✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खेळ दोन ओळींचा - ५

र — राघव, गुरुवार, 03/18/2010 - 10:24

प्रतिक्रिया द्या
2865 वाचन

💬 प्रतिसाद (18)

हे कसं वाटतं?

राजेश घासकडवी
गुरुवार, 03/18/2010 - 10:40 नवीन
खाउनि भरलास तू, लोणी आणि तूप, 'किती' बघू बाळा, तुझं साजरं ते रूप! राजेश
  • Log in or register to post comments

वाह!

राघव
गुरुवार, 03/18/2010 - 11:26 नवीन
छानच की! हे कसं - मुखी लोणी लागलेलं, डोळी साठले अप्रूप! किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप! राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अरे!! आज

राघव
गुरुवार, 03/18/2010 - 13:49 नवीन
अरे!! आज कुणाचा मूड नाही असं दिसतंय.. ठीके.. असो. :) राघव
  • Log in or register to post comments

मोरपीस

चतुरंग
गुरुवार, 03/18/2010 - 17:13 नवीन
मोरपीस खुले डोई, बालक निष्पाप किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप! चतुरंग
  • Log in or register to post comments

हाताची

अनामिक
गुरुवार, 03/18/2010 - 17:48 नवीन
हाताची घडी, अन् तोंडाला कुलूप किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप! -अनामिक
  • Log in or register to post comments

१. जागा एक

बहुगुणी
गुरुवार, 03/18/2010 - 17:48 नवीन
१. जागा एक तू असावा, सारे जग चिडी-चूप किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप! २. डोळे भरून पहावे, आनंदावे खूप खूप किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!
  • Log in or register to post comments

प्रकाटाआ -अ

अनामिक
Fri, 03/19/2010 - 01:54 नवीन
प्रकाटाआ -अनामिक
  • Log in or register to post comments

शाम

डावखुरा
गुरुवार, 03/18/2010 - 18:18 नवीन
शाम सावळा,मथुरेचा न्रुप..... किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप! "राजे!"
  • Log in or register to post comments

आता कसं छान वाटतंय!!

राघव
गुरुवार, 03/18/2010 - 19:01 नवीन
:) माझा आणिक एक प्रयत्न - "दुडक्या" चालीत जसा दरवळे धूप..! किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप! राघव
  • Log in or register to post comments

अवघ्या

मदनबाण
गुरुवार, 03/18/2010 - 19:57 नवीन
अवघ्या जगाचा आधार तूच किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप! मदनबाण..... स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!! http://bit.ly/dlmzCy
  • Log in or register to post comments

मी पण!

क्रान्ति
गुरुवार, 03/18/2010 - 21:01 नवीन
वेणू, घुंगुर, मोरपीस गोजिरे, अनूप, किती बघू बाळा तुझं साजरं ते रूप! क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

चाळवाळे

प्राजु
गुरुवार, 03/18/2010 - 21:36 नवीन
चाळवाळे छुमछुम, मनी आनंद अमाप किती बघू बाळा तुझं साजरं ते रूप! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

घेउनिया मांडीवर

sur_nair
Fri, 03/19/2010 - 21:20 नवीन
घेउनिया मांडीवर, कुरवाळावे खूप किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप माथा मोरपीस तुझ्या, शोभे अनुरूप किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप हरपले ध्यान, गेली दूर तहान -भूक किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप लाभले कि मला, सात जन्माचे ते सुख किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप तुला पाहून वाटे, अन्य सारेची विरूप किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप सुरेश नायर http://sites.google.com/site/surmalhar/
  • Log in or register to post comments

वा!

राघव
Fri, 03/19/2010 - 11:21 नवीन
वा! मस्त!! क्रांतीताई, वेणू, घुंगुर, मोरपीस गोजिरे, अनूप खूप सुंदर लिहिलंत.. क्लास! प्राजु, चाळवाळे छुमछुम हा शब्दप्रयोग आवडला! :) सुरेश, तुला पाहून वाटे, अन्य सारेची विरूप ही ओळ आत्यंतिक सुंदर. आवडेश! माझा आणखी एक प्रयत्न - कसा बसावा विश्वास (कि) तू मुळात अरूप! किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!! राघव
  • Log in or register to post comments

मी दोनोळी

अश्विनीका
Fri, 03/19/2010 - 14:30 नवीन
मी दोनोळी ऐवजी चारोळीचा प्रयत्न केला आहे. शिरी मोरपीसं , हाती मंजूळ पावा बाळमुकुंदाच्या मुखी अमृताचा गोडवा दुडूदुडू धावे , पायी वाजे छुमछुम किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप! सावळा कान्हा माझा नटखट भारी दूध दही खाण्या फोडी मडकी सारी कान्हासवे खेळण्या आतुरले गोप किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप! श्रीरंगा लहानगा तू, दावी लीला अनंत मोहक तुझ्या हासण्याने अंगणी फुले वसंत कृष्णमाय जाहले मनी आनंद अमाप किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप! - अश्विनी
  • Log in or register to post comments

अरे वा!

राघव
Fri, 03/19/2010 - 17:16 नवीन
छानच. कविता म्हणून प्रकाशित करा की! राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनीका

आभार!

राघव
Fri, 03/19/2010 - 17:56 नवीन
यावेळेस सुचलेल्या ओळीसाठी निगडीत ओळ शोधतांना कल्पनेला पुरेसा वाव नव्हता कदाचित. पुढल्या वेळेस जरा आणिक सोपी ओळ घेऊ यात! खेळात भाग घेतलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार. :) राघव
  • Log in or register to post comments

आणखी एक

sur_nair
Sat, 03/20/2010 - 04:49 नवीन
झुंजूमुंजू आलं, भाट आळविती भूप किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा