✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भगवान श्रीकृष्ण - सत्य की मिथ्य?

स
सहज यांनी
Mon, 08/30/2010 - 12:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
62770 वाचन

💬 प्रतिसाद (201)

प्रतिक्रिया

काहीतरी वेगळेपण नको का?

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/01/2010 - 14:37 नवीन
अयोग्य किंवा न पटणारी कृत्ये खुप कमी आहेत
पण आहेत. म्हणजे देवही स्खलनशील असतात तर! मग देव म्हणून त्यांचं वेगळेपण काय? ही पण माणसंच होती का नाही? या हिशोबात अब्दुल कलामांना किंवा शिवाजी महाराजांनाही देव मानलं पाहिजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

>>>अब्दुल कलामांना किंवा

अवलिया
Wed, 09/01/2010 - 14:39 नवीन
>>>अब्दुल कलामांना किंवा शिवाजी महाराजांनाही देव मानलं पाहिजे! आम्ही मानतोच. नक्कीच मानतो. शिवाजीला आम्ही रुद्राचा अवतार मानतो... तुम्ही चांगले काम करा तुम्हाला पण मानु,... अजुन काही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रश्न एकट्या माणसाचा नाहीये;

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/01/2010 - 14:45 नवीन
प्रश्न एकट्या माणसाचा नाहीये; तुम्ही मानता पण इतर बरेच मानत नाहीत म्हणून तुम्ही तुमचा कल्ट सुरू करणार का? मुळात छाटछूट का होईना, चुका करणार्‍यांना विशेष स्टेटस का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कल्ट

सहज
Wed, 09/01/2010 - 14:47 नवीन
पंथ, उपपंथ आहेतच. ३३ कोटी आकडा काय असाच बनतो का? ज्यांचे पटते त्यांनाच निश्चीतच मानणारच की लोक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कारण ते छाट्छूट चुका करतात

मृत्युन्जय
Wed, 09/01/2010 - 14:55 नवीन
कारण ते छाट्छूट चुका करतात आणि त्यांच्या चुका देखील उदात्त कारणासाठी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>>>मुळात छाटछूट का होईना,

अवलिया
Wed, 09/01/2010 - 14:56 नवीन
>>>मुळात छाटछूट का होईना, चुका करणार्‍यांना विशेष स्टेटस का?? आमची मर्जी. चुक काय बरोबर काय... रामायण, महाभारत मुळातुन ज्याने वाचलेले असते त्याला हे प्रश्न पडतच नाही. सर्व नीट व्यवस्थित समोर येतं. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आम्ही मानतोच. नक्कीच

Nile
Wed, 09/01/2010 - 14:49 नवीन
आम्ही मानतोच. नक्कीच मानतो. शिवाजीला आम्ही रुद्राचा अवतार मानतो...
व्हेरी गुड. असे असेल तर मग ठिक. मुळात देव म्हणजे सामन्य माणसापेक्षा थोडेसे सरस अशी तुमची व्याख्या असेल तर आमची काहीच हरकत नाही. बाकी ते जर कुठल्या वाराचे उपास करत असाल तर शिवाजी अन कलामांचे वार पण ठरवुन टाका पाहु. तिर्थयात्रेला जात असाल न पुरंदरावर किंवा राष्ट्रपती भवनात? (रामेश्वरला कलामांच्या घरी सुद्धा जायला हरकत नाही म्हणा!) त्याशिवाय, सत्यनारायणासारख्या पुजा पण घाला दोघांच्या नावाने. आणि देवघरात दोघांच्याही मुर्तींची पुजा करत असालच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

>>>>व्हेरी गुड. असे असेल तर

अवलिया
Wed, 09/01/2010 - 15:00 नवीन
>>>>व्हेरी गुड. असे असेल तर मग ठिक. मुळात देव म्हणजे सामन्य माणसापेक्षा थोडेसे सरस अशी तुमची व्याख्या असेल तर आमची काहीच हरकत नाही. बास. हेच अपेक्षित आहे. >>>बाकी ते जर कुठल्या वाराचे उपास करत असाल तर शिवाजी अन कलामांचे वार पण ठरवुन टाका पाहु. तिर्थयात्रेला जात असाल न पुरंदरावर किंवा राष्ट्रपती भवनात? (रामेश्वरला कलामांच्या घरी सुद्धा जायला हरकत नाही म्हणा!) ते आम्ही पाहु.. म्हणत असाल तर ट्रेक साठी म्हणुन तुम्ही आलात तरी चालेल. ;) >>त्याशिवाय, सत्यनारायणासारख्या पुजा पण घाला दोघांच्या नावाने. मालक, सत्यनारायण विष्णूसाठी. इथे सत्यशिवाजी किंवा सत्यकलाम असे करावे लागेल. सदर पूजेसाठी लागणारी कथा संस्कृतात लिहित आहे, लवकरच प्रकाशित होईल. >>>आणि देवघरात दोघांच्याही मुर्तींची पुजा करत असालच. अगदी अगदी. अनेकांच्या घरात तसबिरी पण आहेत. रस्त्यांवर पुतळे आहेत. लवकरच एक मंदीर बांधणार आहोत.. देणगीचे स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

ट्रेक साठी म्हणुन तुम्ही आलात

Nile
Wed, 09/01/2010 - 15:06 नवीन
ट्रेक साठी म्हणुन तुम्ही आलात तरी चालेल.
आमंत्रणासाठी आभार. निसर्गावर आमचे बेमालुम प्रेम आहे, ट्रेकसाठी आम्ही पुरंदरावरही जाउ आणि सेंट थॉमस माउंटावरही जाउ. फक्त ते ट्रेक करताना टाळ कुटणे आमच्याने व्हायचे नाही ब्वॉ!
मालक, सत्यनारायण विष्णूसाठी. इथे सत्यशिवाजी किंवा सत्यकलाम असे करावे लागेल.
म्हणुनच सत्यनारायणासारख्या असे लिहले आहे. :-)
सदर पूजेसाठी लागणारी कथा संस्कृतात लिहित आहे, लवकरच प्रकाशित होईल.
लिहा च्यामारी. तुमच्या सारख्या अवलियांमुळेच साहित्यात अमुल्य भर पडली आहे, काही भोळे लोक त्याची पुराण म्हणुन पुजा करतात ते सोडा. ;-)
अगदी अगदी. अनेकांच्या घरात तसबिरी पण आहेत. रस्त्यांवर पुतळे आहेत. लवकरच एक मंदीर बांधणार आहोत.. देणगीचे स्वागत आहे.
मंदिर पुतळ्यांकरता देणगी देणार नाही, क्षमस्व! इतर काही समाजपोयगी असेल तर पाहु. (लगेच अकाउंट नं व्यनीतुन धाडु नये ;-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

लिहा च्यामारी. तुमच्या

अवलिया
Wed, 09/01/2010 - 15:08 नवीन
लिहा च्यामारी. तुमच्या सारख्या अवलियांमुळेच साहित्यात अमुल्य भर पडली आहे, काही भोळे लोक त्याची पुराण म्हणुन पुजा करतात ते सोडा. Wink तेच तर म्हणतो त्या भोळ्या लोकांना त्यांच्या नियतीवर सोडुन द्या.. बास ! (अतिभोळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

त्यांना त्यांच्या नियतीवर

Nile
Wed, 09/01/2010 - 15:12 नवीन
त्यांना त्यांच्या नियतीवर सोडुन दिलेलंच आहे. इथे फक्त ज्यांची विवेकबुद्धी शाबुत आहे त्यांना दोन्ही बाजु दिसाव्यात अन स्वतःच्या कुवती-बुद्धीनुसार योग्य काय ठरवावे या करीता प्रतिसादप्रपंच केला आहे. भोळसटांनी वाचले नाहीत तरी काय बिघडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

संपला विषय.

अवलिया
Wed, 09/01/2010 - 15:15 नवीन
अच्छा म्हणजे विवेक जागृत असलेल्यांना समजावे म्हणुन भोळसटांच्या देवांवर चिखल उडवावाच लागतो का ? असेल असेल आम्ही काही विवेक वादी नाही. संपला विषय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

भोळसटांच्या देवांवर

Nile
Wed, 09/01/2010 - 15:18 नवीन
भोळसटांच्या देवांवर चिखल
ह्याला आम्ही भोळसटांच्या अंधश्रद्धांचे खंडन असे म्हणतो. "आमच्या श्रद्धांवर चिखल उडवला" असे म्हणत रडणार्‍यांची तर आम्हाला कीव येते. पण मग पुराणातले भोळसटांचे हरणारे अन मग रडत "मोठ्या देवांकडे" त्राहिमाम करत जाणारे देव आठवतात अन आम्हाला गमक उमगते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

चालु द्या !

अवलिया
Wed, 09/01/2010 - 15:24 नवीन
चालु द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

चालु द्या ! लागलाना सगळ्या

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/01/2010 - 15:26 नवीन
चालु द्या !
लागलाना सगळ्या कपड्यांना चिखल ? तरी सांगत होतो.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हो रे.. खरं आहे. चुकलंच

अवलिया
Wed, 09/01/2010 - 15:27 नवीन
हो रे.. खरं आहे. चुकलंच गड्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

खरं आहे. चुकलंच

Nile
Wed, 09/01/2010 - 15:31 नवीन
खरं आहे. चुकलंच गड्या..
म्हणुन म्हणतो विवेकवादी व्हा! अशी नंतर पस्तावायची वेळ कमी वेळा येईल मग. ;-) शिका जरा पर्‍याकडुन. >)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

शिका जरा पर्‍याकडुन. मेल्या

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/01/2010 - 15:33 नवीन
शिका जरा पर्‍याकडुन.
मेल्या तु विमानातुन खाली उतर मग सांगतो (सांगतो + चिखलवतो) तुला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

जमणार नाही. तुमचा सल्ला

अवलिया
Wed, 09/01/2010 - 15:38 नवीन
जमणार नाही. तुमचा सल्ला फाट्यावर मारला आहे. * बास का सहजराव? १५० झाले आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

नायल्या, बेमालूम प्रेम म्हणजे

यशोधरा
Wed, 09/01/2010 - 18:39 नवीन
नायल्या, बेमालूम प्रेम म्हणजे काय रे? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

देव ही शेवटी एक पदवी अथवा व्यवस्था आहे नाही का?

सहज
Wed, 09/01/2010 - 13:16 नवीन
आता जसे सत्ताधीश आहेत आपले. जनमानसात ते सत्ताधीश असले तरी त्यांची प्रतिमा भ्रष्ट ते निर्बुद्ध काहीतरी चुकीचे करणारे अशीच असते ना? तसेच हे देखील. आजचे 'देव' उर्फ सत्ताधीश कितीही नावे ठेवा तरी आज आपल्या आयुष्यावर दुरगामी परीणाम करणारे निर्णय घेण्याची पॉवर त्यांच्याचकडे आहेत ना? काही करु शकतो का आपण त्यांचे वाकडे? ठीक आहे कधीतरी एखाद्या सत्ताधीशाला सरळ / पराभूत करतही असु तेव्हा जुन्या ग्रंथात असेही वाचलेच आहे की राक्षसांनी एकदा देवाला हरवले मग ते गेले विष्णुकडे इ इ ... बघ बॉ देव - सत्ताधीश - सर्वेसर्वा ही टोटल परत एकदा लागतीय की नै :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

ही तुलना चालेल. (जिंकतो तोच

Nile
Wed, 09/01/2010 - 13:34 नवीन
ही तुलना चालेल. (जिंकतो तोच इतिहास लिहतो असे म्हणतातच की) पण मुख्य फरक हा आहे, सद्ध्याच्या (तशी कृत्यं करणार्‍या) सत्ताधीशांना आपण शिव्या देतो की नाही? पण (तशी कृत्ये केलेल्या, पण जिंकलेल्या) पुराणातील विजेत्यांची मात्र देवघरात पुजा करतो! हा फरक ठळक आणि महत्त्वाचा आहे. (म्हणुन, ब्रॉडली, देव या संकल्पनेलाच विरोध आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

पण मुख्य फरक हा आहे,

मृत्युन्जय
Wed, 09/01/2010 - 15:13 नवीन
पण मुख्य फरक हा आहे, सद्ध्याच्या (तशी कृत्यं करणार्‍या) सत्ताधीशांना आपण शिव्या देतो की नाही? पण (तशी कृत्ये केलेल्या, पण जिंकलेल्या) पुराणातील विजेत्यांची मात्र देवघरात पुजा करतो! हा फरक ठळक आणि महत्त्वाचा आहे. (म्हणुन, ब्रॉडली, देव या संकल्पनेलाच विरोध आहे) तशी कृत्ये केलेल्या या शब्दाला माझा आक्षेप आहे. चुका तश्या नव्हत्या. चुका होत्या. पण त्या पण उदात्त कारणामुळे झालेल्या होत्या. दोघांच्या चुकाच वेगळ्या प्रकारच्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मूळात त्या चुका नव्हत्या...

llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/01/2010 - 21:02 नवीन
मूळात त्या चुका नव्हत्या... त्या चुका होत्या हे छाटछूट लोक कोण ठरवणार? इथेच कुठेतरी शूर्पणखा प्रकरणात रामाची कृती काही अयोग्य नव्हती याचा खुलासा आम्ही केला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

छापील, वाचनीय गोष्टीत कोणी

मनीषा
Wed, 09/01/2010 - 14:05 नवीन
छापील, वाचनीय गोष्टीत कोणी कोणाचे वाट्टेल ते म्हणणे खपवुन घेते का? आहो 'वाट्टेल ते ' आपल्यासाठी ... त्या काळात त्यांच्या साठी ते सहज असेल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

द्रौपदी व एकाचवेळी पाच नवरे ,

llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/01/2010 - 18:55 नवीन
द्रौपदी व एकाचवेळी पाच नवरे , महाभारत व रामायणातील अश्या वादग्रस्त प्रसंगांचे कायम कूतूहल वाटत आले आहे. 'शी बै अच्रट'वाल्या समाजाने हे सगळे कसे काय चालवून घेतले जर ही कथा कादंबरी आहे तर. वाचकांची पत्रेमधे भडीमार करुन प्रकाशकांना आवृत्ती बदलायला लावणे पासुन, प्रकाशकाचे दुकान जाळणे, राजद्रोहाखाली खटला भरणे इ उपाय केले नसतील आपल्या पब्लीकने राजवाड्यांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वी म्हणजे आर्ष कालात सर्व लोक पशूवत संचार करीत होते त्यानुसार सर्व व्यवहार लोकांचाही होता असे आर्ष वाङ्मयातूनही दिसते. म्हणजे पशुप्रमाणे मनुष्यही मोठा झाल्यावर आपल्या आईबरोबर संभोग करत होता तेच सख्ख्या बहीणी भावंडांबाबतही. आजच्या भारतीय समाजात ते पूर्णतः वर्ज्य मानले जाते. मग केवळ आता तसे नाही म्हणून तेव्हा तसे होते यावर विश्वास ठेवायचा नाही का? जसा जसा माणूस आणि समाज पुढे पुढे जात आहेत तसतसे जास्त बंधने आणत आहे. म्हणून मनुस्मृतीत जो ब्राम्हण श्राद्धात मांस खात नाही त्याला पौरोहित्याचा अधिकार नाही असे म्हटलेले असताना आताच्या काळातही पुरोहितवर्ग मांसाहार निषिद्धच मानतो. आजही. मग हा नियम कसा आला? मांसाहाराचा अतिरेक होऊ लागला म्हणूनच सोडले ना? त्यामुळे वादग्रस्त प्रसंगांचे मला कुतूहल वाट॑त नाही. त्याकाळानुसार त्या गोष्टी घडल्या. आणि तेव्हा घडल्या म्हणून तेव्हाचे सामाजिक संदर्भ तसेच्या तसेच आज वापरायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हेच

सहज
गुरुवार, 09/02/2010 - 06:49 नवीन
हे असे विविध मतप्रवाह असल्याने खरे काय खोटे काय व ते तसे का हे मानवी इतिहासात काय वादग्रस्त विषय. व त्यावर दोन्ही बाजुने आपापले युक्तीवाद. तसेच्या तसे संदर्भ वापरणे अवघडच. गेल्या दोन तीनशे वर्षात इंग्रजांनी आपला इतिहास बिघडवला व भारतीयांचा बुद्धीभेद केला असाही एक प्रवाद आहे. म्हणुन प्रत्येक काळात सगळ्यांचा आपापल्या मतानुसार इतिहास मानण्यावर भर. आजच्या कालानुसार 'पॉलिटीकली करेक्ट' इतिहास हवा आहे! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

महाभारत ही देवांची कथा नाही ,

मनीषा
Wed, 09/01/2010 - 13:40 नवीन
महाभारत ही देवांची कथा नाही , त्यामुळे यातील पात्रे मानवधर्माला अनुसरुन चांगले, वाईट वर्तन करतात. कर्ण हा जरी कुंतीने त्यागलेला सूर्य पुत्र होता तरी तो दुर्योधनाचा मित्र होता. त्यानी आपल्या मित्रासाठी म्हणून काही गोष्टी केल्या त्या अतिशय निंदनीय होत्या . उदा, द्रौपदीचा अपमान, विराट राजाच्या गायी पळवणे, घोषयात्रेला जाउन पांडवाना हीन दाखवण्याचा प्रयत्न करणे इ. त्याचा इतिहास असा होता कि आपले साध्य प्राप्त करण्यासाठी तो भल्या बुर्‍या मार्गांचा अवलंब करीत असे.. ब्रम्हास्त्र मिळवण्या साठी त्याने ब्राम्हण असल्याचे नाटक केले होते. त्या मुळे कर्णाला जी वागणूक मिळाली त्यात वावगे काहीच नव्हते फक्त दुर्दैव हे की अतिशय उच्च योग्यतेचा माणुस कुसंगती मुळे नाश पावला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आणी लबाडीने कर्णाची कवचकुंडले

Nile
Wed, 09/01/2010 - 13:42 नवीन
आणी लबाडीने कर्णाची कवचकुंडले पळवणार्‍यांचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

पळवली नाही याचकाच्या रुपात

मनीषा
Wed, 09/01/2010 - 14:01 नवीन
पळवली नाही याचकाच्या रुपात जाउन मागीतली .. आता देवराज इंद्र असला तरी काय झाले ? त्यालाही पुत्र प्रेम आहेच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अरेच्च्या! अशी लबाडी

Nile
Wed, 09/01/2010 - 14:40 नवीन
अरेच्च्या! अशी लबाडी तिकडच्या बाजुंनी केली की ते व्हिलन, इकडच्या बाजुने केली की ते पुत्रप्रेम??? बरं अश्या माणसासारख्या राग-लोभ असणार्‍यांना देव का म्हणता तुम्ही? त्यांची पुजा का करता? वरच्या प्रतिसादात कर्णाला लबाड म्हणालात, इथे त्याला माहित असुनही(सुर्याने सांगितले होते) तरी त्याने बरे कवच कुंडल दिले?एकिकडे इतका लबाड दुसरीकडे इतका भोळा अन दानशुर! असे कसे ब्वॉ? आपल्या हिरोंनाच जिंकण्यासाठी बनवलेली ही स्टोरी आहे याच्यावर विश्वास का म्हणुन ठेवावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

अशी लबाडी तिकडच्या बाजुंनी

llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/01/2010 - 21:05 नवीन
अशी लबाडी तिकडच्या बाजुंनी केली की ते व्हिलन, इकडच्या बाजुने केली की ते पुत्रप्रेम?? आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कार्टं. आपली ती अभिव्यक्ती दुसर्‍याची ती चिखलफेक. आपला तो बुद्धीवाद दुसर्‍याची ती अंधश्रद्धा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आमचं असं मत आहे कि

शिल्पा ब
Wed, 09/01/2010 - 13:02 नवीन
आमचं असं मत आहे कि लाक्षागृहात पाण्डवानीच कोणा सहा लोकांना जिवंत जाळले ...राजकारणापाई ...बाकी सीतेवर अविश्वास, लक्ष्मणाचे बायकोला वाऱ्यावर सोडून भावाबरोबर राहणे इ. शी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कारण यात एका आदर्श जीवन

मनीषा
Wed, 09/01/2010 - 13:29 नवीन
कारण यात एका आदर्श जीवन पद्ध्तीची कथा सांगीतलेली आहे सगळे आदर्श आपल्याला अनुकरणीय आहेत असे नाहीत . काही काल सापेक्ष आहेत. म्हणजे त्या काळी राजकन्यांची स्वयंवरं व्हायची , राजाला एक पेक्षा जास्त विवाह करण्याची अनुमती होती ती आता कालबाह्य आहेत. द्रौपदीच्या इच्छेविरूद्ध तिला पाच लोकांशी लग्नं करायला लावायचं, तेही वस्तू समजून, लाक्षागृहात ६ लोकांना जिवंत जाळणं, इ.इ. कशावरुन इच्छे विरुद्ध ? ती एक राजकारणा साठी केलेली कृती असू शकते . (शिवाजी महाराजां ना ८ राण्या होत्या.) आणि लाक्षागृहात ६ जणांना जाळणं हे ठरलेलं नव्हतं , त्या रात्री पांडवांनी वारणावतातील जत्रेतील देवतेची पुजा करुन सर्व गावकर्‍यांना प्रसाद भोजन दिले, त्या वेळी ही भिल्ल स्त्री तेथे आली ५ मुलां समवेत , आणि त्यांनी भोजना बरोबर मद्य प्राशन केले ( त्या काळी मद्यपान स्त्रीयांनाही निशिद्ध नव्हते) आणि ते सर्व तिथेच झोपले, जर पांडव तिथुन गेले नसते तर पुरोचन ते लाक्षागृह पेटवणारच होता. त्या मुळे तो एक दुर्दैवी अपघात होता असं म्हणता येईल. रामायण, महाभारतामधले खगोलीय संदर्भ उचलून ते लिहीले कधी यांचा काल निश्चित करता येईल. (कसा ते मला विचारू नये.) वास्तव रामायण मधे वर्तकांनी ते खूप विस्तृत पणे सांगीतले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

राजकारण? भावाभावांमधील भांडणे

शिल्पा ब
Wed, 09/01/2010 - 13:35 नवीन
राजकारण? भावाभावांमधील भांडणे मिटवण्यासाठी म्हणा हवे तर...पुरानाप्रमाणे द्रौपदी सुगंधी, सुंदर वगैरे होती म्हणून भावाभावात भांडणे लागली असती...ती टाळण्यासाठी तिला ५ जणांची पत्नी म्हणून राहावे लागले... माझ्या मते कुंती हिमालयाच्या जवळील भागातील असावी...अगदी काही (कदाचित १० किंवा कमी )वर्षापर्यंत तिथे बहुपतित्वाची प्रथा होती...हल्लीच एका मराठी पेपरात याबद्दलची बातमी वाचली. बाकी काहीही असले तर हे लोक अस्तित्वात होते हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

पुरानाप्रमाणे द्रौपदी सुगंधी,

मनीषा
Wed, 09/01/2010 - 13:48 नवीन
पुरानाप्रमाणे द्रौपदी सुगंधी, सुंदर वगैरे होती तसेच ती पांचाल देशाची राजकन्या होती जो कुरुंना तुल्यबळ असा राजा होता. ती एक बुद्धीवान आणि अनेक विद्या पारंगत होती . तिचा पांडवांशी विवाह योगायोगाने झाला नव्हता तर तसे घडावे म्हणून तिने असा पण लावला जो अर्जुनाशिवाय कोणीही जिंकु शकणार नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

आयला, राजकन्या असूनही असे

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/01/2010 - 15:47 नवीन
आयला, राजकन्या असूनही असे 'पण' लावावे लागायचे? त्यामानाने सुभद्रेच्या काळात बरीच प्रगती झालेली दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

लक्ष्मणाचं बायकोला १४ वर्ष

मृत्युन्जय
Wed, 09/01/2010 - 14:07 नवीन
लक्ष्मणाचं बायकोला १४ वर्ष सोडून देणं, सीतेवर अविश्वास इ.इ. गोष्टी आदर्श? रामाने एक चांगला राजा कसा असावा याचा आदर्श घालुन दिला. काही बाबतीत तो चुकला. देवसुद्धा चुक कसा काय करु शकतो बुवा? असा प्रश्न असेल तर एकदम मान्य. देवाने चुक कशी केली? पण देवाने चुका केल्याच्या बर्‍याच गोष्टी पुराणात किंवा तैतिरीय संहितेत मिळतील. देवाला चुका करण्याचा हक्कच नाही जणु या मानसिकतेमधुनच मग पुढे भागवतामधील अवास्तव गोष्टी पुढे आल्या. इथे देव आणि त्याचे अवतार या दोन गोष्टीमधील फरक समजावुन घेतला की कदाचित थोडे पचनी पडेल. चुका करुन सुद्धा त्याने जे असामान्य कार्य केले त्यामुळे तो देव. लक्ष्मणाने बायकोला सोडले यातील केवळ एक बाजु तुम्ही बघता. बायकोवर अन्याय झाला. पण लक्ष्मणाने जे कष्ट सोसले त्याचे काय? भावाच्या प्रेमाखातर त्याने ऐन उमेदीची १४ वर्षे कारण आणि गरज नसताना वनवास भोगला. त्यागाचे याहुन मोठे उदाहरण कुठे असेल तर सांगा. भरताने १४ वर्षे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवुन राज्यकारभार चालवला. निष्ठेचे आणि निस्वार्थीपणाचे याहुन मोठे उदाहरण कुठे असेल तर तेही सांगा. रामायणात जे जे आदर्श आहे ते ते घेउयात आपण. जे पटत नाही त्यासाठी रामाची स्तुती करण्यात काहीच अर्थ नाही. आपल्या आसपास पण अशी कित्येक माणसे आपण बघतो जी पुज्यनीय असतात. ती कधीच चुका करत नसतील का? त्यांनी केलेले महान कार्य हे त्यांच्य काही चुकांसमोर असामान्य असेल तर ते वंदनीय ठरायला हरकत नाही. नाही का? मुळात रामाने सीतास्वयंवरातच फाऊल केला होता. धनुष्याला दोरी लावायची तर धनुष्य मोडून त्याने जनकालाच शेंडी लावली. रामाने धनुष्याला दोरी न लावता ते तोडले म्हणुन सीतेला आयुष्यभर लग्नाशिवाय ठेवायला पाहिजे होते का जनकाने?रामाने काय जबरदस्ती केली काय जनकावर? द्रौपदीच्या इच्छेविरूद्ध तिला पाच लोकांशी लग्नं करायला लावायचं, एक मुख्य प्रश्न. तिच्या इच्छेविरुद्ध होते तर तिच्या बापाने विरोध का नाही केला? भावाने युद्ध का नाही केले? मुळात तिचे ५ जणांबरोबर लग्न होणे (तिच्या इच्च्छेविरुद्ध समजुयात आपण) हेच या गोष्टीचे द्योतक आहे की मुळात स्त्रीला त्यावेळेस फारशी किंमत नव्हती. युधिष्ठीराने नंतर तिला पणाला लावुन जणु हे सिद्धच केले. हे सगळे त्यावेळेस बरोबर होते. आजच्या निकषांवर त्या काळातल्या माणसांचे मुल्यमापन करणे कितपत योग्य होइल? लाक्षागृहात ६ लोकांना जिवंत जाळणं, इ.इ. कोणत्या न्यायाने आदर्श? आदर्श नव्हतीच ती गोष्ट. स्वीकरु नयेच आपण. पण मुळात पांडव म्हणजे महाभारताचे नायक नव्हेत. नायक कृष्णच होता. त्याने जे काय केले त्यावर बोलुयात. बाकीच्यांनी केलेल्या चुका मान्य करुन सोडुन देउयात,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

रामाने एक चांगला राजा कसा

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/01/2010 - 15:03 नवीन
रामाने एक चांगला राजा कसा असावा याचा आदर्श घालुन दिला.
रामाचे वडील आदर्श राजा नव्हते काय? गीत रामायणाततरी दशरथ पितासमान राज्यकर्ता असल्याचा उल्लेख आहे. रामायणाची इतर व्हर्जन्स मी वाचलेली नाहीत. चुभूदेघे. भरत चांगला राजा नव्हता का? रामानेही आपलं राज्य भरताला दिलेलं नव्हतं. मला तर भरत हा जास्त महान वाटतो कारण त्याला राज्य करण्याचा अधिकार असूनही तो राजा झाला नाही, पंतप्रधान झाला आणि १४ वर्षांनंतर तो ही अधिकार सोडला. रामाने मात्र पादुका देऊन का होईना आपला क्लेम ठेवला. असो. इतर उदाहरणं सोडून देते आहे. पण मुद्दा असा आहे, आपल्या आजूबाजूलाही प्रशंसनीय, पूजनीय माणसं असतातच असतात. ती माणसंही चुका करतात, अनेकदा आपल्या चुका मान्यही करतात पण म्हणून ती माणसं देव होतात का? व्यवहारात डोकावून पाहिलं तर नाही. गाडगेबाबा संत, अतिशय आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत हे कोणीही मान्य करेल, पण ते देव झाले का, नाही. (त्यांना देव बनवणं हा त्यांचाच मोठा पराभव असेल.) आमचे एक जालमित्र श्री. बिपिन कार्यकर्ते यांचं एक वाक्य आठवलं: कोणीही माणूस काळा किंवा पांढरा नसतो, असतात त्या करड्याच्या वेगवेगळ्या छटा! देवसुद्धा जर करड्यातलाच असेल तर त्याचं वेगळेपण काय आणि नसेल तर नक्की काय जपलं जातंय हे समजून घेण्याची मला फार उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

भरत हा जास्त महान वाटतो कारण

अवलिया
Wed, 09/01/2010 - 15:06 नवीन
भरत हा जास्त महान वाटतो कारण त्याला राज्य करण्याचा अधिकार असूनही तो राजा झाला नाही, पंतप्रधान झाला आणि १४ वर्षांनंतर तो ही अधिकार सोडला. रामाने मात्र पादुका देऊन का होईना आपला क्लेम ठेवला. कशावरुन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

राज्य किंवा राजेपणावरून!

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/01/2010 - 15:10 नवीन
राज्य किंवा राजेपणावरून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

विस्तृत सांगा.

अवलिया
Wed, 09/01/2010 - 15:12 नवीन
विस्तृत सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

नक्की काय

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/01/2010 - 15:24 नवीन
नक्की काय विस्तृत सांगायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

भरत हा जास्त महान वाटतो कारण

अवलिया
Wed, 09/01/2010 - 15:25 नवीन
भरत हा जास्त महान वाटतो कारण त्याला राज्य करण्याचा अधिकार असूनही तो राजा झाला नाही, पंतप्रधान झाला आणि १४ वर्षांनंतर तो ही अधिकार सोडला. रामाने मात्र पादुका देऊन का होईना आपला क्लेम ठेवला. हे अत्यंत चुकीचे आकलन कसे काढले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हे अत्यंत चुकीचे आकलन कसे

llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/01/2010 - 18:58 नवीन
हे अत्यंत चुकीचे आकलन कसे काढले? सवय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

महाभारतात तर दुर्योधनदेखील

मृत्युन्जय
Wed, 09/01/2010 - 15:44 नवीन
महाभारतात तर दुर्योधनदेखील पित्यासमान राजा होता असे उल्लेख आहेत. पित्यासमान राजा असणे वेगळे आणि राजाचे कर्तव्य पार पडताना असामान्य स्वार्थत्याग करणे वेगळे. आजही आपण सुवर्णकाळाची आठवण करताना रामराज्य असे म्हणतो. हा एवढा मोठा ठसा रामाने राजा म्हणुन उमटवला आहे. याशिवायही इतर गुण होते की ज्यामुळे त्याचे देवत्व उठुन दिसते. शिवाय माणसाचा देव होणे आणि देवाने माणुस म्हणुन जन्म घेणे वेगळे. आता याला कोणि प्रश्न विचारेल की पुरावा काय की विष्णुने रामाच्या रुपात माणुस म्हणुन जन्म घेतला होता? तर काहीच नाही. रामायणात लिहिले आहे हाच पुरावा. अजुन काय पुरावा असु शकतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पादुका भरताने मागुन घेतल्या.

मृत्युन्जय
Wed, 09/01/2010 - 16:31 नवीन
पादुका भरताने मागुन घेतल्या. हा त्याचा स्वार्थत्याग. नंतर रामाने अनवाणी प्रवास केला असल्यास हा त्याचा स्वार्थत्याग. रामाने आपणहुन पादुका घेउन जाणे भाग पाडले नव्हते. उलट राम तर त्याला म्हणाला की तु सुखेनैव राज्य कर मी तुझ्या आड येणार नाही. वनवास पुर्ण झाल्यावर पण त्याने परत एकदा खात्री करुन घेतली की त्याने परत आलेले भरताल रुचणार आहे. त्याला राज्याची अभिलाषा नाही . त्यानंतरच राम परत आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

रामाने धनुष्याला दोरी न लावता

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/01/2010 - 15:33 नवीन
रामाने धनुष्याला दोरी न लावता ते तोडले म्हणुन सीतेला आयुष्यभर लग्नाशिवाय ठेवायला पाहिजे होते का जनकाने?रामाने काय जबरदस्ती केली काय जनकावर?
काय कल्पना नाही याची मला! पण मुळात फाऊल होता का नाही? पुढे सीतेने रामाशी का लग्नं केलं हा तिचा व्यक्तीगत प्रश्न आहे/होता. फाऊलचा मुद्दा टेक्निकल आहे.
तिच्या इच्छेविरुद्ध होते तर तिच्या बापाने विरोध का नाही केला? भावाने युद्ध का नाही केले?
ही हा हा हा ... स्त्रियांना एवढं काय महत्त्व द्यायचं? घरातल्या मायलेकी धरून स्त्रियातर राजकीय सोयीसाठी वापरण्याची प्यादीच होती ना? शिवाजीराजांशी आपल्या लेकीचं लग्नं व्हावं यात मूळ हेतू स्वतःचा स्वार्थ का लेकीचं भलं, तिची इच्छा असा काही होता!!
आजच्या निकषांवर त्या काळातल्या माणसांचे मुल्यमापन करणे कितपत योग्य होइल?
कोणत्याही काळात एका माणसाला वस्तू मानण्याचं काय समर्थन देणार? "एक राणी होती; तिला दोन राजे होते, एक आवडता, एक नावडता" याही उदाहरणाचा क्लिशे होणार असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

समाजाचे योग्यायोग्यतेचे निकष

मृत्युन्जय
Wed, 09/01/2010 - 15:53 नवीन
समाजाचे योग्यायोग्यतेचे निकष बदलत जातात. आज जे योग्य आहे ते उद्या कदाचित अयोग्य असेल. गुलामगिरी आज अयोग्य आहे. ५०० वर्षांपुर्वी नव्हती. अजुन ५०० वर्षांनी काय परिस्थिती असेल माहित नाही. आज गांधर्वविवाह समाजाला मान्य नाही महाभारत काळात होता. आज तो केवळ मान्य नाही म्हणुन अर्जुनाला बलात्कारी म्हणायचे का? आज एका पुरुषाने २ विवाह (मुस्लिमांचे सोडुन द्या. त्यांना सगळे चालुन जाते) करणे अयोग्य मानले जाते. शिवाजी महाराजांनी ८ विवाह केलेच ना? या एका गोष्टीसाठी त्यांना खलनायक ठरवणार का? दुर्दैवाने त्या काळात तीच परिस्थिती होती. जे झाले ते मला देखील अयोग्य वाटते. पण म्हणुन त्यासाठी कृष्णाला दोषी मानणे योग्य होणार नाही. (आणि पांडवांना शिव्या घालत असशील तर माझ्या १० जोड)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>> गुलामगिरी आज अयोग्य आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/01/2010 - 16:05 नवीन
>> गुलामगिरी आज अयोग्य आहे. << उत्तम गोष्ट आहे. >> ५०० वर्षांपुर्वी नव्हती. << मूठभर शक्तीशाली लोकांसाठी अयोग्य नव्हती म्हणून गुलामांची मतंच नव्हती का? स्त्रीशिक्षण, विधवापुनर्विवाह, सतीबंदी ज्या काळात अयोग्य समजले जात होते त्या काळातही त्यासाठी लढणारे लोकं होते ते चुकीचे होते का? >> अजुन ५०० वर्षांनी काय परिस्थिती असेल माहित नाही. << समहत! >> आज गांधर्वविवाह समाजाला मान्य नाही महाभारत काळात होता. << माझ्या माहितीत आजकाल त्याला लिव्ह इन म्हणतात. किंवा गांधर्वविवाह करणारी जोडपी फक्त समाज या घटकाचा उपद्रव होऊ नये आणि/किंवा इतरांना आपल्या व्यक्तीगत आयुष्यात डोकावू देण्याची गरज नाही म्हणून ही माहिती लपवून ठेवतात. >> आज तो केवळ मान्य नाही म्हणुन अर्जुनाला बलात्कारी म्हणायचे का?<< राक्षसविवाह करणार्‍यांना आजकाल बलात्कारी म्हणतात, असा माझा समज आहे. चुभूदेघे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा