सगळे भयंकर आहे. मला एक शंका आहे हे पुस्तक आपल्या रजकारण्यांनी वाचले असेल का ? नसल्यास त्यांनी ते वाचावे यासाठी काय करावे लागेल ?
आपण ज्या चिकाटीने हे भाषांतर पूर्ण केले आहे ते खरोखरच ग्रेट आहे. आणि एक भारतीय म्हणून मी आपले आभारही मानतो.
माझ्या (कांहींना हास्यास्पद वाटणार्या) संवयीनुसार मी "हे पुस्तक प्रत्येक संरक्षणमंत्र्याने, परराष्ट्रमंत्र्याने, प्रत्येक IFS/IAS अधिकार्याने व प्रत्येक पंतप्रधानाने curriculum म्हणून वाचलेच पाहिजे अशी सक्ती करावी" अशा अर्थाचे पत्र पंतप्रधानांना पाठविले आहे.
ओबामा व हिलरी क्लिंटन यांनाही अशीच पत्रे लिहिली आहेत व पूर्वीच्या administrationsनी केलेल्या चुका तुम्ही तरी करू नका असे आग्रहपूर्वक लिहिले आहे. (त्या दोघांनी वाचणे भारताच्या जास्त हिताचे आहे.)
अर्थातच तिघांचेही उत्तर आलेले नाहीं. (मगर हम छोडेगा नहीं जी!)
जकार्ता राजदूतावासातील बर्याच अधिकार्यांना ज्यांना मी वैयक्तिकरीत्या ओळखतो त्यांनाही सांगितले आहे आणि "जवाहरलाल नेहरू इंडियन कल्चरल सेंटर"च्या प्रमुखांना (ज्यांनाही मी वैयक्तिकरीत्या ओळखतो) या पुस्तकाची प्रत केंद्राच्या समृद्ध असलेल्या पुस्तकालयासाठी घ्यायची शिफारसही केली आहे. त्यातल्या कांहींना मी असे भाषांतर करत असून हे पुस्तक वाचण्याची गरज आहे हे पटलेही आहे. पण राजदूतावासात या पुस्तकाची प्रत सध्या तरी उपलब्ध नाहीं.
बघू येते का ती इथे आणि कधी!
काळे काका,
तुम्ही केव्हढ्या मेहनतिने हे काम तडीस नेले. ही ठिणगी हस्ते परहस्ते अनेकांच्या हाती जाईल. आणि कोणि अज्ञात व्यक्ती या माहितीचा उपयोग करुन निर्णायक क्षणी एक असा निर्णय घेईल जो अनेकांचे प्राण वाचवेल. नियतीने दिलेले कर्तव्य तुम्ही ज्या विवेकबुद्धीने पार पाडले, त्याला तोड नाहि.
सलाम !
(विनम्र) अर्धवटराव
प्रतिक्रिया
भयंकर !
जकार्ता राजदूतावासातील बर्याच अधिकार्यांना मी सांगितले आहे
एक चिंगारी !!