✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अनावर (अद्ययावत)

श
शुचि यांनी
गुरुवार, 07/01/2010 - 00:54  ·  लेख
लेख
एखाद्या धुंद सायंकाळी पश्चिमा केशराने माखलेली असताना गुलमोहोर माणकासारख्या जर्द लाल फुलांनी डवरलेला, बहरलेला असताना, तुझा हात हातात घेऊन तो तेजाचा गोळा, डोंगररांगांखाली बुडताना पहायचाय. एखाद्या प्रसन्न, सुगंधी पहाटे, तळ्यातलं शुभ्र कमळ आपले ओठ उघडून, पहील्यांदा आकाश चुंबत असेल तो क्षण तुझ्यासमवेत टिपायचाय. जमलं तर कधी डोंगरमाथ्यावर, रात्री लक्ष लक्ष तारका पहात जागरण करायचय. अफाट आकाशगंगेत हरवून जायचय तुझ्या सोबत. खरं सांगायचं तर काहीच पुरेसं वाटत नाही. एवढ्याशा कुडीत तुझ्याबद्दलचं प्रेम, भावना मावतच नाही. तू दिसतोस, भासतोस सगुण , साकार पण जाणवतोस निराकार, अथांग, अमर्याद अन माझी स्थिती नेहमी "अनंतहस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने"
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5533 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

उत्तम

उपाशी बोका
गुरुवार, 07/01/2010 - 01:35 नवीन
विडंबन करण्यासाठी उत्तम. (विडंबनासाठी माझी बौध्धिक पातळी नाही, नाहीतर मीच केले असते.) लोकहो, येउद्यात.
  • Log in or register to post comments

मंगेश पाडगावकरांची

चित्रा
गुरुवार, 07/01/2010 - 08:11 नवीन
कविता "तुझे गीत गाण्यासाठी" आठवली.
  • Log in or register to post comments

छान

सहज
गुरुवार, 07/01/2010 - 08:17 नवीन
अजुन येउ दे! शेवटच्या दोन तीन ओळीत निसर्गाबद्दल काव्य आहे असे वाटते पण सुरवातील मात्र "ऐसा समा ना होता, कुछ भी यहा ना होता, मेरे हमराही गर तुम ना होते" तसे असेल तर हे पण कोंबडी आधी की अंडे प्रकार झाला. :-) मुक्तक आवडले.
  • Log in or register to post comments

चांगलं

शिल्पा ब
गुरुवार, 07/01/2010 - 09:17 नवीन
चांगलं लिहिलयं.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आवडले.

यशोधरा
गुरुवार, 07/01/2010 - 09:22 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

प्रीती व भक्ती

राजेश घासकडवी
गुरुवार, 07/01/2010 - 09:24 नवीन
यांचं बेमालूम मिश्रण.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

विसोबा खेचर
गुरुवार, 07/01/2010 - 10:37 नवीन
अप्रतिम मुक्तक..! तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

दिसामाजी

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/01/2010 - 10:42 नवीन
दिसामाजी काहीतरी ते लिहावे.... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

*****************************

शिल्पा ब
गुरुवार, 07/01/2010 - 10:50 नवीन
=)) =)) =)) =)) =)) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

उत्कृष्ट

भडकमकर मास्तर
गुरुवार, 07/01/2010 - 15:02 नवीन
उत्कृष्ट वर्णन... हे कशाचे वर्णन आहे ओळखा पाहू... तू दिसतोस, भासतोस सगुण , साकार पण जाणवतोस निराकार, अथांग, अमर्याद अन माझी स्थिती नेहमी "घेता किती घेशील दो कराने" Image removed. अर्थात माझा लाडका डिजिटल एसएलआर क्यामेरा
  • Log in or register to post comments

छान.

जागु
गुरुवार, 07/01/2010 - 15:02 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

जेव्हा

भडकमकर मास्तर
गुरुवार, 07/01/2010 - 15:05 नवीन
जेव्हा क्यामेर्‍याला हातात धरून मी सूर्यास्ताचा फोटू काढला होता... तुझा हात हातात घेऊन तो तेजाचा गोळा, डोंगररांगांखाली बुडताना पहायचाय. Image removed.
  • Log in or register to post comments

आता

मनिष
गुरुवार, 07/01/2010 - 15:14 नवीन
आता शुचि=मास्तर असा गौप्यस्फोट होतोय की काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

ठ्यॉऽऽऽऽऽ

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/01/2010 - 15:20 नवीन
ठ्यॉऽऽऽऽऽऽऽऽऽ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

एक लाख

तिमा
गुरुवार, 07/01/2010 - 17:16 नवीन
या प्रतिसादाला एक लाख टाळ्या!!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

हाणतेज्या

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/01/2010 - 18:03 नवीन
हाणतेज्यायला !! एकदम धरुन फट्याक.. बाकी मास्तर काल काय जयपाल बरोबर २/२ घोट घ्यायला बसले होते का काय ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

-Nile

Nile
Fri, 07/02/2010 - 09:31 नवीन
=)) =)) =)) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

आत्ता ओळी

शुचि
गुरुवार, 07/01/2010 - 18:55 नवीन
आत्ता ओळी आठवल्या - "अनंतहस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने" त्या घात्ल्या आहेत. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

मस्त कविता

टारझन
गुरुवार, 07/01/2010 - 19:00 नवीन
मस्त कविता गं शुचे !! आपल्याला डँम्म आवडेश :)
  • Log in or register to post comments

आवडली!!

प्रभो
गुरुवार, 07/01/2010 - 19:07 नवीन
आवडली!!
  • Log in or register to post comments

.....

वेताळ
गुरुवार, 07/01/2010 - 19:10 नवीन
:S वेताळ
  • Log in or register to post comments

कविता अन

शिल्पा ब
गुरुवार, 07/01/2010 - 22:26 नवीन
कविता अन मास्तरांचे फोटो दोन्ही छान. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

थोडासा रुमानी हो जाए !

वाहीदा
गुरुवार, 07/01/2010 - 23:19 नवीन
खरं सांगायचं तर काहीच पुरेसं वाटत नाही. एवढ्याशा कुडीत तुझ्याबद्दलचं प्रेम, भावना मावतच नाही. तू दिसतोस, भासतोस सगुण , साकार पण जाणवतोस निराकार, अथांग, अमर्याद Wow शुची, तु खरच Eternal Romantic (मराठी ?? ) आहेस . तुझे सहज सुंदर मुक्तक खुप आवडले. I just wish your soul-mate is just like you, Enjoying each moments of your companionship :-) तुझ्यातली आई ही मला आवडते अन जीव ओवाळून टाकणारी प्रियसी , पत्नी देखिल ! Hopefully, तुझा नवरा देखिल तुझ्यासाठी तुझ्या सारखाच असावा :-) नसेल, तर तु त्याला तुझ्या इतक्काच Romantic बनव ;-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा