✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सध्या काय पाहतेय? ---२०२६

B
Bhakti यांनी
Fri, 01/02/2026 - 12:51  ·  लेख
लेख
1 या रे या stranger things च्या फ्यान लोकांनो इकडे या भावनांचे पाट वाहू द्या stranger things ला भरलेल्या मनाने गुड बाय करू या शेवटचा भाग right side up अक्षरश: दोन तास मनःपटलावर अधिराज्य करतो.वेकना मरणार हे माहितीच होत . पण एल पण गायब होणार होत हे अनपेक्षित होत . सुपरनॅचरल मालिका असं गृहीत चालताना यात सायन्सचा वर्म होल हा कन्सेप्ट हि सिरीज सगळ्यांसाठी बघणीय होते.कारण ते भूत खेत जाम बोर करतात. 2 कोणाचं कौतुक करावं ??? सायकोकायनेटिक क्षमता असलेली इलेव्हन ,मैत्रीने घट्ट विणलेले माइक,लुकास, डस्टिन आणि विल,मॅक्स, धडाकेबाज नॅन्सीचा,स्टीव्ह ,हूपर,जोनाथन,रॉबिन जॉयसी,गोड गोडुली हॉली,डफर, बडबडी एरिका की हेन्री उर्फ वन उर्फ वेकना उर्फ खेकडा भजी(भारतीयांनी दिलेले नाव ) :) की पिसाळलेल्या कुत्र्यासारखे मागे लागणारे डेमोगोर्गनच यांचं करायचं. २०१६ पासून १० वर्षात ५ सीझन आणि ४२ भागांत ही सगळी पात्र आपल्या बरोबरच वाढत होती.हृदयस्पर्शी मैत्रीचा अर्थ पुन्हा पुन्हा पटवून देत होती. ८० च्या दशकातील जुन्या आठवणी पॉप गाण्याने जाग्या होत होत्या https://en.wikipedia.org/wiki/Stranger_Things:_Music_from_the_Netflix_Original_Series ."Running Up That Hill (A Deal with God)" by Kate Bush हे गाणं आता माझी मोबाइल रिंगटोन आहे . यावर इन्स्टावर थेअरी ,कॉमेडी,अशा रीलचा महापूर आला आहे .त्यात मॅक्स समोर गेट आलं तरी वेड्या सारख्या का बडबडत आहे हा प्रश्न असो :),वेकना भाऊने केलेला वेट लॉस,एल सारखी पॉवर आल्याचा विश्वास असो :) 3 4 अहो शेवट ,तुम्ही सस्पेंस ,थ्रिलरवर गोष्ट संपवता तेव्हा हे क्षणिक ठरत .मानवी भावनांना जेव्हा स्पर्श करता तेव्हा ती गोष्ट अमर होते. माईक सगळ्यांना समजून सांगतोय आपलं बालपण आता दूर चाललं आहे ,संपलं आहे .हा खेळ संपला आयुष्याचे नवीन अध्याय आता खेळणार आहोत.... हायला खूप दिवसांनी एखाद्या सीरिजने आनंद दिला ,हसवलं,उत्सुकता वाढवली ,रडवले. हॅट्स ऑफ डफर ब्रदर !!!!!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7087 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

सध्या या सिजनचे २ भाग पाहुन

मदनबाण
Sat, 01/03/2026 - 10:49 नवीन
सध्या या सिजनचे २ भाग पाहुन झाले आहेत. तुमच्या मागच्या भागात कोणीतरी White Tiger सुचवला होता तो देखील पाहिला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Pandit
  • Log in or register to post comments

व्हाईट टायगर.. नेटफ्लिक्सवर

Bhakti
Sun, 01/04/2026 - 20:06 नवीन
व्हाईट टायगर.. नेटफ्लिक्सवर वेगळाच White Tiger सिनेमा पाहिला स्लमडॉग मिलेनियर ची आठवण झाली, झोपडपट्टी ते बिग बॉस पण यात गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुमच्या मागच्या धाग्यात असंका

मदनबाण
Mon, 01/05/2026 - 16:59 नवीन
तुमच्या मागच्या धाग्यात असंका या आयडीने रशियन "टी - ३४" वि. जर्मन "टायगर" असा सामना असे लिहल्याने माझ्या लक्षात राहीले. याचे दुसरे कारण म्हणजे काही काळा पूर्वी M1 Abrams Tank चे फायरिंग माझ्या पाहण्यात आले होते. त्या टँकची एकच फायरिंग पाहुन मी चाट पडलो होतो. केवळ ५ सेकंदाचा शॉट खतरनाक आहे! त्यामुळे तो टॅंकपट पाहण्याची इच्छा मला रोखता आली नाही! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

वेगळा आहे पिक्चर. आवडला का?

असंका
Wed, 01/28/2026 - 19:52 नवीन
वेगळा आहे पिक्चर. आवडला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मागे दिवंगत मिपाकर चौकटराजा

टर्मीनेटर
Wed, 01/28/2026 - 21:24 नवीन
मागे दिवंगत मिपाकर चौकटराजा ह्यांनी 'गन्स ऑफ नेव्हरॉन' हा चित्रपट आवर्जून पाहण्याची शिफारस केली होती म्हणून युट्युबवर तो पाहताना हा चित्रपट सजेशनमध्ये आला आणि पाहीलाही होता. पण रशियन भाषेतला हा चित्रपट त्यावेळी सबटायटल्स वाचत बघितल्याने नावानिशी लक्षात राहिला नव्हता. आता वरच्या प्रतिसादांत 'White Tiger' हे नाव वाचून सर्च केल्यावर वर्षभरापूर्वी तो इंग्लिशमध्ये आल्याचे दिसले. तुम्ही हाच चित्रपट म्हणत असाल तर मला तो त्यावेळीही आवडला असल्याने आता ही इंग्लिश आवृत्ती उद्या किंवा परवा सवडीने पुन्हा बघणार! (अत्ता 'El Camino: A Breaking Bad Movie' बघायचे आधीच ठरवले आहे 😀)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

व्हय जी, आवडला. :)

मदनबाण
Fri, 02/27/2026 - 12:18 नवीन
व्हय जी, आवडला. :) stranger things शेवटी पाहुन संपवली.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

वरील प्रतिसाद @असंका यांना

मदनबाण
Fri, 02/27/2026 - 12:21 नवीन
वरील प्रतिसाद @असंका यांना आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ही मालिका पाहायला सुरुवात

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/03/2026 - 13:30 नवीन
ही मालिका पाहायला सुरुवात करणार, अगदी कोऱ्या मनाने, ब्रेकिंग बैड, बॅटर कॉल सॉल संपली, सध्या फ्रिडम एट मिडनाईट पाहतोय, त्या नंतर स्ट्रेंजर थिंग्स!
  • Log in or register to post comments

stranger things पहिला खंड

कांदा लिंबू
Sat, 01/03/2026 - 22:18 नवीन
stranger things पहिला खंड एकाच रात्री सलग पाहून घेतला. ‌ खूपच आवडला. दुसऱ्या खंडात फार काही विशेष वाटलं नाही, दोन-तीन भाग बघून नंतर सोडून दिला. ‌ आमची अपत्ये मन लावून सगळे खंड सगळे भाग बघत असतात. सध्या त्यांचा पाचवा खंड सुरू आहे. ‌ ते पाहत असतात तेव्हा मीही अधून मधून पाहत असतो. ‌ --- एवढ्या प्रचंड मोठमोठ्या मालिका पाहत बसण्यात मला फार काही रस नाही. ‌ दीड दोन तासांपेक्षा अधिक मोठाले सिनेमेही फारसे पहा वाटत नाहीत. (पण जमताड़ाचे सगळे खंड सगळे भाग दिवसरात्र सलग पाहिले होते. ‌ कालापाणी मालिका संपूर्ण सलग पहिली होती. ‌ क्रिमिनल जस्टिस चे एक एक खंड सलग पाहिले होते. ‌ धुरंदर दोन वेळा थेटरात पाहून झाला.)
  • Log in or register to post comments

@Bhakti, एक अनाहूत सल्ला -

कांदा लिंबू
Sat, 01/03/2026 - 22:24 नवीन
@Bhakti, एक अनाहूत सल्ला - कालापानी आधी पाहिली नसेल तर नक्की पहा आणि त्यातला "अन्नसाखळीत आपण शक्य तेवढ्या वर राहायला हवं" हा विचार, आपल्या लेकीला -- तिला कळेल तेव्हा --समजावून सांगा. https://www.netflix.com/title/81314368?preventIntent=true
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कांदा लिंबू

Stranger things

जुइ
Sun, 01/04/2026 - 03:13 नवीन
Stranger things मालिक अजून तरी पाहिली नाहीय. मध्यंतरी classic गट्टात मोडणारा Sound of music पाहिला. हा सिनेमा सत्यकथेवर आधारीत आहे. अतिशय नयनरम्य सिनेमा आणि कथानकही ओघवते आहे. बर्‍याच काळापासून पाहायचा होता, पण राहून जात होता. गेल्यावर्षी या सिनेमाला ६० वर्ष पूर्ण झाली म्हणून पुन्हा प्रकाशित करण्यात आला होता.
  • Log in or register to post comments

रेग्युलर थिंग्स

हणमंतअण्णा शंक…
Sun, 01/04/2026 - 05:57 नवीन
पहिला भाग आला होता तेव्हा मी तो एका रात्रीत पूर्ण केला होता. दुसरा, तिसरा सगळ्या भागांचे असेच. शेवटच्या भागाचेही तसेच. हा शेवटचा एपिसोड, ख्रिसमस नंतरचे एपिसोड, रात्री बारा ते सकाळी सहा याच वेळात पाहिले. या सिरीजने खूप आनंद दिला. शेवटचा एपिसोड देखिल बेहद्द आवडला. सगळे वाचले हे आवडले. डफर बंधूंना स्क्रीनची भाषा परफेक्ट कळते. शेवटी ज्या पूर्वसुरींवर ते पोसलेले आहेत त्यांना ते कोळून प्यायले आहेत हे जाणवत राहते. ब्राव्हो ब्राव्हो!
  • Log in or register to post comments

शेवटचा एपिसोड देखिल बेहद्द

Bhakti
Sun, 01/04/2026 - 20:08 नवीन
शेवटचा एपिसोड देखिल बेहद्द आवडला. शेवटच्या एपिसोडचा शेवट रडवून गेला!काळ किती पळत राहतो,आपणही त्याच्याबरोबर पळले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

चारचौघी नाटक

Bhakti
Sun, 01/04/2026 - 20:02 नवीन
Image removed. १९९०-९१ ला प्रथम सादर झालेले प्रशांत दळवी लिखित चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित "चारचौघी" नाटक २०२२ lरोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे या कलाकारांच्या साथीने २०२२ ला नाटक ३१ वर्षांनी पुनरुज्जीवित केले होते .मागील वर्षी या नाटकाचे अखेरचे प्रयोग पार पडले.प्रत्यक्ष नाटक पाहायचा योग्य आला नाही आज झी फाईव्ह OTT वर हे नाटक पाहिले.रोहिणी हट्टंगडी याचे संवाद नाही गर्जनाचं.. पितृसत्ताक संस्कृतीला, बंडखोर तरीही पुरुष द्वेष नाही, निर्णय घेतलास तर तो निभावणारी बाई हो ... पूर्ण नाटकभर या गर्जना ठसा पडतात, कानात गुंजत राहतात .रंगमंचावर नाटक पाहू शकले नाही याचे जरा वाईट वाटले. स्त्रीने पितृसत्ताक पद्धतीने आखलेल्या कुंपणातच वागले पाहिजे. ती जरा जरी याहून वेगळी वागली तर ते अनैतिक वा चुकीचे समजले जाते. त्यांनी "चारचौघी" सारखेच वागले पाहिजे .अशावेळी नाटकातील चौघीचे निर्णय या समाजाला कसे पचतील? नाटकातील संवादानुसार ५० वर्षांनंतर कदाचित लागू होतील असे निर्णय आज घेतलं तर उठणाऱ्या वादळाला सामोरं आज जावं लागणारच. आई सावित्रीबाई विवाहित पुरुषाशी लग्न न करता तीन मुलींना जन्म देत एकटी सांभाळते...(आजही अशी उदाहरणे फारच दुर्मिळ आहे) तिच्या तिन्ही मुलींच्या आयुष्यात पितृसत्ताक चाकोरीमुळे वादळ आले आहे. नाटकात अनेक प्रश्नाना वाचा फोडली आहे ...​पुरुषांच्या अनैतिक संबंध समाज सहज पचवतो ?? मठ्ठ पुरुषाला समाज प्रश्न न विचारता त्याच्या बायकोला लढायला लावतो ??(लग्न टिकवायला द्रौपदी प्रमाणे किंवा मातृसत्ताक पद्धतीनुसार बहुपतित्व आज शक्य आहे ?? हे प्रश्न विद्या वैजयंती विंनी आआपापल्या आयुष्यातील घटनांद्वारे सादर करतात आपल्याला विचार करायला भाग पाडतात. अशी काळाच्या पुढची नाटके आली तर यामुळे कुटुंबव्यवस्था धोक्यात येईल अशीही नकारात्मक घंटा समाजात वाजू लागतात.पण नाटकातील वैजयंती कुटुंब वाचवते पण स्वतःचे सत्व हरवते केवळ तडजोडीने ती आता जगणार हे एक आजच्या अनेक स्त्रियांचे प्रातिनैधिक उदाहरणही नाटकात आहे हे विसरता काम नये . विद्या जेव्हा घटस्फोटाची केस लढताना ६- ६ महिने आई वडील दोघांनीही मुल का सांभाळू नये ? एकट्या बाईचीच जबाबदारी आहे का ? हा प्रश्न मांडते तेव्हा तिला एक उलट्या काळजाची आई ठरवलं जाते वडील मात्र इथे नाम निराळेच राहतात .खरंच बाईला तिचे आईपण निभवावे लागते पुरूषाला बापपणाची सक्ती का नाही...किती हास्ययास्पद आहे हे .. विनीचा मी एकाचवेळी दोन्ही पुरुष का निवडू शकत नाही ? हा प्रश्न तर कुठूनच मेंदूत शिरत नाही यावरचे उत्तर तर लांबच !! मग अशा प्रश्नासह बाईने करायचे काय ??? तर तिचे निर्णय तिला योग्य वाटतील ते ठामपणे घ्यायचे काळाच्या परिणामाच्या भीतीशिवाय ..हे नाटकाचे मर्म वाटते . -भक्ती
  • Log in or register to post comments

छान नाटक आहे हे.

कॉमी
Sun, 01/04/2026 - 23:18 नवीन
छान नाटक आहे हे. भरत जाधव आणि प्रशांत दामले ह्यांची अत्यंत टुकार नाटके पाहून आधीच क्वचित नाटक पाहणारा मी, मराठी नाटकांवर चुकीचे मत डोक्यात घेऊन बसलेलो. हे नाटक पाहून मत बदलले. ह्यात विनीचा मुद्दा मला जरा "अतिच" वाटला पण तुम्ही म्हणता तसं आपापला निर्णय घेऊन ठामपणे वाटचाल करणे हा संदेश त्यातून मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

Stranger Things मधला

Bhakti
Tue, 01/06/2026 - 10:35 नवीन
Stranger Things मधला स्टीव्हदादा हॅरिंग्टन Joe Keery चं End of Beginning हे गाणं Spotity US च्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत सुप्रसिद्ध गायिका टेलरताई स्विफ्ट ह्यांच्या गाण्याला मागे सारून पहिल्या क्रमांकावर जाऊन बसलं आहे. दादा सॉलीड गायकही आहे:)
https://youtu.be/Ec08db2hP10?si=pm1zy1fecE3TnR-6
कालपासून स्ट्रेंजर थिंगचा अजून एक एपिसोड येणार या फ्यॅन थेअरीला उधाण आल होत.हो अजून एक भाग येणार तो बिहाइंड द सीन डॉक्युमेंटरी येणार आहे. one last time. watch the never-before-seen behind-the-scenes documentary on the making of Stranger Things 5. january 12th.
  • Log in or register to post comments

गाणं आवडलं! इथे शेअर केल्या

मदनबाण
Wed, 01/07/2026 - 13:03 नवीन
गाणं आवडलं! इथे शेअर केल्या बद्धल धन्यवाद!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

सेव्हन इयर्स इन तिबेट-seven years in Tibet

Bhakti
गुरुवार, 01/08/2026 - 15:44 नवीन
सिनेमाचा परिचय खुप मोठा झाल्याने स्वतन्त्र धागा खाली दिला आहे. http://misalpav.com/node/53421
  • Log in or register to post comments

मध्यरात्रीचे स्वातंत्र्य

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/08/2026 - 18:36 नवीन
मध्यरात्रीचे स्वातंत्र्य (फ्रीडम ऐट मिडनाईट) ही जाळमालिका पाहून संपवली , खरं तर पाश्चात्यांच्या दृष्टीने पाहिलेला आपला इतिहास आवडला! शेवटी जिन्ना आणी गांधी ह्यांच्यात कशी कटुता निर्माण होते वगैरे छान दाखवलं आहे. मस्ट वॉच आहे. त्यानंतर, जॅकलचा दिवस (the day of jackal) हा सारख्याच नावाच्या पुस्तकावर आधारित थरारपट पाहतोय, अतिशय गुंतवून ठेवणारे कथानक, तीन भाग पाहून झालेत.
  • Log in or register to post comments

The Day of the Jackal

जुइ
गुरुवार, 01/08/2026 - 21:18 नवीन
The Day of the Jackal ही Frederick Forsyth यांची अतिशय गाजलेली कादंबरी आहे, आता नाव निघालेच आहे तर वाचावी म्हणते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अरे वा, पुस्तक नी १९७३ ला

अमरेंद्र बाहुबली
Sun, 01/11/2026 - 05:13 नवीन
अरे वा, पुस्तक नी १९७३ ला आलेला नि गाजलेला सिनेमा देखिल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ

जॅकलचा दिवस अर्थात द डे ऑफ द

अमरेंद्र बाहुबली
Sun, 01/11/2026 - 05:12 नवीन
जॅकलचा दिवस अर्थात द डे ऑफ द जॅकल हे जाळमालिका आज अखेर संपली, अतिशय थरारक म्हणावे असे कथानक होते. खूप आवडली. मी स्वतः एक उत्कृष्ट स्नायपर (पब जी मधला :) ) असल्याने फार आवडली! काय ती प्लॅनिंग, काय ते स्नायपर चे शॉट, मुख्य कथानायकाने अतिशय उत्कृष्ट काम केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पाताल लोक पर्व पहिले.

कॉमी
Sun, 01/11/2026 - 14:01 नवीन
पाताल लोक पर्व पहिले. ऍमेझॉन प्राईम. आवडले. बऱ्यापैकी रिॲलिस्टिक कथा वाटली. सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे.
  • Log in or register to post comments

एनोला होम्स १ आणि २

Bhakti
Sun, 01/11/2026 - 19:00 नवीन
Image removed. शेरलॉक होम्सचे तर करोडो चाहते आहेत.पण काय होईल जर त्याला एक बहिणही असेल तीही त्याच्यासारखीच तरबेज आणि धाडसी! एनोला होम्स ही एक काल्पनिक कॅरेक्टर आहे, जी अमेरिकन लेखिका नॅन्सी स्प्रिंगर यांनी २००६ मध्ये सुरू केलेल्या "The Enola Holmes Mysteries" या पुस्तक मालिकेत निर्माण केली. या मालिकेत एनोला ही शेरलॉक आणि मायक्रॉफ्टची खूप लहान बहिण (२० वर्षांनी धाकटी) दाखवली आहे. नेटफ्लिक्सवर खूप लोकप्रिय झालेल्या Enola Holmes १ आणि २ या चित्रपटांमध्ये (मिली बॉबी ब्राउन मुख्य भूमिकेत आहे. एनोला हुशार, निर्भय आणि लढवय्या आहे! अ‍ॅक्शन आणि हृदयस्पर्शी असे हे चित्रपट आहेत. स्ट्रेंजर थिंगमुळे मिली ब्राऊन आवडायला लागली आहे.तिचा डॅमसेल हाही फॅन्टसी चित्रपट पाहिला.
  • Log in or register to post comments

दोन्ही पाहिले आहेत!

जुइ
Sun, 01/25/2026 - 22:35 नवीन
दोन्ही पाहिले आहेत! आवडले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

श्रीगुरूजी सध्या लपून मिपा

अमरेंद्र बाहुबली
Sun, 01/11/2026 - 19:11 नवीन
श्रीगुरूजी सध्या लपून मिपा पाहत आहेत . :)
  • Log in or register to post comments

कुणाला कशाचं, बोडकीला केसाचं!

कांदा लिंबू
Sun, 01/11/2026 - 20:46 नवीन
कुणाला कशाचं, बोडकीला केसाचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

खरंच की!

स्वधर्म
गुरुवार, 01/22/2026 - 17:10 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

यंग शेल्डन -Young Sheldon

Bhakti
Sat, 01/17/2026 - 16:05 नवीन
यंग शेल्डन -Young Sheldon ,माझी कन्याच हा मालिकेची माझ्यासाठी शोधकर्ती आहे .टी ही मालिका पाहत असताना ,तिच्यासोबत याचे अर्ध्या तासाचे दोनच भाग पाहिले आणि या शेल्डन प्रेमातच पडले.आता आम्ही दोघी याचे रोज एकत्र भाग पाहतो.... तेव्हा हास्यांचा एक कल्लोळच उठतो. Young Sheldon अमेरिकन कॉमेडी टीव्ही सिरीज -९ वर्षांचा शेल्डन कूपरचे एक जीनियस, पण सामाजिकदृष्ट्या वेगळाच मुलगा आहे.त्याचे टेक्ससमधले जीवन,रोजशी अभ्यासू पण अनेकदा बालसुलभ गोष्टींनी भरलेली धमाल यात आहे. तो हायस्कूलमध्ये लवकर जाते कारण त्याचा बुध्यांक उच्चं आहे त्याच्या कुटुंबाशी आई-बाबा, भावंडे,आजी आणि आजूबाजूच्या पात्रांसोबत त्याच्या गमती जमाती पाहायला मजा येते .साधे जीवन यांच्यात त्याची बुद्धिमत्ता कशी बसते हे मजेदार आणि भावनिक आहे.याविषयी शोधताना कळाले की,Young Sheldon ही The Big Bang Theory प्रीक्वेल आहे, ज्यात शेल्डन कूपर या मुख्य पात्राचे बालपण दाखवले आहे.मी The Big Bang Theory चे नाव केवळ ऐकले आणि त्याचे काही रील्स पाहिले नाही. साधारण जे पूर्वीपासून आंतरराष्ट्रीय मालिका पाहायचे त्यांची खूप आवडती मालिका होती हे समजले. Image removed.
  • Log in or register to post comments

+१००

सोत्रि
Fri, 01/23/2026 - 11:37 नवीन
भन्नाट आहे! मी माझ्या मुलांबरोबर बिंज वॉचिंग करून सगळे सीजन्स एका लाँग वीकेंडला संपवून टाकले होते. - (बिंज वॉचर) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

माझी लेक आधीच बडबडी आहे.ती

Bhakti
Sun, 01/25/2026 - 13:28 नवीन
माझी लेक आधीच बडबडी आहे.ती सुद्धा माझ्या घरातली शेल्डन आहे.आजच तिला म्हटलं आजीने सूर्याला दूध उतू घातलं आहे पहा..ती म्हणाली "कशाला सूर्य आपल्यापासून कोटी किलोमीटर दूर आहे.तिथून कसा फीस ..फीस दूध पिणार ??खूप वर्षांनंतर सूर्य रेड जायंट होईल.त्याचा आकार इतका वाढेल की तो पृथ्वी जवळ येऊ शकतो. पृथ्वीवर खूप उष्णता येईल समुद्र उकळतील, आणि पृथ्वी नष्ट होईल .मग कशाला त्याला दूध द्यायचं ???" मी म्हटलं "बाई आज तरी आजीला तुझं ज्ञान देऊ नको फटके खाशील" तिचे असे किस्से एकत्र करून मराठी छोटी शेल्डन मालिका होईल . ;);)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

पाहते लेकीबरोवर

जुइ
Sun, 01/25/2026 - 22:37 नवीन
नेटफ्लिक्स वर आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

हो,आमचा तिसरा सीझन पाहणे सुरु

Bhakti
Tue, 01/27/2026 - 15:52 नवीन
हो,आमचा तिसरा सीझन पाहणे सुरु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ

धन्यवाद!

जुइ
Wed, 01/28/2026 - 01:14 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

आमच्या घरातली शेल्डन आणि मिमो

Bhakti
Sat, 01/31/2026 - 10:44 नवीन
आमच्या घरातली शेल्डन आणि मिमो :) लेक आजीला वेगवेगळ्या विषयातले मार्क सांगत होती .अमक्याला तमुक वगैरे ... ती म्हणाली "फक्त परिसर अभ्यासाला मार्क्स कमी आहेत " आजी म्हणाली ,"तु परिसरात फिरताच नाही ,टीव्हीसमोरच असते ,कसे मार्क्स मिळणार ??" लेक म्हणाली ,"बरोबर आहे ,मी परिसरात अजून फिरायला पाहिजे. " :);)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

एकांकिका: स्वातंत्र्य सौभाग्य.

Bhakti
Mon, 01/19/2026 - 11:01 नवीन
फिरोदिया महाकरंडक अहिल्यानगर पाच दिवस चालला ,३० -४० नाटके सादर झाली .मी मैत्रिणीला भेटायला म्हणून खास तिथे गेले .तर फक्त हे शेवटचे एकुलते एक नाटक पाहायला मिळालं "स्वातंत्र्य सौभाग्य "!!हे नाटक खूपच आवडलं होत ,विचारही करता येणार नाही असे ट्विस्ट यात होते . इतर दर्जेदार नाटके पाहायचे मिसल...याची खंत वाटत होती विशेष योगायोग असा की या नाटकालाच प्रथम पारितोषिक मिळाले हे नंतर समजलं .त्यामुळे मुख्य विजेता नाटक तर आपण पाहिलं याचा योगयोगी आनंद झाला. ही एक स्वातंत्र्य पूर्व काळातील गोष्ट एका जोडप्याची गोष्ट आहे. सौभाग्य ह्या संकल्पनेने आणि संस्कारात वाढलेली मुलगी तिच्या समोर स्वातंत्र्याने झपाटलेला तिचा नवरा त्याच्याशी तिचं लग्न होतं. त्याचे जे नातं स्वातंत्र्य आणि सौभाग्य ह्या दोन्ही गोष्टीने पुढे जातं आणि नंतर तिच्या मधे होणारा परिणाम एकंदरीत ह्या सगळ्याची गोष्ट आहे. एका ओळीत सांगायचं झालं तर, त्या काळात बऱ्याच स्त्रिया ह्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडल्या गेल्या आहेत पण प्रत्येकीचं कारण हे देश न्हवतं तर आधी तिचं सौभाग्य होतं. सादरकर्ते : मुलुंड वाणिज्य महाविद्यालय, मुंबई. तूर्तास तरी हे केवळ ४७ मिनिटांचे नाटक यु ट्यूबवर आहे .(नंतर ते गैरवापर होऊ नये म्हणून यु ट्युबहून काढून टाकले जाते असे समजले) नक्की पाहून घ्या !!! https://www.youtube.com/live/OrkRsl2I0JY?si=2jlhxMYx37WWKRl1
  • Log in or register to post comments

एवढे सगळे कसे बघू शकते ब्वा

चित्रगुप्त
Wed, 01/21/2026 - 20:45 नवीन
मजसारख्या दिवसाचे चोवीस तास मोकळे असणाराला सुद्धा दीर्घ मालिकाच काय, दोन -अडीच तासांचा सिनेमा बघण्याचीही चिकटी नाही, तर तिकडे दिवसभर काम, व्यावहारिक जबाबदार्‍या वगैरे असलेले पब्लिक हे एवढे सगळे कसे बघू शकते ब्वा, असा प्रश्न पडला आहे.
  • Log in or register to post comments

काका, वेबसिरीजचे तेच तर

अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/21/2026 - 21:19 नवीन
काका, वेबसिरीजचे तेच तर वैशिष्ट्य आहे. त्या बघाव्या लागत नाहीतर बघितल्या जातात! आपण फक्त सुरुवात करायची पुढे काय होणार ह्याची उत्सुकता लागून आपोआप तुम्ही पाहत राहता, पाहत राहता नी पाहतच राहता…. तुम्हाला वेळ काढावा लागत नाही वेळ आपोआप निघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

काका, वेबसिरीजचे तेच तर

अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/21/2026 - 21:21 नवीन
काका, वेबसिरीजचे तेच तर वैशिष्ट्य आहे. त्या बघाव्या लागत नाहीतर बघितल्या जातात! आपण फक्त सुरुवात करायची पुढे काय होणार ह्याची उत्सुकता लागून आपोआप तुम्ही पाहत राहता, पाहत राहता नी पाहतच राहता…. तुम्हाला वेळ काढावा लागत नाही वेळ आपोआप निघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

आपण चित्रकार कलाकार आहेत

Bhakti
गुरुवार, 01/22/2026 - 21:01 नवीन
आपण चित्रकार कलाकार आहेत.कलेद्वारे अद्वैत अनुभवता.माझ्यासारखीला सिनेमे पुस्तके मालिका पाहणे (अट -ते सर्वोत्कृष्ट पाहिजे) एक अद्वैतच आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अलाईस ईन बॉर्डरलँड पहिला सीझन

अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/21/2026 - 21:22 नवीन
अलाईस ईन बॉर्डरलँड पहिला सीझन पाहिला, नाही आवडला.
  • Log in or register to post comments

ह्या आठवड्यात 'Better call

टर्मीनेटर
गुरुवार, 01/22/2026 - 16:49 नवीन
ह्या आठवड्यात 'Better call Saul' बघायला सुरुवात केली असून जवळपास दिड सिझन पाहून झाला आहे. मस्त आहे! 'ब्रेकिंग बॅड' मधल्या सगळ्यात आवडलेल्या पात्रांपैकी हे एक पात्र असूनही ही सिरीज मी अजूनपर्यंत का बघितली नव्हती हा प्रश्न पडला 😀 ह्या विकएंडला बिंज वॉचिंग करून हिचे सगळे सिझन्स बघून संपवणार 👍
  • Log in or register to post comments

लालो ची एंट्री झाली का? :)

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/22/2026 - 17:21 नवीन
लालो ची एंट्री झाली का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

'लालो' हे नाव परिचयाचे वाटत

टर्मीनेटर
गुरुवार, 01/22/2026 - 17:27 नवीन
'लालो' हे नाव परिचयाचे वाटत नाहीये त्यामुळे बहुतेक अजुन एंट्री झाली नसावी... आज रात्री किमान 2 एपिसोड्स बघीन, त्यात जर एंट्री झाली तर नक्की कळवतो 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

लालो ची एंट्री

टर्मीनेटर
Wed, 01/28/2026 - 09:58 नवीन
"लालो ची एंट्री झाली का? :)"
लाँग विकेंडचा पुरेपूर उपयोग करत "Better call Saul" चे सगळे सहा सीझन्स बघून झाले. लालो ची एंट्री बरीच उशिरा म्हणजे चौथ्या सीझनच्या आठव्या एपिसोडमध्ये झाली एकदाची 😀 'लालो' हे खलनायकी पात्र भारीच आहे! मी हा आठवा एपिसोड दोन वेळा पाहिला असल्याने चांगलाच लक्षात राहिला, अर्थात तो लालो साठी नाही पण त्यात 'ह्युल'ला जेलमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी जिमी आणि किम जे काही उपद्व्याप करतात ते पुन्हा पाहण्यासाठी पुन्हा पाहिला 😂 संपूर्ण सहा सीझन्स मधल्या त्रेसष्ट एपिसोड्स पैकी मला सगळ्यात जास्त आवडलेला (विनोदी) एपिसोड हाच आहे! बाकी सिरीजबद्दल बोलायचे तर साडेपाच सीझन्स पर्यंत खूपच मस्त जमून आली आहे पण पुढे मात्र भरकटल्यासारखी वाटली! शेवट तर अजिबात आवडला नाही, तिथे कथानकाने अक्षरशः 'माती' खाल्यासारखे वाटले. 'क्राईम नेव्हर पेज' वगैरे ठीक आहे, तेच तत्व पाळूनही ह्या सुंदर सिरीजचा शेवट कितीतरी चांगल्याप्रकारे करता आला असता अशी भावना मनात घर करून बसली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मला मात्र शेवट आवडला! शेवटी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/29/2026 - 18:53 नवीन
मला मात्र शेवट आवडला! शेवटी तो कबूल करतो की हायसनबर्ग त्यानेच घडवला! त्यामुळे हायसनबर्गपेक्षा मोठा खलनायक सॉल भासला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

'हायझेनबर्ग कडे रसायनशास्त्राची उत्तम जाण

टर्मीनेटर
Sun, 02/01/2026 - 11:45 नवीन
'हायझेनबर्ग कडे रसायनशास्त्राची उत्तम जाण असल्यामुळे उच्च दर्जाचे मेथ तयार करण्याची कला' एवढी एक गोष्ट सोडली तर कुठलेही स्वकर्तृत्व नसते. त्यामुळे एवीतेवी काही महिन्यांत कॅन्सरने मरणारच असलेल्या वॉल्टर व्हाईटला हायझेनबर्ग म्हणून घडवण्यात सॉल सहित अनेकांनी आपापल्या स्वार्थासाठी हातभार लावलेला असतो. त्याच्यापेक्षा टूको सालामांका , अपंगत्व आलेला डॉन हेक्टर, गुस्तावो फ्रीन्ज हे खरेखुरे खलनायक तर लांबच ठेऊ, पण टोड सारखा भाडोत्री गुंड/मारेकरीही मला कितीतरी मोठा खलनायक वाटतो 😀 त्याच्यात 'खलनायक' म्हणवण्याचे एकजरी लक्षण असते तर पहिले त्याने आपली बायको स्कायलरला गोळी घालून ठार मारलेले दाखवायला हवे होते. तेवढी हिम्मत बायकोच्या ताटाखालचे मांजर असलेल्या ह्या मास्तरकडे नसते हे देखील एकवेळ मान्य, पण सतत उठता-बसता लोकांचे मुडदे पाडणाऱ्या सराईत गुन्हेगार लोकांच्या सहवासात राहणाऱ्या ह्या मास्तराने त्यांच्याकडून तरी हे काम करून घेतले असते तरी मी एकवेळ त्याला खलनायक मानायला आनंदाने तयार झालो असतो 😂 मला ब्रेकिंग बॅड हि सिरीज खूप आवडली असली तरी 'हायझेनबर्ग' हे त्यातले 'एक महत्वाचे पात्र' ह्यापलीकडे जास्त काही वाटले नाही! कदाचित त्याआधी नार्कोज आणि नार्कोज: मेक्सिको पाहिलेल्या असल्यामुळे त्यातल्या मेडलिन आणि कॅली ड्रग कार्टेल्स पुढे आणि 'पाब्लो एस्कोबार' आणि 'मिगेल एंजल' सारख्या ड्रग लॉर्ड्स पुढे 'हायझेनबर्ग' हा शाळा-कॉलेज मास्तर अगदीच 'चिंधीचोर' ड्रग लॉर्ड वाटला असल्याचा तो परिणाम असू शकतो. तसेच सॉलचे व्यक्तिमत्व उभे करण्यासाठी बेटर कॉल सॉल'च्या सुमारे साडेपाच सीझन्समध्ये खूप मेहनत घेतली आहे आणि त्यावरून 'आपल्या अटी-शर्तींवर स्वतःसाठी अत्यंत सोयीस्कर अशी डील पदरात पाडून घेतलेल्या' सॉल कडून अशी कबुली देण्याचा मूर्खपणा अजिबात अपेक्षित नाही. किमची गोष्ट वेगळी आहे, तिचे पात्र खूप आवडले आहे आणि तीच्या चेहऱ्यावरून तिच्या मनात काय चालले आहे ह्याचा अजिबात थांगपत्ता लागत नाही. तिचे एकदम 'अनप्रेडिक्टेबल' असे स्वभाव वैशिष्ट्य प्रेक्षकांच्या मनावर मस्त ठसवले गेले असल्याने तिचे विक्षिप्त वागणे समजू शकतो, पण सॉल असला काही मूर्खपणा करेल असे खरेच वाटत नाही. एकवेळ कार्टेलच्या कोणातरी सदस्याने किंवा सॉलच्या गुन्हेगारांना वाचवण्याच्या वकिली डावपेचांमुळे अन्याय झालेल्या एखाद्या व्यक्तीने गोळी घालून त्याला ठार मारलेले दाखवले असते तरी तो शेवट चांगला वाटला असता असे माझे मत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

नार्कोज आणि नार्कोज: मेक्सिको

प्रचेतस
Sun, 02/01/2026 - 11:56 नवीन
नार्कोज आणि नार्कोज: मेक्सिको पाहिलेल्या असल्यामुळे त्यातल्या मेडलिन आणि कॅली ड्रग कार्टेल्स पुढे आणि 'पाब्लो एस्कोबार' आणि 'मिगेल एंजल'
काय नाव काढलंत राव. ह्या दोन्ही मालिका अतिशय उच्च दर्जाच्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

तुमच्या एंगल ने एंड पाहिला तर

अमरेंद्र बाहुबली
Sat, 02/14/2026 - 23:20 नवीन
तुमच्या एंगल ने एंड पाहिला तर खरोखर विचित्र वाटतो. आधी हे लक्षात आले नव्हते. बाकी कीमचे पात्र खरोखर छान झाले आहे. हायज़नबर्गबद्दल म्हणाल तर तो अगदी फिल्मी, टिपिकल व्हिलन नव्हताच, घरात बायकोसमोर भिगीबिल्ली असलेला पण ड्रग साम्राज्याचा सम्राट अश्या दुहेरी भूमिका तो डोके लावून पेलतो. त्याच्या चाली, कन्व्हेनसिंग पावर, क्रूरता हे सगळे अगदी सहज दाखवले आहे. मी तर फैन झाली हायजनबर्गचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

आवरण

कपिलमुनी
गुरुवार, 01/22/2026 - 17:42 नवीन
सध्या आवरण नावाचे एल भैरप्पांचे पुस्तक वाचले. एक आधुनिक , पुरोगामी डाव्या विचारांची स्त्री स्वत:च्या धर्माचा , इतिहासाचा शोध घेते यावर आहे. काश्मीर फाइल्स वगैरे चित्रपटांना प्रोपोगंडा मूव्हि म्हणुन हेटाळले गेले. सध्या ए आर रेहमान छावा चित्रपटाला द्वेषपूर्ण म्हणाला. पण या गोष्टी इतिहासात आहे तशाच घडल्या आहेत , त्या दाखवणे द्वेषपूर्ण असले तरी सत्यच आहे आणि सत्य दाखवायला कसली चोरी ? आवरण मध्ये याच लादलेल्या इतिहासाचे बुरखे फाडले आहेत , टिपू केवळ इंग्रजाविरूद्ध लढला म्हणून त्याची हिंदूविरोधी पापे पुसून महान सेनानी दाखवणे. मूळ दिल्लीची ओळख पुसून मुघल ओळख लादणे , हे काशीपासून ते हंपी पर्यंत आहे , डावे किंवा इंग्रजी इतिहासकार नंतरचे कॉम्ग्रेसी इतिहासकार हे सगळे राजकीय आहे असा प्रचार करतात . पण मौर्यांच्या काळापर्यंत हीन्दू बहुल सिंधू मध्ये आता औषधापुरता हिंदू का राहीला नाही याकडे दुर्लक्ष करतात . पुस्तक सुंदर आहे , शेवट अपूर्ण वाटतो पण तो तुमच्यावर सोडला आहे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा