✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उभा ठाकला

र — रोहन जगताप, Sun, 12/01/2024 - 22:37
भरण्या घडा रिक्त जो सांडलेला खेळण्या उगा डाव हा मांडलेला रडण्या कुठे काळ तो थांबलेला भिडण्या उभा ठाकला पांगलेला
जगाने जरी हारला मानलेला समर्पूण सारे जगा जाणलेला प्रसंगात ओढून तो ताणलेला सुटे बाण लक्ष्याकडे ठाणलेला
दिवा तेवता जागला लाविलेला उभी रात्र सांभाळतो वाहिलेला स्वतः साक्ष अंधार तो राहिलेला असा सूर्य नारायणा पाहिलेला
ललाटात आभाळही फाटलेला एकांतात सारे उरी दाटलेला जमा संपलेलाच तो वाटलेला तयातून साम्राज्यही थाटलेला

प्रतिक्रिया द्या
1271 वाचन

💬 प्रतिसाद (2)

वाह!

निनाद
Wed, 12/04/2024 - 05:36 नवीन
नवकाव्याच्या मुक्तछंद वादळात वृत्तबद्ध काव्याची मशाल पेटवल्याबद्दल अनेक धन्यवाद! छान आहे!
  • Log in or register to post comments

लिहिण्याची प्रेरणा

रोहन जगताप
Wed, 12/04/2024 - 11:40 नवीन
आपल्या प्रशस्तीपर शब्दांनी कविता लेखनाचे समाधान द्विगुणित झाले. अगदी मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा