Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्वगत

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Tue, 09/25/2007 - 08:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51604 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Tue, 09/25/2007 - 08:45 नवीन

अतिशय प्रांजळ स्वगत!

>>माणसातला पुरुष झोपवून टाकायचा आणि पुरुषातलं माणूस पण जागं करायचं काम फारच थोडया स्त्रियांना जमतं. पण ज्यांना हे जमतं त्यांच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे माणसं ही पुरुषचं. बाईचं बाईपण चघळणारी माणसं ही बाईच्या माणूसपणात कधी कधी विरघळून जाणारी देखील असतात. >>बोंबलाच्या वासाने शाकाहारी माणसाची असलेली भूक नाहीशी होणं, मळमळ वाटणे ही देखील प्रकृती आणि त्याच वासाने बोंबील आवडणाऱ्या मांसाहारी व्यक्तीत लाळ गळे पर्यंत भूक निर्माण होणे ही देखील प्रकृतीच. वासं एकचं आहे पण प्रतिसाद भिन्न आहेत. एकासाठी आनंद तर दुसऱ्यासाठी दु:ख. एकाचं अन्न हे दुसऱ्याचं विष असेल तर सहजीवन अशक्य. >>काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही. मग कुणी भूतकाळात रममाण होतं तर कुणी भविष्यकाळातल्या स्वप्नरंजनात. येणारा प्रत्येक क्षण वर्तमान म्हणता म्हणता भूतकाळात जमा होत असतो. घाटपांडेसाहेब, अतिशय प्रांजळ स्वगत! मनापासून आवडले. काही संकेतस्थळं वयात यायला फार वेळ लावतात बुवा! पण मिसळपावने वयात आल्यावरच जन्म घेतला याची साक्ष देणारा लेख! :) घाटपांडे साहेब, आपल्याकडून अश्याच उत्तमोत्तम लेखांची अपेक्षा आहे.. आपला, (स्खलनशील प्राणिमात्र!) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 09/25/2007 - 09:07 नवीन

छान

चांगला लिहलाय किंचीत जरा पसरल्या सारखा वाटतो पण ओव्हरऑल नक्कीच चांगला (फक्कड) आहे. दोन शब्द लैंगिकता :- स्त्री-पुरुष समानतेच्या वार्‍यात, ही लैंगिकता पण समाजमान्यतेत लवकरच समान विभागली जाईल. आजवर "लैंगिकता व त्यावर मोकळे भाष्य" (व त्या द्वारे इतर लोकांवर वर्चस्व / वरचढ) ही "पुरूषी मक्तेदारी" एकदा ढासळली की बघा "लज्जा पांघरूण" कसे सगळेजण पांघरू लागतील. काय जाणो भविष्यात बराच कालपर्यंत अगदी ओपनली "स्त्री मक्तेदारी" होइल. पुरुष्यस्य अष्टगुणे स्त्रियांसी इश्वरी देणे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/25/2007 - 09:26 नवीन

सामाजिक भाकित

<<काय जाणो भविष्यात बराच कालपर्यंत अगदी ओपनली "स्त्री मक्तेदारी" होइल. पुरुष्यस्य अष्टगुणे स्त्रियांसी इश्वरी देणे.>> म्हणुनच आपली सामाजिक भाकिते आम्हाला आवडतात. <<चांगला लिहलाय किंचीत जरा पसरल्या सारखा वाटतो पण ओव्हरऑल नक्कीच चांगला (फक्कड) आहे.>> मंग आयडिया करायची घाईमंदी आवरुन घ्यायचा आन जरा निवांत झालं कि पसरुन वाचायचा. म्हंजे सर्कीट इष्टाईल. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Tue, 09/25/2007 - 10:17 नवीन

सदर करा

घाटपांडे साहेब तुम्ही खरे तर "स्वगत" असे सदर करा बघा. दर आठवड्याला / महीन्याला तुम्हाला जे वाटते असे एक सदर. तुमचे विचार , लेखन आम्हाला आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/25/2007 - 11:34 नवीन

+१

म्हणजेच, अत्यंत सहमत आहे. आम्हा ओपन सोर्स वाल्या लोकांना एखादी सूचना आवडली, एखादा पॅच आवडला, की तिला आपले पॉझिटिव्ह मत देताना आम्ही +१ लिहीत असतो. प्रकाशकाकांनी आपले स्वगत असेच लिहित रहावे, ह्यासाठी हे +१. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
आ
आजानुकर्ण Tue, 09/25/2007 - 21:12 नवीन

++

++ ही आवडेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
व
विसोबा खेचर Tue, 09/25/2007 - 11:48 नवीन

+ १

+ १ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
क
कोलबेर Wed, 09/26/2007 - 05:49 नवीन

+१

सह्जराव मस्त कल्पना :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/25/2007 - 08:59 नवीन

स्वगत आवडले !

सुक्ष्म निरिक्षणामुळे स्वगत झक्कास झालंय ! खूला मंच तर खासच ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/25/2007 - 09:00 नवीन

उत्कृष्ट !!!!!

प्रकाशकाका.. अद्याप पूर्ण लेख वाचायचा आहे. पण माणसातला पुरुष झोपवून टाकायचा आणि पुरुषातलं माणूस पण जागं करायचं काम फारच थोडया स्त्रियांना जमतं. पण ज्यांना हे जमतं त्यांच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे माणसं ही पुरुषचं. बाईचं बाईपण चघळणारी माणसं ही बाईच्या माणूसपणात कधी कधी विरघळून जाणारी देखील असतात. हे वाक्य वाचून मी हरखलो. पूर्ण वाचून सविस्तर प्रतिसाद लिहीनच. पण, आपण आमच्या ओळखीचे आहात, ह्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, हे सांगण्यासाठी हा प्रिमॅच्युअर प्रतिसाद. - (प्रकाश घाटपांडेंचा मानलेला पुतण्या) सर्किट
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/25/2007 - 11:16 नवीन

लेख पूर्ण वाचल्यावर

प्रकाशकाका, आता कुटुंबाची झोप सुरू झाल्यावर निश्चिंतपणे आपला पूर्ण लेख वाचला (नव्हे दोन-तीनदा वाचला.) आपली किती तारीफ करावी तितकी कमीच आहे. वैचारिक लेखन कशाला म्हणावे, हे ह्या लेखावरून जोखावे. अर्थात हे लेखन आम्हाला वैचारिक वाटते, काहींनी अश्लील अश्लील म्हणून आपल्या संकेतस्थळाच्या तथाकथीत स्त्री सदस्यांपुढे असे लेखन "कसे प्रकाशित करायचे बाई?" असे म्हणून प्रशासकीय फटकार्‍यात रद्द केले असते, असे आमचा अनुभव सांगतो. साध्या "बलात्कार" ह्या शब्दाविषयीच्या "जुने सूर अन जुने तराणे" गायकांच्या ताना आपण ऐकल्या असतीलच. ह्या युगातल्या "ग्रो अप गाईज" म्हणणार्‍या स्त्रिया त्यांना बहुतेक संकेतस्थळ सदस्यांव्यतिरीक्त भेटत नसाव्यात. असो. पुन्हा एकदा, आपला लेख आवडला. जरा परिच्छेदांत नीट विभागला असतात, तर इतर कॅज्युअल वाचकांनादेखील समजला असता, एवढीच सूचना द्यावीशी वाटते. सीरीयस वाचकांसाठी परफेक्ट. - (आपला मानलेला पुतण्या) सर्किट
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 09/25/2007 - 13:06 नवीन

उत्तम

लेख आवडला. खासकरुन हे निरीक्षण -- "शिवी म्हणजे लैंगिकतेची ओवीच. रोष, नाराजी, राग, अगतिकता व्यक्त करण्यासाठी या ओव्यांचा वापर करण्याची परंपरा खूप जुनी आहे. सहनही होत नाही व सांगताही येत नाही या अवस्थेतून बेडा पार करण्यासाठी या ओव्यांचा आधार घ्यावा लागतो." नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/25/2007 - 13:32 नवीन

क्या बात

क्या बात है ! मस्तच. वाचनिय तर आहेच पण जपून ठेवण्यासारखे लेखन. बाकी अनूभव हा मानवी जिवनातील महत्वाचा ठेवा ह्या माझ्या मताला पुन्हा एकदा बळकटी मिळाली. राजे (*हेच राज जैन आहेत)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 09/25/2007 - 17:31 नवीन

पटलं!

कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड गेलं की आपण काळावर सोपवून मोकळे होतो. काळाच्या अनंताकडील प्रवासातले आपण सगळे क्षणभंगुर सहप्रवासीच नाही का? आपण नेमके मर्म सांगितलेत.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 09/25/2007 - 18:16 नवीन

सुरेख

लेख अतिशय आवडला. अशी स्वगते वाचायला आवडतील. >>अशाप्रकारचे खुले मंच इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. इथे अभिव्यक्तिला मर्यादाच नसतात.सर्जनशील प्रतिभा इथही बघायला मिळते. सामाजिक बंधन, रुढी परंपरा, संस्कार यात जखडलेल्या विचारांना उसंत घेण्यासाठी खुला मंच दुसरीकडे कुठे मिळणार? त्यात तुम्ही घुसमटल्यावर तुम्हाला मोकळा श्वास घ्यायला इथंच येणार. समाजात हे बुरखे काढून तुम्ही जगायला लागलात तर समाज तुम्हाला वाळीत टाकील. दुर्जन, समाजद्रोही, कलंकित ठरवेल. तुमची इच्छा असो वा नसो समाजात तुम्हाला हे बुरखे पांघरावेच लागतात. हा एक भाग झाला. इंटरनेटचा दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतरांना आपल्यापासून किती दूर ठेवायचे हे आपल्या हातात असते. एखाद्यावर (दिसण्यावर/ वागण्यावर/ विचारांवर) फिदा होऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे, तशी जवळीक साधता आली नाही तर त्या बाईला (किंवा पुरुषाला) बदनाम करून आपली लैंगिक अतृप्तता/ असंतोष पूर्ण करण्याचा (विकृत) मार्ग चोखाळणारे महाभाग प्रत्यक्ष जीवनात पाहिलेले आहेत. अशांचा त्रास इंटरनेटावरही दिसतो परंतु बुरखे पांघरून अशांना नेटावर एका मर्यादेनंतर सहज दूर ठेवता येते.
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Tue, 09/25/2007 - 19:03 नवीन

लेख अतिशय आवडला

सध्या एवढेच लिहितो... सन्जोप राव
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 09/25/2007 - 20:57 नवीन

स्वगत

स्वगत मनापासून आवडले. "कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड गेलं की आपण काळावर सोपवून मोकळे होतो." यावर माझेही एक (अर्धवट) स्वगतः कोण चूक कोण बरोबर काळच ठरवेल म्हणताना स्वत:चे बरे वाईट विचार त्या त्या वेळेपुरते आणि स्वतःपुरते करू शकणे आणि नंतर त्याचे जे परिणाम होतील त्यांना सामोरे जाणे हे महत्त्वाचे. बदलत्या परिस्थितींत कोण बरोबर कोण चूक असा गोंधळ होणे साहजिकच आहे. पण फारच गोंधळ उडायला लागला तर समजावे आपल्याला धरलेली वाट / केलेला विचार झेपत नाही आहे. काही लोकांना स्वतःची वाट ( लगेच ) लख्ख दिसते आणि ते कोणाची पर्वा न करता ते ती अनुसरतात तर काहींना (खरी) ती वाट मिळायला वेळ लागतो, तर अजून काही स्वत:च केलेल्या गुंत्यात अडकतात आणि आहेत तेथेच गुरफटून फिरतात. यातले आपण कोण ते आपण ठरवायचे.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 09/25/2007 - 21:14 नवीन

अप्रतिम

अतिशय सुरेख लेख. वाचायला खूप वेळ लागला. प्रत्येक शब्द न शब्द ज्या लेखाचा वाचावा वाटतो असे लेख वाचायला वेळच लागतो. :) शिवाय हा लेख लगेच पुन्हा एकदा वाचला. घाटपांडे साहेब आम्ही तुमच्या गावचे आहोत हे सांगायला खूप अभिमान वाटतो. ;) - आजानुकर्ण मंचरकर
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 09/25/2007 - 21:16 नवीन

आवडले, पण डोळ्यांना त्रास झाला :-)

तरी असेच येऊ द्या. मी दुसरीकडे चिकटवून स्वतः परिच्छेद पाडून घेईन. > पर्यायी शब्द वापरले तर आशयहानी होते. > 'पोटाला नाही आटा अन म्हनं चोटाला उटण वाटा`. एकदम पटले. शिवराळ भाषा असून रावसाहेब (आणि तुमच्या उदाहरणातले हवालदार) मुद्द्याचे ही बोलतात, हे महत्त्वाचे. कारण केवळ भावनिक आशय असलेले तेवढेच शब्द बोलले, तर समोरच्याला उत्तर देण्याइतपत अर्थ समजेलच असे सांगता येत नाही. "साहेब पेटलाय्" हे उत्तम कळले, पण काय नेमके चुकले आणि काय नेमके बदलायचे ते कळले नाही तर आली पंचाईत. तुमचा हा पूर्वप्रसिद्ध लेख आहे. पण खरे म्हणजे दोन किंवा तीन लेखांना पुरेल इतका मालमसाला याच्यात भरला आहे.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 09/25/2007 - 21:18 नवीन

शेवटचा परिच्छेद

शेवटचा परिच्छेद फारच प्रभावी.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/25/2007 - 21:32 नवीन

कालाय तस्मै नमः ।

प्रकाशकाका, छान आहे लेख. विशेष करून.. एकेकाळची विकृृती ही आता प्रकृती बनत चालली आहे. कुणी म्हणेल आताची पिढी वाहवत चालली आहे. पण दुटांगी धोतर नेसून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाला वा पाचवारी साडी नेसून सायकलवर जाणाऱ्या तरुणीला बघून त्या त्या काळी आजची पिढी वाहवत चालली आहे असे म्हणणारे बुजुर्ग होतेच. पॅंट शर्ट घालून इराण्याच्या हॉटेल मधे जाउन चहा पिणारा तरुण किती वाया गेला? प्रत्येक पिढीत हेच घडत आले आहे. काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही. आवडले. खूप विचार करायला लावणारा लेख आहे. असेच येऊ दे आणखिही.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Wed, 09/26/2007 - 05:48 नवीन

वा वा!

इथल्या प्रतिक्रिय वाचल्यावर हा लेख जरा निवांत वेळ काढूनच वाचला.. जबरदस्त स्वगत आहे.
  • Log in or register to post comments
र
राघव१ Sat, 08/23/2008 - 08:41 नवीन

अगदी असेच झाले माझेही!

काय लिहिलेत काका! अगदी मस्त. राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
अ
अभिज्ञ Sat, 08/16/2008 - 03:03 नवीन

फारच सुरेख...

प्रकाश घाटपांडे जी, मिसळपाव वरील अत्युत्तम अशा लेखांपैकी हा एक लेख वाचनात आला. फारच प्रांजळ असा लिहिला आहे. शेवटचा परिच्छेद अतिशय प्रभावी झालाय. विशेषतः एकेकाळची विकृृती ही आता प्रकृती बनत चालली आहे. कुणी म्हणेल आताची पिढी वाहवत चालली आहे. पण दुटांगी धोतर नेसून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाला वा पाचवारी साडी नेसून सायकलवर जाणाऱ्या तरुणीला बघून त्या त्या काळी आजची पिढी वाहवत चालली आहे असे म्हणणारे बुजुर्ग होतेच. पॅंट शर्ट घालून इराण्याच्या हॉटेल मधे जाउन चहा पिणारा तरुण किती वाया गेला? प्रत्येक पिढीत हेच घडत आले आहे. काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही. मनुष्य हा काही विवेकवाद, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्यवाद यांचे प्रोग्रामिंग फीड केलेला जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला केवळ बुद्धी नाही तर भावनाही आहेत. काळ हा त्याचं दु:ख हलकं करतो. आशेच्या वारुवर स्वार झाले की काळ किती गेला हे समजतच नाही. कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड गेलं की आपण काळावर सोपवून मोकळे होतो. काळाच्या अनंताकडील प्रवासातले आपण सगळे क्षणभंगुर सहप्रवासीच नाही का? हे तर फारच आवडले. अभिनंदन अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 08/16/2008 - 04:33 नवीन

सुंदर..

लेख फार आवडला.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 08/23/2008 - 20:23 नवीन

तुमच आमच जमल

डायरेक्ट. करे़क्ट. वि.प्र.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 03/01/2009 - 14:49 नवीन

मस्तच,

मस्तच, धन्यवाद काका. ह्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल. काळानुरुप सगळ्या व्यख्या बदलत राहतात. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 03/01/2009 - 14:49 नवीन

मस्तच,

मस्तच, धन्यवाद काका. ह्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल. काळानुरुप सगळ्या व्यख्या बदलत राहतात. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments
म
मन१ Sat, 09/08/2012 - 18:45 नवीन

वाचनीय

वाचनीय मुक्तचिंतन....
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 09/11/2012 - 05:41 नवीन

किती सरळ सरळ लिहिलय. अतिशय

किती सरळ सरळ लिहिलय. अतिशय पटल.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 09/12/2012 - 01:06 नवीन

रोलर कोस्टर...

पोलीस खात्यासम रांगड्या यंत्रणेतील ट्रांझीशन्स व कर्मठता, भावना रेचनाचे मानसशास्त्र, भाषेतले वेगवेगळे प्रवाह, स्त्रीत्वाच्या अचाट शक्तीचे तेव्हढेच विराट पण भावुक प्रदर्शन, अभिव्यक्तीच्या नवनवीन हुंकारांचे समाजाने केलेले स्वागत, निसर्गाच्या "बदल" या एकमेव नियमाचे स्पष्टीकरण आणि त्याची अपराजीत शक्ती, नैतिकतेची अपरिहार्य स्थलकालसापेक्षता, मानव्याची राजीखुषीने वा रेट्याने काळाप्रती शरणागती... उफ्फ्फ्फ... एव्हढं सगळं एकाच लेखात ???... भाईकाकांचा पानवाला आठवला. आपल्या प्रतिभेला सलाम. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Wed, 09/12/2012 - 16:27 नवीन

खत्रा लेख!

काही नोकर्‍यांमध्ये स्त्रियांची कुचंबणा होते आणि त्यामुळे पुरुषांची सुद्धा गोची होते. ह्यावरूनच आठवलं. कॉलेजात असताना एक लमाणतांड्यावर मुकादम म्हणून काम करत असलेल्या माणसाच्या घरात काही कामा निमित्त गेलो होतो. एरवी सुशिक्षीत (सुसंस्कृत?) दिसणारा माणूस स्वतःच्या बायका पोरांसमोरच मला 'अवचित उठलं आणि XXत घुसलं' असं करू नकोस असं म्हणाला होता. त्या धक्क्यातून दोन दिवस बाहेर आलो नव्हतो. :)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 09/13/2012 - 06:24 नवीन

हा लेख वर काढणाऱ्या मनोबाला

हा लेख वर काढणाऱ्या मनोबाला धन्यवाद. मिपाच्या खजिन्यातलं एक माणिकच बाहेर काढलं आहे. लेखाला नावाप्रमाणेच एक स्वतःशी बोलण्याचा टोन आहे. पोलिस खात्यातले किस्से अस्सल रांगड्या भाषेमुळे रंगलेले आहेत. घाटपांडेसाहेब, अजून लेखन करा की.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Wed, 03/30/2016 - 04:54 नवीन

चला, हा लेख वर काढण्याचा

चला, हा लेख वर काढण्याचा प्रमाद उरी घेतोच एकदा. घाटपांडेसर, तुमचं लेखण खूप आवडलं, भिडलं! __/\__
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 03/30/2016 - 05:43 नवीन

उत्खदन केल्याबद्द्ल धन्यवाद हो तर्राटशेठ

साबरमतीचं महात्म्य छान 'गांधीगिरी' करुन सांगितलं तर लवकर उमगतं. मनमोकळेपणाची, व्यक्तीस्वातंत्र्याची गरज किती सहजपणे सांगितली घाटपांडे सर. एकमद मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
आ
आनन्दा Sun, 04/03/2016 - 14:33 नवीन

+१

+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
अ
अभिजीत अवलिया Sun, 04/03/2016 - 12:36 नवीन

त.जो. साहेब,

त.जो. साहेब, धन्यवाद हे माणिक वर काढल्याबद्दल. लिखाण आवडले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा