✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बसंतचं लग्न..१३

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 04/07/2008 - 18:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16872 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

व
विजुभाऊ Mon, 04/07/2008 - 19:10 नवीन

काही

काही हिन्दी कव्वाल्या ही केदार मधे आहेत... उदा: पल दो पल का साथ हमारा...पल दो पल के याराने है ( बर्नींग ट्रेन) मराठी गाणे सत्यम शिवम सुन्दरा ..... आज मी आळविते केदार ही गाणी पण केदार मधे आहेत... तात्या रागांची ओळख सांगताना त्या रागातली हिन्दी मराठी गाणी पण सांगा ना
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 19:26 नवीन

अनेक..

विजूभाऊ, तात्या रागांची ओळख सांगताना त्या रागातली हिन्दी मराठी गाणी पण सांगा ना तशी या रागात अनेक गाणी आहेत, परंतु मला जी पटकन आठवतात तीच मी सांगतो. आणि त्या त्या रागातल्या गाण्यांचे नुकतेच संकलन करून येथे देणे, हा या लेखमालेचा उद्देश नसून त्या त्या रागाचा चेहेरा मला जसा दिसला, ते इथे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे, हे आपण कृपया लक्षात घ्या! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्राजु Mon, 04/07/2008 - 19:31 नवीन

सुरेख..

मी जेव्हा एक व्यक्ति म्हणून केदारकडे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की मी मोठ्या उदार मनाच्या व्यक्तिकडे पहात आहे. छोटेपणाचा, अशुभतेचा कधी स्पर्शच झालेला नाही या व्यक्तिला! प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केदरासारखा एखादा तरी सखा असावा असं वाटतं! अगदी सखा नाही, तरी केदाराइतकी मोठ्या मनाची एखादी तरी वडीलधारी व्यक्ति अगदी प्रत्येकाला लाभावी, जिच्याकडे अगदी खुलेपणानं मनातलं बोलता यावं, आपले सगळे लाड पुरवून घेता यावेत, अणि प्रसंगी जिच्या मांडीवर डोकं ठेवून मनमोकळं रडताही यावं! हे खासच... हा ही भाग उत्तम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Mon, 04/07/2008 - 19:43 नवीन

सुंदर .......

आपण सुरुवातीला जे II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II असे लिहिता. त्या देवतुल्य अक्षरांचा योग्य तो मान राखला जाईल असेच सुंदर लिखाण सर्व भागांत आहे. यापेक्षा जास्त काय लिहूं? माझ्या संगणकावर हेहि दुवे चालत नाहींत. कांहीच ऐकू येत नाही. असो अशाच सुरेख भागांची वाट पाहातो. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 04/07/2008 - 20:28 नवीन

वा तात्या! वा!

केदारचे वर्णन मस्त केलंय आणि त्याची श्राव्य झलकही मस्तच आहे. जियो तात्या! जियो!
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 04/07/2008 - 21:51 नवीन

एक शंका.

वसंतरावांनी केदारकडे कसं बघितलंय त्याची झलक इथे ऐका. वसंतरावांसारख्या बुद्धीमान गवयाला केदाराने भुरळ घातली नसती तरच नवल होतं! वसंतरावांचा स्वभावही तसाच होता, केदार सारखाच दिलदार आणि अवलिया! हेही वसंतराव देसाईच का वसंतराव देशपांडे.??? नीटसे कळले नाही . कारण दिलदार आणि अवलिया ही विशेषणे वसंतराव देशपांडे याना पण लागू होतात. केदारच्या मनाची श्रीमंती जराही कुठे कमी झाली नाही, त्यात जराही कुठे कोतेपणा नाही, की जराही कुठे दुराभिमान नाही, की अहंपणचा, जेतेपणाचा स्पर्श नाही! राम वालीला सांगतो की मी तुला मारला खरा, पण तुलाही मोक्षच मिळो लेका! आणि काळजी करू नको, तुझ्या पुत्राला, अंगदालाही मी सांभाळीन, तुझे राज्य तुझ्याच घराण्याच्या सुग्रीवाच्या हवाली करीन. मी खाणार नाही! वैर, वैराच्या जागी आणि नितीमत्ता, नितिमत्तेच्या जागी! मंडळी, हे उघडपणे, खुल्या दिलाने सांगायला केदारच हवा! काय बात आहे तात्या!!! जिंकलस.. एकदम पटले बघ... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/08/2008 - 00:28 नवीन

तौबा तौबा!

पेशवेसाहेब, अहो आवाज, आवाज, असा झारदार, 'काळजात कट्यारी' सारखा 'घुसणारा' आवाज कोणाचा असू शकतो? हे पं. वसंतराव देशपांडेच, भाईकाकांचे वसंतखां! शापित गंधर्व!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/08/2008 - 10:39 नवीन

वाटलेच होते ते वसंतखां असणार...

आवाज, आवाज, असा झारदार, 'काळजात कट्यारी' सारखा 'घुसणारा' आवाज कोणाचा असू शकतो? हे पं. वसंतराव देशपांडेच, भाईकाकांचे वसंतखां! शापित गंधर्व!! अगदी खरे आहे चतुरंगराव... गाण्यात म्हणजे कशी नागिणीची सळसळ होती... हाय... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Tue, 04/08/2008 - 03:51 नवीन

वा तात्या, रागदारी लेखनाची ही मेजवानी अनोखी आहे!

हा आनंदी आणि उत्साहाने ओसंडून वाहणारा केदार ऐकून थकवा कुठल्याकुठे पळून जातो! तात्या, 'आपकी आंखों में कुछ मेहके हुए से राज़ है' हे किशोरदा आणि दीदींचं 'घर' मधलं पंचमदांनी स्वरबध्द केलेलं 'गुलजार गीत' केदारातलचं आहे ना? (अवांतर - तात्या, दरबारी बद्दल येऊदेत ना असाच छानसा लेख!) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 09:09 नवीन

नाही,

तात्या, 'आपकी आंखों में कुछ मेहके हुए से राज़ है' हे किशोरदा आणि दीदींचं 'घर' मधलं पंचमदांनी स्वरबध्द केलेलं 'गुलजार गीत' केदारातलचं आहे ना? नाही, हे गाणं केदार रागातलं नाही. याचे सूर बरेच वेगळे आहेत, मिश्र आहेत. माझ्या मते तरी हे गाणं म्हणजे ठराविक असा एक राग म्हणता येणार नाही. (अवांतर - तात्या, दरबारी बद्दल येऊदेत ना असाच छानसा लेख!) हम्म! थोडा प्रश्नच पडला आहे! दरबारीचं शिवधनुष्य मला जमेल किंवा नाही याचा! :) अत्यंत बुजूर्ग व्यक्तिमत्व आहे या रागाचं! शब्दात मांडायला खूप कठीण राग आहे तो. हरकत नाही, कधितरी एकदा नक्की प्रयत्न करून पाहीन... आपला, (दरबारीने भारवलेला) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बेसनलाडू Tue, 04/08/2008 - 04:14 नवीन

वाचत आहे

लेखमाला उत्सुकतेने वाचत आहे. पुढचे भाग येऊ देत अविरत. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 04/08/2008 - 08:36 नवीन

असेच म्हणतो

"बसंताचे लग्न" हे तात्याचे सर्वात उठावदार [नंबर १] लेखन आहे असे [माझ्यासह अजुन] किती जणांना वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
क
केशवसुमार Tue, 04/08/2008 - 10:29 नवीन

हेच म्हणतो..

लेखमाला वाचत आहोत. पुढचे भाग येऊ देत .. (वाचक) केशवसुमार शास्त्रीय संगित ऐकायला आवडत पण त्या गाण्यातल ओ की ठो कळत नसल्या मुळे ह्या पेक्षा अधीक काय लिहीणार.. (कानसेन)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
स
स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 11:00 नवीन

अगदी हेच..

लेखमाला वाचत आहे. पुढचे भाग येऊ देत ..लवकर.... शास्त्रीय संगित ऐकायला आवडत पण त्या गाण्यातल ओ की ठो कळत नसल्या मुळे ह्या पेक्षा अधीक काय लिहीणार... स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
ऋ
ऋषिकेश Wed, 04/09/2008 - 20:57 नवीन

+१ +१

दोन्ही प्रतिक्रियाबद्द्ल अस्सेच म्हणतो :) -(कानसेन वाचक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
संजय अभ्यंकर Wed, 04/09/2008 - 21:37 नवीन

+१ +१ +१

शास्त्रीय संगीतातले मलाही काही कळत नाही. परंतु तात्यांची लेखन शैली उत्तम आहे. रागदारी संगीत आमच्या सारख्यांना कळावे हा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
श
शैलेश दामले Tue, 04/08/2008 - 08:16 नवीन

वसन्तराव

तात्या तुमच्या कडे वसन्तराव यान्चा केदार रागाचे रेकोर्डिन्ग आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/08/2008 - 08:49 नवीन

क्या बात है !!!

केदार म्हणजे आनंदाचं निधान! केदार म्हणजे रसिकता, केदार म्हणजे तारूण्य, केदार म्हणजे शृंगार! केदार म्हणजे हळवेपणा! अहो किती संपन्न व्यक्तिमत्व असलेला राग आहे हा! आणि मी जेव्हा एक व्यक्ति म्हणून केदारकडे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की मी मोठ्या उदार मनाच्या व्यक्तिकडे पहात आहे. छोटेपणाचा, अशुभतेचा कधी स्पर्शच झालेला नाही या व्यक्तिला! प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केदरासारखा एखादा तरी सखा असावा असं वाटतं! अगदी सखा नाही, तरी केदाराइतकी मोठ्या मनाची एखादी तरी वडीलधारी व्यक्ति अगदी प्रत्येकाला लाभावी, जिच्याकडे अगदी खुलेपणानं मनातलं बोलता यावं, आपले सगळे लाड पुरवून घेता यावेत, अणि प्रसंगी जिच्या मांडीवर डोकं ठेवून मनमोकळं रडताही यावं! वा तात्या, वा !!! केदार वर्णन सुंदर झालं आहे. ( गाण्यातले बारकावे कळत नाही, पण आपल्या केदार वर्णनाने गाण्याची गोडी लागेल असे वाटते. )
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/08/2008 - 10:33 नवीन

सुंदरच.....

सुधीर कांदळकरांशी अगदी सहमत..... (तात्यांचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्यास उत्सुक) मदनबाण
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 04/08/2008 - 12:35 नवीन

छान

लेख. गीतरामायणातलं उदाहरण आणि त्याचा केलेला विस्तार आवडला. केदार म्हणजे साक्षात स्वरोत्सव, केदार म्हणजे आनंदाचं निधान! केदार म्हणजे रसिकता, केदार म्हणजे तारूण्य, केदार म्हणजे शृंगार! केदार म्हणजे हळवेपणा! -- वा! अगदी सखा नाही, तरी केदाराइतकी मोठ्या मनाची एखादी तरी वडीलधारी व्यक्ति अगदी प्रत्येकाला लाभावी, जिच्याकडे अगदी खुलेपणानं मनातलं बोलता यावं, आपले सगळे लाड पुरवून घेता यावेत, अणि प्रसंगी जिच्या मांडीवर डोकं ठेवून मनमोकळं रडताही यावं! कारण एकदा मनमोकळं रडून घेतलं की मन अगदी स्वच्छ होतं, आकाश पुन्हा एकदा निळं, निरभ्रं होतं आणि माणूस पुन्हा एकदा केदारासोबत त्याच्या त्या उत्सवप्रिय, मंगलदायी वातावरणात केदारच्या सुरात न्हाऊन निघतो, केदारच्या रंगात गाऊ लागतो! -- सुरेख. रागदारीतलं काही कळत नसलं, तरी हे वर्णन अतिशय जिवंत आहे. गदिमांनी लिहिलेल्या आणि पुलंनी संगीत दिलेल्या 'ही कुणी छेडिली तार' ह्या गाण्यात केदाराला दिलेलं प्राजक्ताच्या मधुगंधाचं उदाहरण अप्रतिम आहे. त्याचं पहिलं कडवं आणि ध्रुवपद इथे लिहिण्याचा मोह आवरत नाही. ही कुणी छेडिली तार प्राजक्ताच्या मधुगंधासम, कुठुनि ये केदार? तूच छेड ती तूच ऐक ती, आर्त सुरावट तुझ्याच हाती स्पर्शावाचून तूच छेडिसी, माझी हृदयसतार

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 10:02 नवीन

आभार/उत्तरे..

संगीतावर प्रेम करणार्‍या आणि आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकवाचकवरांचे मनापासून आभार... आपल्यासारख्या वाचकांमुळेच आम्हाला लिहायचा उत्साह येतो. तसेच ज्यांना हा लेख, बरावाईट कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचा वाटला नाही, त्यांचेही औपचारिक आभार! तात्या.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 04/09/2008 - 21:48 नवीन

मस्त

आज वेळ मिळाल्यावर आरामात वाचला लेख.. नेहेमीसारखा सुरेख...
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Wed, 04/09/2008 - 22:32 नवीन

सर्व लेख

सर्व लेख छान आहेत. पण मला स्वतःला यमन आणि केदार याविषयीचे लेख जास्त भावले. सोनाली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा