण्याचं कारणच .....

वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं....... हे लई बेस्ट..... (अवखळ पोरगा) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
ब
बकुळफुले Sat, 05/24/2008 - 10:39 नवीन

विजुभाउ प्रेमात पडलेत

विजुभाउ प्रेमात पडलात की काय त्या मलेशियन ऍन ताइंच्या. बाकी मस्तच आहेत तुमचे शब्द. तुम्ही कविता लिहित असाल हे आमच्या स्वप्नात ही आले नव्हते ( तुमच्या स्वप्नात आले असेल आणि तुम्ही त्या धक्क्याने जागे झाले असाल) फक्त एक करा कविता तेवढ्या क्रमशः लिहु नका तुमच्या लेखनाचा आस्वाद घेणारी बकुळफुले
  • Log in or register to post comments
म
मयुरयेलपले गुरुवार, 05/29/2008 - 00:40 नवीन

हाय येड लावल.......

हाय येड लावल....... ओ तुमच्या कवितेनि घायाल केल..... आपला मयुर
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य गुरुवार, 05/29/2008 - 12:49 नवीन

मस्तच!!

कधी कातरवेळी.... संध्याकाळी ..... आठवणी जागवुन हे सगळे क्षण पुन्हा अनुभवणं... जगणं.... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं....... क्या बात है!! मस्तच!! लगे रहो!!!
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Mon, 09/15/2008 - 12:52 नवीन

ते

ते कानातल्या लोलकांचे डुलणं ..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं....... मस्त!!!!.......... जबरा!!!......... चाबुक..... फंडु..... ..... ... .. . नि:शब्द!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :) विजुभौ... परत १ कुतुहलः तुमचा 'प्रेम-विवाह' झालाये का?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/15/2008 - 13:05 नवीन

का?

विजुभौ... परत १ कुतुहलः तुमचा 'प्रेम-विवाह' झालाये का? का त्या जखमी सैनिकाच्या जखमा डिवचता आहात? कविता छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/15/2008 - 13:10 नवीन

>>>का त्या

>>>का त्या जखमी सैनिकाच्या जखमा डिवचता आहात? =)) का उगाच मीठ चोळत आहात असे देखील वाक्य येथे चालू शकेल ना पेठेकर'काका ;) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विजुभाऊ Mon, 09/15/2008 - 13:18 नवीन

मरहम

मरहम लगाने के बहाने से सौ आयेंगे मरहम लगाने के बजाय जख्म कुरेद जायेंगे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा