✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

निवडणूका, फिल्डींग लावणे, लोकप्रिय (लेखक) बनणे इत्यादी

स
सहज यांनी
Sun, 09/30/2007 - 18:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15403 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

स
स्वाती दिनेश Sun, 09/30/2007 - 19:17 नवीन

निवडणूक

(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे) हे मस्तच! निवडणूकीचा धुरळा उडवायला सुरूवातच केलीत की! आता तात्याला लवकरच निवडणुका घ्याव्या लागणार? सल्ला मागायला हवा आता तुमच्या 'सहज कन्सलचंट'कडे..:) स्वाती
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 09/30/2007 - 20:12 नवीन

उमेदवार वादविवाद/डीबेट

सहजराव, हा ही लेख मस्त आहे. एक अजून कल्पना: इच्छूक उमेदवारांची "वादविवाद" स्पर्धा ठेवली पाहीजे. त्यात मधे डेमोक्रॅट्स ना जसे यूट्यूब वरून प्रश्न विचारले गेले तसे किंवा कसेतरी प्रश्न विचारले गेले पाहीजेत. त्यात परराष्ट्रीय धोरणचर्चेत इतर संकेत स्थळांशी कसे संबंध ठेवले जातील, कोण कोणाचा (शोधून पण न मिळणारा)बिन लॅडन, कोण कुणाचा मोहम्मद अहमदेनीजाद आहे - थोडक्यात घरातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला बाहेर कोणाला झोडपणार आहे - ते पण कळणे महत्वाचे वाटते!
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 10/01/2007 - 10:10 नवीन

+१

उमेदवारांच्या वादविवादाविषयी सहमत आहे. - सर्किट कृष्णमूर्ती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/30/2007 - 21:48 नवीन

झक्कास लेख !

सहजराव ! तुम्हाला काय सुचेल त्याचा काय नेम राहिलेला नाही. एक तर निवडणूकीचा विषय काढून तुम्ही थेट मुद्यालाच हात घातला. लवकर म्हणजे आठ एक दिवसात निवडणूक आयोगाने अधिसुचना जाहिर केली पाहिजे,असे आम्हासही वाटू लागले आहे ! इच्छूक पॅनेलप्रमुखांनी आपले चार उमेदवार जाहिर करावे आणि आपला मिसळपावचा जाहिरनामा जाहिर करावा, बाकी मतदारराजांसाठी काय काय करावे तुम्ही सांगितले असल्यामुळे मतदारांकडे उमेदवार मोठ्या आशाळभूत नजरेने पाहात असेल.सहजराव, आपले लेखन आणि आपले लेखन कौशल्य संकेतस्थळावरील काही क्षण आनंदात घालवतात हे मात्र नक्की ! आपण असेच लिहित राहा, काही प्रसंग वाचून मात्र ह्सून हसून पुरेवाट झाली बॉ ! जसे ''लोक म्हणतात तो मुर्श्ररफपण असेच करतो पण सूत्र मात्र......अबे चूप, निवडणूक आयोग काम करतोय. जरा दम धराल की नाय..'' अवांतर ;) सामान्यजन म्हणून जगण्याचा आमचा हक्क आम्ही कोणाला हिरावू देणार नाही ! क्या बात है ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 10/01/2007 - 10:12 नवीन

अधिसूचना

निवडणुकीची अधिसूचना लवकरच जाहिर केली जाईल. तोवर पंचायत समितीला वेगवेगळे नियम करण्याचा हक्क असेल. त्यानंतर तो हक्क निवडणुकीपर्यंत रद्द करण्यात येईल. - (टी. एन.) सर्किट शेषन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विसोबा खेचर Mon, 10/01/2007 - 00:00 नवीन

छान लेख..

च्यायला इथे राज्यसभा असती तर काय मजा आली असती, फक्त अंगभूत हुशारीवर सन्माननीय सदस्य म्हणून वर्णी लागली असती ह्म्म! चांगली कल्पना आहे. पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या तरी त्यानंतर पंचायतीला विश्वासात घेऊन एखाद दोन सन्माननीय सदस्यांची नेमणूक करायला हरकत नाही! :) ५) भोकराचे लोणचे किंवा असेच विस्मरणात गेलेले पदार्थ ताबडतोब आपल्या आई, आज्जी यांना विचारून काढा व वरचेवर उल्लेख करत रहा. म्हणजे जी नॉस्टेलजीक मतदारपेठ आहे ती तुमचीच समजा. मिलिंदा, ऐकतो आहेस ना? :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 10/01/2007 - 10:14 नवीन

ऐकतोय

मिलिंदा, ऐकतो आहेस ना? :) ऐकतोय तात्या ! निवडणुक आयोगाला दिलेले टोमणे सहन करण्यात येणार नाहीत. पण एनीवे, भोकराचे लोणचे काही छचोर लोकांना "विस्मरणात गेलेले पदार्थ" वाटत असतील. आम्ही ते रोजच खातो. विस्मरणात कसे जाईल ? - (निवडणुक आयुक्त) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Mon, 10/01/2007 - 01:17 नवीन

जबरा............च.

सहज राव काय सहज पणे लिहता हो.... " संगणकदुरूस्ती करा, लोकांची काशी, गंगासफर करवा, बाबाजींची प्रवचन करा" ;} मस्त. कधी जिवनामध्ये विचार केला नव्हता ही असे देखील कधी वाचावे लागेल ह्यांची . खरोखर कमाल केलीत तुम्ही आज. एकदम शतक ? क्या बात है ? खरोखर. * जबरा... ह्यांचे अधिकार भोमेकाकांच्याकडे राखीव आहेत ह्यांची नोंद घ्यावी. राजे (*हेच राज जैन आहेत व ह्यांचा दुसरा कोणताही आई डी नाही आहे ह्याची खात्रीच आहे, खात्री नसेल तर नसेल तर साब को पुछो ..)
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Mon, 10/01/2007 - 04:37 नवीन

क्या बात है!

सहजराव फॉर्मात आहेत! एकदम झकास! सॉलीड टाकलाय! गुंडोपंत हेड प्युन सहज कन्सलचंट
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 10/01/2007 - 07:49 नवीन

आमची माती आमची माणसे

आभार आभार त्रिवार आभार! स्वातीताई दिनेशराव - बाकी अस जॉइंट अकाऊंट मतदानाला उपयोगी नाही तुमचे "एकमत" असले तरी तरी तुम्ही २ मताधीकारी असून एक अकाऊंट एक मत होते. लवकरात लवकर दिनेश स्वाती असे अकाऊंट काढावे. जर का दिनेश असे खाते असेल तर ते रहीत करून दिनेश स्वाती करायलाच लावावे. स्त्रीवाद ताजा आहे म्हणून थोडे ऍडीशनल स्वगत :- (प्लीज झेला जरा) आपल्या नावापूढे नवर्‍याचेही (लग्न झाले नसल्यास तात्याच्या भाषेत "आवडते पुरूष"चे) नाव लावणार्‍या अनेक असतील पण आपल्या नावापूढे बायकोचीही नाव लावणारे पुरूष आहेत का? (टाळ्या) विकासराव खरे आहे ह्या निवडणूकीच्या एकेका घटकावर असेच लेख लिहता येतील. तुम्ही पण बघा काय जमते का? पण तुम्ही सत्ताधारीतले घटकपक्ष आहात तेव्हा आचारसंहीता भंग होणार नाही त्याची काळजी घ्या. प्रा.डॉ.सर तुमचे कौतुक असे चविष्ट आहे की केवळ त्याकरता लिहावे असे वाटते, जसे आज्जीने रेवडी, सुकामेवा, लेमनची गोळी द्यावी म्हणून तिला स्तोत्र, कवीता, ए,बी,सी, डी. म्हणून दाखवावे तसे आमचे होते आता. खेचरजी - म्हणजे ज्याची खेचायला मजा येते असे जी, आमच्या बाललीला सहन करता म्हणून तुम्ही आमचे आवडते काका! राजेसाब - आता कॉलनीत नाटक बसवले तर भूमीका करणारे कॉलनीतलेच ना म्हणून तुम्हीपण आलात. अफ्टरऑल हम पंछी एक डाल के खरे की नाही महाराज?) पंत - फायलींचा निचरा काढल्यावरच सर्फींग करायचे बर का? :-) तुमच्या डोळ्याला त्रास होतो म्हणून आधीच कमी काम करू देत आहोत. ---------------------------------------------------------------------------------------- मी पक्षःपाती नाही. मी भेदभाव करत नाही. मी तुम्हा सर्वांचा समानतेने तिरस्कार करतो.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 10/01/2007 - 12:22 नवीन

दिनेश

सहजराव,दिनेश चा वेगळा अकाऊंट मि पा वर आहे हो, तेव्हा २ मतांची काळजी नको,त्या तिथे पलिकडे,मनोगतावर जेव्हा अकाऊंट उघडला तेव्हा दुसरी कोणी एक स्वाती असल्याने मला स्वाती पुढे दिनेश लावावे लागले,मग आता तेच नाव जालावर घेतले.(सारखे आय डी बदला बिदला नाही हो झेपत!:)) आणि आपल्या नावापुढे बायकोचे नाव लावणारे काही आय डी आहेत त्या तिथे पलिकडे,ती मंडळी मिपावर आली आहेत की नाही हे माहित नाही बॉ.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
क
कोलबेर Mon, 10/01/2007 - 09:16 नवीन

हा हा हा..

सहजराव, हा लेख म्हणजे तुमचेपण कँपेनींग समजायचे काय? 'कार्ल रोव्ह' आणि 'भोकराचे लोणचे' हे खासच!! :-)
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 10/01/2007 - 09:18 नवीन

फूट नोट

वाचली नाही का? निवडणूकीत, नेमणूकीत आम्हाला रस नाही. सामान्यजन म्हणून जगण्याचा आमचा हक्क आम्ही कोणाला हिरावू देणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
य
यनावाला Mon, 10/01/2007 - 14:26 नवीन

शुद्धलेखन शिष्टाचार

( ही प्रतिक्रिया केवळ एकाच वाक्याविषयी आहे. लेखातील आशयासंदर्भात नाही.) ................................................................................... श्री.सहज लिहितात :(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे) . ................................................................................... इथे असे लिहिणे म्हणजे "सार्वजनिक ठिकाणी मी उघडाबंब फिरणार. कुणाला ते बरे दिसत नसेल तर त्या व्यक्तीने मला कपडे घालावे." असे म्हणणे आहे. उत्तम प्रकारचे ,चांगल्या रंगसंगतीचे, अंगाला व्यवस्थित बसणारे, कडक इस्त्रीचे कपडे घालणे (म्ह.काटेकोर व्याकरणशुद्ध लिहिणे ) प्रत्येकालाच जमेल असे नाही हे खरे.पण चार लोकांकडे पाहून, कुणाला विचारून,,स्वच्छ धुऊन (म्ह. लिहिलेले तपासून ) बर्‍यापैकी नीट नेटके कपडे घालणे प्रत्येकाला शक्य असते. ते सोडून उघड्या अंगाने हिंडू लागले तर काही टारगट टाळ्या वाजवतील. पण ते शिष्टसंमत नव्हे. आपल्या घरी कांदापोहे खाताना अंगावर अर्धी चड्डी असणे ठीक .(म्ह. खाजगी बोलणे लिहिणे अशुद्ध चालेल ).पण चारचौघां परिचितांत बसून मिसळपाव खायला हॉटेलात यायचे तर अंगावर ठाकठीक कपडे असणे शिष्टाचाराला धरून होईल.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 10/01/2007 - 14:48 नवीन

अतिरेक नको.

चवीला मीठ चिमूटभर मागे पुढे एवढाच अर्थ आहे. आचार्य, मला कृपया सांगा हा लेख उघडाबंब आहे की बर्‍यापैकी झाकला गेलेला, चालेल असा आहे? बाकीचे नंतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
प
प्रकाश घाटपांडे Mon, 10/01/2007 - 18:50 नवीन

भारी आयडिया

"सार्वजनिक ठिकाणी मी उघडाबंब फिरणार. कुणाला ते बरे दिसत नसेल तर त्या व्यक्तीने मला कपडे घालावे." आपन तर कापडं घाल्तो ती सोताच उन थंडी वारा पाउस या पासून संरक्शन व 'इतरांच' लज्जा रक्शन. आमच्या साळंत प्वॉर बिटान तुटल कि टाक 'टाका' मंग लईच फाटली किंवा ईरलि कि डायरेक सोमवार्च्या बाजारात जाऊन जिथं फाटलं आसनं तिथून च बंडी काढायची. मंग नवी बंडी चढवायची. मंग आंघुळ्या करुन घ्यायच्या. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
आ
आजानुकर्ण Fri, 10/26/2007 - 14:41 नवीन

मस्त

उदाहरण आवडले... - (शुद्धलेखक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
य
यनावाला Tue, 10/02/2007 - 21:40 नवीन

शुद्धलेखन

श्री. सहज यांच्या लेखाच्या प्रारंभी असलेले वाक्य वाचल्यावर माझा समज झाला की व्याकरणाचे सर्व नियम झुगारून अनियंत्रित लेखनाचा पुरस्कार करण्याचा हा प्रयत्न असावा. कारण त्या वाक्यात श्री. सहज यांनी अनेक चुका हेतुतः केल्या होत्या. तेव्हा पुढचा लेख न वाचताच मी प्रथम प्रतिक्रिया लिहून निषेध नोंदविला. नंतर पूर्ण लेख वाचला तेव्हा लक्षात आले की लेखातील व्याकरण दोष अगदी नगण्य आहेत. लेख उत्तम जमला आहे. काळकर्ते शि. म. परांजपे यांच्या वक्रोक्तिपूर्ण लेखन शैलीची आठवण व्हावी इतका चांगला आहे. पूर्ण लेख वाचल्याविना प्रतिक्रिया लिहायला नको होती असे आता वाटते. पण "ही प्रतिक्रिया केवळ एका वाक्यापुरती आहे ." एवढे लिहिण्याची दक्षता घेतली आहे. कोणी व्याकरणनियम धुडकावले की मी जरा उद्विग्न होतो. तरी श्री. सहज यांनी राग मानू नये. ....... यनावाला
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 14:51 नवीन

सल्ले

सल्ले चांगले आहेत. पुन्हा निवडणुक केव्हा आहे? ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 01/11/2009 - 17:56 नवीन

सहज

क्या बात है. सुभान्या आला. माश्या आल्या. माश्या आल्या.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 01/11/2009 - 18:12 नवीन

मस्त

मस्त लेख. नजरेतून निसटला होता. गटण्याच्या उत्खननामुळे वाचायला मिळाला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 01/11/2009 - 18:53 नवीन

मस्तच ...

सहजराव, हल्ली लेखणी का हो गुंडाळून ठेवली आहेत? पण जमाना बदल गया है। एकाची दाद दुसर्‍याला दिलीत तर हे लोक चटकन ओळखतात. पर्सनलाइज्ड दाद द्या. अजून काही दिवसांनी प्रतिक्रिया लिहिण्याचे 'काटे क्लासेस' नाही निघाले म्हणजे मिळवलं! अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Mon, 01/12/2009 - 01:00 नवीन

ऑनियन राउटिंग

"त्यासाठी आत्ताच रोमींग आय.पी., ब्लॉक ऑफ आय.पी. विकत घ्या. " गरज नाही...ऑनियन राउटिंग करा की राव :)
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Mon, 01/12/2009 - 05:09 नवीन

सहजराव

सहजराव कमाल केली लेख लक्षात राहील. असा वाचून सोडून देता येणार नाही. सहज कन्सलचंट. आमची अन्यत्र शाखा नाही. हे आवडले. ईस्टेट ब्रोकर नाहीत तर :-) शेवटी गटण्याच्या उत्खननामुळे वाचायला मिळाला. असेच म्हणतो प्रेषक सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness Freedom gives you happiness to do the things you like
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा