✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भाषा आणि प्रमाण

न
नीलकांत यांनी
Sun, 04/20/2008 - 12:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18448 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव Sun, 04/20/2008 - 13:27 नवीन

झकास!

नीलकांत अगदी सुंदर,स्वच्छ आणि पटेल अशा भाषेत लिहिलेला हा लेख तुझ्या अभ्यासूपणाची तसेच नम्र, तरीही कणखरपणाची जाणिव करून देतोय.(मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास,कठीण वज्रास भेदू ऐसे... च्या चालीवर) आवडले तुझे विचार. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 04/20/2008 - 14:17 नवीन

सहमत...

उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 04/20/2008 - 22:21 नवीन

सहमत.....

उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे... मी सुद्धा १००% सहमत आहे. (करा व्यक्त स्वःला मराठी मधेच )असे म्हणणारा..... मदनबाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ऐ
ऐश्वर्या राय Sun, 04/20/2008 - 14:48 नवीन

कौतुक आहे

तुमच्या परिश्रमांचे. लेख वाचण्याइतका वेळ आत्ता नही मिळाला आणि लेखाची लांबी पाहून दमलेच. तसाही माझा या विषयात रस जरा कमीच आहे पण एखादी पिंक टाकायला काही हरकत नाही कधीतरी, काय? टाईम मॅनेज कसा करायचा या चिंतेत सध्या भरपूर टाईमपास करणारी, ऐश्वर्या
  • Log in or register to post comments
व
विदेश Sun, 04/20/2008 - 16:44 नवीन

भाषा आणि प्रमाण-

प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. अगदी मनातलं टंकलात!
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Sun, 04/20/2008 - 17:08 नवीन

न्हाय महाराजा, होय महाराजा

इंग्रजीचे स्पेलिंग आणि मराठीतील शुद्धाशुद्धता यात बराच फरक आहे. नॉट म्हटले तर इंग्रजीत काय लिहाल? naught? not? तिथे स्पेलिंग्ज बदलल्याने अर्थ बदलतो. मराठीत अर्थावरून कोणी हरकत घेतली तर एकवेळ समजू शकते. इंग्रजीत स्पेलिंग बरोबर लिहावे लागते म्हणून मराठीला मात्र त्या पंक्तीला बसवू नये. 'न्हाय' म्हणण्यातला दमदारपणा जसा सूटाबुटातल्या 'नाही'त नाही तसाच 'नाही' शब्दातला शिष्टपणा मुंडासे बांधलेल्या न्हायमध्ये न्हाय. मात्र, भावाच्या आधी घरी पोचल्यावर 'म्ह्या अदुगर आली' म्हणत भावाला चिडवणार्‍या चिमुरडीच्या डोळ्यातला आनंद हा काही 'मी अगोदर आले' म्हणणार्‍या बहिणीच्या डोळ्यातल्या आनंदापेक्षा वेगळा नक्कीच नाही. मुंबई-पुण्यात हरवलेली वस्तू भेटत नसते तर सापडत/मिळत असते. तीच वस्तू नागपूरात मात्र भेटू शकते. तुम्ही नाशकात जा किंवा नाशिकला, द्राक्ष जर आंबट असतील तर ती आंबटच राहतील. असे फरक लिहिण्या-बोलण्यात दोन्हीकडे येतात. पण म्हणून त्यातले एकच एक बरोबर आहे हे म्हणणे म्हणजे दुराग्रह आहे. आपल्या घरी जे बोललं जातं ते बरोबर हा साधा व्यवहार आपण कळत नकळत मानतोच. जे शाळेत जसं शिकलो ते घरी पडताळून पाहतो. आपणच भाषेची चौकट बनवत असतो; आपल्यापुरती. आणि इथेच मर्यादा येतात. आपण जे लिहितो-बोलतो-वाचतो फक्त ते आणि तेच शुद्ध म्हणायच्या आधी दुसर्‍याच्या घरात जाऊन एकदा 'चहा घेऊन' किंवा 'चहा मारून' किंवा नुसतं 'चहाला' जाऊन या. चहा सगळ्यांकडेच मिळेल, पण फक्त 'अमृततुल्य'चा चहा प्रमाण मानणार काय ( इथे हशा मिळेल अशी आमची खात्री आहे ;) )? आम्ही बिनसाखरेचा पितो म्हणून तुम्हाला तो आवडेलच ह्याची शाश्वती नाही, आणि तुम्ही पाणचट(पांचट) चहा आनंदाने पित असाल मात्र आम्हाला तो वंगाळही लागू शकतो. ह्या 'आम्ही' आणि 'तुम्ही'चे 'आपण' व्हायला दोन्ही बाजू तितक्या लवचिक असायला हव्यात.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 04/20/2008 - 17:54 नवीन

सर्वोत्तम सोदाहरण प्रतिसाद

आत्तापर्यंतचा सर्वोत्तम सोदाहरण प्रतिसाद असं मला म्हणावंस वाटतं!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॐकार
च
चतुरंग Mon, 04/21/2008 - 05:47 नवीन

लाख बोललास रे ॐकारा!

आम्ही आणि तुम्ही चे आपण व्हायला दोन्ही बाजू तितक्याच लवचिक असायला हव्यात!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॐकार
व
विजुभाऊ Tue, 04/22/2008 - 10:01 नवीन

प्रमाण मर्‍हाटी म्हणजे ती पुन्या ३० मदे बोल्ली जाते ती त नव्हं?

प्रमाण मर्‍हाटी म्हणजे ती पुन्या ३० मदे बोल्ली जाते ती त नव्हं? म्या आसच बोल्लनार.ती माजी मायची भाषा हाये.चान्ग्लं झेकपॅक लुगाडं नेस्यत न्हाय ,दिसायला आक्षी झैरातीतल्या बाईवानी दिसत न्हाय ;म्हनुन माजी माय काय वंगाळ म्हनायची व्हय? आता मना सांगा भौ तुमच्या प्रमाण मर्‍हाटीत १)"व्हतं"म्हननं हे चूक आन "नव्हतं" हे म्हननं बरुबर हे कसं काय? २) पास हा शब्द इंग्रजी आन नापास तेव्हढा देशी असं कसं काय? इंग्रजीत अनेक बोलीभाषा आहेत. जसे कॉकने , अमेरिकन , स्कॉटीश , तशा त्या प्रत्येक भाषेत असतात. मराठीमध्ये सुधा आहेत. प्रत्येकबोली भाषेचे सौन्दर्य वेगळे असते त्यामुळे एका प्रमाण भाषेचा आग्रह हे चूकच. ॐकारभौ तुमी लिवेले ते लै झ्याक केलत बगा. शुद्धलेखनाचे नियम पाळायला हवेत पण त्याचा अर्थ अस नव्हे की बोली भाषाना हिणकस ठरवुन त्याना हद्दपार करणे. अन्यथा बहिणाबाई वगैरेंसारखे हिरे उरणारच नाहीत. मराठीचा सार्थ अभिमान बाळगणारा : गुज्जुभाऊ विजुभाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॐकार
अ
अविनाश ओगले Sun, 04/20/2008 - 20:45 नवीन

नीलकांतजी,

नीलकांतजी, आपला ले़ख उत्तम. आपल्या ले़खातील "चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य." या विधानासंदर्भात काही नवीन संशाधनाची माहिती नुकतीच प्रकाशित झाली आहे. ती इथे वाचा
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sun, 04/20/2008 - 21:04 नवीन

नवीन माहिती.

अविनाशजी धन्यवाद. ही माहिती नवीन आहे. तसे कोकणातील उल्लेख या आधी केवळ ऐकून माहिती होता. अद्ययावत झालेला - नीलकांत
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Sun, 04/20/2008 - 22:07 नवीन

नामदेव ढसाळ

नामदेव ढसाळांनी १-१.५ वर्षापूर्वी सर्व काही समष्टीसाठी ह्या सामनातील लेखमालेत प्रस्तुत विषयावर एक शोधपूर्ण निबंध लिहीला होता.. व्यंकट
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 04/20/2008 - 22:13 नवीन

प्रमाणाला

प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. +१ लेख आवडला हेवेसांनल. स्वाती
  • Log in or register to post comments
आ
आणिबाणीचा शासनकर्ता Sun, 04/20/2008 - 23:49 नवीन

मिपा व्यवस्थापनाची भूमिका..

हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? आधी आमच्या भाषेला बोली म्हणायचं नंतर तिला कसं नियमांचं अधिष्ठान नाही हे सांगायचं, आणि शेवटी तर ती अशुद्ध आहे एवढं बोलण्या पर्यंत यांची मजल. अगदी खरे! नीलकांतरावांनी खूपच छान लेख लिहिला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...! मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. ह्या वाक्यास मिपा व्यवस्थापनाची पूर्ण सहमती आहे! येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. नीलकांतरावांशी पुन्हा एकदा सहमत! आणि असा अट्टाहास कुणी करू पाहिल तर त्याचे लेखन तर उडवून लावले जाईलच, शिवाय त्याचे सभसदत्वही रद्द केले जाईल, मग भले सभासदांवाचून मिसळपाव बंद पडले तरी बेहत्तर! अशीच या बाबतीत व्यवस्थपनाची भूमिका राहील, हे आम्ही व्यवस्थापनातर्फे सांगू इच्छितो! अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. सहमत आहे! मिपावर प्रमाण लादण्याला मिपा व्यवस्थापनाचा प्रखर विरोधच राहील! प्रमाणभाषेचा आग्रह असणार्‍यांनी आपला आग्रह आपल्याजवळच ठेवावा! तो त्यांनी मिसळपाववर करू नये! खरं तर प्रमाणभाषेची नसती ट्यांव ट्यांव करणार्‍यांसाठी मिसळपाव हे संकेतस्थळ नाही. सबब, त्यांनी इथे येऊ नये हेच उत्तम! -- जनरल डायर.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 04/22/2008 - 08:14 नवीन

अंशत: सहमत

प्रथम लेख अतिशय वाचनीय आहे आणि विचार जवळजवळ सर्वच पटले. तरी अंशतः सहमती अशासाठी की, बोली भाषा एखाद्याची बरोबर किंवा चूक असे मानण्याचा अधिकार कोणालाच नसावा हे मान्य. पण लेखनाचे काही एका प्रमाणात प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) करणे हे आवश्यक मात्र नक्की आहे, नाहीतर लेखनाचा अर्थ न कळण्यापलिकडे जाईल असे वाटते. भाषाशास्त्रात फोनेटिक्स किंवा उच्चारशास्त्र हा एक महत्त्वाचा अभ्यास करावा लागतो. लिखित भाषा सर्वत्र समजली जावी अशी अपेक्षा असल्यास काहीएक उच्चार हे अभ्यासाच्या परिघात आणावे लागतील (कारण तसे ते आत्ता नाहीत म्हणून) आणि भाषेचे प्रमाणीकरण करताना त्यात सामावून घ्यावे लागतील. ते सरळसोट वापरात आणून (म्हणजे ब्रूट फोर्सने) करण्याचा पायंडा पाडणे सर्वस्वी बरोबरच असेल असे मला वाटत नाही, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. अमेरिकेच्या न्यू इंग्लंड भागातील लोक हे शेवटच्या "र" चा उच्चार करत नाहीत ( जसे "कार" मधला र). पण लिहीताना स्पेलिंग बरोबर एकाच पद्धतीने लिहीले जाते. बोली भाषेची वैशिष्ट्ये जपली नक्कीच गेली पाहिजेत पण लिहीताना मात्र प्रमाणीकरणाचा वापर शक्य तेवढा व्हावा. त्या प्रमाणीकरणाची सीमा विस्तृत करावी ही अपेक्षा मात्र योग्य आहे आणि तशी करण्यास कोणाचा नकार नसावा. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे पूर्णपणे मान्य.
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Tue, 04/22/2008 - 09:11 नवीन

कार-भार

कार मधल्या र च उच्चार न करणे पण लिहिताना मात्र 'आर्' लिहिणे हे उदाहरण म्हणून ह्या अनुषंगाने पटत नाही. इंग्रजी उच्चारानुसार लिहिली जाणारी भाषा नाहीच. स्पेलिंगचे घोळ होतात म्हणूनच तिथे प्रमाणीकरण गरजेचे आहे. एखाद्या उच्चार करता येण्याजोग्या शब्दाचे स्पेलिंग पाठ करायला लागावे यासारखे दुर्दैव मराठीच्या नशिबी नक्कीच नाही. किंबहुना (काय शब्द आहे!) क चा उच्चार इंग्रजीत c,q,k,ch कशानेही करता येईल. असे असल्याने तिथे प्रमाणीकरण हवेच. मराठीत क्वार्टर (क्वॉटअ), कार(क्खाअ), कॅन , काइट् (काइच्ट), ऑक्शन लिहा. तिथे 'क' म्हणजे 'क'च. ह्या वादात इंग्रजीला प्रमाण (रेफ़रन्स) मानणे नक्कीच सयुक्तिक नाही. भाषिक तुलनेचं (तुलनेचे असं लिहिलं की कसे पुस्तकी वाटते हे वेगळे सांगायला नको!) आणखी उदाहरण द्यायचं झालं तर थाई भाषेत काही वर्णांचे चार उच्चार आहेत उदा. प् , प , पअ ( लो टोन), प? (हाय टोन). हे उच्चार लिहायला त्या भाषेत वेगळे वर्ण आणि वर्णसंकर(!) आहेत. पा?क (का? सारखे पा? असे विचारा आणि मग क म्हणा) आणि पाक (आपला साखरेचा पाक असतो तसा उच्चार) यांचे लेखन आणि अर्थ वेगळे. त्यांनी उच्चारांच्यादृष्टीने समृद्ध(!) अशी मराठी भाषा/ देवनागरी लिपी प्रमाण मानावी का? मराठीत किमान असे फारसे प्रकार आढळत नाहीत (क्ष = क्श , ज्ञ = द्न्य, ष/श अशा कुरापती काढायला वाव आहे). प्रश्न उरतो तो समोच्चारी वर्णांचा जसे ट-त , द-ड, ण-न, ळ-ल; र्‍हस्व दीर्घाचा आणि प्रत्ययांचा. हा प्रश्नही (प्रश्ण का नाही? ) काही ठरावीक शब्दांपुरताच आहे. (बाकी सामान्य व्याकरण जसे वचन , लिंग, काळ इ. इ. मात्र प्रमाण आहेत हे नाकारता येत नाही). केवळ अशा काही शब्दभेदांमुळे जर मराठी बाटणार असेल तर ती लोकभाषा कधीच होणार नाही. अवांतरः सारेगमप मधल्या पल्लवी जोशीने पुरुषाला स्पर्धक आणि स्त्रीलाही स्पर्धक म्हणणे खटकते का कोणाला? गायक-गायिका, लेखक-लेखिका सारखे स्पर्धक-स्पर्धिका वगैरे का नाही असा प्रश्न पडला का कोणाला? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
च
चतुरंग Tue, 04/22/2008 - 20:22 नवीन

स्पर्धक - स्पर्धिका

तो स्पर्धक - पुल्लिंग, ती स्पर्धक - स्त्रिलिंग, ते स्पर्धक - अनेकवचन. ह्यात मूळ 'स्पर्धक' हा शब्द उदासीन आहे असे वाटते. असेच आणखी एक उदाहरण 'वादक' (वादिका?) - तो वादक, ती वादक, ते वादक. जाणकार आणखी स्पष्टीकरण देऊ शकतील. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॐकार
म
मनस्वी Tue, 04/22/2008 - 10:14 नवीन

यक नंबर

नीलकांतभाऊ लई छान लिवलंय.. यक नंबर.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 04/22/2008 - 11:04 नवीन

ह्येच म्हंतू

लई छान लिवलंय.. यक नंबर. ह्येच म्हंतू. च्यामारी परमाण का काय ते आपल्याला नाय कळत. आपल्याला पायजे तसंच लिवनार आपण. इरोध करणारे गेले खड्ड्यात.Image removed. फारच मस्त लेख... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
न
नरेंद्र गोळे Wed, 04/23/2008 - 17:09 नवीन

... तर भाषाही गाळात जाते हो

इनोबा, प्रामाण्य सांभाळले नाही तर तुम्ही ज्या भाषेत इथे संवाद साधू चाहता ती भाषाही गाळात जाते हो. तुम्ही 'निवड'पूर्वक बोली अवश्य वापरा. विलासरावजी "निचितपने" ह्याचे अनुमोदन करतील. मात्र लेखनात (संवादलेखन, संबोधन, वगळता) प्रमाण भाषा वापरा. त्याचे फायदे अनेक आहेत. हेच ह्या संकेतस्थळ सांभाळणार्‍याचे मत झालेले ह्या लेखातून दिसून येते. अर्थात् ज्या स्वातंत्र्याखातर तुम्ही इथे वावरता त्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे निर्विवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
प
प्रकाश घाटपांडे Tue, 04/22/2008 - 22:30 नवीन

लई भारी

प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.
सहमत आहे. नीलकांता असेच चांगले लेख येवो. एका भाषा शुद्धीचा आग्रह असणार्‍या लेखिकेकडे एकदा गेलो होतो. तिथे दुरदर्शन वर एक कार्यक्रम लागला होता. चर्चा असावी. त्यात एक प्राध्यापक आनि पानि लोनि असे उच्चार करत होता त्या कडे त्या विदुषीने माझे लक्ष वेधले. मी त्यांना एवढेच म्हणालो माझे लक्ष आशया कडे होते. किती वास्तव तो सांगत होता याकडे होतं. बलुत या पुस्तकाच्या मुद्रित शोधनात असंख्य 'चुका' मुद्रित शोधका ने दाखवल्या होत्या असे ऐकून आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Wed, 04/23/2008 - 16:59 नवीन

संकेतस्थळ सांभाळतांना येत जाणारी प्रगल्भता व्यवस्थित प्रकटली आहे

अचानक नव्या जगाची ओळख झाली. हे... हे... सारं आमच्या भाषेत यायला हवं... आमच्या लोकांना कळायला हवं. ही कळकळ वाटायला लागली. १८३२ ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं नावही सुंदर होतं 'दर्पन'. >> नीलकांत, विचारपूर्वक लिहीलेल्या विचारप्रवर्तक लेखाखातर मन:पूर्वक धन्यवाद. प्रमाणभाषा असण्याचे अनेक फायदे असतात. उदाहरणार्थ वरील वाक्यात चुकून 'दर्पन' लिहील्या गेले असावे असा समज होण्याची शक्यता आहे. जर खरोखरीचे ते 'दर्पन'च असेल आणि त्याचा यथार्थ बोध व्हावा असे वाटत असेल तर, एरव्ही लिहीतांना प्रमाण भाषेत 'दर्पण' लिहीणे गरजेचे आहे. मग, प्रमाणभाषेत लिखाण केलेले आहे आणि जे आहे ते बिनचूक आहे अशी खात्री दिल्यास योग्य तो बोध निस्संदिग्धपणे मिळू शकतो. मात्र, संकेतस्थळ सांभाळतांना येत जाणारी प्रगल्भता लेखात व्यवस्थित प्रकटली आहे.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Wed, 04/23/2008 - 18:32 नवीन

ते दर्पण आहे.

मराठीतील पहिले नियतकालीक 'दर्पण' आहे. गोळेसर, माझा प्रमाणभाषेला विरोध नाहिये. विरोध आहे तो त्या प्रमाणाचा अतिआग्रहाला. अहो, मला नाही जमत १००% प्रमाण लिहायला. मग का मी लिहूच नये की काय? केवळ प्रमाण हीच एकमेव भाषा आहे असं नाही, आणि प्रमाणभाषेत झालेलीच केवळ अभिव्यक्ती बाकीचा सगळा दुय्यम गावठी माल असंही काही नाही. प्रमाण असावी, ती सर्वसंमत,सर्वमान्य असावी, त्यामुळे अर्थाबाबत संदेह उरत नाही. हे खरं आहे. या बाबत कुणाचंही दुमत नाही. नीलकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/24/2008 - 15:44 नवीन

अवांतर

दर्पण हे पहीले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारीते साठी दर्पण पुरस्काल दिला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांचे मूळ गाव पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधूदूर्ग. तेथे असलेल्या पोंभुर्ले गावच्या ग्रामदेवतेचे(जांभई देवी)पुजारी म्हणूने त्याना जांभेकर हे आडनाव प्राप्त झाले. आजही पोंभुर्ले गावी त्यांच्या जन्मघरी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तेथे जवळच असलेले जांभई देवीचे मंदिर हे कोकणातील काष्ठशिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
न
नाना चेंगट गुरुवार, 06/07/2012 - 18:13 नवीन

मस्त लेख !!

मस्त लेख !! :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 06/07/2012 - 18:47 नवीन

चेंगट्पना न कर्ता हा लेख वर

चेंगट्पना न कर्ता हा लेख वर आन्ल्याबद्दल श्री श्री नाना चेंगट यांचे त्रिवार हाबिणंदण!!! लै गरज व्हती या अशा लेखाची!! लै माजलेत प्रमाण-ब्रिगेडी अलिकडे ;)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/07/2012 - 20:26 नवीन

फारा दिवसांनी वाचले हे.

फारा दिवसांनी वाचले हे. जुन्या आठवणी! :)
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी गुरुवार, 06/07/2012 - 20:34 नवीन

एक प्रश्नः- हा लेख "नाना

एक प्रश्नः- हा लेख "नाना चेंगट" यांनी (किन्वा यांच्या करवी) इतक्या दिवसांनी वर काढण्यामागचा नक्की हेतू कळू शकेल का?... :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/07/2012 - 20:43 नवीन

अहो, हेतुरहित कर्म करा असं ते

अहो, हेतुरहित कर्म करा असं ते कृष्णाजी वसुदेव सांगून गेले आहेत ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
स
सुनील गुरुवार, 06/07/2012 - 21:03 नवीन

पूर्ण नाव घ्या

कृष्णाजीपंत वसुदेवराव यादव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मृगनयनी गुरुवार, 06/07/2012 - 22:06 नवीन

अरे वा वा!.. चान

अरे वा वा!.. चान चान!...एकन्दर ह्या धाग्यास वर खेचण्याचे काम 'समिती' कडूनच चालू आहे तर!!!.. गुड.. कीप इट अप!!! ___________________________________ मूळचे उत्तर भारतीय असणार्‍या कृष्णाजीराव यादवां'ची राजधानी "द्वारका" गुजराथमध्ये असताना.. त्यांनी महाराश्ट्रातल्या ( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ब
बॅटमॅन गुरुवार, 06/07/2012 - 22:11 नवीन

महाराश्ट्रातल्या....(

महाराश्ट्रातल्या....( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! .. आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मृगनयनी Fri, 06/08/2012 - 09:56 नवीन

आवरा हो मृगनैनीतै...लै झालं

आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.
:| :| :| .. इथे निषेध नोन्दवण्यासारखं काय आहे ? .. माझ्या "त्या" वाक्याचा अर्थ कळला नाही का तुम्हाला? ... मुळात वरच्या दोन प्रतिसादांमध्ये कृष्णाला "यादव" हे आडनाव प्रदान करणारे लोक्स वेगळे आहेत!... (सम्पादकही आहेत !) (पक्षी: मी नाही) ... आणि कृष्णाच्या पहिल्या पत्नीचे नाव- 'रुक्मिणी' असे असून तिचे माहेर विदर्भातले होते... अश्याप्रकारे कृष्णपत्नी'मुळे यादवांचा महाराष्ट्राशी संबंध जोडला गेलेला आहे... आणि "यादवांची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे" हे राज ठाकरेंचे विधान आहे!!!... त्यामुळे मला नाही वाटत की यामुळे इथे मिसळपाव'वरती फार मोठा गदारोळ निर्माण व्हावा!... :| टीप :- सरळ साध्या वाक्यांचे अर्थ समजून घेण्यात कृपया चूक करू नये...... कुणीही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 06/08/2012 - 12:43 नवीन

हम्म्म्म्म्म्म्म्म्म.......हे

हम्म्म्म्म्म्म्म्म्म.......हे हम्मा..हम्मा..हम्मा हम्मा हम्मा......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 06/08/2012 - 10:58 नवीन

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
न
नाना चेंगट Fri, 06/08/2012 - 13:22 नवीन

एक प्रश्नः- हा लेख "नाना

एक प्रश्नः- हा लेख "नाना चेंगट" यांनी (किन्वा यांच्या करवी) इतक्या दिवसांनी वर काढण्यामागचा नक्की हेतू कळू शकेल का?... तुमच्या प्रश्न विचारण्यामागचा हेतु कळू शकेल काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा