✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

यादवी किंवा (ती झाली तेव्हा...)

र — राजेश घासकडवी, Sun, 04/25/2010 - 05:52
मनुष्याचा इतिहास यादवी-युद्धांनी भरलेला आहे. जे मुद्दे तडजोडीने, सहमतीने, गुण्यागोविंदाने सुटू शकतात अशाविषयी हट्टाग्रही भूमिका घेऊन शस्त्रं उपसायची परंपरा आहे. यात भावाविरुद्ध भाऊ उभा राहातो, मित्राविरुद्ध मित्र पवित्रा घेतो आणि प्रेम विसरून एकमेकांचा गळा घोटायला ते तयार होतात. कित्येक राज्यं, देश अशा आंतर्गत बंडाळ्यांमुळे कमकुवत होऊन परकीय आक्रमणांना बळी पडलेली आहेत. मिपावर मी बऱ्याच लोकांपेक्षा खूप कमी वेळ वावरलो आहे. कोणाला अजून भेटलेलोही नाही. असं असतानाही माझे मिपाशी, तिथल्या लोकांशी ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत. मिपाने मला खूप काही दिलेलं आहे. सर्वांनाच मिपाविषयी आत्मीयता वाटते हे मला दिसून आलेलं आहे. तेव्हा मी सर्वांना आवाहन करतो की माझ्या पहिल्या प्रतिसादाला +१ असा प्रतिसाद द्यावा. ज्यांना त्या साध्या विधानापलिकडे काही लिहायचं असेल, आमचा दोष नसून त्यांचा असं म्हणायचं असेल, किंवा जे झालं ते तितकं गंभीर नव्हतंच असं म्हणायचं असेल, ते स्वतंत्र प्रतिसाद द्यायला मोकळे आहेतच. खालची कविता एकांगी होऊ नये म्हणून वादग्रस्त ओळींच्या दोन व्हर्जन आहेत. ज्याला जी हवी ती स्वीकारावी. पण कंसातल्या शब्दांपेक्षा कंसाबाहेरच्या शब्दांना महत्त्व द्यावं अशी विनंती. (ग्रेसना वंदन करून) यादवी ती झाली तेव्हा टिकटिक, कीबोर्ड निनादत होता (सत्तेत अडकली चरणे, हा पाश उल्गडत होता) किंवा (पाहून मोकळी कुरणे, हा तांडा परतत होता) ती घाई होती हाती, घनतुंबळ रणसमराची निष्कारण दुहिच्या पायी, कल्लोळ माजला होता ती झाली आता म्हणुनी, घनव्याकुळ मी ही रडलो घावांनी जख्-मि पाउस, रक्ताने भिजला होता अंतरात गमले मजला, संपले नव्खेपण माझे गोकुळी नांदता यदुजन, दोघांत वाटला होता हे रक्त पाहतानाही त्यां आता गहिवर नाही (निर्वस्त्र द्रौपदीला हा, दु:शासन हसला होता) किंवा (वस्त्रांत द्रौपदीच्याही, उद्देश नागडा होता)

प्रतिक्रिया द्या
3264 वाचन

💬 प्रतिसाद (15)

मिपा

राजेश घासकडवी
Sun, 04/25/2010 - 05:55 नवीन
मिपाविषयी मला आत्मीयता आहे, त्यामुळे इथे खेळीमेळीच्या टक्केटोणप्यांपलिकडे, किंवा साध्या वैचारिक मतभेदांपलिकडे भांडणं होऊ नयेत असं मला मनापासून वाटतं.
  • Log in or register to post comments

+(१)

अक्षय पुर्णपात्रे
Sun, 04/25/2010 - 06:01 नवीन
झकास विडंबन. (प्रतिसाद आल्यास उपप्रतिसाद लिहिण्याची शक्यता आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

+२

श्रावण मोडक
Sun, 04/25/2010 - 06:13 नवीन
+२ (हे झाले तुमच्या मागणीप्रमाणे)
(वस्त्रांत द्रौपदीच्याही, उद्देश नागडा होता)
हे अधिक समर्पक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

+३

Nile
Sun, 04/25/2010 - 06:48 नवीन
>>हे अधिक समर्पक! +१. छान जमलंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+१

धनंजय
Sun, 04/25/2010 - 07:13 नवीन
येथे किंवा अन्य संकेतस्थळावर व्यक्तिगत निरोप बघावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

+५

बिपिन कार्यकर्ते
Mon, 04/26/2010 - 13:22 नवीन
+५ बाकी तिकडे बोलूच. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

+(१)

संदीप चित्रे
Mon, 04/26/2010 - 20:51 नवीन
असंच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

+१

शुचि
Sun, 04/25/2010 - 06:32 नवीन
कविता खूप आवडली ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

लै भारी रे!

विसोबा खेचर
Sun, 04/25/2010 - 07:36 नवीन
लै भारी रे! :) Image removed.
  • Log in or register to post comments

लै भारी

प्रमोद देव
Sun, 04/25/2010 - 08:11 नवीन
पाहून मोकळी कुरणे, हा तांडा परतत होता ही ओळ जास्त समर्पक आहे. ;) तांडा च्या ऐवजी कंपू हा शब्द जास्त उचित होईल. :D
  • Log in or register to post comments

+१

मनीषा
Sun, 04/25/2010 - 09:03 नवीन
पाहून मोकळी कुरणे, हा तांडा परतत होता ही ओळ जास्त समर्पक आहे. सहमत! समयोचित आणि समर्पक कविता ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

श्री

II विकास II
Sun, 04/25/2010 - 08:50 नवीन
श्री घासकडवी यांचे मिपावरील प्रेम पाहुन आंनद झाला. निरपेक्ष प्रेम असेल तर काही अडचणी येत नाहीत, प्रेमातुन काहीतरी हवे असेल आणि ते मिळाले नाही कि उगाच शहारुख खानच्या 'डर' ची कथेची पुनरावृत्ती होती. कंपुला लोक नावे का ठेवता, याचासुद्धा कंपुने विचार करायला हवा. असो. ज्याची त्याची समज, ज्याची त्याची जाण. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments

+....

नंदन
Sun, 04/25/2010 - 10:26 नवीन
अंतरात गमले मजला, संपले नव्खेपण माझे गोकुळी नांदता यदुजन, दोघांत वाटला होता
--- खी: खी: खी:, 'यदुजन' भारीच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१२३४५६....

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 04/26/2010 - 10:20 नवीन
नंदन, 'यदुजन' म्हणजे भाषा महत्त्वाची नसावी ... इथून तिथून "यादवी" महत्त्वाची! ;) राजेश, झकास विडंबन! काना, मात्रा, वृत्ताबद्दल कवितक गुरूजींना मी काय सांगणार? अर्थही झकासच. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सरस शब्द प्रतिभा ! !

निरन्जन वहालेकर
Mon, 04/26/2010 - 08:45 नवीन
वा ! क्या बात है ! अतिशय सुरेख विडंबन ! आणि सरस शब्द प्रतिभा ! ! अजून येऊ देत !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा