✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी: जानेवारी २०२६

क
कांदा लिंबू यांनी
गुरुवार, 01/01/2026 - 00:06  ·  लेख
लेख
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा! सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना. या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत. तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की. * कांदा लिंबू
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21215 वाचन

💬 प्रतिसाद (228)

प्रतिक्रिया

'शत प्रतिशत' पटण्यासारखे

रामचंद्र
Wed, 01/07/2026 - 18:58 नवीन
'शत प्रतिशत' पटण्यासारखे स्पष्टीकरण! सर्वच 'मास्टर स्ट्रोक' सर्वांच्याच लक्षात येतातच असं नाही!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

पण चीनने उईगर

NiluMP
Wed, 01/07/2026 - 19:07 नवीन
पण चीनने उईगर मुस्लिमांविरूध्द कोणतीही कृती केली तरी त्या विरूध्द जगातले कोणीही अगदी ५७ मुस्लिम राष्ट्रेही बोलत नाहीत. ----- चीनमधे लोकशाही नाही आणि ते मतांसाठी लाचार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

मोदींच्या मनांत नक्की काय आहे

मदनबाण
Wed, 01/07/2026 - 19:47 नवीन
मोदींच्या मनांत नक्की काय आहे माहीत नाही. Modernising Madrasas: Govt Spends Rs 1,000 Cr In 7 Years PM Modi : Modi government will also give Saugad-e-Modi to madrasas Aid to minority body & salaries of madrassa teachers Maharashtra government triples salaries of madrasa teachers Shahari Waqf Sampatti Vikas Yojana implemented by Ministry of Minority Affairs through Central Waqf Council for providing interest free loan to Waqf Institutions/Waqf Boards लिंक बंद पडण्याची शक्यता असते म्हणुन तिथली माहिती इथे पेस्ट करुन ठेवतो: The Minister of Minority Affairs, Smt. Smriti Zubin Irani in a written reply to a question in the Rajya Sabha today informed that this Ministry implements Shahari Waqf Sampatti Vikas Yojana (SWSVY) through Central Waqf Council (CWC). Under SWSVY, interest free loan is provided to Waqf Institutions/Waqf Boards for taking up economically viable projects on the urban waqf land such as commercial complexes, marriage halls, hospitals, cold storages etc. The annual Grants-in-aid released under the Scheme between 2017-18 to 2021-22 is Rs. 316.00 lakh, 316.00 lakh 316.00 lakh, 300.00 lakh and 100.00 lakh respectively. The grants and subsequent instalments are released after ascertaining the viability of the project in accordance with the scheme guidelines, receipt of Utilization Certificate (UC) and satisfactory progress Report from the concerned Waqf Institution/ Waqf Board. As on date, total 4 applications are pending amounting to Rs. 487.25 lakh. मला गंमत वाटते की रायसिन मिसळवुन लाखो देशवासी मारले जाणार होते, ( असा दावा करण्यात आला की जप्त केलेला पदार्थ “मुंबई किंवा बेंगळुरूसारखे संपूर्ण शहर” नष्ट करण्यासाठी पुरेसा होता. ) गुप्तचर संस्थाच्यामुळे / किंवा ज्या असतील त्यांच्यामुळे ते झाले नाही. लाखो लोक जर खरंच मेले असते तर? इतक सगळं होऊन देशात सामान्य स्थिती आहे हे लोकांना कसं काय वाटतं? जाता जाता: Won't allow dilution of SC/ST Act: PM Modi

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला

मदनबाण
Sat, 01/03/2026 - 15:12 नवीन
अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला आहे. Trump 'INVADES' Venezuela; US Air Force Attacks Army Bases In Caracas | Maduro Next?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Pandit
  • Log in or register to post comments

ऑपरेशन अ‍ॅबसोल्युट रिझॉल्व्ह

निनाद
Tue, 01/06/2026 - 06:56 नवीन
अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये केलेल्या 'ऑपरेशन अ‍ॅबसोल्युट रिझॉल्व्ह' या लष्करी कारवाईने निकोलस मादुरो यांची सत्ता संपुष्टात आणली. ट्रम्पच्या या आक्रमक पाऊलामुळे केवळ दक्षिण अमेरिकाच नव्हे, तर आर्क्टिक क्षेत्रातील ग्रीनलँड या स्वायत्त डॅनिश प्रदेशाबाबतच्या जुन्या भीती पुन्हा एकदा पटलावर आल्या आहेत. या हस्तक्षेपानंतर ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर अमेरिकेचा ताबा असणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी कसे आवश्यक आहे, याचे सूतोवाच पुन्हा एकदा केले आहे. असो, व्हेनेझुएला लोकशाहीसाठी धोका होता का तर नक्कीच होता. कारण मादुरो यांनी लोकशाही संस्था, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगावर पूर्ण ताबा मिळवला होता. मादुरो प्रशासन कार्टेल ऑफ द सन्स या अमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या टोळीशी संबंधित होते. याकाळात ढासळलेली अर्थव्यवस्था आणि दडपशाहीमुळे ८० लाखांहून अधिक नागरिकांनी देश सोडला. अर्थातच शेजारील लोकशाही देशांवर निर्वासितांचा प्रचंड ताण आला आहे. व्हेनेझुएलाने रशिया, चीन आणि इराण यांच्याशी घनिष्ठ लष्करी व आर्थिक संबंध प्रस्थापित केले होते. यामुळे अमेरिकेच्या अंगणात लोकशाहीविरोधी शक्तींचा शिरकाव झाला आहे. ट्रम्पने आता तेथे 'तात्पुरते प्रशासन' चालवण्याचे जाहीर केले असून डेल्सी रॉड्रिग्ज यांच्या मदतीने व्यवस्था राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर कोरिया, क्युबा आणि निकाराग्वा यांसारख्या देशांच्या नेत्यांना आता आपली सत्ता सुरक्षित नसल्याचा संदेश मिळाला आहे. जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात इराणमधील जनक्षोभाने उग्र रूप धारण केले आहे. व्हेनेझुएलातील यशस्वी सत्तांतरानंतर आता सर्वांच्या नजरा इराणकडे वळल्या आहेत. इराणने व्हेनेझुएलामध्ये केलेली मोठी गुंतवणूक आता धोक्यात आली आहे. नवीन अमेरिकन समर्थक प्रशासन इराणचे देणे देण्यास नकार देऊ शकते. इराण कमकुवत झाल्यास हिजबुल्लाह (लेबनॉन) आणि येमेनी हुथी यांसारख्या इराण समर्थक गटांना मिळणारी रसद कमी होईल, ज्याचा थेट फायदा इस्रायलला होईल. मात्र, इराणमधील हस्तक्षेप हा व्हेनेझुएलापेक्षा अधिक गुंतागुंतीचा आणि प्रदीर्घ असू शकतो. अमेरिकेने नाटो किंवा संयुक्त राष्ट्रांच्या संमतीशिवाय ही कारवाई केल्यामुळे, जुने आंतरराष्ट्रीय कायदे आता कचर्‍यात गेले आहेत असे म्हणायला वाव आहे. या संदर्भाने मोदी सरकारने वेगाने केलेले सुरक्षा दलांचे आधुनिकीकरण आणि त्या संदर्भात घेतलेले वेगवान निर्णय, सुरक्षा दलांना दिलेली ऑटॉनॉमी, आता भरपूर असलेली शस्त्रे आणि दारूगोळा ही फार महत्त्वाचे पाऊले आहेत असे वाटते. (एका काळात दहशतवाद्यांवर झाडायला सुरक्षा दलांकडे गोळ्या सुद्धा शिल्लक नव्हत्या अशी मुलाखत येवढ्यातच ऐकली आहे.) यामुळे भारताला हलक्यात घेणे आता कोणत्याही देशाला शक्य नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

+१

शाम भागवत
Tue, 01/06/2026 - 07:29 नवीन
+१ निर्वासितांचा मुद्दा मला फारसा माहीत नव्हता. बऱ्याच लोकांना ठार मारलंय हे ऐकलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

देजा वू

कपिलमुनी
Tue, 01/06/2026 - 22:59 नवीन
मादुरो यांनी लोकशाही संस्था, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगावर पूर्ण ताबा मिळवला होता... --- हे सगळ ऐकल्यासारखे वाटते ना ?? स्वायत्त लोकशाही संस्थाचा गैरवापर, हव्या तशा निवडणूक , सर्वोच्च न्यायालयाचे हवे तसे निकाल, निवृत्त न्यायाधीश लाभाची पदे वगैरे ... पण आपला तो बाब्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

याचे उत्तर आपल्याच विरोधी

कंजूस
Wed, 01/07/2026 - 02:30 नवीन
याचे उत्तर आपल्याच विरोधी पक्षांनी शोधायचे आहे. किंवा अमेरिका येथे येऊन व्हेनेझुएला करण्याची वाट पाहायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

धुरळा

अभ्या..
Sat, 01/03/2026 - 16:32 नवीन
सोलापूरच्या निवडणुकीत भाजप उमेदवारासाठी आपल्या वहिनीने अर्ज मागे घेऊन सुद्धा सोशल मीडियावर होणाऱ्या चेष्टेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसे सैनिकाचा भरदिवसा धारदार हत्याराने केला खून.. ... सुप्प्प्पर
  • Log in or register to post comments

आज आर ठाकरे यू ठाकरेंच्या

मदनबाण
Sun, 01/04/2026 - 13:56 नवीन
आज आर ठाकरे यू ठाकरेंच्या भेटीला सेना भवनात गेले आहेत याच्या बातम्या सगळे चॅनलवाले दाखवत आहेत. दोन्ही ठाकरेंची अवस्था बिकट झालेली असल्याने एकमेकांस सहाय्य करु या स्थीतीत दोघे आले आहेत. माझा आता कोणत्याच राजकिय व्यक्तीवर / पक्षावर विश्वास राहिला नसल्याने त्यांची चाललेली सर्कस अधुन मधुन गंमत म्हणुन पाहत असतो. आर ठाकरेंनी काही काळापूर्वी लाव रे तो व्हिडियो हे घोषवाक्य प्रचलीत केले होते आणि धनानंदाचा विरोध करु लागले होते, मग धनानंदाने इडी लावली, सगळा आवाज शांत झाला. मागच्या आठवड्यात धनानंद येशू चे गीत गात होता आज तो बुद्धं शरणं गच्छामि करताना दिसला आहे, धनानंदाला जन की बात करण्यात रस नसुन त्याला केवळ मन की बात करणेच आवडते. ज्यांना मी सारखा सारखा धनानंद धनानंद का करतो आहे हे कळले नसेल तर त्यांच्यासाठी: Chanakya Neeti : The Role of a King - 1

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shaaru Shaaru : Super Sharanya
  • Log in or register to post comments

ह्याट

अभ्या..
Sun, 01/04/2026 - 14:16 नवीन
आता कौटील्य चाणक्याचा वारसा सांगणार्‍या वृंदांनी एकेकाळी ह्याच धनानंदाला चंद्रगुप्त संबोधून तत्कालीन धनानंदाच्या जागी मोठ्य्या कौतुकाने बसवले होते. त्याच्या प्रत्येक बरोबर आणी चुकीच्या कृतीचे "हम करे राष्ट्र आराधन" अश्या समूहगीतात गोडवे गायले होते. विरोधातल्या प्रत्येक आवाजाला देशद्रोहाचे कडेलोट शासन फर्मावले होते. दरवेळी किंगमेकर आम्हीच हाही माज करण्यात अर्थ नाही. भारतवर्षात प्रत्येक ज्ञातीला आणि समूहाला क्रांतीचा आणि क्रांतीकारकांचा इतिहास आहे. प्रत्येक पिढीचा धनानंद वेगळा असेल तर चाणक्य आणि चंद्रगुप्तही वेगळा असणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ह्याच धनानंदाला चंद्रगुप्त

मदनबाण
Sun, 01/04/2026 - 15:22 नवीन
ह्याच धनानंदाला चंद्रगुप्त संबोधून तत्कालीन धनानंदाच्या जागी मोठ्य्या कौतुकाने बसवले होते. चूक. आधीची राजसत्ता राष्ट्र विरोधी होती,भ्रष्टाचारी म्हणुन जनता पर्याय शोधत होती. एका राज्यात कार्य करणार्‍या व्यक्तीला पाहुन जनतेला हा चंद्रगुप्त असेल असे वाटले कारण त्या व्यक्तीने दिलेली अनेक आश्वासने आणि वचने मधुर आणि जनहीतकारी होती, खाणार नाही आणि खाऊ देंणार नाही अशी घोषणा त्याने दिली होती. तसेच त्याच्या पक्षातील इतरांनी देखील आम्ही आयकर नष्ट करु इतपर्यंत आश्वासने दिलेली होती. संदर्भः India's main opposition party debates scrapping income tax as poll nears When BJP considered abolishing income tax to woo middle class त्याच्या प्रत्येक बरोबर आणी चुकीच्या कृतीचे "हम करे राष्ट्र आराधन" अश्या समूहगीतात गोडवे गायले होते. विरोधातल्या प्रत्येक आवाजाला देशद्रोहाचे कडेलोट शासन फर्मावले होते. हे ज्यांनी केले असेल ते चूकच होते, मी काय केले ते वरती सांगितलेले आहे. माझे मत २ वेळा दिले तीसर्‍यांदा दिले नाही. दरवेळी किंगमेकर आम्हीच हाही माज करण्यात अर्थ नाही. माज राजसत्ता करते, जनता नव्हे. जनता केवळ पर्याय शोधते,जसा २०१४ ला शोधला होता. भारतवर्षात प्रत्येक ज्ञातीला आणि समूहाला क्रांतीचा आणि क्रांतीकारकांचा इतिहास आहे. क्रांती शिवय बदल घडतं नाही हे सर्वश्रुत आहे! सध्याचा धनानंद वयाची ७५ पूर्ण करुन देखील पद सोडण्यास तयार नाही. त्याच्या पक्षाच्या विचारां नुसार हे वय झालेला व्यक्ती मार्ग दर्शक मंडळात जाऊन बसतो म्हणे! प्रत्येक पिढीचा धनानंद वेगळा असेल तर चाणक्य आणि चंद्रगुप्तही वेगळा असणार आजच्या पिढीचा धनानंद सत्तेत निरंकुष बसलेला आहे.जनतेचे अहीत केले तर राजाचे देखील अहीत होते. तेव्हा जनताच पुढील बदल घडवेल. आपल्या राजसत्तेला बहुधा शाप असावा, कारण जो जो राजा सिंव्हासनावर आरुढ होतो, तो प्रत्येक राजा { जवळपास सर्व,अर्थात अपवाद असतात. } जनतेचे अहीत करतो आणि त्यांची आर्थिक दृष्ट्या पिळवणूक करतो व यवनांची सेवा करतो. तुम्ही स्वतः कधी इथे विरोध केला आहे का? वाच्यता केली आहे का? मी विचारणा करतोय कारण मला तुम्हाला कुठलेही लेबल लावयची इच्छा नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shaaru Shaaru : Super Sharanya
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अर्नबायझेशन मुबारक!

स्वधर्म
Mon, 01/05/2026 - 17:45 नवीन
तुमच्याप्रमाणे काही समर्थक आता थोडे थोडे भानावर येऊ लागलेत, पण अजूनही बहुसंख्य समर्थक आपण अमृत कालातच आहोत, देशाची शान जगात वाढलीय या भ्रमात व "मैने टच किया" नशेतच आहेत. बाकी अर्नबचे कारण म्हणे सुधीर ला १५ कोटीचे कंत्राट दिले व त्याला पुतीनच्या मुलाखतीला बोलावले नाही हे आहे असे मानले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हा.हा.हा... मोदी समर्थन केले

मदनबाण
Mon, 01/05/2026 - 18:05 नवीन
हा.हा.हा... मोदी समर्थन केले तरी काहींना आवडले नव्हते आणि विरोध केला त्याचाही! :))) आज धनानंदचे जय सोमनाथ चालु आहे! :))) ते चादरीच्या बातमीवर मात्र लक्ष ठेवा मात्र! धनानंद हिंदूंच्या सातत्याच्या विरोधाला भीक घालतो का? ते यावेळी पहायचे आहे. अर्नबचे कारण म्हणे सुधीर ला १५ कोटीचे कंत्राट दिले व त्याला पुतीनच्या मुलाखतीला बोलावले नाही हे आहे असे मानले जाते. सुधीर बद्धल काहीच माहित नाही मला, पुतीन चे कारण चर्चेत आले होते. मला मात्र हिरेन जोशी ची गच्छंती झाली [ खरंच झाली की नाही ते मी नीट तपासले नाही. ] ते कारण वाटले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

News nation चानेलचे वार्ताहर

कंजूस
Mon, 01/05/2026 - 18:13 नवीन
News nation चानेलचे वार्ताहर मात्र सर्व कार्यक्रमांना असतात. लाडके आहेत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मला नै ठावूक.

मदनबाण
Mon, 01/05/2026 - 18:33 नवीन
मला नै ठावूक.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ते चादरीच्या बातमीवर मात्र

मदनबाण
Wed, 01/07/2026 - 13:00 नवीन
ते चादरीच्या बातमीवर मात्र लक्ष ठेवा मात्र! SC refuses to hear plea against Prime Minister offering of chadar at Ajmer Sharif Dargah "> SC refuses to hear plea against Prime Minister offering of chadar at Ajmer Sharif Dargah ५ जानेवारी २०२६ रोजी, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अजमेर शरीफ दर्ग्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'चादर' अर्पण करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका (PIL) फेटाळून लावली. न्यायालयाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे: न्यायक्षेत्राबाहेरचा विषय: सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, पंतप्रधानांनी चादर अर्पण करणे हा विषय न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात (Justiciable) येत नाही. याचिका निष्फळ: ८१४ व्या उर्ससाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते पंतप्रधानांच्या वतीने चादर आधीच अर्पण करण्यात आल्याने ही याचिका 'निष्फळ' ठरली असल्याचे न्यायालयाने म्हटले. दिवाणी खटल्यावर परिणाम नाही: सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, या निर्णयाचा अजमेर न्यायालयात प्रलंबित असलेल्या त्या दिवाणी खटल्यावर कोणताही परिणाम होणार नाही, ज्यामध्ये दर्गा हा शिवमंदिराच्या अवशेषांवर बांधल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकेची पार्श्वभूमी: याचिकाकर्ते: ही याचिका 'विश्व वैदिक सनातन संघ'चे अध्यक्ष जितेंद्र सिंह आणि 'हिंदू सेना'चे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी दाखल केली होती. युक्तिवाद: याचिकाकर्त्यांनी असा दावा केला होता की, सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांना राज्य पुरस्कृत सन्मान देणे हे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे. परंपरा: १९४७ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केलेली ही परंपरा तेव्हापासून सलगपणे पाळली जात आहे. एकंदर घडामोडी पाहुन बरे वाटलं, कोणीतरी ही प्रथा मोडीत काढण्यासाठी प्रयत्न तरी करत आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आधीच्च दुवा चुकला आहे,

मदनबाण
Wed, 01/07/2026 - 13:09 नवीन
आधीच्च दुवा चुकला आहे, त्यामुळे परत देतो : SC refuses to hear plea against Prime Minister offering of chadar at Ajmer Sharif Dargah ‘Not justiciable’: SC rejects plea against PM’s ceremonial chadar at Ajmer dargah

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

का पण ?

कॉमी
Wed, 01/07/2026 - 17:33 नवीन
चादर का चढवू नये पंप्रनी ? कोणत्याही सणसमारंभाला शुभेछा देणे, मंदिरांना व इतर धार्मिक स्थळांना भेट देणे ह्या नॉर्मल PR गोष्टी आहेत. ह्यात आक्षेपार्ह काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

याचे कारण मी आधीच इथे दिलेले

मदनबाण
Wed, 01/07/2026 - 19:08 नवीन
याचे कारण मी आधीच इथे दिलेले आहे: https://misalpav.com/comment/1201074#comment-1201074 तसेच तो हिंदू द्वेष्टा होता, हिंदूंचे त्याने मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले होते.. एक गंमत म्हणजे ज्या नेहेरुंच्या नावाने धनानंदाचा पक्ष कंठशोष करत असतो त्यांनीच चालु केलीली परंपरा धनानंद आज पर्यंत चालवत आहे. :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

चिश्तींचा दर्गा अनेक

कॉमी
Wed, 01/07/2026 - 22:35 नवीन
चिश्तींचा दर्गा अनेक वर्षांपासून मुस्लमानांसोबत बऱ्याच हिंदूंचेही श्रद्धास्थान आहे. आजचा कॉन्टेक्स्ट सोडून इतके मागचे मुर्दे उखाडणे हे कोणत्याही दिशेस जाऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

चिश्तींचा दर्गा अनेक

मदनबाण
गुरुवार, 01/08/2026 - 08:47 नवीन
चिश्तींचा दर्गा अनेक वर्षांपासून मुस्लमानांसोबत बऱ्याच हिंदूंचेही श्रद्धास्थान आहे. त्याने इतिहास आणि सत्य दोन्ही बदलत नाही. आजचा कॉन्टेक्स्ट सोडून इतके मागचे मुर्दे उखाडणे हे कोणत्याही दिशेस जाऊ शकते. :))) यापुढे माझ्या बाजुने मी तुमच्या कोणत्याच प्रतिसादास उत्तर देणार नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- RANU BOMBAI KI RANU... : | RAMU RATHOD | LIKHITHA | KALYAN KEYS | PRABHA | RATHOD TUNES
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

<सध्याचा धनानंद वयाची ७५

रामचंद्र
Mon, 01/05/2026 - 20:58 नवीन
<सध्याचा धनानंद वयाची ७५ पूर्ण करुन देखील पद सोडण्यास तयार नाही.> सदर व्यक्तीला तिच्या समर्थकांचा, मातृसंस्थेचा जबरदस्त पाठिंबा असेल आणि दोन्हीही कुठल्याही विधिनिषेधांची फारशी तमा न बाळगणारी मंडळी असतील तर संबंधित व्यक्ती आपणहून पदत्याग करील ही अपेक्षा बाळगणं व्यर्थ आहे. आणि जोरात चाललेला व्यवसाय स्वतःहून बंद करण्याची किती उदाहरणं आपल्याला व्यवहारात दिसतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

पुढच्या निवडणुकीत ते नसणार.

कंजूस
Wed, 01/07/2026 - 02:27 नवीन
पुढच्या निवडणुकीत ते नसणार. काळजी करू नका. इतर खासदारांचेही तिकिट पुढच्या वेळी कापले होते. मुद्दा आपल्या सैन्याचा सेनापती कोण हा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

देशाचं भवितव्य हा मुद्दा

रामचंद्र
Wed, 01/07/2026 - 13:46 नवीन
देशाचं भवितव्य हा मुद्दा बाजूला ठेवल्यास, जर शरद पवार अजूनही राजकारणात सक्रिय राहण्यात काही गैर नाही तर नरेंद्र मोदीही त्यांच्या पाठिराख्यांच्या बळावर सक्रिय राहिले तर त्याला नाही कसं म्हणायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात

आग्या१९९०
Wed, 01/07/2026 - 14:05 नवीन
हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात ७५ नंतर शाल नारळ द्यायची पद्धत आहे, त्यात भेदभाव का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

साक्षात अवतारी नरपुंगव हा

रामचंद्र
Wed, 01/07/2026 - 16:43 नवीन
साक्षात अवतारी नरपुंगव हा नियमाला अपवाद ठरू शकत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात

सुबोध खरे
Tue, 01/13/2026 - 19:23 नवीन
हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात ७५ नंतर शाल नारळ द्यायची पद्धत आहे, त्यात भेदभाव का? पूर्व ग्रह असला कि सगळं उलटंच दिसतं Atal Bihari Vajpayee[1] (25 December 1924 – 16 August 2018) Prime Minister of India In office 19 March 1998 – 22 May 2004 श्री अटल बिहारी याना कुणी कुठे नारळ दिला Lal Krishna Advani (born 8 November 1927) is an Indian politician and statesman who served as the Deputy Prime Minister of India from 2002 to 2004 under Atal Bihari Vajpayee. केवळ मोदी द्वेष सोडला तर काहीही दिसत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

वैफल्यग्रस्त मंडळींचं

सुबोध खरे
Wed, 01/07/2026 - 10:03 नवीन
वैफल्यग्रस्त मंडळींचं अरण्यरुदन नव्या वर्षात पण जोरात चालू असल्याचे दिसते आहे. चालू द्या.
  • Log in or register to post comments

पेनी वाईज अ‍ॅन्ड पाऊंड फुलिश

चंद्रसूर्यकुमार
Wed, 01/07/2026 - 10:35 नवीन
अशा लोकांना पेनी वाईज अ‍ॅन्ड पाऊंड फुलिश म्हणता येईल. हे लोक मुद्दे मांडत आहेत ते सगळे चुकीचे आहेत असे कोणीच म्हणू शकणार नाहीत- कदाचित बरेचसे बरोबरही असतील- म्हणजे ते पेनी वाईज झाले. पण सध्याच्या परिस्थितीत मोदींना पर्याय आहेत ते त्यापेक्षा कितीतरी वाईट आहेत हे ते लक्षातच घेत नाहीत- म्हणजे ते पाऊंड फुलिश झाले. असल्या लोकांना समजावायचा पूर्वी बराच प्रयत्न करायचो पण आता तो प्रयत्न सोडून दिला आहे. एकूणच सुशिक्षित/इंटलेक्च्युअल वर्ग सतत कुरकुर करत असतो. जर असल्या वर्गाच्या तोंडाला सगळेच पक्ष पाने पुसत असतील तर त्यांचे वर्तन पाहता त्या पक्षांचे काही चुकते असे वाटतही नाही. त्यापेक्षा फार बुध्दीची झेप नसलेल्या सामान्य लोकांना नक्की काय योग्य आहे आणि अयोग्य आहे याचे भान अधिक चांगले असते. ते पेनी फुलिश असतील पण पाऊंड वाईज नक्कीच असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बरोबर आहे

स्वधर्म
Wed, 01/07/2026 - 16:03 नवीन
>> अशा लोकांना पेनी वाईज अ‍ॅन्ड पाऊंड फुलिश म्हणता येईल. अगदीच बरोबर आहे सर तुमचे. बघा ना, हे लोक या सरकारच्या धोरणांमुळे डॉलर ची किंमत ९० रूपयाला गेली अशा फालतू बाबीचा कांगावा करत आहेत आणि खाकर्‍यावरील वस्तू सेवा कर कमी करून सर्व देशबांधवांचे केवढे मोठे भले केले ते विसरत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

नवीन वर्षात हॉटेलातील

आग्या१९९०
Wed, 01/07/2026 - 11:09 नवीन
नवीन वर्षात हॉटेलातील गिऱ्हाईके मोजण्याचे कंत्राट रद्द झाले का? सध्या शेजारच्या हॉटेलात जास्त आहात असे आढळून आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+१

अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/07/2026 - 11:42 नवीन
+१ शेजारच्या हाटीलात धागेच धागे आहेत डॉक खरेंचे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

कुठले हॉटेल?

मदनबाण
Wed, 01/07/2026 - 19:51 नवीन
कुठले हॉटेल?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

खांद्याखाली बळकट असलेल्या

सुबोध खरे
Wed, 01/07/2026 - 20:24 नवीन
खांद्याखाली बळकट असलेल्या लोकांशी कुठे वितंडवाद घालायचा? बाकी इथलेच धागे तिथे (मायबोलीवर) प्रकशित केले म्हणू काही लोकांची जळजळ होते आहे हे पाहून अधिक मौज वाटली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

इथलेच धागे तिथे (मायबोलीवर)

मदनबाण
गुरुवार, 01/08/2026 - 08:48 नवीन
इथलेच धागे तिथे (मायबोलीवर) प्रकशित केले ओक्के, मला वाटलं कुठले नविन मराठी संकेतस्थळ सुरु झाले आणि तिथे देखील तुम्ही लिखाण करत आहात.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- RANU BOMBAI KI RANU... : | RAMU RATHOD | LIKHITHA | KALYAN KEYS | PRABHA | RATHOD TUNES
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डॉक साहेब मीपाची अक्षम्य

अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/07/2026 - 20:34 नवीन
डॉक साहेब मीपाची अक्षम्य हेळसांड (दुर्लक्ष) करत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सध्या 6 सदस्य हजर आहेत.

सुबोध खरे
Tue, 01/13/2026 - 19:25 नवीन
सध्या 6 सदस्य हजर आहेत. सुबोध खरे कपिलमुनी प्रकाश घाटपांडे कानडाऊ योगेशु आग्या१९९० प्रचेतस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कोण मिपाची हेळसांड करत आहे?

सुबोध खरे
Tue, 01/13/2026 - 19:26 नवीन
कोण मिपाची हेळसांड करत आहे? हॉटेलचे ग्राहक कमी का झाले हा प्रश्न ग्राहकांचा नसून मालकांचा आणि ते चालवणाऱ्या व्यवस्थापनाचा असतो इतका मूलभूत नियम माहिती नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पण मायबोलीवर धागे काढायचे नी

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/13/2026 - 21:16 नवीन
पण मायबोलीवर धागे काढायचे नी मिपावर फक्त भाजप प्रचाराला यायचं ही हेळसांड नाही तर काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तिथे त्यांच्या एका धाग्यावर

आग्या१९९०
Tue, 01/13/2026 - 21:48 नवीन
तिथे त्यांच्या एका धाग्यावर त्यांची चूक निदर्शनास आणून दिली तर त्यांनी चिडचिड केली. वैतागून तेथून काढता पाय घेऊन आता पुन्हा येथे माणसं मोजणी करू लागले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

निवडणूक प्रचारासाठी घरात का

अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/07/2026 - 13:05 नवीन
निवडणूक प्रचारासाठी घरात का घुसलात अशी विचारणा करणाऱ्या दहिसरमधील मराठी आदिवासी कुटुंबाला एका उमेदवाराच्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. #LokmatMumbai #MumbaiNews #election #dahisar #socialmedia #Viralvideo #CrimeNews https://www.facebook.com/share/r/1DhzwZcUcw/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पाच वर्षापूर्वी लादलेली बंधने

आग्या१९९०
गुरुवार, 01/08/2026 - 16:59 नवीन
पाच वर्षापूर्वी लादलेली बंधने काढून टाकल्याने आता भारतातील सरकारी कंत्राटे चीनसाठी खुली झाली आहे. मेक इन इंडियाचे यश आहे हे. आता चीनच्या सीमेवरील खोड्या बंद पडतील. खूप दिवसांनी दोन दिवसात माझा पोर्टफोलिओ एक लाखापेक्षा अधिक नुकसान दाखवत होता. नुकसान सहन करून १००% कॅश हातात ठेवली. तीस वर्षात प्रथम पूर्ण पोर्टफोलिओ विकला. Enter The Dragon ची भीती वाटतेय.
  • Log in or register to post comments

मागील दहा वर्षापासून आपल्या

आग्या१९९०
Tue, 01/13/2026 - 10:09 नवीन
मागील दहा वर्षापासून आपल्या केंद्र सरकारच्या कारभाराबद्दल मी कायम साशंकच होतो, आता जवळजवळ खात्रीच झाली आहे की हे सरकार चालत नसून दुसरेच कोणी चालवत आहे. देशाच्या आर्थिक स्थितीचे खरे सत्य सामोरे येण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना मी कायम दीर्घकालीन नफ्याचा विचार करत होतो, आता भीतीपायी मी जवळजवळ ह्या बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार सोडून दिला आहे. आतापर्यंतचे सर्वात कमकुवत सरकार देशाला लाभले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

इतर मार्ग?

स्वधर्म
Tue, 01/13/2026 - 15:47 नवीन
आपल्या मताशी सहमत आहे. दुर्दैवाने संपूर्ण र्‍हास झाल्याशिवाय धर्मांध, उजवे व भाजप समर्थक आपली मते उदारमतवादी व पुरोगामी सरकार येऊ देणार नाहीत. म्हणून या वेळी ही पडझड एक दोन वर्षांची नसावी अशी वाईट शंका येत आहे. कदाचित २०४७ पर्यंत असेच राहील. शेअर्स विकून इतरत्र गुंतवणूक करण्यासाठी काही मार्ग तरी उरले आहेत का? म्युचअल फंड, सरकारी रोखे किंवा मुदत ठेवी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

स्वधर्म साहेब दुर्दैवाने

टर्मीनेटर
Tue, 01/13/2026 - 16:22 नवीन
स्वधर्म साहेब दुर्दैवाने उदारमतवादी आणि पुरोगामी विचारांचे समर्थन करणारा कुठला राजकीय पक्षच आज अस्तित्वात नाही... विरोधी पक्ष नामक जे काही अस्तित्वात आहे ते एवढे नालायक आणि कुचकामी आहेत की मतदान करण्याची इच्छाच होत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

विरोधी पक्ष

स्वधर्म
Tue, 01/13/2026 - 17:52 नवीन
विरोधी पक्ष नष्ट करण्याचे सुनियोजित काम गेल्या १० वर्षात झाल्यामुळे तुंम्हाला तसे वाटत असावे. खरोखरच विरोधी पक्ष संपूर्ण नष्ट झाला तर काय होईल असे आपणांस वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

खरोखरच विरोधी पक्ष संपूर्ण

टर्मीनेटर
Wed, 01/14/2026 - 08:28 नवीन
खरोखरच विरोधी पक्ष संपूर्ण नष्ट झाला तर काय होईल असे आपणांस वाटते?
बेबंदशाही (तशी ती सध्याही आहेच म्हणा 😀)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

गुंतवणूकीचे मार्ग

स्वधर्म
Tue, 01/13/2026 - 17:56 नवीन
कॉमी यांना विचारले होते की बाजारातील गुंतवणूक धोक्यात येत आहे असे वाटत असेल तर इतर काही मार्ग आहेत का. बाजाराचा अभ्यास नाही पण असे भीतीचे वातावरण आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

शेअर्स विकून इतरत्र गुंतवणूक

आग्या१९९०
Tue, 01/13/2026 - 19:11 नवीन
शेअर्स विकून इतरत्र गुंतवणूक करण्यासाठी काही मार्ग तरी उरले आहेत का? म्युचअल फंड, सरकारी रोखे किंवा मुदत ठेवी? फार मोठा फंड असेल आणि दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर टॅक्स आणि महागाईचा विचार केल्यास तुम्ही विचारलेले पर्याय फार काही परतावा देऊ शकणार नाही. परंतु अभ्यास असेल आणि थोडा धोका पत्करण्याची तयारी असेल तर, कमोडिटी, एक्विटी डेरीवेटीव , आणि क्रिप्टो करन्सी ह्यात सट्टा लावून थोडेफार पैसे कमावता येतील. दीर्घकालीन मंदी असताना derivatives मधून पैसे कमावणे फार कठीण नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा