✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मनात वसलेला गुलमोहर

क — क्रान्ति, Mon, 06/01/2009 - 08:39

प्रतिक्रिया द्या
6736 वाचन

💬 प्रतिसाद (16)

वा वा

पाषाणभेद
Mon, 06/01/2009 - 08:44 नवीन
"लाल तांबडे शेले उडवित" "हळूच हसतो लाल तजेला कधि तेजाचे पलिते घेउन" "मोहरलेली याची कांती पायांखाली कुंकुम-केशर" आजची सकाळ चांगली आहे. माझ्या ऑफिसातुन समोरचा गुलमोहर पाहत ही कविता वाचली. आनंद वाटला. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

१२ लाख

विनायक प्रभू
Mon, 06/01/2009 - 08:47 नवीन
मोलाची कविता
  • Log in or register to post comments

जबरदस्त!!!

प्राजु
Mon, 06/01/2009 - 08:48 नवीन
क्रान्ती.. सुंदर आहे कविता. गुलमोहोराची विविधरूपं खूपच खुलवली आहेस.. मस्तच! वैशाखाचा घुमवित जागर आणि मोहरलेली याची कांती पायांखाली कुंकुम-केशर तुफान आहेत या ओळी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अहाहा !! फार

जयवी
Mon, 06/01/2009 - 09:31 नवीन
अहाहा !! फार फार सुरेख !! गुलमोहराचं लाल भडक झाड अगदी नजरेसमोर आलं गं !! तप्त उन्हाच्या काहिलीतही मोहरलेली याची कांती पायांखाली कुंकुम-केशर अप्रतिम !!
  • Log in or register to post comments

तेजाचे पलिते

मनीषा
Mon, 06/01/2009 - 11:15 नवीन
वा ! सुरेख कविता उन्हात लखलखणारे झुंबर मनात वसलेला गुलमोहर .... सुंदर
  • Log in or register to post comments

छान.

जागु
Mon, 06/01/2009 - 11:18 नवीन
छान. गुलमोहराच दर्शन घडवलस.
  • Log in or register to post comments

वाह!

ऋषिकेश
Mon, 06/01/2009 - 12:13 नवीन
वाह! गुलमोहर हे माझ्या आवडत्या झाडांपैकी एक.. साकुरा जितका आवडतो तितकाच (किंबहुना काकणभर अधिकच) मला फुललेला गुलमोहर भुरळ घालतो. आणि या सुंदर गुलमोहराचे रुप तुम्हि कवितेते इतके सशक्तपणे मांडलंय की वाह! क्या बात है !!! खुप खुप खुप आवडली कविता Image removed. ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

हेच

अनामिक
Mon, 06/01/2009 - 16:54 नवीन
हेच म्हणतो. खूप खूप आवडली कविता. ऋषिकेश, तुम्ही टाकलेला फोटोही अप्रतिम! -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

वाह ! मस्तच

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/01/2009 - 12:17 नवीन
वाह ! मस्तच कविता, खुप खुप आवडली. झाडा आणी फुलांची फक्त वर्णने वाचायची नशिबात आहे सध्या. जाता येता दिसणारे एकमेव झाड म्हणजे तुळस. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

फार सुंदर कविता

दत्ता काळे
Mon, 06/01/2009 - 12:40 नवीन
घरी, अंगणी, वाटेवरती कुठे माळरानी एकांती तप्त उन्हाच्या काहिलीतही मोहरलेली याची कांती पायांखाली कुंकुम-केशर - हे कडवं फार छान जमलंय. मी पण एक गुलमोहोरावर कविता केली आहे, ती अजून टाकली नाही आणि आता टाकणारही नाही. कारण हि कविता त्यापेक्षा जास्त छान झालीये. माझ्या कवितेमध्ये नदीकाठच्या उतारावर असलेल्या एका कलंदर गुलमोहोराबरोबर झालेले कल्पनेतले संभाषण काव्यस्वरूपात मांडलेले आहे.
  • Log in or register to post comments

दत्ताभाऊ

क्रान्ति
Mon, 06/01/2009 - 15:50 नवीन
तुमची कविता अवश्य टाका. नक्कीच छान असणार आहे ती. आणि वेगळ्या स्वरूपातली. मला वाचायला आवडेल. :) क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे

गुलमोहर.......

निखिल देशपांडे
Mon, 06/01/2009 - 12:52 नवीन
गुलमोहर....... कविता वाचुन डोळ्या स्मोर उभा राहिला.. कालच घरासमोर अर्ध्यापाउण तास निवांत गुलमोहराच्या झाडा कडे आणी त्या रस्त्याकडे डोळे लावुन बसलो होतो. घरी, अंगणी, वाटेवरती कुठे माळरानी एकांती तप्त उन्हाच्या काहिलीतही मोहरलेली याची कांती पायांखाली कुंकुम-केशर ह्या गुलमोहराकडे वेड्यासारखे पहाण्यामुळे एकदा मास्तराने कॉलेज मधुन हाकलुन दिले होते ते पण आठवले. ==(गुलमोहर मधे रहाणारा )निखिल
  • Log in or register to post comments

अवर्णनीय !

चन्द्रशेखर गोखले
Mon, 06/01/2009 - 20:35 नवीन
एक सुंदर काव्य रचना वाचल्याचा आनंद मिळाला !!
  • Log in or register to post comments

गुलमोहोरा

प्रेरणा
Tue, 06/02/2009 - 11:20 नवीन
गुलमोहोराशी माझे खुप सलगीचे नाते आहे. गावाकडच्या घरातील खिड्कीतुन अख्खा फुलापनांचा घोस कवेत घ्यायाला येतो. तित्कीच जवळ्ची वाटली कवीता. जपुन ठेवीन. - प्रेरणा.
  • Log in or register to post comments

छान. मस्तच

मराठमोळा
Tue, 06/02/2009 - 14:27 नवीन
छान. मस्तच आहे. :) बिचार्‍या गुलमोहराच्या फुलांना तेवढी किंमत मिळत नाही, तुमची कविता त्याच्यासाठी अप्रतिम भेटच की. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

सदैव ताजी राहील हि कविता. एकदम सुंदर . . .

नाना बेरके
Tue, 06/02/2009 - 20:02 नवीन
गुलमोहोर - गुलछबू झाड. हा वृक्ष अफगाणिस्थानातून भारतात आला म्हणे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा