✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शिवराज्याभिषेक

ज
जिप्सी यांनी
गुरुवार, 09/09/2010 - 01:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4979 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

माहितीत भर. धन्यवाद!

सुनील
गुरुवार, 09/09/2010 - 01:18 नवीन
या समारंभाचा व दानधर्माचा एकूण खर्च दिड ला़ख होन झाला.(हा आकडा कमी वाटतो) कंसातील टीप आपली की डच वकीलाची?
  • Log in or register to post comments

कंसातील टीप

जिप्सी
गुरुवार, 09/09/2010 - 01:32 नवीन
कंसातली टिप माझीच आहे. ब्रिटीशांच्या अंदाजानुसार हा खर्च ५ लाख होन इतका होता.मराठ्यांचे रायगडावरील दप्तर जळाल्याने अस्सल आ़कडा उपलब्ध नाही. अवांतर :- बटेव्हिआचा शोध घेतला असता असे कळते की बटेव्हिआ म्हणजे आजचा जाकार्ता.(विकीपेडिआ -Jakarta, on the island of Java, is the capital city of Indonesia. During the Dutch colonial era, it was called Batavia)
  • Log in or register to post comments

रोचक! भव्य सोहळा!!

शुचि
गुरुवार, 09/09/2010 - 04:08 नवीन
रोचक! भव्य सोहळा!!
  • Log in or register to post comments

छान........

विलासराव
गुरुवार, 09/09/2010 - 11:15 नवीन
नवीनच माहिती मिळाली. जिप्सी तुम्ही लिहीत रहा. खर्चाचे टेंशन घेउ नका, तो महाराजांनी केलेलाच आहे.जो असेल तो असेल.
  • Log in or register to post comments

होन म्हणजे काय????

अब् क
गुरुवार, 09/09/2010 - 12:23 नवीन
होन म्हणजे काय????
  • Log in or register to post comments

डॉलर, पौंड, युरो, दीनार

मेघवेडा
गुरुवार, 09/09/2010 - 18:48 नवीन
डॉलर, पौंड, युरो, दीनार म्हणजे काय माहिती आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अब् क

चांगली माहिती.

अवलिया
गुरुवार, 09/09/2010 - 13:46 नवीन
चांगली माहिती. धन्यवाद. किंचित सुधारणा - आपण नेहमी शिवराज्याभिषेक असा उल्लेख करतो, जो किंचित चुक आहे. खरे तर जेव्हा राजांना अभिषेक झाला तेव्हा अभिषेकाआधी राज्य अस्तित्वात नव्हते. त्यांना अभिषेक झाल्यावर ते राजा झाले आणि मग राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे शिवराजाभिषेक असा शब्दप्रयोग योग्य. गागाभट्टांनी शिवाजीमहाराजांच्या राजाभिषेकासाठी विविध ग्रंथांचा आधार घेऊन सर्व अभिषेक प्रक्रिया नक्की कशी करायची यासाठी ग्रंथ लिहिला आणि त्याच्याच आधाराने सर्व सोहळा पार पाडण्यात आला. त्या ग्रंथात सुद्धा राजाभिषेक असा उल्लेख आहे. अर्थात त्यामुळे मुळ भावनेला काही फरक पडत नाही जोपर्यंत असे काही झालेच नव्हते असे विचार घेऊन कुणी पुढे येत नाही. अर्थात आले तर आमचे अशांना योग्य उत्तर असतेच. :)
  • Log in or register to post comments

अजुनही काही ऐतिहासिक दाखले

पाषाणभेद
गुरुवार, 09/09/2010 - 18:43 नवीन
अजुनही काही ऐतिहासिक दाखले असतील तर द्या. जय शिवराय! छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो!
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
गुरुवार, 09/09/2010 - 18:53 नवीन
छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

दप्तर

लॉरी टांगटूंगकर
गुरुवार, 09/09/2010 - 20:22 नवीन
भाईलोक, दप्तर या शब्दाचे आजचे आणि पूर्वी चे रूप इतके वेगळे का आहे???(ऐतिहासिक संधार्भा सह सांगितल्यास उत्तम)
  • Log in or register to post comments

ह्म्म.... जिप्सीबुवांच्या

धमाल मुलगा
गुरुवार, 09/09/2010 - 21:20 नवीन
ह्म्म.... जिप्सीबुवांच्या पोतडीतुन एकेक लेख असे बाहेर यायला लागले आहेत हां :) ब्येस ब्येस! सायबा, आमची एक मागणी आहे. महाराजांच्या इतिहासाबद्दल जेव्हा लोकांना ठाऊक असतं तेव्हा ते बहुतांश त्यांच्या धामधुमीच्या काळाबद्दलची रोमांचकारक माहिती.. ह्या धामधुमीखेरीज उर्वरित काळात महाराजांनी राज्याची घडी बसवण्यासाठी काय योजना केल्या, जीवावर उदार होणारे मावळखोर्‍यांतले एकेक नररत्न कसकसे पारखुन उचलले, न्यायनिवाड्याची त्यांची पध्दत इत्यादी बाबींबद्दलही बखरी-दप्तरे-रुमाल बोलतात ते इथे आमच्यासारख्या काहीच ठाऊक नसलेल्यांसाठी लिहावे ही आग्रहाची विनंती.
  • Log in or register to post comments

धमालबुआंना

विलासराव
गुरुवार, 09/09/2010 - 21:28 नवीन
अनुमोदन.
  • Log in or register to post comments

शिवराज्याभिषेक

प्रभाकर कुळ्कर्णी
गुरुवार, 09/09/2010 - 21:58 नवीन
ही माहिती कुठली पुस्तकं वा पुस्तक वाचुल लिहिली आहे ते दिले नाही? मोरोपंत, निळोपंत - पंत म्हण्जे ब्राह्मण काय ? हा निळाजी पंडीत कोन? कारण आता मराठी बाल भारती त जे ३० एक वर्ष शिकवल्या गेलेलं आहे ते चुकीच आहे असं काही लोक म्हणत आहेत. ही माहीती बरोबर कशावरुन? " ब्राह्मण्,विद्वान व इतर मिळून" असं लिहिलं आहे. ब्राह्मणांना तर वाईट होते असं म्हणन्यात येत आहे. तू तर " छत्रपती शिवराय यांच्या अभिषेकाला" ब्राह्मण हे विद्वान व ईतरांच्या जोडीने बसले होते लिहित आहेस. जरा कोनत्या पुस्ताकातुन ही माहीती घेतली ती कळवीने. छत्रपती शिवाजी महाराज कि जय ! चू.भू. द्या. घ्या.
  • Log in or register to post comments

प्रभाकरराव, लेखाच्या

धमाल मुलगा
गुरुवार, 09/09/2010 - 22:29 नवीन
प्रभाकरराव, लेखाच्या सुरुवातीला जिप्सी ह्यांनी
संदर्भ :- डच रेकॉर्डस्,शिवकालीन पत्रसारसंग्रह खं.२
हा संदर्भ दिला आहे. बाकी, जातीय तेढविषयक प्रश्न - पुर्ण दुर्लक्ष. (स्वगतःपरमेश्वरा...कुठवर पसरवलं गेलंय हे गैरसमजाचं विष! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर कुळ्कर्णी

होन म्हणजे काय?

कुक
गुरुवार, 09/09/2010 - 22:06 नवीन
होन म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

होन हे शिवरायांच्या राज्यातील

धमाल मुलगा
गुरुवार, 09/09/2010 - 22:35 नवीन
होन हे शिवरायांच्या राज्यातील महाराजांनी सुरु केलेले चलन होते. जसे आज भारतात रुपया. हे होन सोन्याचे घडवत असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुक

होन म्हणजे काय?

सुनील
Fri, 09/10/2010 - 00:42 नवीन
होन म्हणजे काय, हा प्रश्न वर दोन जणांनी विचारला आहे. आता, होन म्हणजे एक शिवकालीन सोन्याचे नाणे, इतपत ऐकीव माहिती मला आहे. परंतु, एका शंकेचे उत्तर मला आजतागायत समाधानकारकरीत्या मिळालेले नाही. त्या काळात अनेक राज्ये होती. बहुतेक राजे स्वतःची नाणी घडवीत. आंतरराज्यीय व्यापार तर तेव्हाही होत असावाच. तर, ह्या सगळ्या अनेक नाण्यांचे (विविध राज्यांच्या) विनिमयाचे दर काय असत? ते कोण ठरवी? जर सगळी नाणी सोन्याची असती तर हा प्रश्न उद्भवला नसता कारण नाण्यातील सोन्याच्या प्रमाणावरून त्याचे मूल्य ठरले असते. परंतु, सगळीच नाणी सोन्याची नव्हती, हे खरे आहे. तसेच, राजकीय्/सामाजिक/आर्थिक परिस्थितीवरून नाण्यांच्या विनिमयाचे दर बदलीत असत काय? समजा एखादा राजा एखादी लढाई जिंकला, की वाढला त्याच्या नाण्याचा दर! असे काही होत असावे काय?
  • Log in or register to post comments

होन म्हणजे काय ?

जिप्सी
Tue, 09/14/2010 - 07:15 नवीन
होन हे शिवाजी महाराजांचे सोन्याचे नाणे होते. वजन २.७२ ग्राम. त्यावेळेचा विनिमयाचा दर साडेतीन ते पावणेचार रुपये. होन साधारणपणे शर्टाच्या बटणाएवढा असतो. (मी अस्सल होन हातात घेउन बघीतलेला आहे त्यावरून). प्रताप नावाचे सोन्याचे नाणेही होते. याबद्दल विशेष माहीती उपलब्ध नाही. सुवर्णनाण्यांशिवाय्,शिवराई,सापिका,फलम व चक्र ही तांब्याची नाणीही चलनात होती. यापैकी फलम व चक्र ही नाणी अजून उपलब्ध झालेली नाहीत. अवांतर :सिधुदुर्गाच्या उभारणीचा खर्च १ कोटी झाला होता,म्हणजे तेंव्हाचे सुमारे ३.५ कोटी म्हणजे आजच्या परिस्थितीचा विचार करून सुमारे ३५ कोटी तरी म्हणायला हरकत नसावी. मोरोपंत पिंगळेंचा वार्षिक पगार ७००० होन होता. बाकी सर्व प्रधानांना वार्षिक पगार ५००० होन मिळत असे. सुनिल :- तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा काहीसा प्रयत्न करत आहे. महाराजांच्या काळात आंतरराज्यीय व्यापार बरेचदा वस्तुविनिमय पद्धतीने होत असे. २ राज्यांमध्ये चलन विषयक करार झाल्याशिवाय परराज्यातील चलन वापरता येत नसे. या करारावेळी विनिमय दर सुद्धा ठरत असे. काही राज्यांचा असा करार झाला नसल्यास चलनाचा विनिमय दर राजा न ठरवता सावकार ठरवत असत. व त्यावेळेच्या विनिमय दराप्रमाणे पैसे देत. आंतरराज्यीय मोठे आर्थिक व्यवहार तर हुंड्यांमार्फत होत. हुंड्यां म्हणजे आजचे डीडी. सावकारांच्या पेढ्यांवरती हुंड्यां वटवल्या जात. (आजच्या चेकला त्याकाळात वराता असे म्हणत) पुढे पेशवाईत देशभरातली सर्व नाणी जवळपास सर्वत्र चालत. यांचा विनिमय दराबद्द्ल फारसे माहीत नाही. पण पेशवाईत पुणेरी रुपया,जुन्नर रुपया,सुरती रुपया असे रुपये होते. एखाद्या वस्तूची किंमत ४ सूरती रूपये वगैरे अशी असे. बाकी या विषयावर माझ्याकडे सध्यातरी एवढीच माहीती आहे. या विषयावर अधिक अभ्यास करून आपल्याला सविस्तर उत्तर द्यायचा प्रयत्न करीन
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सुनील
Tue, 09/14/2010 - 22:11 नवीन
धन्यवाद. अधिक माहितीच्या प्रतीक्षेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिप्सी

रंजक माहिती. या लेखात, इतर

विंजिनेर
Tue, 09/14/2010 - 09:20 नवीन
रंजक माहिती. या लेखात, इतर इतिहासाच्या पुस्तकांत कायम एक शब्द वाचण्यात येतो की इंग्रजांची वखार होती, डचांची वखार होती इ. तर हे 'वखार' प्रकरण काय आहे? मलातर वखार म्हटलं की लाकडाची नाहीतर कोळशाचीच टिणपाट पत्रे आणि सुभाबळीच्या वाफ्यांनी बांधलेली वखारच डोळ्यासमोर येते. पण एखादा कडक इस्त्रीची विजार, सोनेरी चकचकीत बटणे लावलेला कोट आणि काळेकुळकूळीत बूट घातलेला टोपीकर अशा वखारीत, लाकडाच्या भुशात/कोळशाच्या खकाण्यात राहून एकेकाळी भारतावर राज्य करायची स्वप्ने रंगवत होता यावर विश्वास बसत नाही :)
  • Log in or register to post comments

वखार !!!

जिप्सी
Tue, 09/14/2010 - 09:32 नवीन
त्याकाळात वखार म्हणजे कचेरी वजा गोदाम असा प्रकार होता. ईंग्रज व ईतर व्यापारी सुके खोबरे,मसाल्याचे पदार्थ अशा त्याच्या व्यापारी वस्तून्चा साठा करून ठेवत तसेच कंपन्यांचा सर्व व्यवहार इथूनच होत असे. महाराजांनी स्वराज्यातील कुठल्याही कुंपणीला वखारीस तट्बंदी करू दिली नव्हती पण सुरतेतील वखारीस तट्बंदी असल्याचे उल्लेख सापडतात.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा