पुण्याच्या मुळा-मुठेच्या नैसर्गिक ठिकाणांस ईसरलात का ? .. झ-पुल ऊतरून खाली गेलं की मुळा(की मुठा?) च्या स्वच्छ पात्रात प्रवेश होतो... समोर ईतके स्वच्छ चॉकलेटी काळसर पाणी पाहून आपल्याला या नदीच नाव ऍक्वाफिना किंवा बिसलेरी का नाही असा प्रश्न पडतो... आजु बाजुला असलेले लोक्स तिथेत तुळस लावत असतात. त्यामुळे आपल्याला सुंदर मनमोहक तुळशीचे शेत दिसते. मग त्या वातावरणातला सुगंध ... आहाहाहा !! मृगाची कस्तुरी काय करता हो ? एकदम बेस !! मग असेच तुळशीच्या शेतातुन सावध पणे वाट काढत पुढे निघावे ... मस्त रमनिय स्थळ आहे पुण्यात... एकदा गेलात की पाय निघत नाही तिथुन./... आणि परत परत जावेसे वाटते ...
टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
अहो काका.. ते तर बाय डिफॉल्ट असणारच.. त्यांच्याच तर मागे बसून जाणार ना
पटले, पण त्यांना अनुल्लेखाने मारलेत म्हणून जरा हृदयात कळ उमटली. माझ्या बायकोला कधी कधी सांगावे लागते, 'मॅडम, मैं आपका पती हूं। ड्रायव्हर नही।'
ताम्हीणी लांब वाटत असेल तर त्याच रस्त्यावर पौडपासून पुढे १०-१५ किमी वर मुळशी लागते. पावसाळ्यातच जाण्यात मजा आहे. तलाव, झरे आणि वृक्षवल्ली आणि हादडायला भरपूर ढाबे.
ही कल्पना मस्त.. मस्त होडीत बसून मी गरम गरम मटण-भाकरी-रस्सा-कांदा चोपतीये!
हवं असल्यास त्याचा कुक तांबडा-पांढरा रस्सा पण बनवून देतो...
आता बोल!
मस्त स्पिरिटच्या दिव्यावर मंद आगीवर सगळं अन्न गरमागरम राहतं आणि .....
आयचा घो रे.....भाकरी कुस्करुन त्यावर रस्सा घालून हादडायचं....सोबतीला दहीकांदा, आणि बुक्कीनं फोडलेला कांदापण..जोडीला तोंडी लावायला खीमा.....
=P~ =P~ =P~
मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ शकतो.प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटते.मी उन्हाळ्यात गेलीये,पावसाळ्यात गेलीये, थंडीत तर आह्हां ....सगळीकडे धुक...गरम चहा आणि भाजी.लय भारी.मला प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटल.उन्हाळ्यात चमचमणार पाणी बघितल्यावर भारी वाटल.
आणखीन एक पर्याय आहे.खडकवासला.खडकवासल्याला पाठीमागच्या बाजूने गेल्यावर पिकोक बेची पती दिसल्यावर आणखीन थोडे पुढे जायचे तिथे एक सोलिड ढाबा आहे.इथे जाताना तुम्ही आधीच शीतपेय किवा खायला घेऊन जा कारण इथे सगळ प्रचंड महाग मिळत.पण जागा छान आहे.इथे काही टेन्ट उभारलेत.तिथे बसून एकांताचा आनंद घ्या, किवा बदमिन्तन खेळायची सोय आहे.एकदा जाऊन जा.छान आहे.
मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ शकतो.प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटते.मी उन्हाळ्यात गेलीये,पावसाळ्यात गेलीये, थंडीत तर आह्हां ....सगळीकडे धुक...गरम चहा आणि भाजी.लय भारी.मला प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटल.उन्हाळ्यात चमचमणार पाणी बघितल्यावर भारी वाटल.
चहा आणि भाजी ? हा कुठला पर्याय आहे ?
आणखीन एक पर्याय आहे.खडकवासला.खडकवासल्याला पाठीमागच्या बाजूने गेल्यावर पिकोक बेची पती दिसल्यावर आणखीन थोडे पुढे जायचे तिथे एक सोलिड ढाबा आहे.इथे जाताना तुम्ही आधीच शीतपेय किवा खायला घेऊन जा कारण इथे सगळ प्रचंड महाग मिळत.पण जागा छान आहे.इथे काही टेन्ट उभारलेत.तिथे बसून एकांताचा आनंद घ्या, किवा बदमिन्तन खेळायची सोय आहे.एकदा जाऊन जा.छान आहे.
पिकोक बेची पती ? आणि ढाब्यावरती सगळे महाग मिळते म्हणूण बाहेरुन शीतपेय आणि खायला घेउन जायचे ? =)) =)) हाणेल की धरुन धाबेवाला.
बदमिन्तन ? 'बदनाम झालेले चिंतन' ह्या अर्थाचा शब्द वाटला हा.
वरंधा घाट जवळ जवळ निम्म उतरुन गेल्यावर उजवीकडे घाट उतरायच्या रस्त्यातच एक छोटा रस्ता जातो. येथे माझ्या आठवणीप्रमाणे एक पाटी आहे शिवथरघळकडे. पाटी निट दिसेल अशी नाहीये त्यामुळे चुकायची शक्यता आहे. हा कच्चा रस्ता आपल्याला थेट शिवथरघळीकडे घेउन जातो.
मोठी गाडी जाणार नाही पण छोट्या गाड्या अथवा मोटारसायकल नक्की जाते. पावसाळ्यात हा रस्ता पकडुन शिवथरघळ गाठणे म्हणजे एक मस्त अनुभव आहे.
--
ध्रुव
शनीवार वाड्याजवळच , दक्षीणाभिमुखी मारुतीजवळ केतकर आणि जोशी यांनी उभारलेले ' संधिपाद प्राणि संग्रहालय' आहे. तिथे फक्त संधिपाद वर्गातीलच प्राणि पहायला मिळतील.
धमु,
भेट देउन झाल्यावर भेटवर्णन जरूर लिहा. बाकिच्याना उपयोगी पडेल.
तसेच बाकिच्यानी नुसती नावे सुचवण्याऐवजी तेथे जाउन आल्याचे अनुभव सांगितल्यास हा जास्त मदत होइल.
संधिपाद हा शब्द शाळेनंतर बर्याच वर्षांनी उच्चारला.....
परत परत म्हणून काय मज्जा वाटते... :SS
अहाहा, काय ते शब्द.....
सन्धिपाद, डिंभक, ग्रसनीमध्यकर्णनलिका,आंत्रपुच्छ...
( शाळेत मराठीत जीवशास्त्र शिकलेला) भडकमकर..
अ ) कार्ला - भाज्या च्या लेण्या हा पण ऐक चांगला पर्याय आहे.
रेल्वेने कार्ल्या पर्यंत जाता येतं किंवा जुना मुंबई रस्त्याने ही जाता येते. फक्त ५० कि.मी
पावसात जायला ऐक वेगळीच मजा आहे.
ब) शिवथर धळ - सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं निरव शांत, डोगर, गर्द दाट झाडी आणी धबधब्यांनी वेढ्लेलं ठिकाण. (रामदास स्वामींनी दासबोध ऐथेच लिहीला होता) अंदाजे ९० कि. मी.
भटकंती प्रिय (आर्य)
थोडंसं दूर जायची तयारी असेल तर
पुण्याहून सासवडला जावं (३०किमी) तिथून साधारणतः १३ कि.मी.वर पुरंदर गड आहे...केवळ अप्रतिम!!!
चढायला अतिशय सोपा, आणि एकदम हिरवाकंच....
परताना, पुरंदर पायथ्यापासून साधारण ६ कि.मी.वर असलेले नारायणपूरचं मंदीरही छान.
सिंहगड रस्त्यावर पु.ल.देशपांडे उद्यान देखील अगदी जाऊन येण्यासारखं.
पुरंदर अप्रतिमच....शंभूराजाचं जन्मस्थान...किल्ल्यावरची पुरंदरेश्वर,केदारेश्वर मंदिरे पाहण्यासारखी...
पायथ्याजवळ असलेल्या नारायणपूर येथील प्राचीन नारायणेश्वराचे आणि एकमुखी दत्ताचे मंदिर हि सुंदर !
- मालोजीराव (पुरंदरकर)
बेडसे
भुलेश्वर
त्रिशुन्ड्या मंदिर - मंगळवार पेठ
शिरवळची लेणी - ५५ किमी
मस्तानी तलाव - २५ किमी
भिगवण - पक्षी अभयारण्य - ९० किमी
कवडी - पक्षी निरीक्षणासाठी
कर्नाळा - पक्षी अभयारण्य - अंदाजे ११०
चाकणचा किल्ला
चाकणजवळचे वराह मंदिर
पाषाण तलाव - - पक्षी निरीक्षणासाठी ;)
सोनोरीचा वाडा व भुयार
सोनोरीचा किल्ला - मल्हारगड
वाईजवळचा घाट - मेणवली
निघोजची रांजणखळगी
वाईजवळ पांडवगड व गडाच्या पोटातील लेणी
सध्यातरी इतकीच आठवत आहेत आत्ता...
--
ध्रुव
जबराट रे!!!
ध्रुव भौ!!! अरे काय कधी घरी असतोस की नाही? डायरेक्ट पायाला भिंगरी?
एका वट्टात भास्सकन्न इतकी ठिकाणं सांगून मोकळा, वर आणि
सध्यातरी इतकीच आठवत आहेत आत्ता...
हे?
लय भारी...भेटायलाच पाहिजे तुला...आपल्यासारखाच भटक्या दिसतोयस.
-(भटकमल्हारी) ध मा ल.
डिस्क्लेमरः भटक'भवानी' ला पुल्लिंगी शब्द सापडला नाही म्हणून मल्हारी वापरला. हेतू भावना दुखावणे नाही. आमच्याही भावना मल्हारीमार्तंडाच्या पायाशी रुजु आहेत.
विश्रामबागवाड्यामध्ये कायमस्वरुपी 'पुनवडी ते पुणे`' हे प्रदर्शन असते. (कोणी पाहिले आहे का? माझे राहून गेले :( )
वाडा आणि प्रदर्शन असा दुहेरी हेतू साध्य होईल.
-- लिखाळ.
कळकट , मळकट भिंती, उखडलेल्या फरशा, कोळीष्टकं आणि कुबट वास. बघण्यासारखे काहि नाही , माडेल ट्रेन बद्द्ल काहीच माहीती मिळत नाही. विक्री साठी ठेवलेल्या ट्रेन तद्द न चीनी बनावटीच्या व अवाच्यासवा महाग.
त्या पेक्षा राजा केळकर संग्रहालय उत्तम आहे.
पुण्यातील प्रेक्षणिय स्थळे(फि'रस्त्यांसाठी)
नळस्टॉप चौकः आजूबाजूला जे दिसेल ते बघा.बाजूलाच अप्पाचे हाटील असल्याने खाण्यापिण्याची उत्तम सोय.
गुडलक चौकः शक्यतो संध्याकाळी जा,बघण्यासारख्या भरपूर प्रेक्षणिय गोष्टी ;) मरेस्तोवर खाता येईल एवढी हाटीलं आहेत.चिंता नको.
अलका चौकः पुण्याच्या रहदारीचे तीन तेरा वाजलेले दूपारी बारा ते रात्री नऊ कधीही येऊन पहा, हे पाहून बोर झालं तर शेजारीच अलका टाकीत जाऊन तीला पहा....स्वारी....पिच्चर पहा.इंटरवलला खायची सोय होईल,वांधा नाय.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
फर्ग्युसन रोड राहिलं की...
ऐन विकांताला भर संध्याकाळी....बाब्बोय...लै मजा येते :))
अरे पण विजुभाऊ विचारताहेत ते पाहूण्यांना घेऊन जायला...दोस्तांना नाय..तेच जर असतं तर तिच्याआयला त्याला प्रेक्षणिय स्थळं कशाला हवीत? मोप ठिकाणं पडलीयेत दोस्तांना घेऊन जायला...आन् ती सगळ्यांना ठाऊक आहेतच की ;)
फर्ग्युसन रोड राहिलं की...
ऐन विकांताला भर संध्याकाळी....बाब्बोय...लै मजा येते
अरे म्हणून तर गुडलक चौक म्हटलो ना!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
:)
भौ...आपाची है आपल्याच बापाची !!!!
कधी पण चालेल रे......
चेहर्यावग्राहक""संभाव्य ग्राहक" अजिबात वाटत नसल्यानं हाकलुन दिलं होतं त्यांनी.
आरारारा....लै च पोपट झाला म्हण की :)
आता नाय देणार...तिच्याआयला, आपण कशाला हौत? मिसरुडच काय, येड्या मलापण असे अनुभव यायला लागले म्हणून हनुवटीवर कुंचा राखलाय :))
आता कोण नाय अडवणार....
तू येच
च्यायला धम्या तू तिकड यायचा का ?
मग मी तुला नक्की बघितलं असलं राव, कारण मागचे ८ महिने सोडले तर गेली"२ वर्षे" आम्ही आठवड्यातन कमीत कमी २ वेळा तिकड पडीक होतो ...
अजून त्यांचा मॅनेजर व वेटर ओळखतात आपल्याला ...
मी आणि माझा एक मित्र, पर हेड एक "अपाची टोरंटो" संपवल्याशेवाय उठत नव्हतो ...
त्यानंतर "चैतन्यचा" पराठा ...
मी तुला नक्की पाहिलं आहे मग राव ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
प्रतिक्रिया
तिथेच,
जवळ नाही/ केतकावळा
अजुन एक ठिकाण
थोडे पुण्यापासून दूर..
ताम्हीणी
अरसिकता (?)
भौगोलीक ठिकाण
आमचं कारभारी
पटले...
:)
मुळशी
आणि हे
मस्त!
ही कल्पना
सहीच रे धम्या
मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ
<पिकोक बेची पती> "ची" पती की
च्यायला !
पावसाळ्यातच..
कसे ?कोठे जायचे ? तेथे काय पहायचे ते लिहा
शिवथरघळ
मोठ्या गाड्या....
संधिपाद प्राणि संग्रहालय......
आयला, नक्की
डावीकडे
धन्यवाद
भेटवर्णन
टोटल अवांतर...
अळंबी
अ ) कार्ला -
मनस्वी, दोन्ही ठिकाणं मस्तच..
पुरंदर
पुरंदर अप्रतिमच....शंभूराजाचं
बेडसे
आयला,
पाषाण तलाव
केळकर संग्रहालय
पुनवडी ते पुणे
शिंव्हगड....
सिंहगड
मावळसृष्टी!
आयला
रेल्वे म्युझीयम (कर्वे रोड - संगम प्रेस ) काही झकास नाही
हे घ्या...
आरे दाद्या...
फर्ग्युसन
फर्ग्युसन? "अपाची" कस वाटत मग?
आपाची????
च्यायला धम्या , मी तुला पाहिलं आहे ..
आयला, असु