✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वोट चोरी वर चर्चा

व
विवेकपटाईत यांनी
Fri, 09/05/2025 - 13:39  ·  लेख
लेख
बगीच्यात फेरफटका मारताना निरनिराळ्या लोकांशी भेट होत असते. आजकाल ‘वोट चोरी’चा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. असाच एक तरुण मुलगा भेटला—आयटी क्षेत्रात काम करणारा, अमेरिकन कंपनीत नोकरी करणारा. साहजिकच, स्वतःला महाज्ञानी समजणारा. गप्पा मारताना तो सहज म्हणाला, “ईव्हीएमच्या मदतीने वोट चोरी सहज शक्य आहे.” मी विचारलं, “कसं शक्य आहे? ईव्हीएमला इंटरनेट कनेक्शन नसतं. शिवाय एकदा मतदान झालं की ती मशीन बंद केली जाते—वीजही नसते.” तो म्हणाला, “आज टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. इंटरनेट नसतानाही आकाशीय तरंगांच्या माध्यमातून ईव्हीएममध्ये फेरफार करता येतो.” त्याची गूढ भाषा मला काही समजली नाही. शेवटी मी त्याला म्हटलं, “मला तुझं सगळं पटतंय. ईव्हीएममध्ये वोट चोरी होऊ शकते.” तो खुश झाला. म्हणाला, “म्हणजे राहुल गांधींचे आरोप बरोबर आहेत!” तेवढ्यात मला पार्कमधल्या एका बाकावर एक गृहस्थ टाइम्स ऑफ इंडिया वाचताना दिसले. मी त्याला विचारलं, “आकाशीय तरंगांच्या माध्यमातून या वर्तमानपत्राचं नाव बदलून हिंदुस्तान टाइम्स करता येईल का?” ते माझ्याकडे पाहून म्हणाले, “काका, हे शक्य नाही. कागदावर छापलेले शब्द बदलता येत नाहीत.” मी म्हणालो, “ईव्हीएमचा डेटा जर बदलला, आणि त्यानुसार छापील कागदी स्लिप्स बदलल्या नाहीत, तर चोरी सहज उघडकीस येईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काही निवडणूक क्षेत्रांमध्ये ईव्हीएमसोबत छापील स्लिप्सची मोजणी केली जाते. त्यामुळे वोट चोरी शक्य नाही.” त्याचं तोंड अगदी लहान झालं. म्हणाला, “मला हे माहीत नव्हतं.” बहुतेक त्याने कधीच मतदान केलेलं नसावं.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12452 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

हा वाद म्हणजे आपण उत्तम नोटा

सुबोध खरे
गुरुवार, 09/25/2025 - 10:06 नवीन
हा वाद म्हणजे आपण उत्तम नोटा तयार करण्यासाठी अतिशय उत्तम यंत्रे आणून नोटा तयार केल्या तरी खोट्या नोटा तयार होतातच ना मग त्यापेक्षा विनिमय प्रणाली ( barter system) च चांगली होती हे म्हणण्यासारखे आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या देशात जवळ जवळ १०० कोटी मतदारांसाठी मतपत्रिका छापायच्या सर्व दूर पोचवायच्या तिथून घेऊन यायच्या मोजायच्या आणि वेळेत निर्णय द्यायचा. यात सुद्धा बनावट मतपत्रिका, बूथ कॅप्च्युअरीन्ग पासून सर्व गोष्टींसाठी सुरक्षा पुरवायची आणि हे कशासाठी तर एक बेजबाबदार बिनडोक राजपुत्र जिंकू शकत नाही म्हणून बेफाट वक्तव्य करतो आणि त्याच्या साठी साऱ्या जनतेने त्याच्या तालावर नाचायचे. आणि आजतागायत त्याने आरोप केलेला कोणताही प्रश्न धसास लावलेला नाही किंवा सिद्ध झालेला नाही मुळात इ व्ही एम मुले निवडणूका करण्याचा खर्चच १लाख ३५ हजार कोटी आहे तो किमान पाचपट होईल. मेरा भारत महान चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

निवडणूक आयोगाने वोट चोरीवर

आग्या१९९०
गुरुवार, 09/25/2025 - 10:11 नवीन
निवडणूक आयोगाने वोट चोरीवर उपाय सुरू केले हे उगाचच का? राहुल गांधींमुळे झाले हे पचनी पडत नाही वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हे कशासाठी तर एक बेजबाबदार

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 09/25/2025 - 10:15 नवीन
हे कशासाठी तर एक बेजबाबदार बिनडोक राजपुत्र जिंकू शकत नाही म्हणून बेफाट वक्तव्य करतो आणि त्याच्या साठी साऱ्या जनतेने त्याच्या तालावर नाचायचे. हे कशासाठी करू नये तर एक व्यक्ती ज्याची पदवी खरी की खोटी हे बाहेर जाऊ नये म्हणून कोर्टात जातो… तो जिंकावा म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तो जिंकतोच आहे आणि जिंकणारच

सुबोध खरे
गुरुवार, 09/25/2025 - 10:27 नवीन
तो जिंकतोच आहे आणि जिंकणारच आहे. कारण सामान्य माणसांचा त्याला पाठिंबा आहे. तुम्ही विचार न करता हवे ते आरोप करा काहीही होणार नाही तुमची फडफड, जळजळ आणि चिडचिड चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

सामन्यांचा? खिक्क? निवडणूक

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 09/25/2025 - 10:48 नवीन
सामन्यांचा? खिक्क? निवडणूक आयोग, अडाणी, अंबानी, इडी, सीबीआय, असे सगळे सामान्य मिळून घोळ घालून जिंकवतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

केवढा हा द्वेष!

स्वधर्म
गुरुवार, 09/25/2025 - 14:30 नवीन
>> बेजबाबदार बिनडोक राजपुत्र खरोखरच केवढा हा द्वेष! आणि आपण इतरांना 'मोदी द्वेषाची कावीळ' झालीय असे म्हणता? भाजपच्या इतर क्षमतांबद्दल काही सांगता यायचे नाही पण एखाद्या धर्म, संस्था वा व्यक्ती बद्दल आपल्या समर्थकांच्या मनात एवढा अफाट द्वेष निर्माण करण्याची क्षमता इतर कोणाही नेत्यात वा पक्षात नाही! बाकी एकेका मुद्द्यावर बोलत बसलो तर वेळ लागेल, पण याचा अर्थ असा नाही की तुमचे इतर मुद्दे वादातीत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+१

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 09/25/2025 - 15:17 नवीन
+१ सार्वजनिक न्यासावर खालच्या पातळीवर टीका करणं हे अत्यन्त हीन मनोवृत्ती दाखवतं. असे स्वत डॉक्टर खरेच म्हणून गेलेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

इविएम घोटाळ्यावर संशय

कंजूस
Wed, 09/24/2025 - 07:02 नवीन
इविएम घोटाळ्यावर संशय असणाऱ्यांना मात्र त्यांचा झालेला विजय नि:संशय पाक असल्याबद्दल खात्री वाटते हे विशेष.
  • Log in or register to post comments

जाऊ द्या हो

सुबोध खरे
Wed, 09/24/2025 - 10:03 नवीन
जाऊ द्या हो कर्नाटक, बंगाल, तामिळनाडू, बिहार येथे इ व्ही एम का हॅक होत नाहीत याचं उत्तर द्यायच नाही. आणि बाकी ठिकाणी जेथे भाजप जिंकतंय तेथेच फक्त इ व्ही एम हॅक केलं जातंय. वरच्या सारख्या राज्यात सुद्धा इ व्ही एम हॅक करून ३/४ बहुमत मिळवता येईल कि. हे असं का कोणी बोलत नाही? आकाशातील ग्रहांची शांती करता येते दुराग्रहाची नाही.
  • Log in or register to post comments

भाजप समर्थकाना डिफेंड करता

अमरेंद्र बाहुबली
Wed, 09/24/2025 - 10:53 नवीन
भाजप समर्थकाना डिफेंड करता यावे हे कारण देऊन म्हणून कदाचित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बाडिस!!

नावातकायआहे
Wed, 09/24/2025 - 16:18 नवीन
आकाशातील ग्रहांची शांती करता येईल "कदाचित"! पण मोदिळ झालेल्या दुराग्रह्यांची नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कदाचित! ))=((

सुबोध खरे
Wed, 09/24/2025 - 11:35 नवीन
कदाचित! ))=((
  • Log in or register to post comments

मुळात राहुल गांधी ने उचलले ला

गणेशा
गुरुवार, 09/25/2025 - 10:50 नवीन
मुळात राहुल गांधी ने उचलले ला वोट चोरी चा मुद्दा रास्त होता.. मुद्दामून एका नावाचे किंवा खोटे मतदार दाखवून मते फिरवली जातात.. मुद्दामून काही नावे add तर काही नावे गहाळ केली जातात, आणि त्या गहाळ जागेवर नविन नावे add केली जातात.. आणि खोटेच मतदार उभे केले जातात. वगैरे वगैरे.. तो मुद्दा बरोबर आहे का चूक हे न्यायालय ठरवेल.. परंतु त्या नंतर वरती मूळ लेखात तरुणांने उचललेला evm चा मुद्दा विनाकारण राहुल गांधीच्या मुद्द्याला दाबण्याचा प्रयत्न वाटतो आहे.. आणि Evm बद्दल काही बोलून उपयोग नाही.. बदलणार नाही.. नशीब लाल कृष्ण अडवाणी यांनी evm हॅक चा पहिला आरोप केला होता.. Evm हॅक नसेल होत, तर evm चोरून हॉटेल वर सापडणे, वगैरे का गेले जात असावेत? मागे वाचलेले राजस्थान निवडणुकी वेळेस.. असो.. मोदीजी आणि भाजप धुतल्या तांदळा सारखे साफ आहेत, त्यामुळे evm वर शंका घेणे किंवा वोट चोरी वर बोलणे म्हणजे सूर्या वर थुंकण्या सारखे आहे महाराष्ट्रा पुरते बोलायचे झाले तर शिंदे मार्फत सेना आणि अजित पवार मार्फत राष्ट्रवादी यांची सांगड झालीच आहे.. मग भ्रष्ट कोण तर जे bjp मध्ये आले नाहीत ते?
  • Log in or register to post comments

Evm हॅक नसेल होत, तर evm

विवेकपटाईत
Sun, 09/28/2025 - 08:10 नवीन
Evm हॅक नसेल होत, तर evm चोरून हॉटेल वर सापडणे, वगैरे का गेले जात असावेत? मागे वाचलेले राजस्थान निवडणुकी वेळेस.. जिथे ईव्हीएम असते तिथे टाळे आणि सील लागलेली असते. बाहेर प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते असतात. अर्थात हे होणे शक्य नाही. या फक्त अफवाह असतात. राहूल गांधीला हा विवाद न्यायालयात न्यायचाच नाही. कारण आधीच अनेकदा कोर्टात ते माफी मागून चुकले आहे. योगेन्द्र यादव अनुसार मुद्दा फक्त निवडणूक आयोगावर विश्वास उडविण्याचा आहे. त्याच साठी राहूल गांधी हे करत आहे. त्यात त्यांना काही सफलता ही मिळत आहे.
  • Log in or register to post comments

भाजप नेत्यांच्या कारमध्ये

अमरेंद्र बाहुबली
Sun, 09/28/2025 - 10:21 नवीन
भाजप नेत्यांच्या कारमध्ये ईव्हीएम सापडल्याच्या अनेक बातम्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

कारमध्ये ईव्हीएम

कर्नलतपस्वी
Sun, 09/28/2025 - 11:07 नवीन
विरोधी पक्षाचे कार्यकर्ते एवढे दयाळू का आहेत? मी जर सक्रिय सहभाग घेत असतो तर आशा लोकांची उचलबांगडी थेट पोलीस ठाण्यात केली असती. जर पोलीस सरकारभिमुख असतील तर सार्वजनिक रूपाने त्यांचे पितळ उघड पाडले असते.
  • Log in or register to post comments

खिक्क! पोलीस गृह

अमरेंद्र बाहुबली
Sun, 09/28/2025 - 15:07 नवीन
खिक्क! पोलीस गृह मंत्रालयाच्या अंडर काम करतात हे माईत असेलच तुम्हाला, त्यामुळे प्रकरण दाबले जाणारच! नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

बी बी सी ची या विषयातील शोधपत्रकारिता

स्वधर्म
Sun, 09/28/2025 - 17:39 नवीन
बी बी सी ची या विषयातील शोधपत्रकारिता दुवा: निवडणूक आयोग आणि पोलिसांची कारवाई कुठवर? बीबीसीनुसार बोगस मतदार वाढवले गेले हे सत्य आहे. निवडणूक आयोगाकडेही ही तक्रार आहे. पोलीसांकडे गेले ११ महिने हे प्रकरण पडून आहे. रागा यांच्या म्हणण्यात तथ्य आहे असे बीबीसी च्या बातमीचा एकंदर सूर आहे. वरती कर्नल साहेब पोलिसांकडे जा असे म्हणत आहेत, तर त्याबाबत परिस्थिती ही अशी आहे. बाकी धागाकर्ते पटाईत काका यांच्या मतात फरक पडेल असे नाही, पण ज्यांना निष्पक्ष विचार करायचा आहे त्यांच्यासाठी दुवा दिला आहे.
  • Log in or register to post comments

आता काही सत्यापासून पळ

अमरेंद्र बाहुबली
Sun, 09/28/2025 - 17:45 नवीन
आता काही सत्यापासून पळ काढणारे लोक bbc ला देशद्रोही म्हणतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

बोगस मतदार कमी करण्यासाठी सर

विवेकपटाईत
Fri, 10/03/2025 - 12:21 नवीन
बोगस मतदार कमी करण्यासाठी सर प्रक्रिया राबवली जाते. आज पर्यन्त 13 वेळा राबवली आहे. बिहार मध्ये 43 लाख मते कमी झाली. बाकी बोगस मते कमी होण्याचे दुख कोणत्या पक्षांना आहे. हे सांगण्याची गरज नाही. बाकी तुम्ही निवडणूकीत मतदान केले असेल किंवा निवडणूक ड्यूटी केली असेल( मी अनेकदा केलेली आहे) तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे. प्रत्येक एजेंट जवळ मतदाता सूची असते. बोगस मतदार असेल तर त्याला टोकता येते. निवडणूक संपल्या वर त्याला हस्ताक्षर ही करायचे असते. या शिवाय निवडणूकीच्या तीन महिन्यापर्यंत निवडणूक आयोग आणि कोर्टात ही जाता येते. बाकी कितीही प्रयत्न केला तरी बोगस मते टाकण्याचे पक्ष विशेषकर ज्यांना बांगलादेशी मते पाहिजे. बाकी रागा एका ही केस मध्ये कोर्टात गेलेले नाही. त्यामुळे त्यांच्या म्हणयात किती सत्याचा अंश असतो असता तर त्यांनी अनेकदा कोर्टात माफी मागितली नसती. एवढेच नव्हे बिहार मध्ये सर झाले, कोर्टा समोर ही प्रमाण प्रस्तुत करू शकले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

तुंम्ही कोणते माध्यम पाहता/ वाचता

स्वधर्म
Fri, 10/03/2025 - 18:51 नवीन
>>बाकी रागा एका ही केस मध्ये कोर्टात गेलेले नाही. त्यामुळे त्यांच्या म्हणयात किती सत्याचा अंश असतो असता तर त्यांनी अनेकदा कोर्टात माफी मागितली नसती. एवढेच नव्हे बिहार मध्ये सर झाले, कोर्टा समोर ही प्रमाण प्रस्तुत करू शकले नाही. आपल्या माहितीचा स्त्रोत काय? कोणती माध्यमे वरील प्रमाणे माहिती देत आहेत? माझ्या माहितीनुसार रागा यांनी आयोगाला प्रश्न विचारले आहेत. आयोगाने बदनामीचा खटला वगैरे दाखल केला आहे काय? मतचोरीबाबत माफी कधी मागितली? उलट ते मी सावरकर नसल्याने मुळीच माफी मागणार नाही असे बोलले होते, असे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

Rahul Gandhi ‘unconditionally

सुबोध खरे
Fri, 10/03/2025 - 18:54 नवीन
Rahul Gandhi ‘unconditionally apologises’ to apex court for wrongly attributing ‘chowkidar’ remark to it. https://www.thehindu.com/news/national/rahul-gandhi-unconditionally-apologises-to-sc-for-wrongly-attributing-chowkidar-remark-to-it/article27065672.ece
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

When Rahul Gandhi apologised

सुबोध खरे
Fri, 10/03/2025 - 18:55 नवीन
When Rahul Gandhi apologised to SC over remarks after Rafale verdict https://indianexpress.com/article/political-pulse/rahul-gandhi-supreme-court-rafale-verdict-8516892/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

महितीचा स्त्रोत गूगल करून

विवेकपटाईत
Wed, 10/08/2025 - 12:35 नवीन
महितीचा स्त्रोत गूगल करून स्वत तपासू शकता. बाकी नुकतेच मद्रास उच्च न्यायालयाने एक जनहित याचिका (Public Interest Litigation) “पूर्वग्रहदूषित आणि पुराव्यांशिवाय” असल्याचे सांगून फेटाळली, जी राहुल गांधी यांनी मत चोरीचे आरोप केल्याबद्दल निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी करत होती. ही याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यावरच ₹1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

बीबीसी म्हणजे ब्लफ

विवेकपटाईत
Wed, 10/08/2025 - 12:37 नवीन
बीबीसी म्हणजे ब्लफ ब्राडकास्टिंग कंपनी. बाकी कर्नाटक पोलिस यावर काही करत नाही. त्याचे कारण कर्नाटक पोलीसला विचारा. निवडणूक आयोगाला नाही. बाकी त्या मतदार संघात कोंग्रेस विजयी झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

एक ट्रायल म्हणून, प्रयोग

पाषाणभेद
Sun, 09/28/2025 - 17:52 नवीन
एक ट्रायल म्हणून, प्रयोग म्हणून, कागदावरील मतपत्रीकांवर निवडणूक का होऊ नये? भले हा प्रयोग एखाद्या प्रांतात राबवा.
  • Log in or register to post comments

तसे केले तर त्याना जिंकणे

अमरेंद्र बाहुबली
Sun, 09/28/2025 - 19:40 नवीन
तसे केले तर त्याना जिंकणे कठीण होईल! कारण मतपत्रिका हॅक करता येत नाहीत, (बूथ कॅप्चर केला जाईल म्हणून काही छाती बडवत येतील, पण बूथ कॅप्चर करे पर्यंत प्रशासन झोपा काढते का? हे नाही सांगणार!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

ईव्हीएम आणि १००% VVPAT

आग्या१९९०
Sun, 09/28/2025 - 20:40 नवीन
ईव्हीएम आणि १००% VVPAT दोन्हींची मोजणी केली तर तक्रारीला जागा राहणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मुंबईतील बेस्टच्या पतपेढी ची

रात्रीचे चांदणे
Mon, 09/29/2025 - 01:33 नवीन
मुंबईतील बेस्टच्या पतपेढी ची निवडणूक कशी झालेली. EVM नसेल कदाचित तिथं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आपण महान बुद्धिमान आहात. मत

विवेकपटाईत
Wed, 10/08/2025 - 12:34 नवीन
आपण महान बुद्धिमान आहात. मत पत्र कुणीही सकाळी सिरिज पाहून कागदावर एका तासांत छापू शकतो. तीनपट मतपेटी स्थानीय लोहार ही बनवून देईल. त्यावेळी मतपेट्या बदलल्या जात होत्या. पण सिरीज नंबर असलेली ईव्हीएम डुप्लीकेट बनविणे शक्य नाही. तेच दुखणे विपक्षी दलांचे आहे. वोट चोरी करणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मग भाजप नेते आपल्या गाडीत

अमरेंद्र बाहुबली
Wed, 10/08/2025 - 12:40 नवीन
मग भाजप नेते आपल्या गाडीत इव्हीएम घालून का फिरत होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

निवडणूक आयोग उघडपणे सत्ताधारी

आग्या१९९०
Mon, 10/06/2025 - 23:59 नवीन
निवडणूक आयोग उघडपणे सत्ताधारी पक्षासाठी काम करतंय. सरकारतर्फे रेवडी वाटप, उद्घाटन कार्यक्रम झाल्यावर बिहार निवडणुकांची तारीख जाहीर केली. राहुल गांधींनी वोटचोरी उघडकीस आणली नसती तर रेवडी वाटली असती का?
  • Log in or register to post comments

वोट चोरीचा अर्थ वोट एकाला

विवेकपटाईत
Wed, 10/08/2025 - 12:28 नवीन
वोट चोरीचा अर्थ वोट एकाला दिले आणि गेले दुसर्‍याला. राहुल गांधीने एक ही वोट चोरी उघडकीस आणलेली नाही. बाकी मद्रास उच्च न्यायालयाने एक जनहित याचिका (Public Interest Litigation) “पूर्वग्रहदूषित आणि पुराव्यांशिवाय” असल्याचे सांगून फेटाळली, जी राहुल गांधी यांनी मत चोरीचे आरोप केल्याबद्दल निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी करत होती. ही याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यावरच ₹1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

बिहार निवडणुक

नावातकायआहे
Wed, 10/08/2025 - 19:20 नवीन
पारदर्शकता वाढविण्यासाठी बिहारमधील सर्व मतदान केंद्रांवर १०० टक्के वेबकास्टिंग केले जाईल. मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी पीठासीन अधिकारी ECINET वर मतदारांची संख्या थेट नोंदवतील. सर्वात महत्वाचे: निवडणुक आयोगाचा बिहार निवडणुकीत आंगणवाडी व पोलीस महिलांना "खास" महिलांचे ओळखपत्र पडताळणीस नेमणूक करण्याचा आदेश.
  • Log in or register to post comments

भाजप नेत्यांच्या गाड्या नी

अमरेंद्र बाहुबली
Wed, 10/08/2025 - 20:58 नवीन
भाजप नेत्यांच्या गाड्या नी त्यात ईव्हीएम आहेत की नाही ह्यावर देखील लक्ष ठेवायला पाहिजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

नेहमी प्रमाणे, बातमी पुर्ण न

नावातकायआहे
गुरुवार, 10/09/2025 - 08:51 नवीन
नेहमी प्रमाणे, बातमी पुर्ण न वाचता धुराळा उडवणार्या "रागा" टिम चे पालुपद. आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम: ४ अधिकाऱ्यांना निलंबित, केंद्रावर पुन्हा मतदान. एवढेच वाचले असेलः बातमी "पुर्ण" वाचायची व समजून घेण्याची सवय चांगली असते: https://www.ndtv.com/india-news/assam-assembly-polls-poll-panel-team-hitches-ride-on-bjp-candidates-car-sparks-violence-2404442 तेलंगणा पोटनिवडणुकीसाठी मतदार ओळखपत्र वाटल्याबद्दल खांग्रेसी नेत्यावर गुन्हा दाखल. वोटचोरीची बोंब मारणाऱ्या गॅंगकडे ह्याचे उत्तर आहे का? https://www.ndtv.com/india-news/naveen-yadav-jubilee-hills-hyderabad-leader-charged-for-distributing-voter-ids-is-congress-pick-for-telangana-bypoll-9421056 बिहारमधे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) ८ टक्के (७-१० जागा) मिळण्याचा अंदाज आहे. "बडा घर पोकळ वासा"!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

त्याला बिजेपीत जायचे असेल.

आग्या१९९०
गुरुवार, 10/09/2025 - 09:30 नवीन
त्याला बिजेपीत जायचे असेल. पात्रता फेरीत पास झाला. घ्या शुद्ध करून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

खांद्याखाली बळकट असणाऱ्या

सुबोध खरे
Fri, 10/10/2025 - 10:49 नवीन
खांद्याखाली बळकट असणाऱ्या माणसांशी कुठे वाद घालताय? पादलात तर का पादलात? आणि नाही पादलात तर का नाही पादलात? असली भंपक चर्चा करणाऱ्यांकडून काय निष्पन्न होणार आहे? मुळात राहुल गांधीं सारख्या बिनडोक माणसांची गुलामी करणाऱ्या लोकांच्या बुद्धीची झेप कुठपर्यंत जाणार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

56 इंची ढेरपोट्या समर्थकांनी

अमरेंद्र बाहुबली
Fri, 10/10/2025 - 11:22 नवीन
56 इंची ढेरपोट्या समर्थकांनी भाजप नेते गाडीत ईव्हीएम घालून का फिरतात हे सांगावे! पळ काढणे हे उत्तर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बाडिस!

नावातकायआहे
Fri, 10/10/2025 - 12:11 नवीन
बाडिस! ... पुढे वाचली गीता ... ... .. ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा