✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उन्हाळ्याची तयारी

अ
अरुंधती यांनी
Mon, 03/22/2010 - 22:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10889 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

आहाहा!! लेख

रेवती
Mon, 03/22/2010 - 23:09 नवीन
आहाहा!! लेखन मनाला एकदम गारेग्गार करून गेले! उन्हाळ्याच्यादिवसात अंगणात किंवा गच्चीवर वाळवलेले चुरचुरीत कपडे, कुर्डया, पापड्यांसारखी वाळवणे (अर्धी ओली असताना खाणे) असं सगळं आठवलं. रेवती
  • Log in or register to post comments

कधी येतोय अस झालाय

मीनल
Tue, 03/23/2010 - 02:59 नवीन
हे वाचून कधी उन्हाळा येतोय असं झालय . इथे तर आज ही बारीकसा स्नो फॉल झालाय. थंडी जायच नावच घेत नाही आहे. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अगदी, अगदी...

स्वाती दिनेश
Tue, 03/23/2010 - 12:27 नवीन
हे वाचून कधी उन्हाळा येतोय असं झालय . इथे तर आज ही बारीकसा स्नो फॉल झालाय. थंडी जायच नावच घेत नाही आहे. अगदी ग, आमच्याकडचा स्नो थांबला आता, पण थंडी जायचं नावच घेत नाहीये,:( आत्ता कुठे पारा "डबल डिजिट" मध्ये तपमान दाखवायला लागला आहे. अजूनही स्वेटर घालावा लागतोच आहे... स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

उन्हाळा थंडी

नितिन थत्ते
Wed, 03/24/2010 - 08:23 नवीन
>>हे वाचून कधी उन्हाळा येतोय असं झालय ह्म्म. प्रत्येकाचे वेगवेगळे दु:ख. यावरून एक किस्सा आठवला. आमच्या ओळखीतले एक गृहस्थ सरकारी नोकरी निमित्ताने सिमल्याला दोन एक वर्षे होते. त्यांना बोलता बोलता म्हटले "तुमची मजा आहे बुवा....सिमल्याला नोकरी......उन्हाळ्याचा त्रास नाही !!! :) . तेव्हा त्यांना एकदम संताप आला आणि मला म्हणाले "अहो कसली मजा >:P .... सिमल्याला राहून पहा. थंडीत नुसता जीव अर्धमेला होतो". :( स्वातीतै पण बहुधा असेच म्हणतील. :) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

हे वाचून

देवदत्त
Tue, 03/23/2010 - 12:57 नवीन
हे वाचून कधी उन्हाळा येतोय असं झालय पहिल्यांदा हे वाचून वाटले मार्च मध्येच एवढी गरमी असताना उन्हाळा का पाहिजे? :D पण पुढचे वाचले आणि का ते कळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

व्व्वा !!

टारझन
Mon, 03/22/2010 - 23:14 नवीन
व्व्वा !! सुर्रेख सुर्रेख .. :) कलिंगड म्हणजे आमचा जिव की प्राण .. ल्हाणपणा पासुन आमचं एक स्वप्न आहे .. एखाद्या भल्या मोठ्या कलींगडात घर करुन रहायचं :)
  • Log in or register to post comments

आता तुला

मेघवेडा
Tue, 03/23/2010 - 16:26 नवीन
आता तुला रहायला कलिंचा गड लागेल!! कलिंगड काय कामाचं?? :P -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

कलिंगडात

अरुंधती
Tue, 03/23/2010 - 20:21 नवीन
कलिंगडात घर? :-) मला भोपळ्याची व म्हातारीच्या गोष्टीची आठवण झाली... चल रे भोपळ्या टुणुक टुणुक तसे चल रे कलिंगडा टुणुक टुणुक! घर केलंत की सांगा नक्की! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

व्वा...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/23/2010 - 00:19 नवीन
सुरेख वर्णन...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेख भलताच

शुचि
Tue, 03/23/2010 - 00:26 नवीन
लेख भलताच भारी झालाय. मस्त. आवडला. मार्च महीन्यात जे वारे वहातात त्यानी इतकं मस्त वाटतं आणि नेमक्या तेव्हा परीक्षा असतात. मला वाटतं हेच ते वसंत ऋतूचे वारे. पहाटे पहाटे चालण्यासाठी बाहेर पडावं तर पक्षी इतके मंजूळ सुस्वरात साद घालत असतात. त्यांचा मीलन काळ हाच असतो त्यामुळे असेल कदाचीत. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments

क्या बात है!!

चतुरंग
Tue, 03/23/2010 - 00:31 नवीन
सुंदर लेखन! सगळ्या आठवणींचा पट उलगडलात!! धन्यवाद! :) पन्ह्यासाठी आई कैर्‍या उकडून ठेवायची आणि मग त्यातला गर काढून झाल्यावर राहिलेल्या साली आणि कोयींनी अंग घासून गच्चीवर ठेवलेल्या तांब्याच्या घंगाळातल्या झळवणीच्या पाण्याने आम्ही गच्चीवरच आंघोळ करायचो. मग राजापुरी पंचाने अंग पुसायचे की वेलची पूड घातलेले थंडगार पन्हे हाणायला तयार! आंबे तर एक दोनाच्या हिशेबात कधी खाल्लेच नाहीत! रस काढायला मी सगळ्यात पुढे. आंबे घमेल्यात घेऊन धुवायचे, पुसून मऊ करायचे, रस काढायचा, कोयी आणि साले चाटून सर्व तोंड, हात माखून घ्यायचे त्याशिवाय मजा नाही! घरातच मोगर्‍याच्या चार कुंड्या होत्या संध्याकाळी फुले उमलून संपूर्ण घरभर सुवास सुटायचा. अबोली आणि मोगर्‍याची फुलं एकत्र फार सुंदर दिसतात. (आठवणीत हरवलेला)चतुरंग
  • Log in or register to post comments

हेच

प्राजु
Tue, 03/23/2010 - 18:57 नवीन
हेच म्हणते. सुरेख आठवणी. नॉस्टॅल्जिक एकदम. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मस्तच

चित्रा
Tue, 03/23/2010 - 03:40 नवीन
सुंदर लेख आणि चित्रांनी शोभा वाढवली. आमच्या घरी उन्हाळ्याच्या सुमाराला एप्रिलच्या मध्यावर-मे च्या मध्यापर्यंत भरपूर वाळवणे चालत असत. मुख्य म्हणजे डाळींना उन्हे देणे हा मोठा कार्यक्रम असे. आणि त्या डाळी वर्षभराच्या घेऊन नीट भरून ठेवणे हे प्रचंड कटकटीचे काम आमच्या घरच्या मोठ्या बायका कशा करत हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. असो ते नंतर कधीतरी.
  • Log in or register to post comments

सुंदर...

राजेश घासकडवी
Tue, 03/23/2010 - 03:47 नवीन
चित्रांमुळे रंग, वास, आणि थंडाव्याच्या आठवणी जाग्या झाल्या...
  • Log in or register to post comments

फार सुंदर

नंदू
Tue, 03/23/2010 - 04:56 नवीन
ते वास, उन्हाळ्याच्या सुट्या आठवल्या. प्रभावी लेखन. नंदू
  • Log in or register to post comments

अरुंधतीताई

इंटरनेटस्नेही
Tue, 03/23/2010 - 05:58 नवीन
अप्रतिम लिहलयं तुम्ही.. तुम्ही आमच्या सारख्या नवीन लेखकांना अगदी आदर्शवत लिहीता.. कीप इट अप..! -- (भारावुन गेलेला) इंटरनेटप्रेमी.
  • Log in or register to post comments

सुरेख लेख..

विसोबा खेचर
Tue, 03/23/2010 - 08:25 नवीन
सुरेख लेख.. मन प्रसन्न करून गेला! चित्रंही आल्हाददायक.. जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments

मस्त लेख.

झकासराव
Tue, 03/23/2010 - 10:39 नवीन
मस्त लेख. :) आई उन्हाळ्याचे पापड, कुरडया, सांडगे अस काही काही करत असायची. वाळत घालण्याच काम आम्ही स्वताकडे घायचो. कारण काही गोळे गट्टम करायला मिळायचे.
  • Log in or register to post comments

वा !!.. अतिशय

टुकुल
Tue, 03/23/2010 - 12:07 नवीन
वा !!.. अतिशय सुंदर लेख, खुप आवडला. --टुकुल
  • Log in or register to post comments

सुंदर

मदनबाण
Tue, 03/23/2010 - 12:13 नवीन
सुंदर चित्रमय लेख... :) (आमराईतल्या कैर्‍या चोरणारा...) :) मदनबाण..... अमेरिकेने नक्की काय "डील" केले आहे पाकड्यांबरोबर ? डील व्ह्यायचे आहे का आधीच झाले आहे ? http://www.timesnow.tv/Now-US-to-reward-Pak-with-India-type-N-deal/articleshow/4341126.cms
  • Log in or register to post comments

वाचून गार

बिपिन कार्यकर्ते
Tue, 03/23/2010 - 12:37 नवीन
वाचून गार पडलो :D बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

वा!!

समंजस
Tue, 03/23/2010 - 13:36 नवीन
सुंदर!!! माझ्या सुद्धा उन्हाळ्यातील बालपणीच्या आठवणी जागृत झाल्यात :) शाळेतील बारामाही परिक्षा संपल्यावर सुरू होणार्‍या उन्हाळ्यातील सुट्टया खुपच हव्याशा वाटत 8> (भरपूर खेळायला मिळणार यामुळे की वर लेखात उल्लेखलेल्या पदार्थांचा फडशा पाडायला मिळणार यामुळे :? ठाउक नाही पण उन्हाळा खुप आवडायचा :D )
  • Log in or register to post comments

मस्त लिव्हलय.....

वेताळ
Tue, 03/23/2010 - 13:54 नवीन
चित्रे खुप खुप खुप आवडली. वेताळ
  • Log in or register to post comments

Wow !

वाहीदा
Tue, 03/23/2010 - 13:59 नवीन
डोळे सुखावले .. अहाहा अल्हाद -दायक ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/23/2010 - 19:28 नवीन
खरच डोळे (चारी) सुखावले.. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

अरुंधती मी

पर्नल नेने मराठे
Tue, 03/23/2010 - 14:07 नवीन
अरुंधती मी तुझी फॅन ग 8> चुचु
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख!

समीरसूर
Tue, 03/23/2010 - 15:14 नवीन
मजा आली वाचून. आणि उन्हाळ्याचं किती सुंदर वर्णन केलं आहे! अगदी डोळ्यासमोर उभे राहिले उन्हाळ्यातले दिवस. छान! --समीर
  • Log in or register to post comments

सहमत

नील_गंधार
Tue, 03/23/2010 - 16:44 नवीन
सहमत आहे. उन्हाळ्याचं सुंदर वर्णन. नील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

मस्तच!!!

मेघवेडा
Tue, 03/23/2010 - 16:29 नवीन
आता कसं वाटतंय??? एकदम गार गाऽऽऽर वाटतंय!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

थंडावा

पिंगू
Tue, 03/23/2010 - 19:16 नवीन
लेख वाचून उन्हाळ्यातील थंडाव्याची अनुभूती मिळाली...
  • Log in or register to post comments

क्या बात है !!

अनिल हटेला
Tue, 03/23/2010 - 19:28 नवीन
अतिशय सुरेख लेख......:) बैलोबा चायनीजकर !!! © Copyrights 2008-2010. All rights reserved.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

अरुंधती
Tue, 03/23/2010 - 20:36 नवीन
हा लेख खरं तर मी खूप उकडत होतं तेव्हा लिहायला घेतला.... आणि ते सर्व लिहिताना उकाडा कोठे पळाला, मन कसे प्रसन्न झाले ते कळलेच नाही! तुम्हाला सगळ्यांना आवडला हा लेख व फोटो हे वाचून मस्तच वाटले. माझ्या बरोबर तुमचेही सर्वांचे डोळे निवले व आल्हाददायक आठवणी जागृत झाल्या! अजून काय हवे? :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुरेख लेख आणि फोटो

संदीप चित्रे
Tue, 03/23/2010 - 20:50 नवीन
मागच्या शनिवारी इथे वसंत ऋतुचा पहिला दिवस होता आणि तुम्हीतर आधी उन्हाळ्याची वाट बघायला लावताय :) सगळेच फोटो अगदी योग्य आहेत. पण ह्या लेखात 'उसाच्या रस', रसवंतीगृह आणि फोटो राहिलेले दिसतायत :) शेणाने सारवलेल्या जमिनी, बांबूच्या तट्ट्यांचा भिंती, बसायला लाकडी बाकं आणि डुगडुगणारी टेबलं, भिंतीवर काळानुरूप बदलणारे नट्यांचे फोटो (तेव्हा रेखा, हेमा मालिनी असायच्या, आता प्रियांका, बिपाशा, करीन, कतरीना असतील), आणि तो घुंगुरांच्या आवाजाबरोबर चालणार उसाचा चरक. ... लिहावं तितकं कमीच आहे :) (परवा न्यू जर्सीतल्या स्प्रिंगच्या स्वागताला उसाचा रस प्यायलेला) संदीप ! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

संदीप

अरुंधती
Tue, 03/23/2010 - 21:38 नवीन
संदीप, लिहिताना मला पण ऊसाचा आले-लिंबू घातलेला बर्फाळ रस आठवला.... रसवंती गृहात भर दुपारी जाऊन 'एक फुल एक हाफ' करत, घुंगरांचा ताल व नाद कानांत साठवत, आजूबाजूच्या रंगीबेरंगी पोस्टर्सकडे बघत घालवलेला तो ऊसाच्या गुर्‍हाळातला सह्ही काळ! :-) हा घ्या तुमच्यासाठी खास गारेगार ऊसाचा रस! :-) Image removed. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

ऊसाचा थंडगार रस

संदीप चित्रे
Wed, 03/24/2010 - 05:13 नवीन
मिळाला... धन्स :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

उन्हाळा

चित्रगुप्त
Tue, 03/23/2010 - 21:47 नवीन
वाहवा... अतिशय सुन्दर लिखाण आणि तितकीच छान चित्रे..... असेच र्सौंदर्य निर्माण करीत रहा........सहज "समर नाईट" असे गुगलताना ही प्रतिमा मिळाली: Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर

सुमीत भातखंडे
Wed, 03/24/2010 - 00:47 नवीन
सुंदर लेख
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा