विकास, चर्चा प्रवर्तक ह्या नात्याने आधी तुला कुणाबरोबर जेवायला आवडेल ते सांग की. ;)
नुसतेच ४ ओळींचे चर्चा प्रस्ताव देण्यापूर्वी, प्रस्तावकाने त्यात आपले मतही द्यावे असे मिपाकरांचे मत असते :)
अरेरे वाईट वाटले वाचुन...
कारण विकास ने म्हटले आहे... जर आपल्याला कुणाएका ऐतिहासिक (हयात नसलेली) व्यक्तीबरोबर गप्पा मारायला मिळाल्या तर त्या कुणा बरोबर असतील?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
(एकंदर चर्चा ही सिरीयस (पक्षी : राजकारण, साहीत्य, शास्त्र, कला, समाजकारण. इत्यादी इत्यादी ) न होता विरंगुळा मार्गावे जात असल्याचे पाहुन ...)
काय हो विकासराव, इथे "आंतरजालीय मॄत आयडी" चालतील काय ?
त्यांचा जन्म ५०० % १८५७ नंतरचा आहे व काही कलनीय / अनाकलनीय कारणाने त्यातले बरेच आयडी आज हयात नाहीत त्यामुळे हे नियमात बसते आहे ...
आमचा फर्स्ट चॉईस "मॄत आंतरजालीय आयडी " ....
मनोरजंन आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी ह्याहुन दुसरे उत्तम साधन नाही ...!!!
------
(कल्पनेतला)छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
>>अहो पण कोणते तेही लिहाना..नुसतेच काय मृत आयडी?
हा हा हा, लै भारी शेठ, चांगली आयडिया आहे आम्हाला गोत्यात आणण्याची.
अहो ती नाव इथे आम्ही "जाहिरपणे" लिहली तर आमचाच आयडी "मॄत" होणार नाही का ;)
असो, जोक्स अपार्ट, धाग्याला चांगले वळण लागल्याने काही सिरीयस मत सांगतो ...
* माझ्या पसंतीतल्या व्यक्ती :
राजकारण / समाजकारण : अॅडोल्फ हिटलर , बॅरिस्टर जीना , नथुराम गोडसे , सद्दाम हुसैन, आचार्य अत्रे ,
साहीत्य : भाईकाका , गोनिदा ,
शास्त्र : लै मोठ्ठी लिस्ट आहे. तुर्तास आईस्टाईन , न्युटन ही २ नावे देतो, ह्यातला कोणी १ ठरवणे शक्य नाही ...
( १८५७ च्या आधीचे नको असल्यामुळे कोपर्निकस नाव कटाप )
कला : गोची केलीत राव, १८५७ नंतरचे म्हणजे अवघड आहे कारण त्याआधीच्या कलाकारांनी त्यांच्या कलांमधुन समाजकारण केले असे आम्हाला वाटते च म्हणुन ते आम्हाला आवडतात.
असो, तुर्तास आम्ही "राज कपुर" चे नाव देऊ इच्छितो ...!!!
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
उत्तर देणे फारच अवघड बॉ!
राजकारण - महंमद अली जीना
साहित्य - पु ल देशपांडे
शास्त्र - सी व्ही रामन
कला - राजा रविवर्मा
समाजकारण - महात्मा फुले
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
फारच अवघड काम. माझे काही पर्याय
१. वसंतराव देशपांडे २. नथुराम गोडसे ३. रॉकी मार्शियानो (rocky marciano ) 4.हिटलर ५.चर्चिल
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
हरितात्यांसारखंच आम्ही पण सनावळी,क्रमवारीच्या पलिकडे आहोत, त्यामुळे खालील पर्याय.
(बर्याच पर्यायात आम्ही श्रोतेच आहोत असे समजा)
१. सॉक्रेटीस.
२. पीजीडब्ल्यु.
३. पु.ल.
४. भगतसिंग
५. किशोर
६. ज्ञानेश्वर
७. गालिब
८. विवेकानंद
९. लोकमान्य
.
.
.
.
क्ष. जमलंच तर पुराणं लिहणारे लेखक! ;)
१८५७ च्या नंतरच्या ऐतिहासीक व्यक्तींपैकी निवडायचे आहेत हो. नाहीतर आम्हीही क्लिओपात्राला निवडले असते की! ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
१. थोरले आबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज
२. नेताजी पालकर
३. प्रतापराव गुजर
४. संभाजी राजे
५. थोरले माधवराव
६. पु.ल.
७. भगतसिंग
आणी अशी बरिच नावे आहेत राव
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
माझी काही आदराची स्थाने आहेत
खरेतर ह्या विभूतींशी 'गप्पागोष्टी' करण्याची माझी पात्रता नाही.. पण तशी एक सुप्त कामना आहेच!!
राजकारण : स्वातंत्र्यवीर सावरकर
साहीत्य : रवींद्रनाथ टागोर
शास्त्र : अल्बर्ट आईनस्टाईन
कला : चार्लस चॅप्लिन
समाजकारण : गाडगेबाबा
-
कोकणी फणस
राजकारण - लोकमान्य टिळक / महात्मा गांधी
साहित्य - संत ज्ञानेश्वर / पु. ल. देशपांडे
शास्त्र - होमी भाभा / विक्रम साराभाई
कला - पं. विनायकराव पटवर्धन / पं. रामकृष्णबुवा वझे
समाजकारण - बाबा आमटे / महात्मा फुले
चांगला विषय. हयात नसलेल्या / १८५७ नंतच्याच या अटी असल्याने
थोरल्या आबासाहेबांच नी शंभुराजांच नाव टाकता आल नाही.
राजकारण - बाळ गंगाधर टिळक
साहित्य - भाई काका
शास्त्र - होमी भाभा
कला - चार्ली चॅप्लिन
समाजकारण - साईबाबा / मदर तेरेसा
ह्म्म्म्म !
मला....
मिस्टर ओक.
सर्किटराव आपलेच.. ते ते.. वाले सर्कीट ;)
देव साहेब... चाल अस्त्र वाले !
काळे साहेब.... तेच लोखंड वाले !
एन्ड वन एन्ड ओन्ली.... विकास सेठ .. तेच ते लै मोठे प्रतिसाद वाले =))
तात्याराव सावरकर....उपरोल्लेखीत सगळ्याच गटांसाठी हे एकमेव नाव पुरेसे नाही काय? :)
त्याशिवाय :
श्री.नथुराम गोडसे, डॉ.हेडगेवार, गोळवलकर गुरुजी हे देखील.
सु.शि.ना भेटायची इच्छा अपुरीच राहिली :(
आणि सगळ्या महाराष्ट्राचे लाडके पु.ल.देशपांडे कसे विसरणार :)
शास्त्रज्ञांमध्ये डॉ. होमी भाभा.
राजकारण - इंदिरा गांधी
साहित्य - होर्हे लुईस बोर्हेस
शास्त्र - बर्ट्रांड रसल
कला - पु ल देशपांडे (नाटककार म्हणून)
समाजकारण - भीमराव आंबेडकर
(चर्चाप्रस्तावकानेही स्वतःची यादी द्यायला पाहिजे :-) )
वर उल्लेखलेल्या सर्वच व्यक्तींना भेटता आले तर आवडेल. सावरकर आणि टिळक ह्यांना भेटलो नसलो तरी कायमच भेटत असतो की काय असे वाटते... वर जशी डॉ. हेडगेवार आणि गोळवळकर गुरूजींची नावे आहेत तशीच त्यांच्याच पंथातील अजून एक व्यक्तीमत्व हे दत्तोपंत ठेंगडी होते. सुरवातीच्या काळातील काही कम्युनिस्ट नावे पण चांगली होती राजकारणात (अहील्या रांगणेकर) आणि समाजकारणात (अनुताई वाघ). तसेच समाजवाद्यांमधील एस एम जोशी हे नाव विशेष, जयप्रकाश आहेतच आणि भूदान चळवळीमुळे समाजकारणातील म्हणता येतील असे वास्तविक गांधीजींचे तत्वज्ञानाने वारस समजले जाणारे विनोबा.
(६+५ ओळींची) चर्चा टाकताना मुद्दामूनच कालाचे निर्बंध घातले होते (१८५७ नंतर आणि हयात नसलेली व्यक्ती).
आता भारतातील उल्लेखलेल्या व्यक्तींसंदर्भात - एकच एक व्यक्ती सांगता येऊ नये हे आपले परमभाग्य आहे. याचा अर्थ खूप चांगली व्यक्तीमत्वे भारतात जन्माला आली - एकाच नाही तर विविध क्षेत्रात...
बाकी वर तुम्ही सर्वांनी उल्लेखलेल्या (भारतीय) व्यक्तींशिवाय अजून काही मला भेटायला आवडतील अशा व्यक्ती: (माझ्याच नियमाप्रमाणे एकच नाव देतो, पण मनात अनेक आहेत):
राजकारणः सरदार पटेल
समाजकारण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
साहीत्यः दुर्गा भागवत (तसेच तितक्याच शांताबाई शेळके)
शास्त्रः श्रीनिवास रामानुजन
कला: बाल गंधर्व (आणि तसेच व्हि. शांताराम)
एकेक नाव देणार नाही. तीन देतो. त्यापैकी कुणाशीही बोलायचे आहे, प्रत्येकाला एकच प्रश्न -
राजकारण
१. हिटलर - मागं वळून पाहताना काय वाटतं? खेद, स्वतःची घृणा की जे केलं ते बरोबरच होतं?
२. स्टालीन - एक माणूस-नेता म्हणून, कम्युनिझ्म तुमच्यामुळं अपयशी ठरला की, तुम्ही कम्युनिझ्ममुळं?
३. लादेन - का, का हे सारं?
साहीत्य
१. शिवराम कारंथ - आजच्या आजीची स्वप्नं लिहाल?
२. गदिमा - सर्वच रसातील लीलया संचाराचं रहस्य काय?
३. टागोर - आत्ताचे राष्ट्रगीत, खरंच, का लिहिले होते?
शास्त्र
१. आईनस्टाईन - जे झालं आहे ते पाहता आजच्या या काळात पुन्हा संधी मिळाली तर तसंच संशोधन कराल की वेगळा मार्ग पत्कराल?
२. न्यूटन - "सफरचंद पडलं नसतं तर?"
३. मर्फी - तसा लॉ परत गवसेल असं वाटतं?
कला
१. कुमार - एक इच्छा आहे - सुनता है गुरू ग्यानी, उड जायेगा आणि अवधूता ऐकण्याची. पुरवाल? (त्यांनी फक्त होकार भरला तरी बास्स).
२. गुलाम अली - परफॉर्मन्स थोडा बाहेर ठेवून केवळ शास्त्रीय आधाराच्या गझलांचा (हुई है शाम, ले चला जान मेरी यासारख्या) कार्यक्रम का करत नाही?
३. जी. कांबळे - 'त्या' छत्रपती शिवरायांची प्रेरणा आज दिसतीये कुठं?
समाजकारण
(ही मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत, पण त्यांचा दृष्टिकोन महत्त्वाचा म्हणून समाजकारणात त्यांना घेतलं आहे).
१. कार्वर - आजच्या जगाकडं कसं पाहू?
२. लिओपोल्ड - आजच्या जगाकडं कसं पाहू?
३. आंबेडकर - आजच्या जगाकडं कसं पाहू?
राजकारणः महात्मा गांधी
समाजकारण: महात्मा फुले
साहीत्यः पु.ल., शांताबाई शेळके, गालिब
शास्त्रः लोकमान्य टिळक
कला: पिकासो
ऋषिकेश
------------------
रात्रीचे ८ वाजून ३९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काहि...."
प्रतिक्रिया
विकास,
अनुष्काशी
अहो तात्या
१८५७ नंतरचाच
बरोबर आहे
वा !
अरेरे
अरेच्च्या!
आमचे मत ...
"मॄत
हा हा हा ...
डान्या!
अवघड काम
ग दि
वरील यादी
फारच अवघड
हरितात्या
सॉक्रेटीस?
:)
१. थोरले
माझी आदराची स्थाने
>>पण तशी एक
रिचर्ड
+१
अल्बर्ट
माझे पण काही पर्याय
प्रकाटाआ
राजकारण -
राजकारण -
राजकारण-
माझे पर्याय. .
चांगला
राजकारण -
गप्पा
आबा
मला प्रथम ह्या जिवंत माण्सांशी गप्पा हाणायाच्या आहेत.
तुमचा फोन नं द्या. दहा मिनिटात फोन करतो.
ह्म्म्म्म
भेटायला
तुमचा फोन नं. द्या. दहा मिनिटात फोन करतो.
माझा जन्म
एकच नाव....
छान चर्चाविषय
मस्तं धागा सुरू केलात. माझाही पर्याय . .
मस्त धागा
बरेच
सावरकर,
एकेक नाव
देर आये...
माझा चॉईस...