✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पावसांत वडवानल ! ! !

न — निरन्जन वहालेकर, Mon, 09/06/2010 - 13:56
पावसांत वडवानल ! ! ! बरसत होता श्रावण अगणित, ऋतू प्रेमाचा होता फुलला, विद्युलतेसम प्रकटलीस तू, इंद्रधनूहि स्वागतास अवतरला. पाऊस रिमझिम, तू ओलेती, तन-मन माझेहि ओलेती, केस झटकणे तुझे त्या क्षणी, बरसले अगणित माणिक मोती. उधळीत रंग असे लावण्याचे, आलीगिले तू अवचित मजला, पावसांत जर वडवानल पेटला, मी दोषीन पावसाला.. निरंजन वहाळेकर

प्रतिक्रिया द्या
2079 वाचन

💬 प्रतिसाद (9)

मला उगाच

मदनबाण
Mon, 09/06/2010 - 17:17 नवीन
हनुमान वडवानल स्तोत्र आहे की काय असे वाटले... ;) छान कविता...
  • Log in or register to post comments

कवितेचा विषय छान आहे.

मेघवेडा
Mon, 09/06/2010 - 17:23 नवीन
कवितेचा विषय छान आहे. गेयतेच्या ग्राफाचा स्लोप/ग्रेडियण्ट 'ऋण' आहे असं वाटतंय! ;)
  • Log in or register to post comments

योग्य मार्गदर्शन.

निरन्जन वहालेकर
Tue, 09/07/2010 - 09:24 नवीन
" गेयतेच्या ग्राफाचा स्लोप/ग्रेडियण्ट 'ऋण' आहे असं वाटतंय ! " योग्य मार्गदर्शन.धन्यवाद ! ! ! गेयतेच्या दृष्टीने लिहिण्याचा पुन्हा प्रयत्न करीन पाहू कितपत जमते ते..
  • Log in or register to post comments

मी असे वाचले..

स्वानंद मारुलकर
Tue, 09/07/2010 - 21:28 नवीन
बरसत होता श्रावण अगणित, ऋतू प्रेमाचा होता फुलला, विजेसारखी प्रकटलीस तू, इंद्रधनू स्वागतास सजला. पाऊस रिमझिम, तू ओलेती, तन-मन माझेहि ओलावे, केस झटकणे तुझे त्या क्षणी, अगणित मोती मी झेलावे उधळत रंग असे प्रीतिचे, बिलगलीस तू अवचित मजला, ऊर पेटवू लागे पाऊस फितूर झाला ऋतूचक्राला आगाऊपणाबद्दल माफ करा. पुलेशु.
  • Log in or register to post comments

सुरेख! चित्रच उभे राहिले

मेघवेडा
Tue, 09/07/2010 - 21:31 नवीन
सुरेख! चित्रच उभे राहिले डोळ्यांसमोर! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानंद मारुलकर

क्या बात है !!!

मिसळभोक्ता
Tue, 09/07/2010 - 21:34 नवीन
ऊर पेटवू लागे पाऊस फितूर झाला ऋतूचक्राला सुंदर, आवडले... फक्त, ऋतु म्हटले, की काहीतरी वेगळेच डोळ्यासमोर येते. (मास सायकोलॉजी).. जरा वेगळे शब्द वापरले, तर ? फितूर झाला वैशाखाला असे म्हटले, तर एक वेग्ळीच नशा.. नाही का ? (ता.क. साला, आपण मारुलकराचा फ्यान झालोय आज.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानंद मारुलकर

>>ऋतु म्हटले, की काहीतरी

स्वानंद मारुलकर
Tue, 09/07/2010 - 21:40 नवीन
>>ऋतु म्हटले, की काहीतरी वेगळेच डोळ्यासमोर येते भा. पो. >>फितूर झाला वैशाखाला तिथे पाऊस त्याच्या स्वभावाला फितूर झालाहोते.मला म्हणायचे होते. मूळ कवितेतल्या शेवटच्या २ ओळी कळल्या नाहीत. तेव्हा मनानेच भर टाकली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

फितूर

मिसळभोक्ता
Tue, 09/07/2010 - 23:04 नवीन
मारुलकर साहेब, संभाजी महाराज औरंगजेबाला फितूर झाले, असे म्हटले, म्हणजे, औरंगजेबाला सहाय्य करू लागले, असे होते. स्वतःच्या स्वभावाला (द्विरुक्तीबद्दल क्षमस्व) सर्वच फितूर होतात. पाऊस आणि वैशाख ह्यांचे सहा-बाराचे नाते आहे (अधिक माहितीसाठी घड्याळ बघा.) त्यामुळेच म्हणतो, की "फितूर झाला वैशाखाला" खूप उठून दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानंद मारुलकर

१००% सहमत.

स्वानंद मारुलकर
Tue, 09/07/2010 - 23:45 नवीन
>>"फितूर झाला वैशाखाला" खूप उठून दिसते. याच्याशी १००% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा