टारझन-जी,
मी तक्रार नोंदवणे सोडून २० वर्षें झाली! या विषयावरचा माझा लेख एक 'मुर्च्छा'चे सहसभासद श्री. अजय देवगण यांनी प्रकशित केलेल्या रातपाळी अंकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाचा दुवा जरा शोधून पाठवीन. सध्या कांहीं दिवसांसाठी कामाठीपुर्यात आलोय, त्यामुळे शोधायला जरा वेळ लागेल. किंवा देवगणसाहेबांनी हा प्रतिसाद पाहिल्यास तेही तो दुवा पाठवू शकतील.
या 'अर्धपुरुषी-पाववचनी' लेखाचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल असे वाटते!
परिकथेतील राजकुमार, मंडई
------------------------
आपण २० वर्षांपुर्वी नक्की काय झालं होतं , ज्यामुळे आपण तक्रार नोंदवणे सोडले ?>>>
नक्की काय हरवले होते ते कळले तरी बस्स...
बाय द वे २० वर्षापुर्वी हरवलेली वस्तु शोधायला आजकाल कामाठीपुर्यात आलायत का? ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
लय डेरिंग्बाज!!
पूर्वी पोलिसांविरुद्ध काही छापले की द्.शं. सोमण्,रिबेलो त्यांची बाजु घ्यायचे."सगळे पोलिस तसे नाहीत्.काही सज्जनही आहेत!!" असे सांगायचे.आता त्यालाही काळ लोटला.
राजकारणी लोक ह्यांना कुत्र्यासारखे वागवतात तेच योग्य वाटते.
भेंडी
P = NP
ह्याला डेरिंग म्हणता येईल की नाही माहित नाही ... पण थोबाड पाहुनंच लुच्चा आणि करप्टेड वाटणारा तो हवालदार पाहिला .. आणि त्याच्या वर्दीची भिती/दरारा ... उरला नाही बॉ ! बाकी शांत शुद्ध भाषेत टोमणे कसे टाकावेत त्याचं ट्रेणिंग आम्ही इकडेच घेतलं हॅहॅहॅ :) त्यात आमचा लोकल पोलिटिकल बॅक-अप असल्याने तसाही काही प्रॉब्लेम झाला नसता :)
>> त्यात आमचा लोकल पोलिटिकल बॅक-अप असल्याने तसाही काही प्रॉब्लेम झाला नसता
असा कुणी पोलिटिकल बॅकअप नसलेल्याने पोलिसाला झटकलेलं बघायला मिळण्याची शक्यता किती आहे? मी असं म्हणत नाहीये की पोलिटिकल बॅकअपमुळे तू बिन्धास्त पंगा घेतलास पण पूर्ण बॅकअप नसलेला माणूस खरंच किती प्रमाणात असं करेल हा प्रश्न मनात आला. कारण अर्थात वेगळं सांगायची गरज नाहीच म्हणा :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
>>पूर्ण बॅकअप नसलेला माणूस खरंच किती प्रमाणात असं करेल हा प्रश्न मनात आला.
संदीपशेठ, तुम्ही असा प्रश्न विचारायचा नाही आणि विचारलात तर आम्ही त्याचे उत्तर अजिबात सांगणार नाही ;)
कारण अर्थात वेगळं सांगायची गरज नाहीच म्हणा :)
ते फार्फार तर मुव्हीत घडु शकते, पण त्यावरुन प्रेरणा घेऊन कुणा सामान्य माणसाने अशा फॅंटसीत गुंतायचे कारण नाही.
बाके टार्याला लेख झकासच !
वर्तवणुकही टिपीकल टारुच ...
अवांतर :
ह्यावरुन "नायक" ह्या सामान्य पत्रकार ते मुख्यमंत्री हा प्रवास दाखवणार्या मुव्हीतल्या एका सिनची आठवण झाली.
जेव्हा अनिल कपुर त्याच्य चोरीला गेलेल्या बाईकच्या चौकशीसाठी फोन करतो तेव्हा त्याला मिळणारी उत्तरे ऐकण्यासारखी आहेत ;)
------
(टिकल ते पॉलिटिकल)छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
"........पोलिसांतही अपवाद असु शकतील , सगळीकडेच असतात............"
असेलही ! परंतु असला "अपवाद" याची देही याची डोळा जो पर्यंत भेटत नाही तो पर्यंत ही बाब अमान्य करणे भाग आहे, टारझन साब ! अगदी आपली जेन देखील (असल्यास) माझ्या मताला देकार देईल.
(या महाराष्ट्रात १०० चांगले शोधा १ मिळेल, पण १ हलकट शोधाला जावा, १०० मिळतील !)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
बाकी बंधुराज टारश्री झन भाउ !!
तुम्हाला नविन मित्र मिळाला असे लिहले आहे कारण त्या लेखावरीर मनोज नामक आयडीचे "सिस्टीम वैगेरे बदलण्याच्या अविर्भावातले प्रतिसाद" ... त्यांच्या लेखनात आम्हाला श्री. गंगधर फुटणेंचा नविन आंतरजालिय वारसेदार दिसला होता. असो, चालायचेच. ज्याची त्याची समज.
बाकी आम्हाला फुक्कटचे मोठेपण दिल्याबद्दल शतशः धन्यवाद.
१२वीत असतना दिवाळीत कळवा पोलिस स्टॅशन समोर ग्रीटिग कार्ड चा व्यवसाय केला होता. बाबा कदुन उदारी घेवुन. साला नेमका त्याच जागेवर एक हवालदार त्याची स्कुटर पार्क करायचा. त्याने रागाने लाथ मारुन सगळा माल खाली पाड्ला होता.आपली पण जवानी होती घातला सरळ आडवा. बराच त्रास झाला पण साहेब चान्ग्ला होता माफी नाम्यावर सुटका झाली पण व्यवसाय त्याच जागेवर केला.
१९९७ ची गोष्ट! सकाळी आठ वाजता वडिल दवाखान्यात जायला निघाले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आमच्या मारूती ८०० कारमधला स्टिरिओ चोरीला गेला आहे! गंमत म्हणजे स्टिरिओची समोरची कंट्रोल पट्टी रात्री घरी काढून ठेवली होती तरीही मूर्खाने आतला स्टिरिओ मागच्या दाराची त्रिकोणी काच (क्वार्टर ग्लास) फोडून दार उघडून चोरला होता. वडिल नको म्हणत असतांना देखील मी संतापाने पोलिस स्टेशनवर गेलो (प्रामाणिक व अजाण नागरिक ना!) तिथे तक्रार लिहिल्यावर हवालदारसाहेबांनी गाडीची तपासणी सुरू केली. मागच्या दाराची छोटीशी काच फुटलेली पाहून अस्सल पोलिशी आवाजात त्यांनी पहिला सवाल टाकला, ' एव्हढ्याश्या भोकातनं आत कसा गेला मा**चो*! ' मी अवाकच झालो आणि त्यांना म्हणालो , 'अहो साहेब त्याने ही काच फोडल्यावर आत हात घालून लॉक उघडून दार उघडले असणार.' ह्यावर साहेबांनी माझ्याकडेच संशयाने पाहून विचारले, ' तुम्हांला कसं माहित?' तुम्ही नक्कीच पाहिलं असणार मग तुम्ही ही चोरी कशी होऊन दिली?' अन मग हवालदारांना माझाच वहिम येऊ लागला! आणि हा सगळा प्रकार अतिशय सिरियसली चालला होता बरं का, गंमत वगैरे नाही :)
मी परत कधी असली क्षुल्लक तक्रार द्यायच्या भानगडीत पडलो नाही.
बाकी निरिक्षक लेव्हलचे (व त्यांच्याही वरचे) अधिकारी मात्र जनरली सेन्सिबल असतात असा माझा अनुभव आहे. काही तर अतिशय तल्लखही असतात; त्यांची नजरच अत्यंत तीक्ष्ण असते. मी जवळून पाहिलेल्या अनेक पोलिस अधिकार्यांमधले विशेष लक्षात राहिलेले म्हणजे राजेन्द्र जोशी, अरविंद पाटील, रविन्द्र सेनगावकर, किरण शेलार आणि आयुक्त डॉ. सत्यपालसिंह हे खूपच बुद्धिमान व सावध- सजग तरीही सौजन्यपूर्ण वर्तणूक असलेले होते.
एव्हढ्याश्या भोकातनं आत कसा गेला मा**चो*! ' मी .....पाहिलं असणार मग तुम्ही ही चोरी कशी होऊन दिली?' अन मग हवालदारांना माझाच वहिम येऊ लागला! आणि
हे खासच आहे... हहपुवा अगदी..
जवळून पाहिलेल्या अनेक पोलिस अधिकार्यांमधले विशेष लक्षात राहिलेले म्हणजे ....
तरी मी सगळ्यांना सांगत असतो की या डॉक्टरांपासून जपून राहा...
पाचेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. नाईट शिफ्ट करून आल्यानंतर झोपलो असताना दार उघडे असल्याचा फायदा घेऊन एकाने माझा मोबाईल लंपास केला. फार महाग नव्हता. पण तक्रार द्यावी, त्याची प्रत उपयोगी पडेल म्हणून गेलो. आमच्या रिपोर्टर मित्रासोबत. त्याला पाहून तिथल्या हवालदाराने आत नेलं. बसवून घेतलं. मग तक्रार लिहून घेतली. म्हणजे ते सांगत होते, मी कागदावर लिहून देत होते, लिहून दे ऐसा जे की झालं, मग त्यांनी सांगितलं, हं लिहा, मी सकाळी देवीच्या मंदिरात दर्शनाला जात असताना माझ्या पॅंटच्या उजव्या खिशातून मोबाईल पडला.' मी म्हटलं, अहो पडलेला नाही, चोरी झालेला आहे. त्यावर महाशय म्हणतात, अहो, लिहा हो. सापडला की देऊच. सापडण्याची आशा मला नव्हतीच. पण तो सांगेल तसे लिहावे लागले. रिपोर्टर मित्राने मग ज्ञानात भर घातली. गुन्हा म्हणून नोंद केली तर त्यांच्या नावावरचे न उलगडलेले गुन्हे वाढतात. ते त्यांना अडचणीचे ठरते. म्हणून ही शक्कल. मी कपाळाला हात मारला.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
गुन्हा म्हणून नोंद केली तर त्यांच्या नावावरचे न उलगडलेले गुन्हे वाढतात. ते त्यांना अडचणीचे ठरते.
सॉफ्टवेअरमध्ये सापडलेले बग्स 'बाय डिजाइन' किंवा 'एक्स्पेक्टेड बिहेविअर' म्हणून खपवले जाण्यासारखाच प्रकार वाटतो. तसे केले नाही तर 'अन्रिजॉल्व्ड बग्ज' घेऊन नाहीतर साहेब आणि कस्टमर दोघे उरावर बसतात :( घरोघरी मातीच्याच चुली ;)
(सॉफ्टवेअर अभियंता)बेसनलाडू
भारतातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांबद्दल जिव्हाळा दाखवण्यास आम्हाला बंदी असल्याने ;-) टारुभाऊंबद्दल केवळ सहानुभूती व्यक्त करतो. बाकी आमच्या एका भारतातल्या स्नेह्यांनी ते दोनेक तासांच्या ट्रॅफिकजॅममधे अडकलेले असताना एका ट्रकवर जे लिहिलेले पाहून आनंद व्यक्त केला त्याची आठवण झाली :
हे
असंच
चालायचं !
;-)
टारझनभाऊ, प्रसंग मस्त सांगितला आहे. माझाही एक अनुभव सांगतो:
पासपोर्ट मिळण्याआधी पोलिस घरी चौकशीला आले होते (साध्या वेशात). त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली तरी ते इकडचं तिकडचं बोलत राहिले. तुम्ही नगरचे का मग नगरला कुठे रहाता? रस्ते सुधारले का? वगैरे.. त्यांना चहा देऊन झाला तरी हलायला काही तयार नाही. शेवटी म्हणाले या उद्या पोलिस स्टेशनात - देतो पासपोर्ट. स्टेशनात गेल्यावर माझा नंबर दुसरा होता तरी मला थांबयला सांगितलं. नंतर तो पोलिस आला आणि म्हणाला गाडीवर आलाय का? जरा एका ठिकाणी जायचं होतं. चलता का? मला काही केल्या झेपंना.. गाडीपाशी आल्यावर इकडं तिकडं पाहिलं आणि म्हणाले की काय राव तुमच्या घरी वर्गणी मागायला आलो तरी काही दिलं नाही तुम्ही. असं चालता का कधी? साहेब पण नाराज झालेत. म्हटंलं की तुम्ही काही बोलला नाही मी स्वतःहून कशी वर्गणी (लाच) देणार? काढा ३०० रू. पैसे दिल्यावर मग गडी रंगात आला, साहेबाकडे जाऊन लगेच ह्यांचा पासपोर्ट द्या म्हणाला...
एखादी सुपर पॉवर नको , पण पोलीस माज करत असतील तर त्यांना योग्य ती शिक्षा द्यायची जर कायदेशिर परवानगी मिळाती तर बराच मनस्ताप कमी होईल !
आता पर्यत क्रान्ती झाली असती.
बाकी निरिक्षक लेव्हलचे (व त्यांच्याही वरचे) अधिकारी मात्र जनरली सेन्सिबल असतात असा माझा अनुभव आहे. काही तर अतिशय तल्लखही असतात; त्यांची नजरच अत्यंत तीक्ष्ण असते. हे खूपच बुद्धिमान व सावध- सजग तरीही सौजन्यपूर्ण वर्तणूक असलेले होते.
आम्ही पण यांची लेव्हल पाहिली आहे. पण आमचा अनुभव वेगळा आहे.
सगळ्याची एकच लेव्हल - पैसा
प्रतिक्रिया
टारझन-जी, म
आपण २०
आपण २०
तरी लय
आपण
ह्याला
डेरिंगबद्दल अभिनंदन टार्या पण
हॅ हॅ हॅ ...
लय डेरिंग
>>>>>>>काही
"अपवाद"
बंधुराज टारश्री झन भाउ
माझी पण
किस्सा..
१२वीत
माझापण एक किस्सा!
हा किस्सा वाचून तर
एव्हढ्याश
पाचेक
गुन्हा
+ १ हा हा हा!
हम्म
टारझनभाऊ,
झकास!
झक्कास...
एखादी सुपर