✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(माझ्या कविता - असा पाऊस पडावा : एक विडंबसुनीत)

र — राजेश घासकडवी, Mon, 02/22/2010 - 02:40

प्रतिक्रिया द्या
9879 वाचन

💬 प्रतिसाद (29)

>>

पक्या
Mon, 02/22/2010 - 07:20 नवीन
>> टीव्हीवर्ची मॅच बघत् >> आपण कांदाभजी खावे हा हा ..मस्त जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

विडंबनसुनीत आवडले

अक्षय पुर्णपात्रे
Mon, 02/22/2010 - 07:47 नवीन
आमची पायाखालची कळकळ पुढे देत आहे. असा पाऊस पडावा खिडकीशी जीव लागावा पहावी सगळी फरपट कोरडा बनियन कुरवाळत
  • Log in or register to post comments

खि खि खि

मुक्तसुनीत
Mon, 02/22/2010 - 09:10 नवीन
असा पाऊस पडावा काव्य फुलीमध्ये जावे हे लय भारी.... xxxxxxx ;-)
  • Log in or register to post comments

गमतीदार पण अंशतः असहमत

धनंजय
Mon, 02/22/2010 - 21:16 नवीन
गमतीदार :-) घिशापिट्या कल्पनांबाबत सहमत. जुने कवितेतले उच्चार (निभृत 'अ' पूर्ण मात्रा देऊन उच्चारणे) आणि नवीन उच्चार (सामान्य भाषेत जिथे 'अ'चा लोप होतो, तसा लोप करूनच कवितेत उच्चार करावा) यांची सरमिसळ आणि कुतरओढ होऊ नये. सहमत. परंतु "गळ्क्या", "अव्तरावे" हे उच्चार मराठीत योग्य आहेत, आणि ठरवल्यास मात्रा अशा मोजण्यास काहीच हरकत नाही असे माझे मत आहे. ("यम्कांची" हा उच्चार माझ्या घरगुती बोलीत योग्य वाटत नाही. पण तसा उच्चार अन्य लोक करत असल्यास ठीकच.) मर्ढेकरांची ओळ आठवा: दण्.कट दंडस्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग याबाबत मागे चर्चा झालीली होती (येथे बघावी).
  • Log in or register to post comments

मात्रा

राजेश घासकडवी
Tue, 02/23/2010 - 01:01 नवीन
गळक्या व अवतरावे हे शब्द त्या छंदात बसतात, पण विडंबनासाठी ते बदलून आले आहेत. बळीराजा ही खेळेल हिरव्या रंगाची पंचमी ही ओळ हिर्व्या रंगाची पंचमी. अशीच उच्चारावी लागते. किंवा मेघ धरेस भेटता त्यात मीही विरघळावे त्यात मीही विर्घळावे अशी उच्चारावी लागते. त्या ओढाताणीची 'यम्का' मध्ये चेष्टा आहे. जर कवितेत शक्तिवान प्रतिमा निर्माण करण्याची कुवत नसेल, आणि छंदबद्धतेची मर्यादा झुगारून देण्याची हिंमत नसेल तर निदान गेयता, नादमाधुर्य तरी असावं. (सध्याचं मराठी लोकप्रिय काव्य बघितलं तर 'कुणी दिग्दर्शक आणि अचानक्...' येऊन मूळ गाण्याला चाल लावून तिच्या हजारो काप्या खपवेलही... तोंडघशी पडणं सोपं असतं. विडंबन करण्यापेक्षाही :) ) मर्ढेकरांनी केलेली दण् कट अशी फोड कवितेच्या तालाल वजन वाढवण्यासाठी केली होती. त्यात दण् ध्वनिने इतर घणावर घाव घालण्याची प्रतिमाही तयार होते. कोळशेवाळ्याच्या वर्णनासाठी ती पूरक आहे. मी मूळचा लेख एकदा चाळला होता -पुन्हा एकदा नीट वाचेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

जबरी.... लै

बिपिन कार्यकर्ते
Mon, 02/22/2010 - 21:21 नवीन
जबरी.... लै आवडलं हे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्त

विकास
Mon, 02/22/2010 - 22:08 नवीन
विडंबन आवडले! :-) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

+१

नितिन थत्ते
Mon, 02/22/2010 - 22:10 नवीन
आवडली कल्पना. 'असेल्का विचारुन्शहार्लो मनात्मी' ची आठवण झाली धनंजयनी हल्केच घेणे. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

हल्केच् :-)

धनंजय
Mon, 02/22/2010 - 22:24 नवीन
हल्केच् घेत्लेय् :-) त्या चर्चेचा दुवा माझ्या वरील प्रतिसादात दिलेलाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

इरेस पडलो

मुक्तसुनीत
Tue, 02/23/2010 - 03:18 नवीन
इरेस पडलो जर्बच्चम्जी कविता ऐशी लिहीन मीही उडेल तुम्ची दाणा"दण्" "पढो पार्वती शिरि भगवन !" ;-)
  • Log in or register to post comments

बा.सीं. ची जय हो...

राजेश घासकडवी
Tue, 02/23/2010 - 05:13 नवीन
वा: एकदम तरल वगैरे म्हणतात तसलं. ल्याहाच. बऱ्याच दिवसात तुमचं काही ललित वाचलेलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

"काय डेंजर कविता झालीय !"

मुक्तसुनीत
Tue, 02/23/2010 - 09:15 नवीन
अरे तुझी साईट तुझी साईट गेली खड्ड्यात काय डेंजर वारा सुटलाय स्क्रीनवर कचरा धूळ धूळ डोक्यात संपादकाची विंडो फुटली गादीवर काचा काचा आपोआप गुंडाळतोय तात्याचा गालिचा ****बाईंच्या स्मायली सैरावैरा उडताएत मुक्तस्त्रीच्या दांडीवरली म्हागडी नायलॉन साडी चालली वार्‍यावरती हवाई झाज नवव्या मजल्यावरच्या जिजुत्सुचा लेंगा लगेच लागला तिच्यापाठी खेचरांना फेफरं भरलं फडफड करताएत पाखरांसारखी कार्यकर्त्यांच्या भिंतीवरल्या ठिकर्‍या खोबर्‍या फरशीवरती घास्क्या घास्क्या तुझा चष्मा सटकला की फोटोमधनं मैदानावर जिकडेतिकडे (मी) मराठीचे पेपर हाटेलमधल्या माणसांवरती कडकडकडाट झाड पडलं रावसाहेब तुमची प्रतिभा गेली उडत पळ रे पर्‍या र्‍हाऊ दे नेट्कॅफेचं डबडं झ्यायरातपत्रा खडखड करतोय मालकानीच काढलेली पंचवीस फुटी अनुष्का तुमच्या बोकांडी बसणाराय ढेंगात मानगूट पकडणाराय मास्तर मास्तर बघा कसा हिसडे मारतोय भिंतीवरती खिंडीचा नकाशा गेला उडत खिडकीबाहेर पोरीसकट पालकांसकट परीक्षांसकट गेला सरळ आकाशात काय डेंजर कविता झालीय ! ;-)
  • Log in or register to post comments

लय डेंजर

चेतन
Tue, 02/23/2010 - 11:36 नवीन
अखेर बोळा निघाला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

लय

नितिन थत्ते
Tue, 02/23/2010 - 11:43 नवीन
लय भारी. घास्क्यानं चायलेंज केल्याकेल्या लगेच कविता? आन तीबी जोडेमारू? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

अखेर

चतुरंग
Tue, 02/23/2010 - 12:01 नवीन
'सुनीत' 'मुक्त' झाले! ;) (बद्ध)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

बाप रे!

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 02/23/2010 - 17:07 नवीन
=)) =)) =)) =)) =)) ऑबॉबॉबॉ ... अरे बाप रे, हे काय आणि कोणी लिहीलं आहे! "मर्ढेकर ते मढेपाडकर : एक तौलनिक अभ्यास" लिहा रे कोणी जाणकार (नंदन, श्रामो) लोकांनी! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आहे की नाही

चतुरंग
Tue, 02/23/2010 - 18:45 नवीन
शरदिनीतैंना कांपिटीशन? ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मिष्टर

बिपिन कार्यकर्ते
Tue, 02/23/2010 - 20:37 नवीन
मिष्टर मुक्तसुनीत, बघा.. आम्ही सांगत नाही नेहमी तुम्हाला? एक धागा टाकाल तर पन्नास प्रतिसाद असे यूं काढाल... अरे आहे काय अन् नाही काय... काय? तेव्हा आता लिहित जा बरं नेहमी... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सहमत आहे...! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/23/2010 - 17:43 नवीन
>>'सुनीत' 'मुक्त' झाले! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

खल्लास !!!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 02/23/2010 - 17:11 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) लेका, लेका... मर्ढेकरच झालास की रे... कं लिवलंय... कं लिवलंय... झ का स... ! ! ! (भिंतीवरचा) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

मित्रांनो

मुक्तसुनीत
Tue, 02/23/2010 - 17:36 नवीन
माझ्या वरच्या कवितेचे चिरगुट म्हणजे मुळातल्या अरुण कोलटकरांच्या एका भन्नाट कवितेचे विडंबन आहे. (और ये ना बताने मे जरूर हर्ज है ! :) )
  • Log in or register to post comments

कोलटकर : मूळ कविता

मुक्तसुनीत
Tue, 02/23/2010 - 18:04 नवीन
अरे तुझी टोपी तुझी टोपी गेली खड्ड्यात कपाळ पहिलं सांभाळ काय डेंजर वारा सुटलाय डोसक्यात कचरा धूळ धूळ डोक्यात साहेबाची खिडकी फुटली गादीवर काचा काचा आपोआप गुंडाळतोय पंजाब्याचा गालिचा पार्शिणीचा फ्लावरपाट गडाबडा लोळतोय सिंधीणीच्या दांडीवरली म्हागडी नायलॉन साडी चालली वार्‍यावर हवाई झाज नवव्या मजल्यावरल्या बंगाल्याचा लेंगा लगेच लागला तिच्या पाठी खापरांना फेफरं भरलं फडफड करतायत पाखरांसारखी कुलकर्ण्याच्या भिंतीवरल्या डिगर्‍या ठिकर्‍या फरशीवरती नार्‍या नार्‍या तुझा बाप सटकला की फोटोमधनं मैदानावर जिकडंतिकडं एसेस्सीचे पेपर धावत्या मर्जीडीझवर कडकडकडाट झाड पडलं प्रोफेसरसाहेब तुमची कविता गेली उडत पळा पेंटर र्‍हाऊदे रंगाचं डबडं झ्यायरातपत्रा खडखड करतोय तुम्हीच रंगविलेली पंचवीस फुटी हेलन तुमच्या बोकांडी बसणाराय ढेंगात मानगूट पकडणाराय मास्तर मास्तर बघा कसा हिसडे मारतोय भिंतीवरती भारताचा नकाशा गेला उडत खिडकीबाहेर डोंगरांसकट नद्यांसकट खुंटीसकट गेला सरळ आकाशात
  • Log in or register to post comments

नतमस्तक,

II विकास II
Tue, 02/23/2010 - 18:06 नवीन
नतमस्तक, सुनितराव तुमच्यापुढे. -- २०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

मूळ कविता

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 02/23/2010 - 18:13 नवीन
मूळ कविता काहीही कळ्ळी नाही, पण विडंबन बहुदा समजलं! असो. चालायचंच ... आमचीच जाण, समज अंमळ कमी, नाही का? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

क्लास

धनंजय
Tue, 02/23/2010 - 20:11 नवीन
क्लास कविता. एकाच वेळी पाचोळ्यासारखी हलकीफुलकी आणि वादळासारखी घनघोर... नैमित्तिक-प्रसंगिक विडंबनही मस्त! (वेगळा धागा काढायला हवा होता - अजूनही धागा वेगळा करता येईल का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

वेगळा धागा-सहमत आहे.

Nile
Tue, 02/23/2010 - 23:37 नवीन
प्रथम विडंबन वाचले, समजले पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. आता मर्ढेकरांची कविता वाचल्यावर डोक्यात प्रकाश पडला. लै भारी! वेगळा धागा काढला नाही तरी याप्रमाणेच यापुढेही तुम्ही, राजेश आणि अक्षय यांच्या विडंबन-जुगलबंदीची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

कविता

सन्जोप राव
Tue, 02/23/2010 - 19:15 नवीन
मूळ कविता भारी, विडंबन दीड भारी! तसे बघायला गेले तर मूळ कविता हे एक विडंबनच आहे, आणि विडंबन हीसुद्धा एक मूळ कविताच आहे.... सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments

कविता आवडली

चित्रा
Tue, 02/23/2010 - 19:16 नवीन
यमके वगैरे कळत नाही, पण अनुभव एकदम परिचयाचा!
  • Log in or register to post comments

वा वा

अक्षय पुर्णपात्रे
Tue, 02/23/2010 - 20:51 नवीन
राजेशने विडंबन केले. श्री सुनीत यांनी त्यात चांगलीच भर घातली. मूळ कवितेचे विडंबन असले तरी राजेशनी मूळ कवितेचा सांगितलेला अर्थ मराठी जालविश्वाबाबत विडंबनात सटकत नाही. सगळे चांगलेच जमलेले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा