Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विडंबनासंबंधी निवेदन

च
चतुरंग यांनी
Fri, 03/28/2008 - 01:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25191 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

स
सन्जोप राव Fri, 03/28/2008 - 11:28 नवीन

मग हे कसे?

मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे. मिसळपावाच्या मालकांविषयी वैयक्तिक टिप्प्णी करणारा एक तुकडा इथे वाचला होता. तो आता दिसत नाही, हे कसे काय ,प्राध्यापक डॉक्टरसाहेब? सन्जोप राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विजुभाऊ Fri, 03/28/2008 - 12:35 नवीन

.

.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 03/28/2008 - 10:58 नवीन

दुटप्पीपणा आणी अनुल्लेख

खरे तर अजिबात तोंड घालायची इच्छा नव्हती; कारण आम्ही विडंबने वाचायची तर सोडलीच आहेत इव्हन त्यावर गप्पा मारण्याचे पण सोडले आहे. या अशा कविता पडल्या पडल्या दुसर्‍या मिनिटाला होणार्‍या विडंबनांची तुलना मी रेल्वे स्टेशन वर मिळनार्‍या पिवळ्या पुस्तंकाशी मी करतो; रद्दी; दुर्लक्ष करण्याजोगी. चला पण वरिल चर्चेत अनेकांचा दुटप्पीपणा दिसुन आला, एरवी विडंबन पडल्या पडल्या त्यावर लगेच "वा वा","शवटुकार तुमच्या प्रतिभेला सलाम" वैगेरे वैगेरे प्रतिसाद देणारे लोक आता वेगळी वेगळी मते मांडतांना दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 11:22 नवीन

यात्रीसाहेब,

एकिकडे आपण, कारण आम्ही विडंबने वाचायची तर सोडलीच आहेत इव्हन त्यावर गप्पा मारण्याचे पण सोडले आहे. असं म्हणता, व लगेच एरवी विडंबन पडल्या पडल्या त्यावर लगेच "वा वा","शवटुकार तुमच्या प्रतिभेला सलाम" विडंबनांना कुणाचे काय प्रतिसाद येतात हेही आपल्याला ठाऊक आहे याचे राहून राहून नवल वाटले! गंमतच आहे बॉ!:) यावरून विडंबनांचे आपले वाचन कुठपर्यंत सुरू होते आणि नेमकी कुठून आपण विडंबने वाचायची सोडून दिलीत हा एक अवांतर प्रश्न आम्हाला पडला आहे! :) असो, आपलाच, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Fri, 03/28/2008 - 11:45 नवीन

पडो

बापडा तो प्रश्न की काय तुम्हाला !! :)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
श
शेखर Fri, 03/28/2008 - 12:57 नवीन

वाद

आपपसातील वादानेच किंवा हेव्यादाव्याने मराठेशाही बुडाली ...... याचे स्मरण असुद्या. - शेखर
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 03/28/2008 - 13:27 नवीन

शेखरशेठ, आप

शेखरशेठ, आपपसातील वादानेच किंवा हेव्यादाव्याने मराठेशाही बुडाली ...... याचे स्मरण असुद्या. अगदी लाख बोललात ! हल्ली काय चालल॑य काही कळत नाही. लवकर ही परिस्थिती सुधारो हीच श्रीश॑भूचरणि प्रार्थना! -(व्यथित) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
ल
लिखाळ Fri, 03/28/2008 - 19:34 नवीन

ज्याचे त्याचे मत

विडंबने कशी असावित, असावित का? इत्यादी मते वैयक्तिक आहेत. वाचकांनी चांगले वाईट प्रतिसाद द्यावेत. त्यातून जे राहिल ते इथल्यांना आवडते असे समजले जाईल. बंदी वगैरे आणावी असे वाटत नाही. चतुरंग यांनी सुद्धा असे काही सुचवले नाही हे चांगलेच. --लिखाळ. सामर्थ्य आहे बडबडीचे जो जो करील तयाचे - पुल.
  • Log in or register to post comments
व
वरदा Sat, 03/29/2008 - 05:13 नवीन

अरे अरे

काय चाल्लंय्...चारोळ्याही आपण सगळ्यांनी एन्जॉय केल्या आणि बरीचशी विडंबनंही आपल्याला आवडली...थोडी अतिशयोक्ति झाली असेल तर होईल कमी आपोआप कुणी प्रतिसाद दिले नाहीत तर्..जी छान विडंबन असतील ती वाचूया बाकीची सोडून देऊ....सुशील तुम्हालाही आवडत होतं चारोळ्या लिहायला आणि तिथे लिहावसं वाटत नव्हतं तर वेगळा धागा उघडायचा माझ्या वेगळ्या चारोळ्या म्हणून....उगाच कशाला बोलता... आम्ही तर मस्त एन्जॉय केलं.... हल्ली काय चालल॑य काही कळत नाही. लवकर ही परिस्थिती सुधारो हीच श्रीश॑भूचरणि प्रार्थना! धमु १००% सहमत.... अरे तुम्ही सगळे एप्रिल फुल नाही ना करत? कालपर्यंत तर आपण सगळे धमाल करायचो मधेच काय झालं काय? सारखी ऑफिस आणि घरची टेन्शन्स असह्य झाली की आपण इथे येतॉ जरावेळ मजा करतो कीती बरं वाट्टं..इथेही तसच असेल तर कसं वाटेल यावसं?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 07:52 नवीन

:)

वरदा, तुझे प्रतिसाद वाचताना कॉलेजातली तेरावी, चौदावीतली एखादी मुलगी माझ्याशी बोलते आहे की काय असं वाटतं! :) स्वभावातला अवखळपणा, निरागसपणा असाच राहू दे! जप त्याला नेहमी... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 03/29/2008 - 08:05 नवीन

आणि सांभाळून राहा

वरदा, तुझे प्रतिसाद वाचताना कॉलेजातली तेरावी, चौदावीतली एखादी मुलगी माझ्याशी बोलते आहे की काय असं वाटतं! :) सांभाळून राहा हो ! अशा प्रतिसादांमुळे "तेराव्या चौदावीतल्या" मुलींना किती धोका आहे, हे सहज लक्षात येते ! - (खट्याळ) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रा सुरेश खेडकर Sat, 03/29/2008 - 09:46 नवीन

साधक-बाधक चर्चा.

विडंबन काव्यावरील ही साधक-बाधक चर्चा अतिशय मोलाची असून ती एखाद्या पुस्तकात जतन करून ठेवली पाहिजे. ऑरकुट व इतर संकेत स्थळावरील जाणकार रसिकांसाठी सुध्दा ती उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न. पहा. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2591450425237531522&... »
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 03/29/2008 - 15:08 नवीन

वाचनाधिकार....

प्रत्येक वाचकाचा वाचनाधिकार अबाधित आहे. विडंबनकारांवर बंदी आणू नये. वाचकांनी आपापला वाचनाधिकार वापरावा. 'मला आवडत नाही ते साहित्य वाईट' असा संकुचित एप्रोच नसावा. (हा कुणावरही वैयक्तिक शेरा नाही.)
  • Log in or register to post comments
प
प्रा सुरेश खेडकर Sun, 03/30/2008 - 12:45 नवीन

सहमत

प्रत्येक वाचकाचा वाचनाधिकार अबाधित आहे. विडंबनकारांवर बंदी आणू नये. वाचकांनी आपापला वाचनाधिकार वापरावा. 'मला आवडत नाही ते साहित्य वाईट' असा संकुचित एप्रोच नसावा. (हा कुणावरही वैयक्तिक शेरा नाही.) » श्री. प्रभाकर पेठकर(खरं खुरं नांव वाचून आनंद झाला) यांच्या मताशी सहमत. चांगले/वाईट साहित्य असा भेद असूनही "माझ्या आवडीचे/नावडीचे" असाहि भेद नक्कीच असू शकतो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/30/2008 - 12:51 नवीन

अवांतर-

श्री. प्रभाकर पेठकर(खरं खुरं नांव वाचून आनंद झाला) अहो पण 'प्रभाकर पेठकर' हे नांव तरी खरंखुरं कशावरून? त्यांचं खरं नांव 'धुरंधर भाटवडेकर' असंही एखादं असू शकतं! :)) आपला, तात्याभैय्या देवासकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा सुरेश खेडकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा