Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काही सुधाराव्याशा वाटणार्‍या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा...

भ
भडकमकर मास्तर यांनी
Wed, 05/21/2008 - 02:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
50071 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

म
मन Wed, 05/21/2008 - 03:05 नवीन

अगदि

मनातले प्रश्न बोललात. मलाही हेच सारे(आणि इतरही अशेच अनेक) प्रश्न पडलेत. पण आपण अगदी नेमक्या शब्दात बोललात. (आणखी एक उदाहरणः- दि.चा है मध्ये ही प्रीती झिंटा-आमिर प्रकरणाचा एंड असाच आहे. थोडक्यात काय एखाद्याची होणारी बायको पळवल्याशिवाय ह्या हीरो मंडळींना चैन पडेनासं झालय.) आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Wed, 07/16/2008 - 23:50 नवीन

पण

दि.चा. है मध्ये प्रिती झिंटा आणि आमीर यांच्यातील प्रेम अव्यक्त आहे. ते दोघे परस्परांना मित्र म्हणूनच भेटत असत. दिदुलेजा मध्ये नायिका(?) प्रेमाचा इजहार वगैरे करुन बसली आहे. दिचाहै मध्ये नायक तिला सर्वात शेवटी प्रेमाचा इजहार करतो. ही बाब लक्षात घ्यायला हवी. आपला, अन्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
ट
टारझन गुरुवार, 07/17/2008 - 00:20 नवीन

अगदी सहमत

दिल चाहता है आम्ही थेटरात ३ दा आणि कंप्युटर वर ३५ वेळा पाहीलाय बहुतेक.. ३० नंतर काऊंट सोडलेला.. तो एक अमेझिंग चित्रपट आहे. त्यात कुठेही कसलीही अतिशयोक्ती किंवा अव्यवहारिक वाटलेलं नाही.... आमच्या भावना दुखावता ? ---(यदा कदाचित -२ मधला अफझल्या) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
ध
धनंजय Wed, 05/21/2008 - 04:27 नवीन

अशा काही कथा परिचितांत झालेल्या आहेत

एका नात्यातल्या मुलीला मुलाने होकार दिला, आणि साखरपुडा होण्यापूर्वी (हे तरी बरे) आपले खरे प्रेम दुसर्‍या कोणावर आहे, लग्न नको, म्हणून सांगितले. एका काकूंच्या मुलाने साखरपुड्यानंतर लग्न मोडले, आणि "खर्‍या" प्रेयसीशी त्यानंतर कायमसाठी बिनसले म्हणून पुन्हा मोडलेल्या मुलीच्या घरच्यांच्याकडे विचारणा केली!!!! त्यांनी अर्थात अपमानास्पदपणे "चालता हो" म्हटले, हे बरेच केले. पण एक बघायला पाहिजे ना - लग्न म्हणजे एक महत्त्वाच्या वस्तूची खरेदी आहे. एखादी सुंदर आणि महाग मोटारगाडी घेताना, आपल्याला किती आवडली, आई-बाबांना किती आवडली, कसल्या वळणाची आहे, कसल्या रंगाची आहे, हे सगळे गुण बघणे आलेच. सर्व गुण संपन्न असतीलच असे नाही. शिवाय कुठला गुण जास्त महत्त्वाचा वाटतो तेही सकाळ-संध्याकाळ बदलू शकते. म्हणजे मित्रांबरोबर असताना होंडा-सिटीचे गुण जास्त दिसतात, आई-बाबांशी बोलताना ह्युन्डाई ऍक्सेंटचे. मग कधी या डीलरकडे "कार विकत घेतो" असे म्हणणार, कधी त्या डीलरकडे. आधी एकाला "हो" म्हणून मग दुसर्‍यापाशी गाडी विकत घेतली तर पहिल्या डीलरचा पचकाच झाला... त्यामुळे कंत्राटावर सही केल्याशिवाय कार विकली नाही; अक्षता डोक्यावर पडल्याशिवाय वर-वधू खपली नाही. (स्पष्टीकरण : वधू-वर-संयोजन हा एक बाजारही असल्यामुळे त्याचे बाजारशास्त्रीय विश्लेषण केले आहे. तो बाजार थोडाफार अनैतिक आहे, असे माझे मत आहे. खोटे बोलून किंवा अर्धसत्य झुलवत ठेवून कुठल्याही मनुष्याच्या भावनांशी खेळणे मला अनैतिक वाटते.)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 05/21/2008 - 09:43 नवीन

खोटे बोलून

खोटे बोलून किंवा अर्धसत्य झुलवत ठेवून कुठल्याही मनुष्याच्या भावनांशी खेळणे मला अनैतिक वाटते.) एकदम खरे... पण ह्या असल्या कथानकांमुळे उगीचच वेगळाच संदेश जात असेल ( सिनेमा एवढा कोणी सीरियसली घेत नाही, हे खरे आहे.......पण ऊठसूठ " घराने के संस्कार रीतीरिवाज , पिताजीकी भावनाएं " याची चाड पोरीला फार आहे असे दाखवायचे पण त्याच वेळी एका संपूर्ण कुटुंबाला फसवत राहायचे , ते सुद्धा काही तास किंवा एखादा दुसरा दिवस ( हा की तो , हा निर्णय न होण्याच्या काळात , समजा मुलगा बघताना वगैरे...)नव्हे तर महिनाभर आणि त्यांच्या नकळत केलेल्या प्रेमचेष्टांचे उदात्तीकरण करायचे ...... हा तद्दन भंपकपणा आहे)... बरं ही नैतिकतेच्या मार्गावरून अल्पकाळासाठी का होईना पाय घसरलेल्या एका मुलीची गोष्ट असती तर एक वेळ ठीक होते, पण अर्थातच तसले काही दाखवायचे नाहीये ... ( आणि तिला तिच्या चुकांची जाणीव होते आणि ती त्या मुलाला सॉरी म्हणते, इतपत तरी काहीतरी घडायला हवे होते) कॉलेजात असतानाही ग्रुप मधल्या काही मुलींशी मी बोललो तेव्हा त्यांना त्या हीरॉईनची काही चूक आहे असे वाट्लेच नाही, "प्रेमासाठी तिने केवढे रिस्क घेतले "अशा अर्थाचे बर्‍याचशा मुलींचे मत पडले....... कमाल आहे च्यायला.. अरे रिस्कच घ्यायचे तर बापाचा आणि कुटुंबाचा राग पत्कर, त्यांना समजावायचा प्रयत्न कर आणि ते होत नसेल तर घर सोडून जा आणि स्वतःच्या हिमेतीवर स्वतःचे घर उभार... ही खरी रिस्क ..... तुझे कौटुंबिक संबंध नीट रहावेत म्हणून लोकांना कसा काय मनस्ताप देऊ शकता ? आणि पुन्हा आमची ही नेहमीची चिडचिड की बर्‍याच मंडळींना विशेषतः महिलावर्गाला हे जाणवतच नाही...... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
म
मदनबाण Wed, 05/21/2008 - 06:09 नवीन

मोकॅम्बो खुष हुआ.....

खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला...".... :D हा मोकॅम्बो आतल्या आत फारच खुष झाला असणार बघा..... (मिस्टर इंडिया चा पंखा) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
फ
फटू Wed, 05/21/2008 - 07:10 नवीन

खूप छान लिहिलं आहे मास्तर...

पण कधी कधी असंही होतं... म्हणजे ती पुण्याला बी ए एम एस ला होती... वैद्यकी शिकता शिकता आपल्या एका वर्गमीत्राच्या प्रेमात पडली... बी ए एम एस संपलं... दोघांनीही लग्न करायचं ठरवलं... तो तिचा भावी नवरा म्हणून तिच्या घरी येऊन गेला... आणि तिला परदेशस्थ डॉक्‍टर मुलाचं स्थळ सांगून आलं... झालं त्या मुलीने आपल्या प्रियकराचा पत्ता काटला अन् त्या परदेशस्थ डॉक्‍टर मुलाशी लग्न केलं... आता बोला... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 08:53 नवीन

:)

याला आधीच चांगला पिटून काढला बरे झाले....ही ही पोरगी पण एक नंबरची अडाणी...आमच्या या मूर्ख पोरीने इतके गुण उधळले आहेत की सगळ्या गावात आता बदनामी झाली आहे.... कोण बोंबलायला आता हिच्याशी लग्न करणार आहे देव जाणे... आणि हा भडवा तर बापाबरोबर चालला...ह्याच्यायला ह्याच्या... हा कसला जातोय? हा थांबणार... थांबायलाच पाहिजे यानं... अरे महिनाभर बोंबलत इथे रंगढंग केलेस ना आमच्या नकळत ? तुला भाड्या आता जबाबदारी नको घ्यायला ? खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेडझवाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... खरंतर असल्या मूर्ख, नालायक, वेंधळ्या आणि फ़सवणूक करणार्या या माणसाची अजिबात लायकी नाही...पण आता आपल्या मूर्ख आणि बदनाम पोरीला तरी कोण मिळणार याच्यापेक्षा बरा?? खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला...".... जा बाई जा... हा हा हा! आमरसपुरीचे हे स्वागत क्लासच आहे! मुलीचा हात सोडण्यापूर्वी क्षणभर त्याचा चेहरा दाखवला आहे त्यावर मास्तर म्हणतात तेच स्वगताचे भाव अगदी नेमके दिसतात! :) मास्तर, अजूनही शिणेमे येऊ द्यात... आपला, (काजोलप्रेमी) तात्या देवगण.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 05/21/2008 - 09:46 नवीन

मुलीचा हात

मुलीचा हात सोडण्यापूर्वी क्षणभर त्याचा चेहरा दाखवला आहे त्यावर मास्तर म्हणतात तेच स्वगताचे भाव अगदी नेमके दिसतात धन्यवाद तात्या.... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 05/21/2008 - 10:13 नवीन

आमची अजून

आमची अजून दोन निरीक्षणे आहेत... १. कुकुहोहै, जप्याकिहोहै, दिचाहै,दितोपाहै या सर्व सिनेमांमध्ये थोड्याफार फरकाने "दुसर्‍याच्या लग्नात जाऊन आपली प्रेयसी पळवून आणणे " हा कार्यक्रम दिसतो परंतु सर्वात जास्त त्रास देणारा चित्रपट मला दिदुलेजाच वाटतो... असं का बरं होत असावं? २. वर उल्लेखिलेल्या सर्व सिनेमांमध्ये कथा अशाच बांधलेल्या दिसतात की हीरॉईनचं नक्की ठरत नाहीये आणि ती ऐन वेळी एका दुसर्‍याच ( म्हणजे आधीच्याच प्रियकर ) माणसाबरोबर लग्न करते... हेच पुरुषाने केले तर त्याला इतकी सहानुभूती कोणी देईल का ?... मग तो बरोबर व्हिलन ठरेल...मला आत्ता या क्षणी तरी असे सिनेमे आठवत नाहीयेत की ज्यात ( १.पुरुष ऐन वेळी लग्नाला नकार देतो आणि पळून जातो + २. त्याचे त्याच वेळी उदात्तीकरणही केले जाते...) .... असो... याचे स्त्रीमुक्तीवादी उत्तर हे असणार की १. पुरुषांवर लग्नासाठी कुटुंबाचे इतके प्रेशर नसते, त्यामुळे त्याला सहानुभूती कशाला कोण द्यायला बसलंय ? तो वाईटच.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मन Wed, 05/21/2008 - 13:57 नवीन

हेच

हेच पुरुषाने केले तर त्याला इतकी सहानुभूती कोणी देईल का ?... मग तो बरोबर व्हिलन ठरेल... जबरान... :-) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ध
धनंजय Wed, 05/21/2008 - 21:53 नवीन

सिनेमा नव्हे, पण स्फूर्तिदायक लोककथा

( १.पुरुष ऐन वेळी लग्नाला नकार देतो आणि पळून जातो + २. त्याचे त्याच वेळी उदात्तीकरणही केले जाते...) अगदी नेमके असे केलेला म्हणजे नारायण ठोसर हा मुलगा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. (पण तो दुसर्‍या कुठल्या मुलीबरोबर लग्न करत नाही. हा लहान मुलगा विश्वाची चिंता करण्याइतका मनाने प्रौढ होता, पण आईवडलांच्या आग्रहाखातर बोहोल्यावर चढलाच.) आणखीनही उदाहरणे असावीत. दुसरे लग्न करणारा कुठलाही वीरपुरुष पहिल्या बायकोच्या जीवनाचे काही प्रमाणात मातेरे करतो असो मानता येईल. (हे मातेरे लग्नाआधी नसून लग्नानंतर असते, पण अधिक वाईट कुठले, ते सांगता येत नाही.) अशा वीरांचे, 'राज्याला वारस पुरवण्यासाठी कर्तव्य करणारा' म्हणून उदात्तीकरण होते. वरील दोन्ही उदाहरणे ऐतिहासिक आहेत, पण त्या उदाहरणांचे उदात्तीकरण मात्र आधुनिक आहे. (सगळ्या टीव्ही मालिका मला एकसारख्या वाटतात - पण अशी एक साचेबद्ध कथा बरेचदा दिसते ना? श्रीमंत उपवर तरुणाशी लग्न करायचा घाट एक पाताळयंत्री सुंदर तरुणी घालते, आणि लग्न पक्के होते. पण लग्नाआधी मुलाला तिचा नीचपणा समजतो. आणि त्याच्यावर प्रेम करणार्‍या सोज्ज्वळ पण सुशील मुलीबरोबर तो लग्न करतो...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
स
संताजी धनाजी Tue, 12/16/2008 - 18:39 नवीन

अगदी नेमके

अगदी नेमके असे केलेला म्हणजे नारायण ठोसर हा मुलगा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. =)) ह्या मुलाचा आम्ही पंखा आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
म
मेघना भुस्कुटे Wed, 05/21/2008 - 13:33 नवीन

जबरा!

भडकमकर मास्तर, जबरा! अजून येऊद्यात शिणेमे!
  • Log in or register to post comments
क
कल्याणी पेटकर - पोरे Wed, 05/21/2008 - 15:49 नवीन

साथिया च्या राणी मुखर्जी बद्दल काय मत?

साथिया चित्रपटात राणी मुखर्जी च्या वडिलांचा विवेक ओबेरॉय च्या वडिलांकडून अपमान होतो...याबद्दल राणी ला राग येतो पण तो थोड्याच वेळासाठी आणि नंतर चक्क त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न करते. इथपर्यंत सुद्धा ठीक ... पण लग्नानंतर ते आपापल्या घरी राहतात!!! (याला हिंमत म्हणावी की शुद्ध बावळट पणा?) हे कमी की काय म्हणून बघायला आलेल्या पाहुण्यांसमोर सांगून टाकते की मी आधीच लग्न केलं आहे!! (पाहुण्यांसमोर सांगून आई बापाची इज्जत का घालवायची? :( )
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 05/22/2008 - 08:36 नवीन

मस्त रे

मस्त रे मास्तुर्‍ये.. अजुन लिवा..
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 05/22/2008 - 10:12 नवीन

मैं मां बननेवाली हुं.

हे पण अश्याच सिनेमात घडत असते. प्रथम छपरी हिरोशी उदांत प्रेम करायचे. गळ्यात गळे घालुन फिरायचे. चुम्माचाटी करायची. आणि दुसरा मुलगा बघायला येण्याआधी घरी बोंबलायचे,उल्ट्या करायच्या आणि हाच संवाद फेकायचा " मैं मां बननेवाली हुं".पण हेच तिला आधी का कळत नाही.ह्यात पण सगळी सहानुभुती त्या मुलीला. कारण ह्यात तिचा दोष नसतो दोष तिला मां बनवणारयाचा असतो. अजब तर्क. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/22/2008 - 12:31 नवीन

चुम्माचाटी! :)

गळ्यात गळे घालुन फिरायचे. चुम्माचाटी करायची. वा! मागे केव्हातरी ऐकल्यासारखा वाटतो, 'चुम्माचाटी' हा शब्द क्लासच आहे!..:) आपला, (जुम्म्याला चुम्मा देणारा!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ध
धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 12:19 नवीन

मास्तुरे...जब्बराट

मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा वगैरे आवडून बाप प्रभावित झाला नाही तर " माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" या भावनेने नाईलाजाने तो यांच्या लग्नाला तयार झाला असे वाटते... मग हीरोने हिरॊईनच्या आईपुढे मारलेले डायलॊग सगळे गेले ना बाराच्या भावात... मग सिनेमाचा संपूर्ण दुसरा भाग ज्या गोष्टीसाठी बिल्ड अप केला आहे त्याचीच वाट लागली... आणि आम्हाला येडा का बनवले?
हे हे हे....आमचं पण हेच मत झालं होतं :) आणि तो बाप तरी कसा असा एकदम चंबू? शेवटपर्यंत आजिबात कळत नाही त्याला, हा बकरा में में करत आपल्या पोरीच्या लग्नघरात का फिरतोय? बाकी त्याचं स्वगत एकदम झक्कास! येऊ दे अजुन... स्वगतः आमच्या भावी सासर्‍याचं पण हेच स्वगत असावं काय? :?
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 05/22/2008 - 19:13 नवीन

हा हा हा हा हा

मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा व>>>> =)) मास्तर तुम्ही तर त्या दिलवाले ची बिनपाण्याने केलीत की. :) आवडल आपल्याला तुमच मत. मी अजुन देखील हा चित्रपट पाहिलेला नाहिये. फुकटात सुद्धा. आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल??? ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/23/2008 - 13:58 नवीन

आणि हो

आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल??? तसं तिच्याबद्दल थोडं वाईट वाटलं... जास्त नाही कारण या पोरानं काही कमिट केलं नव्हतं तिला...( नव्हतं बहुतेक, आता काय नीट आठवेना... की त्यांच्या आई बापाचं काहीसं बोलणं झालं होतं?...??... ) हां..बरोबर ..मग तिचीसुद्धा झालीच की फसवणूक... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
ट
टारझन Tue, 07/15/2008 - 17:56 नवीन

काय रे ?

मी अजुन देखील हा चित्रपट पाहिलेला नाहिये. फुकटात सुद्धा. आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल??? खोटं बोलतोस ? चित्रपट पाहीला नाही ? मग रुकरुक आणि बधिरा बद्दल एवढ डिटेल कसं माहीत आ? कस्सा पकडला चोर ? ;) असो.. त्या शाहरूक चे सरसकट सगळेच चित्रपट बावळट असतात... सगळ्यात हाईट म्हणजे .. मोहोब्बते.... आरे काय ? तो बच्चन बिचारा शिस्त लावतो.. अभ्यासाच्या वेळी अभ्यास करा ...आणि हा बहाद्दर पोरांना लफडी करायला शिकवतो ! केवळ बच्चनचा विरोध म्हणून..आणि मग ती अती स्कॉलर पोरं पण लफडी करून डॉक्टर होतात... च्यायला डोक्यात जातो रे तो.... काहीही ... हाणा तद् माताय(विजाभौ प्रसन्न) (रुकरुक चा अँटीफॅन) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 05/22/2008 - 19:16 नवीन

मास्तर..... ज

मास्तर..... ज्यावेळी हे चित्रपट आले होते खास करुन डीडीएलजे ;) त्यावेळी असे काही वाटत नव्हते .. पण आज पुन्हा त्रयस्थ नजरे ने काही चित्रपट पाहीले की त्या चित्रपटाची मजाच जाते ! उदा. मोहरा त्याकाळी गाजलेला चित्रपट .... मी कमीत कमी ५ वेळा पाहीला होता.... पण आज तो चित्रपट १० मिनिटे पाहणे म्हणजे भयंकर सजा आहे असे वाटत :)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
र
रुस्तम Fri, 11/23/2012 - 06:07 नवीन

सहमत

सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजे
म
मेघना भुस्कुटे Fri, 05/23/2008 - 10:21 नवीन

'हम दिल दे चुके सनम'

"...खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेडझवाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... " अमरिश पुरीचं स्वगत वाचून हसता हसता लोळायची वेळ आली खरोखर. अफलातून. :) असाच मनस्ताप मला 'हम दिल दे चुके सनम' बघताना झाला होता. बाई ग, तुझं प्रेमबिम आहे ना सलमानवर? मग लग्न का करतेस दुसर्‍या माणसाशी? हे मनमानी आईबाप पोरांचं न ऐकता लग्न ठरवतात इथपर्यंत ठीक. पण ही मूर्ख पोरं बोहल्यावर कशी चढतात? तिथल्या तिथे बोंबाबोंब नाही का करता येत? एरवी एवढी येता जाता बापाच्या गळ्यात पडत असतेस ना बये, मग आता थोबाड उघडायला काय धाड भरली? बाप नाही तर नाही ऐकत, त्या बिचार्‍या अजय देवगणला सरळ सांगता येत नाही, की बाबा रे, असं असं आहे... लग्न-बिग्न नको. फुकटच्या फाकट लग्न करून बसला ना तो? बरं, ठीक आहे, लग्न केलं. मग तरी गप बसायचं. तेपण नाही. नंतर सांगायचा धीर आला. आला तर आला. मग जायचं सलमानसोबत. तोतरी सुखी. तेही नाही. एकदम चार रात्रींमधे सलमानवरचं प्रेम उडून अजयवर? कारण काय, तर मंगळसूत्र. अरे काय चाललंय काय? पोरखेळ आहे का? हे मंगळसूत्र आणि लग्नाची गाठ भलतेच पॉवरफुल्ल असतात एवढाच सगळ्या लव्हस्टोरीचा अर्थ. मूर्ख लेकाचे.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 05/23/2008 - 10:37 नवीन

हे...हे...हे....

जबरान् !!!!! आयला, मीपण असाच वैतागलो होतो 'हम दिल दे चुके सनम' पाहून. एक तो सलमान, काय ते येडं भंजाळल्यासारखं आकाशाकडं बघून जोरजोरात एकटंच गप्पा हाणत असतं, आमच्या गावात आहेत अशी एक-दोन वेडी माणसं :) बरं, मान्य आहे बाबा तू हाडाचा गायक बियक आहेस..म्हणजे ते काय म्हणतात बरं...हां, जन्मजात कलाकार आहेस, अरे पण म्हणून इतकं खुळ्यासारखं वागायचं? कलाकार काय अक्कलशुन्य असतात का? दुसरी ती ऐश्वर्या, तीच्या आयुष्यात नक्की काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही..आपण काय करतोय, काय करायचंय, काय होइल...कश्शा-कश्शाचाच विचार नाही? आज काय म्हणे सलमानवर प्रेम....उद्या काय म्हणे बाबा म्हणतात ह्याच्याशी लग्न करायचं म्हणून एकदम "निंबुडा निंबुडा" करुन नाचत लग्नाला तयार, परवा काय तर त्या अजय देवगणासमोर अचानक पहिल्या प्रेमाचा साक्षात्कार... तो बिचारा शिगारेटी फुंकुन फुंकुन छातीचं खोकडं करुन घेतोय, आणि ही हिंडतीये त्या सलमानला शोधत.... बरं तो भेटल्यावर तरी गप त्याच्याबरोबर सुखानं संसार करावा, तेही नाही...परत अजय देवगणकडे गाडी वळलेली... काय बाई आहे का भिंताड? येऊन जाऊन त्या अजय देवगणनं साकारलेला संयत, समजुतदार, भल्या मनाचा नवरा हेच काय ते दु:खात सुख! आणि "अलबेला सजन आयो..." एएएएएकदम मस्त!!!!!! केवळ त्यासाठी भन्साळ्याचे सगळे गुन्हे माफ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/23/2008 - 13:39 नवीन

एकदम खरंय...

एकाच पात्राच्या किती चुका... १.बाप नाही तर नाही ऐकत, त्या बिचार्‍या अजय देवगणला सरळ सांगता येत नाही, की बाबा रे, असं असं आहे... लग्न-बिग्न नको _ २.बरं, ठीक आहे, लग्न केलं. मग तरी गप बसायचं. तेपण नाही. नंतर नवर्‍याला सांगायचा धीर आला. ३.मग जायचं सलमानसोबत. तोतरी सुखी. तेही नाही. एकदम चार रात्रींमधे सलमानवरचं प्रेम उडून अजयवर? कारण काय, तर मंगळसूत्र पण पहिल्यांदा बघताना जास्त जाणवल्या नाहीत चुका... ऐश्वर्याचं दिसणं, उत्तम संगीत आणि गाणी यात आख्खा सलमान सहन केला...( ऐश्वर्याच्या डीव्हीडी कॅप्चर्सवरून कोलाजेस , वॉलपेपर्स बनवणे हा आमचा त्या काळातला आवडता उद्योग) अजयचं पात्र बेष्ट रंगवलंय... ( मला या सिनेमात एक मर्मभेदक ऍडिशन सुचतेय की अजय देवगण शेवटी ती बोंबलत तिच्याकडे आल्यावर तिला म्हणतो, "...आज आलीस उद्या परत तिसर्‍याकडे जाशील... तुझ्या आवडत्या खेळापायी मला का त्रास सारखा? या टायमाला युरोप दर्शन झालं, पुन्हा म्हणशील आता ऑस्ट्रेलियात फिरूयात...अशी मानसिकदृष्ट्या अस्थिर चंचल स्वभावाची बायको मला नको .. चल हो बाहेर..." ... मग अगदी काव्यात्म न्याय मिळाल्यासारखं झालं असतं... :)) :)) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
व
विसोबा खेचर Fri, 05/23/2008 - 13:42 नवीन

:)

"...आज आलीस उद्या परत तिसर्‍याकडे जाशील... तुझ्या आवडत्या खेळापायी मला का त्रास सारखा? या टायमाला युरोप दर्शन झालं, पुन्हा म्हणशील आता ऑस्ट्रेलियात फिरूयात...अशी मानसिकदृष्ट्या अस्थिर चंचल स्वभावाची बायको मला नको .. चल हो बाहेर..." =)) हा हा हा मास्तर, तुमची मर्मभेदक ऍडिशन लै भारी आहे! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
म
मन Fri, 05/23/2008 - 16:55 नवीन

सुधारणा

मला सुचली ती अशी... समजा हा पिकचर करण जोहर ह्या प्रेमाच्या घाउक विक्रेत्याला दिला असता, तर त्याने:- येक शाहरुख वाढवला असता.जो, मुळात नाराज अजयचे मन वळवुन त्या सटवीला सलमानच्या दारात सोडुन ये म्हणतो. आता,शाहरुख ने य्व्हढे उप्कार केलेच आहेत म्हणल्यावर त्याची "परतफेड" कशी करावी या विवंचनेत असलेली ती येडझवी नायिका त्याच्याही प्रेमात पडली असती! मग झाला असता साक्षात्कारः- शाहरुख तर आधिच त्याची "मैत्रिण" काजोल(किंवा राणी) ह्यांच्या प्रेमात आहे. मग त्याला खुश कसे करणार्?त्या काजोलच्या गळ्यात मारुन! पण काजोल सलमानच्या प्रेमात आणी सलमान ऐश्वर्याच्या विरहात व्याकुळ का काय म्हणतात ते झाला आहे. मग? करणार कसं? हे त्या येड्यालाही कळलं नसतं आणि तो जे दाखवेल, ते प्रेक्षकांनाही कळलं नसतं! ज्याने जो अर्थ घ्यायचाय , तो घेतला असता! (हाच चित्रपट दीपा मेहता(फायर, अर्थ्,वॉटर वाली) हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन! आणि मस्त ऍवार्डस वगैरे मारले असते ह्या बाईनं.म्हंजे ते दोघही खुश, ऍश ला अद्दल घडली ती वेगळीच. सगळाच कसा सुखांत!) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/23/2008 - 17:14 नवीन

(हाच

(हाच चित्रपट दीपा मेहता हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन! हहाहा... हे फारच आवडले... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
झ
झकासराव Fri, 05/23/2008 - 19:32 नवीन

हाच

हाच चित्रपट दीपा मेहता(फायर, अर्थ्,वॉटर वाली) हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन! आणि मस्त ऍवार्डस वगैरे मारले असते ह्या बाईनं.म्हंजे ते दोघही खुश, ऍश ला अद्दल घडली ती वेगळीच. सगळाच कसा सुखांत =)) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
ग
गिरिजा Tue, 05/27/2008 - 16:46 नवीन

मास्तर.. हा

मास्तर.. हा अभिप्राय तर अतिशयच अप्रतिम आहे!!! =)) चालु द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
च
चावटमेला Fri, 05/23/2008 - 14:12 नवीन

मस्तच!!!

मस्तच मास्तर, लै भारी.. ह्या सीन मध्ये अमरिश पुरी प्रमाणेच मंदीराच्या मनात खालील विचार चालले असतील "अगं सटवे, अशी डाव खेळलीस काय ?इकडे माझ्या भावाला नादी लावलेस आणि तिकडे ह्याच्याबरोबर गुलछर्रे उडवित होतीस काय्?इथे हे आम्हाला समजले म्हणून बरे, नाहीतर, तिकडे त्या इंग्लंडात अजून काय धंदे केले असतील देवच जाणे??? आणि हा मुडदा सुध्दा काय निर्लज्ज आहे. एवढा मरेपर्यंत मार खावून सुद्धा कसा उजळमाथ्याने चालला आहे.बरं झालं , चांगलंच बदडलं ह्याला, मी तर म्हणते छान चेचून काढायला हवं होतं. मीच कपाळकरन्टी म्हणून ह्या नरसाळ्यावर भाळले होते.वेळीच समजलं म्हणून बरे, नाहीतर, मै मा बननेवालि हू म्हणायची वेळसुद्धा आणली असती ह्याने माझ्यावर, ह्या बाजारबसवीसाठी हा नरसाळाच ठीक आहे, जा आता आणि बसा गळ्यात गळे घालून( आणि मी जाते क्रिकेट कॉमेन्ट्री करायला गळा उघडा टाकून ;) )"
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 05/23/2008 - 14:17 नवीन

हाण तिच्यामारी......

सटवी काय, नरसाळा काय, मुडदा काय.... अगाबाबो..... त्यांच्यापैकी कोणी हे वाचलं तर झीट येऊन पडतील की :)
मै मा बननेवालि हू म्हणायची वेळसुद्धा आणली असती ह्याने माझ्यावर, ह्या बाजारबसवीसाठी हा नरसाळाच ठीक आहे, जा आता आणि बसा गळ्यात गळे घालून
:))
( आणि मी जाते क्रिकेट कॉमेन्ट्री करायला गळा उघडा टाकून Wink )"
=)) =)) =)) स्वगताचा शेवट मात्र एकदम वास्तवदर्शी आहे हो चावटशेठ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/20/2009 - 21:06 नवीन

धम्या शी

धम्या शी सहमत ... आता मास्तर पुढचा चित्रपट कधी ?? सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
न
निरंजन मालशे Fri, 05/23/2008 - 17:03 नवीन

साजन

अरे सकळ्या त्रिकोणी लव्हस्टोर्या अशाच असतात. मला आजही कळलेल नाही की सलमान अस काय सांगतो म्हणून दोन सीन पुर्वी दोन्ही नायकांच्या नावाने शिमगा करणारी माधुरी संजय दत्तशी लग्न करायला तयार होते.
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 05/24/2008 - 03:40 नवीन

सही.

मास्तरा॑नी डीडीएलजी ची केलेली शाळा आणि त्या वरच्या सर्वच प्रतिक्रिया ह्या अफलातुन आहेत. चावटमेला साहेबा॑नी तर हातच॑ काहीच राखुन लिहिले नाही आहे. त्यामुळे हि॑दी पिक्कचर आणि त्यात ते करण जोहर असेल पैसे घालुन बघणे म्हणजे, आ बैल मुझे मार हा प्रकार. प्रेमाच्या भानगडी शिवाय हे हि॑दी पिक्कचर निर्माते पिक्कचर बनवु शकत नाहीत का ?
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 05/24/2008 - 12:34 नवीन

मस्त आहे...

मस्त आहे... दे धमाल :)
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा Sat, 05/24/2008 - 13:57 नवीन

मस्त आहे...

बाकी तुमचे चालु द्या
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 05/27/2008 - 17:50 नवीन

हम दिल दे चुके सनम...

कदाचित संजय लीला भंसाळी नीट दाखवू/पट्वू शकला नसेल पण सिनेमात 'प्रेम करणे' आणि 'प्रेम निभावणे' यातला फरक ऐश्वर्याला (नंदिनीला) लग्नानंतर जाणवतो - सलमान (समीर) हा वेगळ्या वातावरणात वाढलेला, अवखळ, मजेशीर पुरुष - नंदिनी त्याच्या प्रेमात पडते आणि अजय देवगण (नाव काय त्याचे सिनेमात) फक्त तिच्या प्रेमाखातर आणि तिच्या इच्छेखातर तिला सलमानकडे घेऊन जातो. त्यात तिला जाणवणारा त्याचा दुहेरी पराभव ('इस मे दोनो तरफ हार मेरीही आहे') -- नवर्‍याबरोबर राहिली तर तिच्या मानाविरुद्ध रहाते आणि झुरते म्हणून तर सलमान (तिचे प्रेम) कडे नेले तर ती त्याच्याबरोबर जाणार म्हणून. असे असूनही तिला खरच तो भेटावा म्हणून अजय चा सच्चा प्रयत्न. त्या प्रवासात, प्रयासात त्यांच्यात तिला जाणवणारा 'प्रेमात पडणे'/आकर्षण (infatuation) आणि प्रेम निभावणे/खरे प्रेम (love) ह्यातला फरक -- त्याच्यात निर्माण होणारे नाजूक बंध हे सगळे जर नैसर्गिकपणे उलगडत/उमगत गेले तर मला वाटते हे इतके विचित्र वाटत नाही. भंसाळी चा प्रयत्न खूपच चांगला वाटला. तो जर कुठे फसला/अपयशी ठरला असेल तर तो माझ्या मते असा - (१) सलमान चा अतिशय पोरकट अभिनय (त्यात नवीन काय म्हणा?) -- ते वडिलांशी बोलण्याविषयी - भंसाळी म्हणे बोलायचा असा कल्पनेत त्याच्या वडिलांशी (तसे बरेच जण बोलतात कल्पनेत त्यांच्या प्रिय व्यक्तीशी/support system, त्या व्यक्तीच्या निधनानंतर) -- आणि एक दिवस सलमान्ने फोने करून त्याला विचारले कि असे करूया का? भंसाळी भारावला आणि त्याला वाटले की सलमान खूपच जोडला गेला आहे त्या स्क्रिप्टशी - हे भंसाळीनेच एका मुलाखातीत सांगितलेले आठवते. अर्थात चांगल्या कल्पनेची प्रत्यक्षात माती करावी तर सलमाननेच....ते प्रत्यक्षात इंटेन्स वाटण्याऐवजी विनोदीच वाटले. (२) अजय आणि ऐश्वर्याचे नाते फुलतांना अजून छान दाखवायला हवे होते - तिला होणारी प्रेमाची जाणीव, तिचे अजयमधे गुंतणे हे जरा प्रभावीपणे यायला हवे होते. त्या मनाने तिला जाणवणारे अजयचे प्रेम जाणवते. पण जेवढ्या तीव्रतेने तिचे समीरमधे गुंतणे, त्याच्या विरहात व्याकुळ होणे येते - तेवढ्या प्रभावीपणे अजयचे आणि तिचे नाते दिसत नाही. तसेच अपेक्षित शेवटाकडे जातांना भंसाळीने ऐश्वर्याच्या व्याकुळतेची तीव्रता कमी होतांना दाखवायला हवी होती - 'अरे खरच काय मी कशाच्या शोधात आहे, मला वाटलेल्या प्रेमाच्या मृगजळाच्या की माझा नवरा जे जीवापाड प्रेम करतो आहे ते खरे आहे?' हे नाही तितक्या प्रभावीपणे जाणवू शकले. (३) अजय आणि सलमानची भेट ही अतिशय वाईट कल्पना - अजयला वाटणारी असूया हि एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती - ती तशीच राहू द्यायला हवी होती. त्यांना 'फिल्मी योगायोगाने' मित्र बनवण्याची काहिच गरज नव्हती. मला वाटते, भंसाळी काही सीनच्या, गाण्याच्या आणि visualizations च्या प्रेमात पडला नसता (उदा.ढोली तारो ढोल बाजे) तर स्क्रीप्टला न्याय मिळाला असता. जितक्या प्रभावीपणे सलमान-ऐश्वर्याचे नाते येते तितक्या प्रभावीपणे अजय-ऐश्वर्याचे जुळणारे नाते येत नाही. हा भंसाळीचा पराभव. मंगळसुत्र हे commitment किंवा 'प्रेम निभावणे' (love is a verb, not noun) या सहज प्रतिकात्मक अर्थाने न येता पारंपारिक, फिल्मी पद्धतीने 'Cliché' होऊन येते. पण तरीही मला एकूण सिनेमा इतका विचित्र/विनोदी वाटला नाही. 'वो सात दिन' हाही असाच एक सिनेमा - त्यातही बरीचशी अशीच ट्रिटमेंट जाणवली. बाकी - धमु ने म्हटल्याप्रमाणे 'अलबेला सजन आयो रे...' साठी हजार चुका माफ! खर तर ह्यातली सगळीच गाणी अप्रतीम आहेत - दरबारीतला 'अलबेला सजन..' आणि 'तडप तडप के....' वर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. असो! फारच सविस्तर झाले.... - (फिल्मी) मनिष अवांतर - नुकत्याच आलेल्या 'यू, मी और हम' मधेही हिच love is a verb, not noun कल्पना होती पण त्याचा साग्रसंगीत बट्ट्याबोळ केला आहे! :) कदाचित आपल्या 'प्यार किया नही जाता, हो जाता है" फिल्मवाल्यांना हि कल्पना माहित असेल पण अजून नीट उमजलीच नसेल.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 05/27/2008 - 18:18 नवीन

++१

मनिष, छान सांगितलस :) माझ्यासारखं टोकाची भुमिका न घेता सांगोपांग विचार करुन सौम्य शब्दात योग्य भावना पोहोचवल्यास. अभिनंदन !
जितक्या प्रभावीपणे सलमान-ऐश्वर्याचे नाते येते तितक्या प्रभावीपणे अजय-ऐश्वर्याचे जुळणारे नाते येत नाही. हा भंसाळीचा पराभव.
+++१
तसेच अपेक्षित शेवटाकडे जातांना भंसाळीने ऐश्वर्याच्या व्याकुळतेची तीव्रता कमी होतांना दाखवायला हवी होती
सही रे भिडू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
भ
भडकमकर मास्तर Wed, 05/28/2008 - 14:13 नवीन

फारच छान

फारच छान मनीष.. हम दिल दे चुके सनमचे अप्रतिम विश्लेषण....तुझे तीनही मुद्दे एकदम पटले... वो सात दिन सुद्धा तसाच आहे, मला थोडा जास्त छान वाटतो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मेघना भुस्कुटे Sat, 05/31/2008 - 09:54 नवीन

नाही पटले खरे

मनीष, मग तिच्या आधीच्या प्रेमभावनेचं काय? तिला वाटले ते नुसतेच आकर्षण? की एक माणूस आपल्यावर इतकं समजूतदार इत्यादी प्रेम करतो आहे, म्हणून आपणच निर्माण केलेल्या आधीच्या नात्यांना मोडीत काढायचे? (सलमानचं कॆरेक्टर अत्यंत आचरटपणे रंगवल्यामुळे मला काही काळ ’बरे झाले’ असा एक आसुरी आनंद झाला, नाही असे नाही! पण) मंगळसूत्र क्लिशे होऊन येते हे खरेच आहे. पण समजा असे गृहित धरू, की तो क्लिशे नाही. तरीही ऐश्वर्या आपल्याच नात्याला तिलांजली देऊन नव्या नात्यात अडकते? मला हे फार उथळ वाटते. त्यापेक्षा भन्साळीच्याच ’सॉंवरिया’मधली प्रेयसी मला सच्ची आणि पुरेशी हट्टी वाटली होती. (बाकी सिनेमाबद्दल न बोलणे बरे!) एका ठिकाणी गुंतलेला जीव असा इतक्या सहजासहजी उचकटला जात नाही. मग समोरचा माणूस कितीही जिवापाड प्रेम करत असो. त्याचे प्रेम हे बर्‌याचदा आपण बाहेरूनच पाहू शकतो... असो. वाद नव्हे.... पण नाही पटले खरे... खूप समंजस शब्दांत उकलून दाखवले आहे तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष Sat, 05/31/2008 - 11:10 नवीन

मला समजते आहे....

खरे आहे....जर आधीची प्रेमभावना स्ट्रॉंग सेल तर तू (चालेल ना?) म्हणते ते बरोबर आहे. पण भंसाळीला ते दखवायचे नव्हते - त्याला अपेक्षित असलेल्या कथेच्या दृष्टीने मी सांगत होतो. आपल्या सारख्या स्वतंत्र वृत्तीने वाढलेल्यांना पटणार नाही हे, पण काही वेळा असे होते हे समजून घेता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
म
मेघना भुस्कुटे Sat, 05/31/2008 - 13:43 नवीन

कभी अलविदा ना केहना

मनीष, अर्थातच ’तू’ चालेल! काही वेळा असे होते खरे. बाकी भन्साळीच्या एकंदर आवाक्याचा विचार करता आपण त्यावर इतके शब्द उधळावेत का, असा एक पोटप्रश्न पडतो आहे मला. बाय दी वे, कुणाला ’कभी अलविदा ना केहना’ वर काहीच म्हणायचं नाहीय का? मुळात विवाहबाह्य संबंध हा करण जोहरच्या दृष्टीनं ’अब्रह्मण्यम्‌’ विषय. तो त्यानं निवडला हीच एक मोठ्ठ्ठ्ठी अचीव्हमेंट. पुढचा सगळा शेणकाला आपण त्याच्याकडे दयार्द्र दृष्टीनं पाहून माफ केला पाहिजे, असा माझा एकंदर दृष्टिकोन होता. पण सिनेमा पाहिल्यावर तो मला चक्क आवडला. अमिताभचा ’सेक्सी सॅम’ आचरटपणा किंवा राणी मुखर्जीचा निरागस मूर्खपणा (दुकानातल्या बेडवर बसून इतक्या संशयास्पद पद्धतीनं रात्रीच्या सीनची तालीम करतं कुणी? आचरट नाहीतर...) करणबद्दलच्या एकूण अपेक्षांना साजेसा होता. पण नात्यांबद्दलची जाण चक्क प्रगल्भ म्हणावी अशी होती. ’अर्धी-मुर्धी नाती असण्यापेक्षा ती तोडून टाकणे उत्तम’ ही स्पष्टोक्ती किंवा प्रामाणिकपणा या भावनेला महत्त्व देऊन तथाकथित पवित्र विवाहसंस्थेशी बेईमानी करणे किंवा ’इस घरमें मर्द मैं हूं’ असा प्रीती झिंटाचा स्पष्ट बोचरा उद्गार... सुखद धक्का. ध्यानीमनी नसताना. (तरी शाहरुख खान, प्रीती झिंटा, अभिषेक आणि राणी यथाशक्ती डॉक्यात गेलेच.) असे अजून काही सिनेमे आठवताहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष Sat, 05/31/2008 - 15:07 नवीन

कभी अलविदा ना कहना...

माझ्या तो अख्खा सिनेमाच डोक्यात गेला... मी शेवटी वैतागुन उठून आलो. भंसाळी परवडला पण करण जोहर.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
भ
भडकमकर मास्तर Sun, 06/01/2008 - 01:11 नवीन

मुळात

मुळात विवाहबाह्य संबंध हा करण जोहरच्या दृष्टीनं ’अब्रह्मण्यम्‌’ विषय. तो त्यानं निवडला हीच एक मोठ्ठ्ठ्ठी अचीव्हमेंट. हे खरं..तो इतपत रिस्क घेइल असे कधीच वाटले नव्हते ... निदान विषय निवडीसाठी त्याला बरे मार्क... पण पुढे सिनेमाभर प्रत्येक कॅरेक्टर विचित्र वागत राहते... ( ते सरप्राईज करायचे प्रसंग वगैरे) घडोघडी वैताग येत राहतो... मात्र प्रीती झिन्टा शाहरूखच्या कानाखाली ठेवून देते हा प्रसंग लै मज्जा आणतो... ... दोन किरकिरे जीव आधीच्या संसारातून भांडून एकत्र येतात ,...ठीकच आहे...पण ते पुढे एकमेकांबरोबर सुखाने राहतात की नाही हाच एक मोठा प्रश्न... तात्पर्य : दुरून दुसर्‍याच्या बायका (किंवा दुसर्‍यांचे नवरे ) कितीही साजरे दिसले तरी त्या स्वतःच्या बायका (किंवा स्वतःचे नवरे ) होतील तेव्हा साजरे नसतात ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
स
स्वाती फडणीस गुरुवार, 07/17/2008 - 14:09 नवीन

अगदि बरोबर

विश्लेषण आवडले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष Tue, 05/27/2008 - 17:50 नवीन

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे...

मास्तर - अमरिश पुरीचे स्वगत मस्तच!
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 05/27/2008 - 20:27 नवीन

काही खरच डोक्यात जाणार्‍या सिनेमांच्या कथा...

काही खरच डोक्यात जाणार्‍या सिनेमांच्या कथा... काही खरच डो़क फिरवणार्‍या कथा/सिनेमे असे आहेत की डायरेक्टर भेटला की डायरेक्ट त्याच्या श्रीमुखात द्यावी असे वातते. आठवेल तसे लिहितो इथे - चुपके-चुपके - मागच्या वर्षी आलेला शाहिद कपूर - करीना कपूर ह्यांचा सिनेमा. त्यात शाहिद चे गावात सुषमा रेड्डीवर प्रेम, इकडे काही अतर्क्य घतनानंतर साहेब करीनाच्या प्रेमात - त्याचा गैरसमज की सुषमा रेड्डीचे लग्ना झले आहे - करीना शाहिद च्या प्रेमाचा रस्ता मोकळा - मोकळा म्हणजे एकदम हायवे होतो (नाही, सैफ नव्हता सिनेमात! :)); इतका की सिनेमाभर गुजरातचे गोडवे गाणारे कुटुंब एकदम पंजाबी गाणे गाऊन आनंद साजरा करते..जाऊ दे. माफ प्रियदर्शनला! पण हाईट म्हण्जे, सिनेमाच्या शेवटी सुषमा रेड्डी लग्नघरी येते आणि सगळा खुलासा होतो - आता शहिदची अगदी शाही पंचायत -- आणि प्रियदर्शनची पण. काय करावा साहेबांनी क्लायमॅक्स?? तर सुषमा रेड्डी शहिदला म्हणते (करीनाचा आग्रह करून झाल्यावर) - तू करीनाशी लग्न कर,कारण?......कारण का तर म्हणे ती मुकी आहे?? 'उसे सहारा दो!' अरे किती मुर्ख आणि क्रूर कारण? दया म्हणून प्रेम/लग्न?? किती हॉरीबल??? हाच का तो हेराफेरी देणारा प्रियदर्शन?? कितीही विसरू म्हटले तरी हा क्लायमॅक्स डोक्यात जातो!!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा