✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक ऐतिहासिक घटना: भाग१ : प्रस्तावना

ऋ
ऋषिकेश यांनी
Mon, 06/01/2009 - 20:33  ·  लेख
लेख
  • एक ऐतिहासिक घटना: भाग२ : आपले घटनादत्त अधिकार
  • एक ऐतिहासिक घटना: भाग ३: निवडणुका आणि प्रतिनिधित्त्व
  • एक ऐतिहासिक घटना: भाग ४: (राजकीय) प्रशासक
  • एक ऐतिहासिक घटना: भाग ५: (नागरी) प्रशासक

Book traversal links for एक ऐतिहासिक घटना: भाग१ : प्रस्तावना

  • एक ऐतिहासिक घटना: भाग२ : आपले घटनादत्त अधिकार ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25026 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

चांगला उपक्रम.

क्रान्ति
Mon, 06/01/2009 - 20:41 नवीन
उपक्रम आवडला आणि अभ्यासपूर्ण लेखही आवडला. क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा
  • Log in or register to post comments

छान माहिती..

मस्त कलंदर
Tue, 06/02/2009 - 00:06 नवीन
बर्‍याचदा नीरस वाटल्याने खूपशा महत्त्वाच्या गोष्टी वाचायच्या टाळल्या जातात.. त्यामुळे हा लेख मनापासून आवडला.. ही माहिती प्रत्येकाला असणं गरजेचं आहे!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

+१ हेच म्हणातो

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 06/02/2009 - 18:18 नवीन
असा अभ्यास पुर्ण लेख आपण लिहिल्या बद्दल शुभेच्या आणि हि लेखमाला जोरदार होणार घटना लिहिताना/ बनविताना काय चर्चा मतभेद झाले ते पण लिहा बाकि पुलेशु येउ द्या पटापट ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

उत्तम

नंदन
Tue, 06/02/2009 - 00:24 नवीन
उपक्रम, ऋषिकेश. विशेषकरून भारतीय राज्यघटना ही जशीच्या तशी ब्रिटिश राज्यघटनेवर बेतली असल्याचा आरोप बर्‍याचदा ऐकायला मिळतो, त्याचे खंडन येथे वाचायला मिळाले हे विशेष. पुढील भागांची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

ऋषि, लेख

प्राजु
Tue, 06/02/2009 - 00:34 नवीन
ऋषि, लेख आवडला. उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अभ्यासपूर्ण आहे लेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान लेख.

घाटावरचे भट
Tue, 06/02/2009 - 02:15 नवीन
छान लेख. पुढील लेखाची वाट पाहातो. - भट
  • Log in or register to post comments

उत्तम

सुनील
Tue, 06/02/2009 - 06:23 नवीन
छान माहितीपूर्वक लेख. आयरिश आणि कॅनेडियन घटनांवरून घेतलेल्या गोष्टी नव्याने समजल्या. पुढील भाग वाचण्यास उत्सुक. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

अगदी

इनोबा म्हणे
Tue, 06/02/2009 - 06:59 नवीन
माहितीपुर्ण लेख. पुढील भाग लवकर येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

सुंदर विषय

सहज
Tue, 06/02/2009 - 07:08 नवीन
अतिशय छान सुरवात. मिपावरील उत्तम लेखमाला संग्रहातील हाही एक ऐवज ठरो. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

अगदी असेच

अवलिया
Tue, 06/02/2009 - 09:00 नवीन
अगदी असेच म्हणतो :) सुरेख :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

असेच

स्वाती दिनेश
Tue, 06/02/2009 - 13:00 नवीन
अतिशय छान सुरवात. मिपावरील उत्तम लेखमाला संग्रहातील हाही एक ऐवज ठरो. पुढील भाग वाचण्यास उत्सुक. सहजरावांसारखेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सुरेख

यशोधरा
Tue, 06/02/2009 - 09:16 नवीन
सुरेख माहितीपूर्ण लेख. आवडला. पुढचा लेख लवकर येऊदेत.
  • Log in or register to post comments

चांगला

नितिन थत्ते
Tue, 06/02/2009 - 11:24 नवीन
चांगला उपक्रम. पूर्ण कराल अशा सुभेच्छा देतो. भारतीय घटनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती अनेक देशांच्या घटनांवर आधारली असली तरी त्यातून काही उघड विसंगती निर्माण झालेली नाही. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

हि लेखमाला

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/02/2009 - 11:26 नवीन
हि लेखमाला उत्तम होणार यात शंकाच नाही. पुलेशु ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

ऋषिकेश...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 06/02/2009 - 16:25 नवीन
लेखमाला एकदम ऊत्तम... घटना समीतीवर कोण-कोण होते व त्या॑चा अल्पशा परिचय दिल्यास अतिऊत्तम... सुहास...
  • Log in or register to post comments

चांगला

विकास
Tue, 06/02/2009 - 18:54 नवीन
चांगला उपक्रम आणि लेखमाला वाचण्यासाठी उत्सुक.... आपण कुणाकडून कुठला भाग घेतला ही माहीती वाचनीय आहे. मात्र एक गोष्ट आपल्याकडे वेगळी झाली असे कुठेतरी वाटते की घटना दुरूस्ती हा प्रकार आपल्याकडे नको इतका सोपा आणि कशालाही करायला ठेवून दिला आहे. उ.दा. अमेरिकेने २३३ वर्षात फक्त २७ वेळा घटना दुरूस्ती केली तर भारताने ६० वर्षात ९४ वेळा. यावर अधिक नंतर वेळ मिळाल्यास...
  • Log in or register to post comments

अमेरिकेने

नितिन थत्ते
Tue, 06/02/2009 - 19:14 नवीन
अमेरिकेने २३३ वर्षात फक्त २७ वेळा घटना दुरूस्ती केली तर भारताने ६० वर्षात ९४ वेळा ते घटना दुरुस्ती कशाला म्हणायचे यावर अवलंबून आहे. भारतात राष्ट्रपती राजवट वाढविणे यासाठी सुद्धा घटनादुरुस्ती करावी लागते. भारतातील ९४ पैकी किती दुरुस्त्या अशा प्रकारच्या आहेत हे पहायला हवे. (एक दृष्टीने हे चांगले आहे. म्हणजे 'सरकारला योग्य वाटेपर्यंत राष्ट्रपती राजवट वाढवली आहे' अशी एकवेळची घटनादुरुस्ती करता येत नाही. दर सहा महिन्यांनी २/३ बहुमताने हे करावे लागते.) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

घटना दुरूस्ती

विकास
Tue, 06/02/2009 - 19:59 नवीन
भारतात आत्तापर्यंत झालेल्या घटना दुरुस्तींची यादी येथे पहाता येईल. सहा महीन्यांपेक्षा अधिक राष्ट्रपती राजवट ही केवळ पंजाबमधेच झाली असावी असे या यादीवरून वाटते. अर्थात हा विकीसंदर्भ असल्याने तृटी सहज शक्य आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

धन्यवाद

नितिन थत्ते
Tue, 06/02/2009 - 22:11 नवीन
धन्यवाद विकास, अधिकृत यादी पुढील दुव्यावर पाहता येईल. http://indiacode.nic.in/coiweb/coifiles/amendment.htm सुरुवातीच्या अनेक दुरुस्त्या या सरकारच्या पुरोगामी धोरणांना हितसंबंधियांकडून 'मूलभूत हक्कां'च्या नावाने आव्हान दिले जात होते आणि न्यायालये असे खटले दाखल करून घेत होती. त्यावर उपाय म्हणून केल्या गेल्या आहेत. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

चांगला उपक्रम

चित्रा
Tue, 06/02/2009 - 21:02 नवीन
माहितीपूर्ण लेख आहे. काही गैरसमज दूर करणारा ठरला. खूपच आवडला.
  • Log in or register to post comments

फार सुरेख

मेघना भुस्कुटे
Tue, 06/02/2009 - 22:15 नवीन
फार सुरेख उपक्रम. आमच्यासारख्या बेशिस्त उंडग्या वाचणार्‍या लोकांकरता तर ही पर्वणीच आहे. सगळं काही आयतं. उत्सुकता चाळवली तर प्रश्न विचारा, मग हवे तर संदर्भ मिळवून वाचा, शंकानिरसन करून घ्या... पुढच्याही भागांची वाट पाहते.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी अगदी सहमत

छोटा डॉन
Tue, 06/02/2009 - 22:19 नवीन
आमच्यासारख्या बेशिस्त उंडग्या वाचणार्‍या लोकांकरता तर ही पर्वणीच आहे. सगळं काही आयतं. उत्सुकता चाळवली तर प्रश्न विचारा, मग हवे तर संदर्भ मिळवून वाचा, शंकानिरसन करून घ्या...
:) असेच म्हणतो रे ॠषी. पुढच्या भागाची वाट पहात आहे ... लहानपणी निरस नागरिकशास्त्राने बालपण नासवले होते. तुझी लेखमाला आता इंटरेस्टिंग वाटते आहे, वाचतो आहे, वाट पहातो आहे पुढच्या भागाची ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

अतिशय छान उपक्रम ऋषीकेश!

चतुरंग
Tue, 06/02/2009 - 22:27 नवीन
हा विषय निवडण्याबद्दल तुझे मनःपूर्वक कौतुक! इतक्या पारदर्शी पद्धतीने आणि लोकांचे हित खर्‍या अर्थाने डोळ्यांसमोर ठेवून आपल्या घटनेची निर्मिती झाली आहे हे माहीत नव्हते! कॅनेडिअयन आणि आयरिश घटनांचा संदर्भही विस्मयकारक आहे! घटनादत्त हक्क आणि अधिकार ह्याचबरोबर 'राष्ट्राप्रति नागरिकांची मूलभूत कर्तव्ये' असा काही मुद्दा घटनेने चर्चेत घेतला आहे का? ह्याची मला उत्सुकता आहे. तुझ्या पुढच्या लेखात ह्याचा धांडोळा घेतलास तर छान होईल! चतुरंग
  • Log in or register to post comments

आणीबाणीच्

नितिन थत्ते
Tue, 06/02/2009 - 22:37 नवीन
आणीबाणीच्या काळात ४२ वी घटना दुरुस्ती झाली त्यात मुलभूत कर्तव्ये म्हणून कलम ५१ अ मध्ये घालण्यात आली होती. http://indiacode.nic.in/coiweb/amend/amend42.htm येथे पहा. याच घटना दुरुस्तीतील इतर अनेक दुरुस्त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. तसेच या घटना दुरुस्तीने भारत देश हा सेक्युलर आणि सोशालिस्ट प्रजासत्ताक असल्याचे कलम घालण्यात आले. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

चांगला उपक्रम

धनंजय
Tue, 06/02/2009 - 22:44 नवीन
पुढील लेखमालेची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

ऋषिकेश
Tue, 06/02/2009 - 23:54 नवीन
सर्व प्रतिसादकांचे प्रोत्साहनाबद्दल अनेक आभार. विकास व खराटा यांचे उत्तमोत्तम पुरवण्यांबद्दल विषेश आभार. प्रतिक्रिंयांमधे सुचवले गेलेले विषय पुढिल काहि भागांत समाविष्ट करणार आहे. (अदाचित लगेच पुढच्या भागात नसतील तर त्यापुढील भागात घ्यायचा प्रयत्न असेल) पुन्हा एकदा नमुद करू इच्छितो की मी काहि या विषयातील तज्ञ नाहि. निव्वळ विषयाच्या आवडीपोटी सध्या जे वाचन चालु आहे त्यावर आधारीत लेखमाला लिहिण्याचा प्रयत्न आहे. तृटी/चुका आढळल्यास त्वरीत कळवावे. मागितल्यास मी शक्य तितक्या विधानांचा संदर्भ देण्याचा प्रयत्न करेन. संदर्भ उपलब्ध नसल्यास बहुतेक वेळी लेखात तसे नमुद करण्याचे ठरवले आहे. ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

पुढील

नितिन थत्ते
Wed, 06/03/2009 - 10:16 नवीन
पुढील भागांच्या प्रतीक्षेत. (तुमची बुद्धी आधीच तेज आहे त्यामुळे लोहाच्या गोळ्या घेवू नका म्हणजे डोके गंजण्याचा प्रश्न येणार नाही) :) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

लेख

मुक्तसुनीत
Wed, 06/03/2009 - 08:27 नवीन
लेख आवडला. या निमित्ताने आलेले प्रतिसादही वाचनीय. लेखमालेतील पुढील भागाची वाट पहातो आहे.
  • Log in or register to post comments

सुरे़ख

Nile
Wed, 06/03/2009 - 12:53 नवीन
सुरे़ख उपक्रम! येउद्या अजुन. जाता जाता: drafting comittee मध्ये सहा जण होते पण मला शोधुनही सहजपणे त उरलेल्या पाच जणांची नावं सापडली नाहीत. आपण नावं दिलीत तर तेवढेच आमच्याकडे २ पैसे वाढतील. :)
  • Log in or register to post comments

मसुदा समिती

नितिन थत्ते
Wed, 06/03/2009 - 17:55 नवीन
Q. 18. Who were the members of the Drafting Committee of the Constitution? Ans. Dr. B.R. Ambedkar was the Chairman. The other members were M/s N. Gopalaswami Ayyanagar, Alladi Krishnaswami Ayyar, K.M. Munshi, Sayed Mohd. Saadulla, N, Madhava Rau and D.P. Khaitan. http://www.indiastudychannel.com/resources/47068-Constitution-India.aspx येथे मिळाले. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

(आमचा)

Nile
Sat, 06/06/2009 - 01:33 नवीन
(आमचा) धन्यावाद!(गेला परत टाकतो!) :) (फाँटचे रंग का काम करीत नाहीत कुणास ठावुक?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

खुपच सुंदर लेखमाला

वेताळ
Sun, 06/07/2009 - 10:49 नवीन
प्रथम लेख पाहिला..मनात आला असले निरस कशाला वाचा म्हणुन वाचला नाही. आज परत वेळ मिळाला म्हणुन वाचुन काढला. मस्तच लेखमाला होणार ह्यात शंका नाही. भारतीय राजघटना विविध देशातील राज्यघटनांचा अभ्यास करुन तयार करण्यात आली आहे. अजुन एक ह्या घटनांचे वैशिष्टे मागे वाचनात आले होते. ते म्हणजे. अमेरिकन घटना लिहताना घटक राज्यांचा खुप मोठा पगडा होता. प्रत्येक घटक राज्याला स्वःताचे अधिकार व कायदे निर्माण करण्याचा हक्क हवा होता. त्याप्रमाणे तो त्याना तिथे दिला गेला. घटनाकाराना वाटत होते कि अश्या अधिकारामुळे घटक राज्ये मजबुत होणार व केंद्रशाशन निष्क्रिय राहणार. त्यामुळे फुटिरतेचा संघराज्याला धोका निर्माण होणार. पण अमेरिकेत झाले उलटेच आता तिथे केंद्रियसत्ता जगातील सर्वात बलवान सत्ता केंद्र म्हणुन उदयास आले आहे. आपण मात्र कॅनडाप्रमाणे संघराज्य पध्दत स्विकारली. ह्यात केंद्रसरकार मजबुत राहुन ,राज्यसरकारांना मर्यादीत अधिकार दिले गेले आहेत. पण गेल्या ६० वर्षात आपल्या इथे अगदी उलटच झाले आहे. इथे घटकराज्ये मुजोर झाली आहेत व केंद्रसरकार त्याच्या समोर हतलब झाले आहे.त्यामुळे घटनेच्या मुळ हेतुलाच धोका निर्माण झाला आहे.बाकी जाणकार मंडळी ह्यावर अधिक प्रकाश टाकतील. अमेरिकेत प्रत्येक राज्यात काही काही कायदे खुपच वेगळे असतात असे वाचनात आले आहे. त्यावर देखिल तिथल्या मंडळीनी लिहावे. क्लिंटन साहेब जर इथे हजर असते तर अजुन खुप माहिती मिळाली असती. लेखमालेस सुभेच्छा. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments

मस्त!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 06/07/2009 - 13:55 नवीन
ऋषि, काय मस्त लेख रे!!! आणि एकदम नाविन्यपूर्ण विषय. लहानपणी शाळेत ना.शा. आवडायचं. पण पुढे फार संबंध नाही राहिला. आता वाचतोय. पटापट टाक लेख. जास्त वेळ नको काढू. अवांतर समांतरची कल्पना मस्तच. भारतिय राज्यघटनेचा जगात कुठे कुठे कसा प्रभाव पडला आहे हे शेवटी पण विस्ताराने लिही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा