नसे सोय बोलून सत्यात काही
जगाला हवे ते असत्यात राही
उगा मौन राखून विश्वा पहावे
वहात्या जगा वाहुनी तू रहावे
घळे आसवांतून पाषाण लेणी
मुकी साचताना उरी दैव देणी
अबोलाच बोलून गाईल गाणी
स्थितप्रज्ञ राहूनही काळ वाणी
झरे ज्ञान मर्मातले होत ओळी
जरी सांडले वेचले घेत झोळी
शिदोरीच वाटेत ही चालवावी
उपाशी जिवा तेवढी चाखवावी
निसर्गास वाटेल जेही मनाशी
अनाहूत साकार होई जगाशी
जुळल्यास योग कृतीही करावी
नसे अन्यथा शांतता बाळगावी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2872
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली
कविता आवडली
आभारी आहे
In reply to कविता आवडली by विवेकपटाईत
आभारी आहे.
छान.
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
नक्कीच
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नक्कीच लिहित राहीन, आभारी आहे!
मनाचे श्लोक वाचल्यासारखे
मनाचे श्लोक वाचल्यासारखे वाटले!
कविता आवडली!!
मनःपूर्वक आभार!
In reply to मनाचे श्लोक वाचल्यासारखे by अथांग आकाश
आपल्या बहुमोल प्रतिक्रियेसाठी अगदी मनःपूर्वक आभार!
छान रचना.... आवडली !
छान रचना.... आवडली !
शेवटी हेच खरं ... नशिबात असेल तर आख्खी कायनात एकत्र येऊन तुम्हाला मिळेलच याची खात्री करते...
नायतं .. शांत रहायचं
अगदी बरोबर
In reply to छान रचना.... आवडली ! by चौथा कोनाडा
अगदी बरोबर, मनःपूर्वक आभारी आहे!