छोटाच पण मस्त लेख!
आवडला..
चिंग मिंग राजघराण्यांचे "चंगु मंगु" हे रुपांतर तर लैच भारी!
बाकी विंचुच्या फोटोत विंचू दिसत नाहीयेत... सी हॉर्स वाटले!
(माझ्या चष्म्याचा परिणाम म्हणू का;)) )
इथल्या सामान्या माणसांवर, त्यांचे आयुष्य यावर अजून एक भाग आला तरी चालेल असे वाटले!
शिवाय जुन्या बिजींग शहराविषयी, परंपरां विषयी वाचायला आवडेल.
आपला
गुंडोपंत
चीनी ज्योतिष शास्त्राविषयीपण प्रचंड कुतुहल आहे. (माहीती मिळाल्यास कळवा!)
>>बाकी विंचुच्या फोटोत विंचू दिसत नाहीयेत... सी हॉर्स वाटले!
अहो ते दोन्ही बाजूला काडीवर एकएकटे बसले आहेत ते सी हॉर्स आहेत पण त्यांच्या मधल्या काड्यांवर विंचू आहेत.
>>इथल्या सामान्या माणसांवर, त्यांचे आयुष्य यावर अजून एक भाग आला तरी चालेल असे वाटले!
फारच धावता दौरा होता हो त्यामूळे काही फारशी माहिती मिळाली नाही. प्रतिसादा बद्दल धन्यवाद!!
वा ... क्या बात है...
बस अजून काय हवे डिश मध्ये... ह्म्म्म एका झुरळाची कमी आहे पण त्या अळ्या ते काम पुर्ण करतीलच. काय कोलबेर साहेब एकटे
एकटेच डिशवर ताव मारता होय... आम्हाला ही थोडी टेस्ट घेऊ द्या.. आम्ही ही सांग्गू की आमच्या येणा-या मुलाबाळांना की आम्ही काय काय खल्ले ते ;}
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
छायाचित्रे असली की कसा सूंदर दिसतो लेख. मस्तच.
तुमच्या "स्टीम बोटचा" (हॉट पॉट) पण एक टाकायचा की फोटो. हे कच्चे मास साठी "शेजवान" सॉस मागायचा की भलेभले गारद होतात त्या तिखट तर्री पूढे. पूढच्यावेळि स्टीमबोट कम हॉट प्लेट मागा.
मग विंचू चावला की नाही? माझा एक चायनीज मित्र म्हणतो, जे हालचाल करतय, श्वास घेतय ते सगळ आम्ही (चायनीज ) खातो. :-)
अवांतर ह्या नव्या बिजींगच्या जरा बाजूला गेले की दिसते भकास, बकाल वस्ती. जागतीककरणाच्या रेट्यात त्यांची वस्ती शहराच्या बाहेर टाकली आहे. पण तसेच व्हायला पाहीजे म्हणा. टोलेजंग इमारती च्या मधेच झोपड्या कसे कोण चालून घेईल बघा अगदी माओवादी देखील नाही. ते चालवून घेणारे फक्त मतलालची समाजवादीच.
ते चालवून घेणारे फक्त मतलालची समाजवादीच.
ही भारीच पिंक दिली टाकुन सहजराव!!
आता अचानक समाजवाद्यांवर का घसरलात?
(तुम्हाला ही वस्ती नकोशी वाटते ते ठीक हो... पण आपणच जेव्हा त्या वस्तीत असतो तर मग काय ?)
आपला
गुंडोपंत
हु टाँग असे इथल्या गल्ली बोळांना म्हणतात. सहजराव म्हणता आहेत तशी झोपडपट्टी बादालिंगला जाताना पहायला मिळाली. आमच्या ड्रायवर ने शॉर्ट कट मारण्यासाठी गाडी अश्या बोळांमधून काढली आणि रस्त्यावरचे खड्डे त्यात साचलेले पाणी असा प्रकार देखिल पहायला मिळाला. ह्या हु टाँग मधून सायकल रिक्षातून फिरवणार्या काही खास टूर्स देखिल असतात. अरूंद रस्ते असल्यामूळे मोठ्या गाड्या जाऊ शकत नाहीत पण सायकल रिक्षा सहज जाते आणि आरामात रमत गमत जुने बेजींग बघायला मिळते. आमची ही सफर देखिल हुकलीच. :-(
ह्यापूर्वी आमचे मित्र खिरे ह्यांनी शांघाईची अंगडाई हा चीनचा परिचय करून देणारा आणि एका क्रांतिकार्याने चीनचे अतिरंजित वर्णन करणारा लेख लिहिला होता. त्यापेक्षा ही लेखमाला वास्तववादी व्हावी हीच अपेक्षा.
- सर्किट त्से तुंग
'अमुक तमुक ह्यांचे ९२व्या वर्षी निधन झाल्याने आज शाळा भरणार नाही' अशी 'सुचना' दिल्यावर आमच्या मनाची जी स्थिती व्हायची पुन्हा एकदा अगदी तशीच झाली
च्यामारी एकेकाळी कदाचित आपल्या पेक्षा दरिद्री असलेल्या ह्या देशात फिरताना पण आता 'फारिन' ला आल्यासारखेच वाटत होते.
पण नुसत्या फॉरबिदन सिटीतच ५६ वेळा हा उल्लेख झाल्यावर मात्र आम्ही ह्या चंगू-मंगुचा नाद सोडून दिला.
भारीच सफर घडवून आणलीत
पुर्वी त्याला पेकींग म्हणायचे ना! कलकत्त्याला कोलकता, मद्रास ला चेन्नई, सिलोनला श्रीलंका अन ते सयामला का काय हो पुलंच्य पुर्वरंग मध्ये आहे?
प्रकाश घाटपांडे
लेख आणि चित्रे आवडली. चिनी खाण्याविषयी जमला तर एखादा लेख नक्की लिहा. चिंग-मिंग बरोबर कुंग (पाओ) सुद्धा येऊ देत :)
बाकी, तिआनामेन स्क्वेअर बद्दल वाचून टाइम मासिकाने 'अननोन रेबेल' म्हणून विसाव्या शतकातील शंभर सर्वोत्कृष्ट छायाचित्रांत समाविष्ट केलेले हे छायाचित्र आठवले.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
चीन मध्ये आता मिसळपाववर बंदी येणार.
पण खरंच, हे चित्र लोकशाही च्या कठीण वाटेची खातरजमा करणारे आहे.
हे चित्र पाहून मला "उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया" ह्या ओळी आठवतात.
(ता. क. ह्या रिबेलची चीनच्या तुरुंगात सरकारने हत्या केली.)
- सर्किट
..चीनमध्ये ब्लॉगस ब्लॉक केलेलेच आहेत. इतकेच नव्हे तर विकिपीडिया देखिल उघडता येत नाही...अहो जिथे तुम्हाला मुलं किती हवीत देखिल सरकर ठरवणार तिथे विकिपीडियाची तक्रार कोण करणार? :-)
लेख वाचायला थोडा उशीर झाला वाटतं.
>> मी आपलं सरळ भरपूर शेंगदाणे घालून केलेला चिकनवर ताव मारल
अमेरिकेत कंग-पाओ चिकन म्हणून शेंगदाणे घातलेले चिकन मिळते अर्थात, अमेरिकन चायनीज हा एक भारतीय चायनीजसारखा "अस्सल" प्रकार असावा. चीनमध्ये मिळणे कठिणच असावे.
>>पण ह्या फॉरबिडन सिटीच्या मागे असलेली 'एंप्रेस गार्डन' मात्र भारी आहे हा.
अशा ठिकाणांचा इतिहास नाही तरी विशेष तरी सांगा.
फॉरबिडन सिटीचा लावलेला फोटो पाहताना शांघाई नाईट्सची आठवण झाली.
अवांतरः
>>तिथे फारच (अजानुकर्ण टाईप) हौशी असाल तरच पायी चढून जावे अन्यथा डायरेक्ट भिंतीवर नेऊन बसवणारी केबल कार आहे.
अजानुकर्ण बहुधा भिंतीवर पायी चढून जातील. ;-)
वर्णन आवडले. बेजिंगची सफरच घडली. चित्रेही मस्त.
खाण्यावरील लेखाबद्दल नंदनशी सहमत आहे. लिहाच!
एक शंका - "फॉर्बिडन सिटी" हे नाव कसे पडले, याबद्दल काही माहिती मिळाली का?
(जिज्ञासू)बेसनलाडू
साधारण १९२० पर्यंत फॉरबिडन सिटीत सामन्य माणसाला प्रवेश प्रतिबंधीत होता. ७२० चौ.मि. चा परिसर म्हणजे जणू एक गावच आणि त्यात राजा राणी, राजाची अंगवस्त्रे आणि हिजडे ह्या खेरिज कुणालाही आत प्रवेश नसल्याने ह्याचे नाव 'फॉरबिडन सिटी'. सामान्य जनतेच्या अतोनात पिळवणुकीला वैतागुन अखेर गावकर्यांनी बंड केले. उत्तरेकडून आलेल्या त्यांच्या फौजांनी (पेसंट अपरायजींग) फॉरबिडन सिटीवर कब्जा केला आणि सात आठशे वर्षे बंद असलेली फॉरबिडन सिटीची दारे उघडली.
अहो काय काय म्हणून सांगू .?मी तिथे ५ वर्ष राहिले आहे.मी १० -१२ लेख सकाळ मधे लिहिले आहेत.
आता अमेरिकेत आल्यावरही मी ते आयुष्य विसरणार नाही .
विचारा का काय ते.जमल तर उत्तर देते.
अहो जे काही चांगले वाईट अनुभव असतील ते बिनधास्त लिहा.
आता बघा कसे आहे, आलम दुनियेला आकर्षण असलेली अमेरीका मला मात्र फारशी भावली नाही मनाला. तसे ते त्या बिजींग मधे जे काही चांगले वाईट असेल ते मि.पा.कराना कळवा.
पुण्याचे पेशवे
'भरले मांजर' अथवा 'पीठ पेरलेली डासांची अंडी' ही कल्पना सुरेख.
बेजींग शहर हे कांद्या सारखे अनेक पापुद्र्यांनी बनलेले आहे. अतिभव्य तिआन्नमेन चौक हा त्याच्या मध्याभगी असून त्याच्या भोवतीचे पापुद्रे म्हणजे अनेक वर्तुळाकार 'रिंगरोड' आहेत. हे वर्णन छान.
चंगूमंगू हि कल्पना तर अफलातून.
पुढील भाग लौकर येऊ द्यात.
प्रतिक्रिया
वा झकास!
>>बाकी
हे पाहा विंचू..
वा ... क्या
अहाहा
च्यामारी!
वेगळा प्रस्ताव मांडा
हुताँग
हु टाँग
क्या बात है !!
मस्त
मस्त सफर
वा
चीन मध्ये बंदी
तसेही..
लेख मस्त
आवडला !
मंडळी..
मस्त
वरूणदेवा,
असेच
मस्त!
फॉरबिडन सिटी
मस्तच. अजून
बीजिंग
काय ते?
मस्त.
झकास. .....