✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

<अनावर>

स — सहज, गुरुवार, 07/01/2010 - 07:42
जालावर येउन अनावर आपण सगळेच होत असतो की. डोन्ट डिनाय इट! सांगा बरे तुम्हालाही असे काहीसे वाटते का? तुम्हा सगळ्या अनावरांना समर्पित! :-) एखाद्या धुंद सायंकाळी पूर्व-पश्चिमेची दिग्गज मंडळी जमली असताना, सदाबहार माणसांच्या काव्य हास्य मैफिलीने सभा पूर्ण बहरलेली असताना, तुझा प्रतिसाद मनात साठवत तो धागा, फुलताना, दौडताना पहायचाय. एखाद्या प्रसन्न, सुगंधी पहाटे, एका कवितेतील शुभ्र पाकळी न पाकळी उघडून, रसग्रहण करुन देत असलेला तो क्षण कविसमवेत टिपायचाय. जमलं तर कधी एखाद्या कट्ट्यावर, रात्री लक्ष लक्ष गजाल्या करत जागरण करायचय. अफाट जालविश्वात हरवून जायचय तुम्हा सर्वांच्या सोबत. खरं सांगायचं तर काहीच पुरेसं वाटत नाही. एवढ्याशा कुडीत सगळ्यांबद्दलचं प्रेम, घृणा कुठलीच भावना मावतच नाही. दिसावी माणसं सगुण, साकार. पण मनातल्या आयड्या निराकार, अथांग, अमर्याद. अन माझी स्थिती नेहमी "किती घेशील किंवा ठोकशील दोन कराने?"

प्रतिक्रिया द्या
1966 वाचन

💬 प्रतिसाद (10)

इल्लो

टारझन
गुरुवार, 07/01/2010 - 07:49 नवीन
इल्लो इल्लो ... इल्लोजी सहज तुम आ गये ... आज फिर कविता लेके =)) =)) =)) =)) हे विडंबण कसलं आहो ... सगळा कोथळा बाहेर काढलाय
दिसावी माणसं सगुण, साकार. पण मनातल्या आयड्या निराकार, अथांग, अमर्याद. अन माझी स्थिती नेहमी "किती घेशील किंवा ठोकशील दोन कराने?"
टाळ्या !!! -(आंधारात टपल्या मारुन जाणार्‍यामुळे हल्ली त्रस्त) टारझन
  • Log in or register to post comments

हम्म

चित्रा
गुरुवार, 07/01/2010 - 09:04 नवीन
आहेत खरे कधी न संपणारे प्रश्न.
  • Log in or register to post comments

आता

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/01/2010 - 09:40 नवीन
आता कवितांचा पूर (आवर) म्हणायची वेळ आली म्हणायची! अदिती
  • Log in or register to post comments

सहजकाका,

प्रभो
गुरुवार, 07/01/2010 - 10:05 नवीन
सहजकाका, बोळा कुठे अडकलाय तुमचा???? ;) किती ट्युशन घ्याल आता लोकांची??
  • Log in or register to post comments

छान रे..

विसोबा खेचर
गुरुवार, 07/01/2010 - 11:08 नवीन
छान रे.. :) Image removed.
  • Log in or register to post comments

अन माझी

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/01/2010 - 11:29 नवीन
अन माझी स्थिती नेहमी "किती घेशील किंवा ठोकशील दोन कराने?
'ठोकशील' हा शब्द काळजाला भिडला ;) बाकी 'जनावर' असे एक विडंबन सुचले होते. असो... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

खुपच मस्त

गणपा
गुरुवार, 07/01/2010 - 12:51 नवीन
खुपच मस्त जमलय हे विडंबन, इतक की स्वतंत्र कवितेचा मान मिळावा असं. काका लै फार्मात आहेत सध्या ;)
  • Log in or register to post comments

हेच

भडकमकर मास्तर
गुरुवार, 07/01/2010 - 15:57 नवीन
हेच मन्तो..मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सुंदर

sur_nair
गुरुवार, 07/01/2010 - 19:12 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

छान

अवलिया
Fri, 07/02/2010 - 11:17 नवीन
छान ! --अवलिया
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा