✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळ आणि भेळ

म
महेन्द्र यांनी
Wed, 09/19/2007 - 19:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30954 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

अ
अप्पासाहेब गुरुवार, 09/20/2007 - 10:48 नवीन

मिसळ

मिसळ बैठ्कीची लावणी आहे तर भेळ उभ्याउभ्याने करावयाचा डिस्को आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/20/2007 - 11:05 नवीन

:))

'बैठकीची लावणी' आणि 'उभ्या उभ्या करायचा डिस्को' या उपमा अतिशय आवडल्या..:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पासाहेब
ट
टीकाकार-१ गुरुवार, 09/20/2007 - 10:56 नवीन

२ वेगळे

२ वेगळे पदार्थ आहेत हे.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 09/20/2007 - 11:24 नवीन

जयसिंग आणि जिग्नेश

मातीच्या तालमीतला (-नाटकाच्या नव्हे) जयसिंग घोरपडे : किराणा दुकानातला (- घराण्यातला नव्हे) जिग्नेश शहा :: मिसळ : भेळ (ह.घ्या. कोणत्याही व्यक्तीसमुहास दुखावण्याचे आमच्या मनात नाही.)
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 09/20/2007 - 11:48 नवीन

तात्या

तात्या मिसळ आणि भेळ समोर असताना "उपमा" आठवावा. अरे रे काय हे. :) हलकेच घ्या बर. :) मी दोन्हीचा भक्त आहे. मिसळ मधे डोळ्यातुन आणि नाकातुन पाणी आणण्याची शक्ती आहे. भेळ मधे नाही.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 09/20/2007 - 17:42 नवीन

अम्म !

मिसळीबरोबर पाव चांगला लागतो. भेळेबरोबर नाही. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 09/21/2007 - 07:43 नवीन

मिसळ आणि भेळ

मिसळ हा फारच पोट भरणारा पदार्थ आणि भेळ हलकी फुलकी.....मिसळ तिखट आणि मसालेदार तर भेळ चटपटीत......
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 09/21/2007 - 07:51 नवीन

मिसळ /भेळ

मिसळ म्हणजे राखी सावंत तर भेळ म्हणजे सुप्रिया सुळे ! ;) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 07:54 नवीन

:)

मिसळ म्हणजे राखी सावंत तर भेळ म्हणजे सुप्रिया सुळे ! ;) क्या बात है! म्हन्जी बिरुटे सायबास्नी सावतांची राखी आवडते म्हनायची! :) आपला, तात्या मिका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
N
Nitin Palkar Tue, 12/27/2016 - 18:59 नवीन

भेळ म्हणजे सुप्रिया सुळे

भेळेचा घोर अपमान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विशुमित Wed, 12/28/2016 - 14:26 नवीन

मग "स्मृती" ला भेळ म्हणा

मग "स्मृती" ला भेळ म्हणा चटपटीत वाटेल...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
त
तर्री Fri, 09/21/2007 - 13:28 नवीन

हा तर

हा तर मिसळी चा घोर अपमान........
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sun, 09/23/2007 - 14:49 नवीन

आताच सुचल एक :)

मिसळ म्हणजे जाफरानी जर्दा घातलेल जास्त चुना घातलेल पान तर भेळ म्हणजे ज्यादा गुलकंद वाल मसाला पान :) मला पानातील तशी जास्त माहिती नाही एखाद्या जाणकार तांबुलभक्षी ने अधिक चांगल्या प्रकारे लिहिता आल तर पहा. :)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/24/2007 - 04:42 नवीन

अहा हा !!

वा ! अगदी खरे.... (तांबूलप्रेमी) - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 03/19/2008 - 20:58 नवीन

किंवा

मिसळ म्हणजे मस्त भोला-बनारस, कलकत्ता १२०-३२ सारखे तिखट पान. आणि भेळ म्हणजे फूलचंद १२०-३०० सारखे थोडे गोड पण आनंददायी पान. :) :) (असुरावादी -'गो' पाल) डॅनी. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
व
विसोबा खेचर Sun, 09/23/2007 - 15:14 नवीन

मिसळ आणि भेळ,

मिसळ हा अस्स्ल मराठमोळा पदार्थ. भेळ हा का कुणास ठाऊक, पण मला उगिचंच तो गुजराथी पदार्थ आहे असं वाटत आलेलं आहे! :) मिसळ खाताना कुणी सोबत नसलं तरी चालतं, कारण लालभडक रश्श्यात पाव बुडवून खाताना बराचसा वेळ घाम आणि नाकातोंडातलं पाणी पुसण्यातच जातो, भेळ खाताना मात्र एखादी छानशी मैत्रिण सोबत असेल तर फारच छान. एकूंणच भेळ हा हसीमजाक करत करत कुटुंबियांसोबत, मित्रमंडळींसोबत खाण्याचाही पदार्थ आहे. मस्त चटपटीत भेळ! कांदा, कैरी, झकासशी चिंचगुळखजुराची चटणी, हिरव्या मिरच्यांची चटणी घालून केलेली मस्त चटपटीत भेळ! वा वा.. गरमागरम मिसळ सक्काळच्या टायमाला खावी, तर भेळ संध्याकाळी! छ्या..! आमच्या मिसळीला शृंगार वगैरे काही कळत नाही! :) ती सजते, फुलते ती एखाद्या यष्टीष्टँडवरील, किंवा पोलिस स्टेशनाजवळील किंवा एखाद्या मारुतीच्या देवळाजवळील टपरीत! :) परंतु या जागा भेळेला मात्र शोभून दिसत नाहीत हो! एखाद्या छानश्या समुद्र किनार्‍यावर, एखाद्या गोड मुलीसोबत मावळतीचे रंग पाहता पाहता खाल्लेल्या भेळेची चव काही औरच! आमच्या नशिबी असे काही भेळ खायचे प्रसंग आलेले आहेत त्या दिवसांची आठवण आजही आमच्या मनात त्या भेळेइतकीच रेंगाळते आहे. हल्ली त्या सर्व गोड मुली रस्त्यात भेटल्या की "अले शोनुल्या, तो बघ तात्यामामा! त्याला पापी दे पाहू!" असं आपल्या लेकाला म्हणतात..! मग आम्ही मनात म्हणतो, "अगं गधडे, त्या संध्याकाळी, समुद्रकिनारी इतकी रंगात आली होतीस तेव्हा आम्ही तुझ्याकडे....." जाऊ द्या....:) आपला, तात्यामामा शिरवळकर!
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sun, 09/23/2007 - 15:19 नवीन

तात्या, एकद

तात्या, एकदम जबरा फरक दाखवला आहे भेळ व मिसळ मधील... क्या बात है.. तर मग तात्या मामा काय करतात जेव्हा तो कार्टा गालावर पापी देतो तेव्हा ???? राजे (*हेच राज जैन आहेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/23/2007 - 21:16 नवीन

सही !

मिसळ आणि भेळ यातला फरक सहीच ! किती व्याप सांभाळता,कधी किती ताप सांभाळता, देवगडात चक्कर ,शेअर मार्केट,संगीत,कुटुंब,मित्र परिवार ! आणि एखाद्या छानश्या समुद्र किनार्‍यावर, एखाद्या गोड मुलीसोबत मावळतीचे रंग पाहता पाहता खाल्लेल्या भेळेची चव ! क्या बात है, तात्या ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सृष्टीलावण्या Wed, 03/19/2008 - 17:43 नवीन

गरमागरम

गरमागरम मिसळ सक्काळच्या टायमाला खावी, तर भेळ संध्याकाळी! मी म्हणेन भेळेला वेळेची बंधन घालू नयेत. ती कधीही खायला छानच. मिसळ मात्र सक्काळी सक्काळी गरमागरम खावी. आमच्या इथे दादरमध्ये त्यातल्या त्यात माने मिसळ प्रसिद्ध आहे (नाहीतर, इतर ठिकाणच्या मिसळी म्हणजे एकतर कालचे उरलेले सरवायचे ठिकाण किंवा ब्राह्मणी जाड ओले पोहे घातलेल्या गोड चवीच्या, मामलेदारची मिसळ आठवूनच हळहळायला होते). आम्ही पूर्वी दर रविवारी मानेकडून लालभडक तर्रीदार तर्री उसळ घरी आणायचो, दोन लादी बुरून पाव (कडक पाव) आणि गोकुळदास गांठियावाल्याचे फरसाण आणि हाणायचो जोरदार नाक डोळे पुसत. त्या उसळीचा घमघमाट हात धुतले तरी दिवसभर हाताला. काय मसाला बनवतो माने, मानलं बुवा. पण फरसाण निवडताना इतकी कंजूसी का करतो हरामखोर कोणास ठाऊक. नाहीतर त्याच्या कडेच मिसळ खाल्ली असती आयुष्यभर. > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
इ
इनोबा म्हणे Wed, 03/19/2008 - 17:52 नवीन

मिसळ

फरसाण निवडताना इतकी कंजूसी का करतो हरामखोर कोणास ठाऊक. नाहीतर त्याच्या कडेच मिसळ खाल्ली असती आयुष्यभर. पुण्यात नाही करत. धैर्य दे अन नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे... परमेश्वरा,ऐकतोयस का रे! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या
प
पाटीलभाऊ Tue, 12/27/2016 - 15:38 नवीन

सुंदर प्रतिसाद

सुंदर प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ल
लिखाळ Sun, 09/23/2007 - 21:43 नवीन

अम्म्म

मिसळ म्हणजे वन डे क्रिकेट मॅच...भेळ म्हणजे ट्वेंन्टी - ट्वेंन्टी (ज्यांना ट्वेंन्टी - ट्वेंन्टी जास्त आवडते त्यांनी आलटापलट करुन म्हणावे:) -- लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 09/24/2007 - 03:40 नवीन

मुंबई - कोल्हापूर

भेळ म्हणजे मुंबईसारखी. अठरापगड पदार्थांच्या मिश्रणातून स्वतःची निराळीच चव घेऊन येणारी. झटपट, वेळ न दवडता कामचलाऊ पोट भरायला उपयुक्त. शिवाय ती खरी रंगते ती बाहेर -- खासकरून गिरगाव किंवा जुहू चौपाटीवर. घरी कुरमुरे आणून, चटण्या बनवून केलेली भेळ ही टोफू तंदुरी चिकनसारखीच दयनीय वाटते. मिसळ म्हणाल तर कोल्हापूरसारखी. अस्सल मर्‍हाटमोळी. तिखटजाळ, ठसकेदार पण तितकीच चवीवरुन जीव ओवाळून टाकावा अशी. पण भेळेसारखी सार्‍यांच्याच पचनी पडेल अशी नाही. 'मी आहे ही अशी आहे. आवडले तर ठीक, नाहीतर राम राम' असा रोखठोक 'तेगार' मिरवणारी. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/24/2007 - 04:45 नवीन

वेळेतला फरक !

भेळ ही प्रेयसीला बायको बनवण्याच्या प्रयत्नातली भागीदार. मिसळ ही नवीन बायकोला आअयुष्यभराची सोबतीण बनवण्यातल्या प्रयत्नातली भागीदार. दोन्ही मस्तच ! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
व
विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 19:41 नवीन

भेळ हा बायको समवेत खायचा पदार्थ आहे

भेळ ही बायको खायचा पदार्थ आहे मिसळ ही मित्रांबरोबर हाणायची असते बायको आणि मित्र यांच्यात आहे तेवढाच फरक भेळ आणि मिसळ यात आहे.. ( हवे तर यासाठी तात्यांकडुन तज्ञांचे मत घ्या)
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू Wed, 03/19/2008 - 19:43 नवीन

खाउन बघा...

असे कोणाला विचारत बसू नका....खाउन बघा....
  • Log in or register to post comments
उ
उदय ४२ Wed, 03/19/2008 - 20:07 नवीन

माने मिसळ

दादर मध्ये माने मिसळिचा पत्ता काय?(मिसळीतला रस्सा भूरकणारा)
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 22:14 नवीन

मी पण पहिल्यांदाच ........

ऐकतोय. पण ब्रून मिसळ हेहि पहिल्यांदाच ऐकतोय. तात्यांची व सर्किटरावांची प्रतिक्रिया आवडल्या. लाजबाब. धन्यवाद सृलाताई अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
V
vcdatrange Tue, 12/27/2016 - 08:41 नवीन

घुले भेळ सेंटर

बादवे, मिपावर ओळख झालेल्या एका मित्रवर्याने नाशकात भेळेचे दुकान थाटलयं, पुणे रोडवर आंबेडकर नगरला.. आम्ही चकरा मारतोय हल्ली..... या तुम्ही पण
  • Log in or register to post comments
V
vcdatrange Tue, 12/27/2016 - 08:41 नवीन

घुले भेळ सेंटर

बादवे, मिपावर ओळख झालेल्या एका मित्रवर्याने नाशकात भेळेचे दुकान थाटलयं, पुणे रोडवर आंबेडकर नगरला.. आम्ही चकरा मारतोय हल्ली..... या तुम्ही पण
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 12/27/2016 - 11:08 नवीन

पुणे रोडवर कुठे हो?

उपनगरच्या जवळ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vcdatrange
ब
बोका-ए-आझम Tue, 12/27/2016 - 11:08 नवीन

पुणे रोडवर कुठे हो?

उपनगरच्या जवळ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vcdatrange
V
vcdatrange Tue, 12/27/2016 - 18:49 नवीन

होय

विजय ममता जवळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
पुंबा Tue, 12/27/2016 - 15:40 नवीन

मस्त. असे जुने धागे

मस्त. असे जुने धागे जुन्याजाणत्या लोकांनी बाहेर काढावेत. आमच्यासारख्या नव्या लोकांना फायदा होईल.
  • Log in or register to post comments
स
सांरा Tue, 12/27/2016 - 19:15 नवीन

पण

सर्व महानुभावांनी आपले मत नोंदवावे ही नम्र विनंती
इतर धर्म चालतील का
  • Log in or register to post comments
न
निल्या१ गुरुवार, 12/29/2016 - 07:32 नवीन

भेळ आणि गोड ???????

ब-याच जणांनी भेळ म्हणजे गोड असे वर्णन केले आहे. मराठवाड्यातली भेळ जबरा तिखट असते. काही ठिकाणची साधी भेळ डोक्याला घाम व चेह-याला मुंग्या येतील इतकी तिखट असते. तितकीच हवी हवीशी वाटणारी. दर १२ मैलावर भाषा बदलते म्हणतात तशी भेळही बदलते. प्रत्येकाला आपल्या गावचीच भेळ भारी वाटण स्वाभाविक आहे. पण फक्त पुण्यातली भेळ ज्यांनी खाल्ली त्यांना "हाय कंबख्त तू ने भेळ खाई ही नही" असे म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा