✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अथांग सागर

स — सुवर्णमयी, गुरुवार, 03/20/2008 - 17:40

प्रतिक्रिया द्या
10779 वाचन

💬 प्रतिसाद (18)
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/20/2008 - 18:01 नवीन

सुरेख..!

वा! सुरेख कविता...! नभातल्या चंद्रामुळे खुळी चांदणी जाहली मिठीमध्ये किनाऱ्याच्या फेनफुले विसावली फेनफुले हा शब्द सुंदर आहे..! थांग लागेना अजुनी माणसाला मानसाचा मन अथांग सागर खळाळणाऱ्या लाटांचा! क्या बात है, मन अथांग सागर खळाळणाऱ्या लाटांचा! या ओळी बाकी क्लासच! आपला, (मनाच्या दर्याचा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 03/20/2008 - 18:51 नवीन

छान कविता

सुंदर कविता लिहिली आहे. सागराच्या स्पंदनाची आगळीशी देहबोली फेनफुले खळाळत नभाकडे झेपावली या ओळी आवडल्या. फेनफुले हा शब्द सुंदर आहे..! तात्यांशी सहमत.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 03/20/2008 - 19:09 नवीन

सागराच्या

सागराच्या स्पंदनाची आगळीशी देहबोली फेनफुले खळाळत नभाकडे झेपावली अप्रतिम... अतिशय सुंदर आहेत याओळी.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
स
सचिन गुरुवार, 03/20/2008 - 20:58 नवीन

खरंय....!

थांग लागेना अजुनी माणसाला मानसाचा मन अथांग सागर खळाळणाऱ्या लाटांचा! हे बाकी खरंय....! कविता सुरेख्....आवडली. फेनफुले शब्द छानच ! तात्यांशी सहमत !!
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 03/20/2008 - 23:38 नवीन

जियो !!!!

चित्रदर्शी कविता ! लगागागा लगागागा ही सुंदर लय.. (फक्त शेवटच्या ओळीतले "खळाळणार्‍या" बदलता येईल का ?) - सर्किट
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 03/20/2008 - 23:43 नवीन

हेच म्हणतो.

"खळाळत्या ह्या लाटांचा!" चालू शकेल? चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 03/20/2008 - 23:44 नवीन

परफेक्ट

छान रंगोबा !! - सर्किट (आता ही कविता "कशासाठी पोटासाठी.." ह्या चालीत छान बसते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
धनंजय Fri, 03/21/2008 - 00:24 नवीन

असेच

छान कविता. "खळाळणार्‍या" बदलावे, (अष्टाक्षरीत शक्यतो ५/३ अशी यती देऊ नये असा नियम लक्षात येत आहे...) पण "खळाळत्या ह्या" नाही पटले - उगीच आठ-अक्षर पूर्ती वाटते. "ह्या" म्हणजे कुठल्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सुवर्णमयी Fri, 03/21/2008 - 00:27 नवीन

५/३

५/३ यतीचा नियम मला माहिती नव्हता. आता लिहितांना आणखी एक बंधनः) ह्या - मनातल्या लाटांचा म्हणून घेता येईल असे मला वाटले. अधिक विचार करून यमक साधणारी व अर्थपूर्ण दुसरी ओळही लिहून बघेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
च
चतुरंग Fri, 03/21/2008 - 00:31 नवीन

'ह्या' म्हणजे कुठल्या?

'ह्या' म्हणजे सततच्या - कुठल्या एका ठिकाणच्या/क्षणातल्या असे काही नाही, त्या असतातच, तुम्ही पहाल तेव्हा आणि तुम्ही पहाल तिथे! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सुवर्णमयी Fri, 03/21/2008 - 00:01 नवीन

धन्यवाद

सर्वांचे प्रतिसाद आणि सूचनेकरता आभार. कवितेत केलेला बदल आवडला. आता कशासाठी पोटासाठीच्या चालीत म्हणून बघायला हरकत नाही:) फेनफुले हा शब्द माझा नाही. त्यामुळे त्याचे श्रेयही माझे नाही. हा शब्द खूप वर्षापूर्वी वाचनात आला होता, तेव्हापासून लक्षात होता.. पण कोणाच्या लेखनात वाचला ते आता नेमके आठवत नाही. सोनाली
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 03/21/2008 - 00:13 नवीन

वाव्वा!

मस्त कविता. फार आवडली. गतीमान जसा जसा सागराचा श्वास होई ऊर त्याचा फेसाळत खाली वर झेप घेई एकामागे एक येते खळाळत लाट लाट लपाछपीमध्ये होते दिनरात नि पहाट 'फेनफुले', 'माणसाला मानसाचा' हे फार आवडले. 'मराठी माणसं मराठी मानसं' हे कुठेशी वाचलेले आठवले :) ;) (मराठी माणूस)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 03/21/2008 - 02:00 नवीन

उत्तम

कविता, शेवटचे कडवे विशेष आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ठ
ठणठणपाळ Fri, 03/21/2008 - 10:07 नवीन

सुरेख!

अभिनंदन >>ऊर त्याचा फेसाळत खाली वर झेप घेई ही कल्पना अगदी नवीन आणि मनोरम आहे. काही शब्दांची द्विरुक्ती खूप परिणामकारक वाटते. उदा., क्षणक्षण, कणकण, जसाजसा, लाटलाट. खळाळणार्‍या च्याऐवजी खळखळत्या चालेल का? ठणठणपाळ
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 03/21/2008 - 12:01 नवीन

सुंदर

वरील प्रतिक्रियांशी सहमत आहे. सुंदर कविता. अत्यंत आवडली. (सहमत) आजानुकर्णही कल्पना अगदी नवीन आणि मनोरम आहे.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 03/21/2008 - 19:33 नवीन

सागराची देहबोली ,......

खूळी चांदणी, फेनफुले तसेच माणसाला मानसाचा शब्दयोजना सुंदरच. शुभेच्छा अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
स
सागर Sun, 03/23/2008 - 15:50 नवीन

सुवर्णमयी,

सुवर्णमयी, अतिशय सुंदर कविता आहे. खूपच छान.... अजून येऊ देत... माझे नाव त्यात आहे त्यामुळे तर अगदीच स्पर्शून गेली ही कविता :) शेवट खूपच सुंदर केलात. -------------------- थांग लागेना अजुनी माणसाला मानसाचा मन अथांग सागर खळाळणाऱ्या लाटांचा! -------------------- माझीही थोडी भर... सरिता येथे सागरमय होते सर्वस्व अर्पून प्रेमा करता... अथांग सागरात काहूर माजते एकेक दिशा सावरता सावरता.... (अथांग) सागर
  • Log in or register to post comments
उ
उत्खनक Tue, 12/13/2022 - 15:14 नवीन

अप्रतीम!

नभातल्या चंद्रामुळे खुळी चांदणी जाहली मिठीमध्ये किनाऱ्याच्या फेनफुले विसावली फार सुंदर काव्य!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा