✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी-मार्च २०२४

म
माईसाहेब कुरसूंदीकर यांनी
Sat, 03/01/2025 - 22:52  ·  लेख
लेख
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला. जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या. जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले. https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump-white-house-clash-9862068/ https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump-jd-vance-berate-ukaines-zelenskyy चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-plays-russian-response-trump-zelensky-white-house-clash
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
65467 वाचन

💬 प्रतिसाद (548)

प्रतिक्रिया

परिणामी अमेरिकनांना रत्ने

आग्या१९९०
Fri, 03/07/2025 - 14:47 नवीन
परिणामी अमेरिकनांना रत्ने-हिरे महाग मिळतील. तसे होणार नाही. अमेरिकेला दुसरे देशही रत्ने - हिरे निर्यात करतात. त्यांच्यावर. अमेरिकेने भारताइतकी ड्युटी लावली नसल्यास स्वस्त मिळतील. अमेरिकेकडे पर्याय भरपूर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बरोबर

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 03/07/2025 - 15:12 नवीन
ह्या आयात शुल्काचा भारतावर विशेष परिणाम होणार नाही असे खात्रीलायक सांगणारे 'अर्थतज्ञ' विविध चॅनेल्स्वर गेले २/३ दिवस अवतरले आहेत. हसायचे की रडायचे ते कळत नाही.एका तज्ञाला 'मोदी-ट्रम्प भेटीतुन भारताला काय मिळाले? ह्या प्रश्नावर ' अध्यक्ष झाल्यावर सर्वात आधी मोदी-ट्रम्प भेट झाली हेच मोठे यश आहे" असे तो म्हणाला. बाकी वॉट्स-अ‍ॅप विद्यापीठावर जस्टिन ट्रुडो/जिंपिंग ह्यांची यथेच्छ टवाळी करणारे, ट्रम्प ह्यांच्यावर काहीच बोलताना दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

ट्रंपवर कोणीच बोलत नाही

श्रीगुरुजी
Fri, 03/07/2025 - 15:39 नवीन
ट्रंपवर कोणीच बोलत नाही म्हणून इतकी कासावीस होऊ नकोस माईडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माईनी एकहाती धुलाई लावलीय!

अमरेंद्र बाहुबली
Fri, 03/07/2025 - 16:29 नवीन
माईनी एकहाती धुलाई लावलीय! माईडी रॉक्स इतर सगळे शॉक्स! :)
  • Log in or register to post comments

माई हमारी नेती हैं

सिद्धार्थ ४
Fri, 03/07/2025 - 17:19 नवीन
माईंचा डाय हार्ट पंखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ट्रम्पचे टॅरिफ युद्ध थंडावले.

आग्या१९९०
Fri, 03/07/2025 - 21:21 नवीन
ट्रम्पचे टॅरिफ युद्ध थंडावले. कॅनडा, मेक्सिको, चीन समोर नमला ट्रम्प. ३०० बिलियन डॉलर जी ७ आणि युरोपीय देशांनी गोठविलेले असल्याने युक्रेनला मदत करण्यासाठी फंड असल्याने ट्रम्प आणि पुतीन दोघांनाही माघार घ्यावी लागणार. चीनने एकट्याच्या बळावर ट्रम्पला आव्हान दिले , आपले विश्वगुरु काचेतून वाघ सिंहांना आपले दर्शन देण्यात मग्न होते. काय कामाचा असला अजैविक बाहुला.
  • Log in or register to post comments

खी खी! :)

अमरेंद्र बाहुबली
Fri, 03/07/2025 - 21:25 नवीन
खी खी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

तरीपण

स्वधर्म
Fri, 03/07/2025 - 22:09 नवीन
समर्थक जयजयकार करणारच. नमो यांचे काहीच आश्चर्य वाटत नाही. ते नेहमीच मोठमोठ्या घोषणा करतात आणि कधीही रिझल्ट देत नाहीत. चूक तर त्याहूनही मान्य करत नाहीत. बोलण्याच्या बरोबर विरूध्द क्रुती करतात, तरीही भक्त भलामण करतच राहतात याचे खूप आश्चर्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

माहितीच्या अधिकारात वैयक्तिक

आग्या१९९०
Fri, 03/07/2025 - 21:55 नवीन
माहितीच्या अधिकारात वैयक्तिक माहिती मिळणार नाही परंतु नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट २४७ नुसार शंका आल्यास आपली वैयक्तिक माहिती ( सोशल मिडिया, इमेल ई . ) इन्कम टॅक्स विभाग मिळवू शकेल तेही आपल्या परवानगीशिवाय. तुमचे पासवर्ड गेले गोबरात. ह्याला म्हणतात डिजिटल इंडिया.
  • Log in or register to post comments

आयात शुल्क

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 03/08/2025 - 17:28 नवीन
अजून ट्रम्पकडुन काय काय अवहेलना झेलायला लागणार आहे देव जाणे. Because somebody has finally exposed India”: Trump claims New Delhi has agreed to cut tariffs दोन देश जेव्हा आयात शुल्क ठरवतात तेव्हा एकमेकांसमोर बसुनच ठरवत असणार ना? मग आता "भारत खूपच आयात शुल्क लावत होता. आता (मी) त्याला उघडे पाडले आहे'. ह्या डोनाल्डाच्या विधानाचा अर्थ काय? भारतातर्फे कोणीच का विचारत नाही? पियुष गोयल ४-६ मार्च अमेरिकेतच होते. त्यांच्या त्या ट्वीटर(एक्स)वर त्यांनी 'नारी शक्तीला' तर प्रणाम केला आहे पण आपण ट्रम्प जे बोलत आहेत त्यावर किंवा आयात शुल्कावर काहीच भाष्य नाही. गप्प राहण्याच्या बदल्यात कोणाला सोडवण्याचा प्रयत्न होतोय का? https://www.thestatesman.com/india/because-somebody-has-finally-exposed-india-trump-claims-new-delhi-has-agreed-to-cut-tariffs-1503405801.html https://www.youtube.com/watch?v=AVt76PAJsek
  • Log in or register to post comments

नेहरूंच्या काळात अमेरिकेतील

आग्या१९९०
Sat, 03/08/2025 - 18:03 नवीन
नेहरूंच्या काळात अमेरिकेतील आयातीवर भारत १५ - ४०% आयात कर लावत असे आणि अमेरिका भारतीय आयातीवर ३-३५% आयात कर लावत असे. आता नेहरूंना मध्ये कसे आणायचे ह्यावर विचार करत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मग नेहरूंच्या काळात परत जा.

श्रीगुरुजी
Sat, 03/08/2025 - 18:22 नवीन
मग नेहरूंच्या काळात परत जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

माईडे,

श्रीगुरुजी
Sat, 03/08/2025 - 18:26 नवीन
माईडे, नुसतं आरामखुर्चीत डुलत सामना वाचून काहीतरी फेकण्यापेक्षा तुझ्या 'ह्यां'ना आरामखुर्चीतून उठून जरा वाचन व अभ्यास वाढविण्यास सांग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

तुमचं वाचन असेल तर तुम्ही

अमरेंद्र बाहुबली
Sat, 03/08/2025 - 18:36 नवीन
तुमचं वाचन असेल तर तुम्ही उत्तर द्या! पुन्हा पुन्हा माईच्या “ह्याना” मधे आणून उत्तर मिळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गप्प राहण्याच्या बदल्यात

अमरेंद्र बाहुबली
Sat, 03/08/2025 - 18:42 नवीन
गप्प राहण्याच्या बदल्यात कोणाला सोडवण्याचा प्रयत्न होतोय का? अदाणीला माईडे अदाणीला! गुजरातला प्रकल्प पळवणे, गुजराती व्यापाऱ्याना मदत करणे, नी गुजरातला वैभव आणणे हा भारत सरकारचा प्रमुख ३ सुत्री कार्यक्रम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

या महिन्यात राऊत आणि अंधारे

विजुभाऊ
Sat, 03/08/2025 - 18:39 नवीन
या महिन्यात राऊत आणि अंधारे मंडळी शांत बसलेली दिसतेय. मिडीयात त्यांच्याबद्दल बातम्या नसणे हेच एक आश्चर्य आहे
  • Log in or register to post comments

राऊत रोज हल्ला करताहेत! गनीम

अमरेंद्र बाहुबली
Sat, 03/08/2025 - 18:40 नवीन
राऊत रोज हल्ला करताहेत! गनीम बचाव करतोय, आहात कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अगदी अलिकडेपर्यंत मटा,

श्रीगुरुजी
Sat, 03/08/2025 - 18:57 नवीन
अगदी अलिकडेपर्यंत मटा, लोकसत्ता, लोकमत वगैरे वृत्तपत्रे आणि एबीपी माझा सारख्या काही वाहिन्या आजच्या सामनात काय लिहिलंय असं शीर्षक देऊन सामनातली घाण आपल्या वाचकांवर फेकायचे. ज्यांना सामना वाचायचाय ते स्वतः वाचतील, तुमच्या वृत्तपत्रातून का वाचतील? मुळात सामना कोणीच वाचत नाही. २-४ ,हजार प्रती खपतात त्या झोपडपट्टीत कारण सकाळच्या वेळी मुलांना बसवायला आणि पुसायला उपयोग होतो. हे इतर वृत्तपत्रवाले सामना सक्तीने आपल्या वाचकांवर लादायला लागले तेव्हा वाचकांनी ही वृत्तपत्रे वाचणे बंद केले आणि तेव्हा कुबेर वगैरेंचे डोळे उघडले आणि सामनिला म्हणजे राऊत, ठाकरे वगैरेंना प्रसिद्धी देणे बंद झाले. म्हणून आजकाल राऊत, अंधारे वगैरेंचं बरळणं प्रसिद्ध होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

काय राऊत, आंधळे घेऊन बसलाय?

आग्या१९९०
Sat, 03/08/2025 - 19:07 नवीन
काय राऊत, आंधळे घेऊन बसलाय? अमेरिकेत बेकायदा प्रवेश केलेल्या नेपाळी नागरिकांना अमेरिकेने चार्टर विमानाने परत त्यांच्या देशात पाठवले ,तेही हातापायात बेड्या, साखळ्या न घालता , तरीही आपले विश्वगुरु गप्प बसून आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हे वाचलं नसेलच

श्रीगुरुजी
Sat, 03/08/2025 - 19:19 नवीन
हे वाचलं नसेलच Nine Nepali nationals who were living and working illegally in the US were brought to Kathmandu on a chartered flight—handcuffed throughout the journey, said officials. "En route to Kathmandu, their arms and legs were shackled throughout,” a Nepali official who quizzed them after they were handed over to the immigration official told the Post. म्हणून मी मोदीद्वेष्ट्यांना वारंवार सांगतो की कोणतेही आरोप करण्यापूर्वी वाचन करा, अभ्यास करा. पण पालथ्या घड्यावर पाणी. फक्त सामना वाचायचा आणि बरळायला लागायचं हेच यांचं काम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हा पेपर वाचला ,ह्यात

आग्या१९९०
Sat, 03/08/2025 - 20:20 नवीन
हा पेपर वाचला ,ह्यात बेड्यांचा उल्लेख नाही. चार्टर्ड विमानाचा आहे. आपल्या भारतीयांच्या नशिबी संरक्षण दलाचे विमान होते. https://www.aninews.in/videos/world/us-deports-batch-of-8-nepali-nationals-on-first-chartered-flight/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

या वृत्तपत्रापेक्षा

श्रीगुरुजी
Sat, 03/08/2025 - 21:05 नवीन
या वृत्तपत्रापेक्षा नेपाळसंबंधित बातम्यांसाठी काठमांडूचे वृत्तपत्र जास्त विश्वासार्ह नाही का? हातापायात बेड्या घालून मर्सिडीजमधून नेले काय किंवा इनोव्हातून नेले काय किंवा रोल्स रॉयसमधून नेले काय . . . नेपाळी कमी संख्येने असल्याने व भाड्याची विमाने लहान असल्याने ८ नेपाळ्यांसाठी भल्यामोठ्या ३०० प्रवासी क्षमतेच्या विमानाची गरजच नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

२-४ ,हजार प्रती खपतात

अमरेंद्र बाहुबली
Sat, 03/08/2025 - 21:04 नवीन
२-४ ,हजार प्रती खपतात खो खो! ठाकरेद्वेष्ट्या महाराष्ट्रद्रोहीना चक्क खोटे बोलावे लागत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

२-४ हजार हा मी खोटा आकडा

श्रीगुरुजी
Sat, 03/08/2025 - 21:12 नवीन
२-४ हजार हा मी खोटा आकडा सांगितला. प्रत्यक्ष खप २-४ शे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

असत्यवादी हरीचंद्र विषगुरू

अमरेंद्र बाहुबली
Sat, 03/08/2025 - 21:36 नवीन
असत्यवादी हरीचंद्र विषगुरू तुमचा नेता! चालुद्या फेकाफेकी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भारताने आयातशुल्क कमी करण्यास

श्रीगुरुजी
Sat, 03/08/2025 - 19:03 नवीन
भारताने आयातशुल्क कमी करण्यास मान्यता दिली आहे हा ट्रंपचा दावा वाचून ट्रंपचा आपल्या पहिल्या कार्यकाळातील हा दावा स्मरला.
  • Log in or register to post comments

भारताचे उत्तर

श्रीगुरुजी
Sat, 03/08/2025 - 19:05 नवीन
भारताचे उत्तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सध्या भारत अमेरिकेकडून जेवढा

रात्रीचे चांदणे
Sat, 03/08/2025 - 19:05 नवीन
सध्या भारत अमेरिकेकडून जेवढा आयात करतोय जवळ जवळ त्याच्या दुप्पट निर्यात करतोय. अधिक भारतीय अमेरिकेत शिकायला आणि नोकरी साठी आहेत त्याचा फायदा वेगळाच. आणि आपण आपल्या उद्योग धंद्यांना संरक्षण देण्यासाठी आयातीवर अवाजवी कर लावतोय हे ही काय नवीन नाही. भारतीय नसते तर गूगल , मॅक्रसॉफ्ट सारख्या कंपन्या बंद पडतील ह्या असल्या भ्रमात न राहता योग्य पद्धतीने हे प्रकरण हाताळले पाहिजे. सध्यातरी आपल्याला अमेरिकेची भारताला जेवढी गरज आहे त्यापेक्षा आपल्याला अमेरिकेची जास्त गरज आहे. त्यामुळे कुठे ट्रम्प ने भारताचे नाव घेतले आणि आपण शांत का, ह्या असल्या होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करणेच योग्य.
  • Log in or register to post comments

मुळात ट्रंप म्हणतोय ते

श्रीगुरुजी
Sat, 03/08/2025 - 19:10 नवीन
मुळात ट्रंप म्हणतोय ते भारताने मान्य केले आहे का हे अजून माहिती नाही. समजा भारत आयातशुल्क कमी करणार असेल तर त्यात वावगे काहीच नाही. इतकी वर्षे भारत जास्त आयातशुल्क वसूल करीत होता, पण आता अमेरिकेच्या ते लक्षात आल्याने कमी केलं यात चुकीचे काहीच नाही. एखादे दुकान छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने वस्तू विकत असेल व ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर छापील किंमतीत विकायला लागले तर त्यात मानहानी समजण्यासारखे काहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

म्हणजे

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 03/08/2025 - 20:57 नवीन
" इतकी वर्षे भारत जास्त आयातशुल्क वसूल करीत होता, पण आता अमेरिकेच्या ते लक्षात आल्याने कमी केलं यात चुकीचे काहीच नाही" अमेरिकेच्या कधीच लक्षात नाही आले? आणी ते ट्रम्प ह्यांनी आणुन दिले? मग पुर्वीचे ते गॅट आणी आताचे डब्ल्यु-टी.ओ. का काय ते, कशासाठी असते? असो. ह्याआधी आयात शुल्काचे प्रश्न चर्चा करूनच सोडवले जायचे. उ.दा. २०२३ मध्ये अमेरिकेने आयात होणार्या स्टील आणि अल्युमिनियमवर सुऱक्षेच्या कारणास्तव निर्बंध घातले होते. भारताने मग अमेरिकेतुन येणार्या सफरचंद/बदामवरील आयात शुल्क वाढवले होते. नंतर दोन देशांत चर्चा झाली आणि आयात शुल्क कमी केले गेले. https://nationalnutgrower.com/news/india-to-lift-tariffs-on-u-s-almonds-walnuts-and-apples/ २०१९ मध्ये ट्रम्पने भारताला जी एस. पी अंतर्गत मिळणार्या सवलती काढुन घेतल्या. मग भारताने बदाम्/आक्रोड ह्यांवरील आयात शुल्क वाढ्वले. https://www.businesstoday.in/latest/economy-politics/story/from-almonds-to-walnuts-india-plans-to-impose-higher-tariffs-on-some-of-us-goods-sources-206174-2019-06-14 मुद्दा हा की ह्यावेळी भारत गप्प आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भारतिने १९९८ मध्ये अणुचाचणी

श्रीगुरुजी
Sat, 03/08/2025 - 21:10 नवीन
भारतिने १९९८ मध्ये अणुचाचणी केल्याने अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते. ती भारताची मानहानी होती का? त्यावेळी भारताने निर्बंधांकडे दुर्लक्ष करून निर्बंध निष्प्रभ ठरविले होते. आता सुद्धा तसे होऊ शकेल. पण त्यासाठी भारताने आयातशुल्क कमी केले याची अधिकृत घोषणा तर होऊ दे. मुलाचा नुसता साखरपुडा झाला तर लगेच नातवाच्या मुंजीकरता कार्यालय शोधणे सुरू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हो

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 03/08/2025 - 19:43 नवीन
"नुसतं आरामखुर्चीत डुलत सामना वाचून काहीतरी फेकण्यापेक्षा तुझ्या 'ह्यां'ना आरामखुर्चीतून उठून जरा वाचन व अभ्यास वाढविण्यास सांग." अमेरिकेच्या उपाध्यक्षांनी झेलिन्स्कीबरोबर वाद घालत असताना ,झेलिनस्कीनी "आपण युक्रेनला कधी आला आहात का? नसाल तर या " असा प्रश्न विचारला. ह्याला म्हणतात स्वाभिमान. 'आता माझी सटकली"फेम डोनाल्ड ट्रम्प रोज काहीतरी उकरतात, ईतर देशांबद्दल अपमानास्पद बोलतात. कॅनडा,चीन्,मेक्सिको,फ्रान्स्,चीन त्यावर प्रत्युत्तर देतात पण भारत गप्प राहतो. ह्याचा अर्थ काय काढायचा? जर्मनीच्या चॅन्सलरांचे गेल्या महिन्यातले विधान बघा- German chancellor Olaf Scholz slammed as “selfish and self-serving” Donald Trump’s demands for Ukrainian rare earths in exchange for U.S. military aid, in an interview published on Saturday (February 8, 2025). जर्मन परंपरेला साजेल असेच थेट विधान आहे. ट्रम्प खट्टू होतील आणि बी एम डब्ल्यु/ऑडी गाड्यांवर आयात शुल्क वाढवतील.. असली भीती नाही. आता हे सगळे घडत असताना आपले पंतप्रधान कुठे होते? "डोन्लाड ट्रम्प माझे मित्र आहेत "असे पंतप्रधान म्हणतात आणि मित्र म्हणतो-"मी भारताला उघडे पाडले आहे" काय प्रकार आहे हा? पत्रकारांची नेहमी बोलती बंद करणारे एस. जयशंकर लंडनमध्ये म्हणतात- ट्रम्प ह्यांच्या निर्णयांचा दोघांनाही फायदा होणार आहे" गेल्या काही महिन्यात टेस्ला गाड्यांची विक्री कमी झाली आहे. मुंबईत टेस्लाची शो-रूम उघडत आहे. वॉशिंग्टन सफरचंदे/अमेरिकन आक्रोड्/बदाम ह्यावरील आयात शुल्क कमी करण्याच्या विचारात भारत सरकार आहे. ही माहिती भारत सरकार नाही तर ट्रम्प आणि त्यांच्या सरकारमधुन मिळत आहे.!! अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांची भाषा बघा- “The Indian market for agriculture has to open up…Now how you do that, the scale in which you do that (has to be seen). Maybe we should have quotas. Have limits. Be smarter when you have your most important trading partner on the other side of the table. You can’t say it is off the table,” Lutnick said. https://www.thehindubusinessline.com/economy/us-throws-challenge-of-macro-large-scale-trade-agreement-to-include-agriculture-before-india/article69303801.ece आणी आपले पियुष गोयल? वॉशिण्ग्टनला गेले आणि परत आले! मनमोहन सिंग ह्यांना मौनमोहन म्हणणारे मीडियावाले कुठे गेले? आता काय? परत संभल, वक्फ बोर्ड, औरंगझेब?
  • Log in or register to post comments

ट्रंप किंवा वाणिज्य सचिवांनी

श्रीगुरुजी
Sat, 03/08/2025 - 20:17 नवीन
ट्रंप किंवा वाणिज्य सचिवांनी भारतसंदर्भात जो दावा केलाय तो भारताने मान्य केलाय का? चीन परस्पर भारतातील गावांची, राज्याची नावे बदलल्याचे जाहीर करतो. या मूर्खपणाला भारताने प्रत्युत्तर दिले नाही म्हणजे भारत दुबळा ठरतो का? तसेच ट्रंपने केलेल्या दाव्यावर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

म्हणजे

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 03/08/2025 - 23:07 नवीन
"ट्रंप किंवा वाणिज्य सचिवांनी भारतसंदर्भात जो दावा केलाय तो भारताने मान्य केलाय का?" भारताने तो अमान्य तरी केला का? "Somebody Is Finally Exposing India" ह्या ट्रम्प ह्यांच्या विधानाचे खंडन केले पाहिजे असे मोदी/गोयल/जयशंकर, कोणालाच वाटत नाही? हेच विधान बिगर-भाजपाचा पंतप्रधान असताना झाले असते तर मीडियाने/भाजपाने किती धिंगाणा घातला असता? "India for Sale" वगैरे सारखी दोन-चार पुस्तके आली असती.अर्नब गोस्वामीने जो धुमाकुळ घातला असता तो विचारुच नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे

श्रीगुरुजी
Sat, 03/08/2025 - 23:30 नवीन
आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे कोणी काही म्हटले की पुढच्या सेकंदाला लगेच प्रतिक्रिया द्यायची, इतके उथळ नसते. फक्त १ दिवसासाठी पंतप्रधान करा, २४ तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडवून दाखवतो, असला मूर्खपणा फक्त मुर्खांसाठी असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हो, घेतलाय अनुभव ८नोव्हेंबर

आग्या१९९०
Sat, 03/08/2025 - 23:46 नवीन
हो, घेतलाय अनुभव ८नोव्हेंबर २०१६ ला रात्री ८ वाजता. असे काही झटपट नष्ट होत नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

जखम भरली नाही अजून?

श्रीगुरुजी
Sun, 03/09/2025 - 06:25 नवीन
जखम भरली नाही अजून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

विश्वगुरूची ना? **वरचा घाव

आग्या१९९०
Sun, 03/09/2025 - 07:48 नवीन
विश्वगुरूची ना? **वरचा घाव मिरवता येईना आणि दाखवता येईना. अश्वत्थामा झालाय विश्वगुरूचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पत्रकारांची नेहमी बोलती बंद

आग्या१९९०
Sat, 03/08/2025 - 20:26 नवीन
पत्रकारांची नेहमी बोलती बंद करणारे एस. जयशंकर हल्ली तर कायम तणावात दिसतात, चेहरा फ्रेश अजिबात दिसत नाही. भारत सोडून सगळ्या देशांनी ट्रम्प वर तोंडसुख घेतले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

The Indian market for

आग्या१९९०
Sat, 03/08/2025 - 20:34 नवीन
The Indian market for agriculture has to open up हे आमच्या सरकारला सांगायची गरज नाही, वेळोवेळी कृषिमालावरील निर्यातशुल्क कमी करून शेतकऱ्याला देशोधडीला लावायचे काम सरकार करत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

आपण युक्रेनला कधी आला आहात का

रात्रीचे चांदणे
Sat, 03/08/2025 - 19:56 नवीन
आपण युक्रेनला कधी आला आहात का? नसाल तर या हा बाणेदारपणा असेल तर , व्हाइट हाऊसने हाकलून दिल्यानंतरही त्याच अमेरिकेबरोबर मिनरल्स डील करायला तयार होणे ह्याला लाचारी समजायचं का?
  • Log in or register to post comments

तसं ही अमेरिकेने कॅनडा आणि

रात्रीचे चांदणे
Sat, 03/08/2025 - 20:04 नवीन
तसं ही अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिको वरून येणाऱ्या मालांवर कर लावलेला आहे तर भारताविरुद्ध कराची घोषणा केली आहे.
  • Log in or register to post comments

या धाग्यात अमेरिकन तात्या

विवेकपटाईत
Mon, 03/10/2025 - 11:30 नवीन
या धाग्यात अमेरिकन तात्या शिवाय दुसरे काही नसते. दिनांक 9 मार्चला आशियातील सर्वात मोठा ज्यूस काढण्याचे संयंत्र नागपुरात सुरू झाले. संयंत्रची क्षमता 800 टन एका दिवसाची आहे. संत्र्या शिवाय इतर फळांचे ज्यूस ही इथे काढले जाईल. पुढील पाच वर्षांत नागपुरात किमान दहा हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि हजारो शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल. संत्र्याचे भाव 40 टक्के वाढले. 1500 रु वरून 2200 रु प्रति क्विंटल झाले.
  • Log in or register to post comments

तात्या

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 03/10/2025 - 15:31 नवीन
ट्र्म्पाचे सहकारी वाणिज्य सचिव- हॉवर्ड ल्युट्निक- "भारताने रशियाकडून शस्त्रे घेणे बंद करावे. अमेरिकेकडुन शस्त्रे घ्यावीत. ब्रीक्स देशांनी डॉलरशी स्पर्धा करणारा चलन काढण्याचा जो प्रयत्न आहे तोही बंद झाला पाहिजे. असेही ल्युटनिक म्हणाले. दोन दिवसापुर्वीची मुलाखत आहे. https://www.youtube.com/watch?v=HWaNqn5amJw संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सध्या काय करत आहेत सहज शोधुन पाहिले- चॅम्पियन चषक विजेत्या भारताचे त्यांनी अभिनंदन केले. ओमर अब्दुल्ला ५४ वर्षाचे झाले म्हणुन राजनाथ ह्यांनी त्यांचे शुभचिंतन केले. बेंगळुरुत एच ए एलच्या योगदानाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. https://newskarnataka.com/karnataka/bengaluru/rajnath-singh-celebrates-hals-role-in-indias-defence-self-reliance/10032025/
  • Log in or register to post comments

शिमग्याला अजून अवकाश आहे

श्रीगुरुजी
Mon, 03/10/2025 - 16:37 नवीन
शिमग्याला अजून अवकाश आहे माईडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

तरीही उतावीळ ' सोंग '

आग्या१९९०
Mon, 03/10/2025 - 17:21 नवीन
तरीही उतावीळ ' सोंग ' अमेरिकेत जाऊन बसली आहेत तोंड रंगवून घ्यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दाह खूपच वाढलेला दिसतो. काळजी

श्रीगुरुजी
Mon, 03/10/2025 - 17:23 नवीन
दाह खूपच वाढलेला दिसतो. काळजी घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

ट्रम्प

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 03/10/2025 - 19:25 नवीन
ट्रम्पने शिमगा सुरु केलाय. जर्मनी,फ्रान्स,ब्रिटन्,चीन्,कॅनडाचे देशप्रमुख अजिबात न घाबरता रंग लावत आहेत. भारताला ट्रम्पने रंग लावला पण भारत 'वेळ आल्यावर रंग लावु' म्हणतोय. कॅनडा-अमेरिकेचे गेले १५० वर्षे चांगले संबंध आहेत. दोन देशांत तब्बल ८००० कि.मी. सीमा आहे पण नवे पंतप्रधान माईक कार्नी ह्यांनी ट्रम्पना प्रत्युत्तर द्यायला अजिबात वेळ लावला नाही. सुरुवातीला त्यांनी ट्रम्प ह्यांना हॅरी पॉटरमधील 'वॉल्डेमॉर'ची उपमा दिली."मी ट्रम्प ह्याना अजिबात यशस्वी होउ देणार नाही" असे माईक म्हणाले. न घाबरता,कूटनीतीच्या नावाखाली वेळकाढुपणा न करता कॅनडाने जे ठणकावुन सांगितले त्याला म्हणतात खरा राष्ट्रवाद. राष्ट्रवादाचे दुसरे उदाहरण घ्या- Ontario Premier Doug Ford has taken a strong stance against U.S. President Donald Trump’s sweeping tariffs on Canada, vowing to retaliate by cutting energy exports, banning U.S. alcohol and cancelling a $100 million Starlink deal. They Need To Feel Pain https://www.news18.com/world/canada-cancels-100m-starlink-deal-threatens-to-cut-electricity-to-us-over-tariffs-they-need-to-feel-pain-9249872.html आणि आपण? जयशंकर लंडनमधील आपल्या चाह्त्यांचे फोटो टाकुन त्यांचे आभार मानत आहेत. बाकीचे मंत्री भारताच्या क्रिकेट संघाचे कौतुक करत आहेत. ते विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते/सचिव म्हण्तात- ""There is lot of interest in statements coming from United States. I will not go into details"" किती ते घाबरायचे? असो.
  • Log in or register to post comments

अमेरिकेचे ५१ वे राज्य

रात्रीचे चांदणे
Mon, 03/10/2025 - 19:53 नवीन
अमेरिकेचे ५१ वे राज्य म्हटल्यानंतर खर तर कॅनडाने सगळे संबंध तोडून टाकायला पाहिजे होते. पण ते बसले कुटणीतीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

भारताने टेस्ला आणि हर्ले वर

आग्या१९९०
Mon, 03/10/2025 - 20:58 नवीन
भारताने टेस्ला आणि हर्ले वर १००% आयातशुल्क लावल्यास अमेरिका भारताच्या कोणत्या उत्पादनावर तेव्हढेच आयातशुल्क लावेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा