✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मातृत्वाचा शृंगाररस

ग — गंगाधर मुटे, Sat, 10/19/2024 - 23:35
मातृत्वाचा शृंगाररस चंदन चांदणं गोंदण ल्याली नवथर कांती तनू सुकुमार अर्ध मोकळ्या केसावरती माळून गजरा चंद्राकार कुठे निघाली चंचल रमणी थबकत लचकत हरिणी समान सरकत शेला सावरलेला धरत रोखुनी नयन कमान ठुमकत मुरडत गवळण राधा जणू विहरत यमुनाकाठ गोप बघुनी झाकू पाहते पदराखाली भरला माठ हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार हृदय-चक्षूंना वेधून घेते तन्मीलनाची नमनमिनार अर्ध्या उघड्या पाठीवरती भुरुभुरू केसांचे नर्तन नाभी भवती करुनी रिंगण पिंगा खेळतो द्वाड पवन गुलाब जाई मोहित होई रूप गोजिरे पद्मसमान लपून आडून चोरून बघती फुलामागुनी पिकले पान कुणी म्हणाले शेंग चवळीची कुणी म्हणाले पेवंदी आम कुणी म्हणाले कामुक मैना खुदुखुदू हसुनी रमताराम कुण्या मुलखाची राजपरी ही कुजबुज करती वल्लीशिवार जशी घडविली, तशी मढवली ही रंगीली नटवी नार तव वदली ती प्रसन्नवदना हो मी आहे नटवी नार खळखळ वाहत असतो माझ्या नसानसातुनी रस शृंगार विरक्तीला लुब्ध कराया करीत पीयुषाची पखरण सजणेधजणे, लटक, मटकणे प्रीत लालित्याची उधळण जरी दिसतो तुम्हां दुरुनी माझ्याठायी हा एकच रस परी मी आहे सर्व रसांचा जणू घुसळला अमृतरस कधी असते मी झाशी, अहिल्या मीच कालिकेचा अवतार मी राधिका, मीच मीरेच्या अद्वैत भक्तीचा एकतार मीच कैकेयी, मी कौशल्या मी वनवासी जनकाची लेक मीच देवकी, मीच यशोदा माझे स्वरूप, रूप अनेक मीच भीमाई, मी जीजाऊ मी क्रांतीची ज्योतमशाल पंकामध्येही पंकजाची पालनकर्ती मी मृणाल आदी माया आदी शक्ती सचेतनाची मी सृजक जैवजिवांची उत्पत्ती अन प्रणयरसाची मी पूजक स्त्रित्वाची मी अभय स्वामींनी सजीव सृष्टी माझं बाळ ब्रह्मांडाला व्यापून उरली माझ्या मातृत्वाची नाळ - गंगाधर मुटे 'अभय' ============== अठरा/दहा/चोवीस

प्रतिक्रिया द्या
20567 वाचन

💬 प्रतिसाद (93)

मुळात ती कविता मातृत्वाभोवती

चौकस२१२
गुरुवार, 10/24/2024 - 15:09 नवीन
मुळात ती कविता मातृत्वाभोवती फिरत असल्यामुळे खालील ओळीत जर "मातृत्व" असेल तर माझी उंची १० फूट आणि मी पाण्यावर चालू शकतो ! गोप बघुनी झाकू पाहते पदराखाली भरला माठ! डुचमळते बेचैन उभार पहिली अनेक कडवी हि चांगल्यापैकी जमलेले स्त्रीदेहाचे / वृत्तीचे शृगांरिक वर्णन आहे उगा मातृत्व वैगरे कसली कल्हई लावताय धन्य ते कवीश्वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

तुमच्या प्रतिसादावरून निदान

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 15:50 नवीन
तुमच्या प्रतिसादावरून निदान असे जाणवते की जे तुम्हाला दिसतील तेवढेच खरे असते, बाकी सर्व खोटे असते.. असा तुमचा एकंदरीत समज आहे. आपण उदृत केलेल्या ओळी कवितेच्या विषयाच्या अनुषंगाने मातृत्वाशी निगडित आहेत असे मला वाटते, तुम्हाला नाही वाटत त्याला मी काय करू? ही कविता आहे. साता समुद्रा पलीकडे पोहोचू शकते. कवी काय त्या कवितेसोबत फिरून प्रत्येकाला अर्थ समजावून सांगू शकतो का? ज्याला जेवढा अर्थ लागला तेवढा त्याने घ्यावा. विषय संपला. तुम्हाला शंभर टक्के समजेल अशा कविता कवींनी लिहाव्या.... असल्या तत्त्वज्ञानाला काही अर्थ आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

टीकेचे दोन प्रकार असतात.

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 16:37 नवीन
टीकेचे दोन प्रकार असतात. स्वीकार करण्यायोग्य, सन्मान करण्यायोग्य अस्वीकार करणे योग्य, लाथाडने योग्य सरसकट टिकेचा स्वीकार केला तर लोक एका दिवसात नराला वानर बनवून टाकतील. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

खरंतर तुम्ही अजून पर्यंत

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 16:40 नवीन
खरंतर तुम्ही अजून पर्यंत कवितेवर टीकाच केलेली नाही. तुम्ही केवळ कवीला शहाणपणा शिकवत सुटलेले आहात आणि त्यालाच कवितेवरची टीका समजत आहात. कवीला शहाणपणा न शिकवता कवितेवर वाटेल तशी टीका करा. तो तुमचा अधिकार आहे. कवीला शहाणपणा शिकवणे हाही तुम्हाला अधिकार आहेच... पण तो शहाणपणा स्वीकारायचा की नाकारायचा याचा अधिकार कवीला आहे याचे भान ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

मानवी स्त्री मधील मातृत्व आणि

सुबोध खरे
गुरुवार, 10/24/2024 - 18:57 नवीन
मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो, हे विधान जरा सिद्ध करून दाखवाल का? बाकी "तुमची कविता आणि त्यातील सार, त्याचे काव्यात्मक मूल्य. कवीचे अधिकार आणि सार्वजनिक स्थळावर कविता टाकल्यास वाचकाचे अधिकार" हे मुद्दे वेगळे आहेत. त्यावर कुणी टीका केली तर तुम्ही वसकन अंगावर येता हे काही पटलं नाही. बाकी नाना पाटेकरांच्या सिनेमात म्हटल्याप्रमाणे --लिपस्टिक लावून खिडकीत बसला तर खालून जाणाऱ्या माणसाने "शुक शुक" केले तर चिडचीड करू नये. तेंव्हा आपण फक्त जीवशास्त्राबद्दल बोलू या. '' म्हणजे "मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो" हे विधान सिद्ध करून दाखवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

१ ) मानवी स्त्री मधील मातृत्व

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 19:59 नवीन
१ ) मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्वात प्रचंड फरक असतो . ... हे तुम्हीच सिद्ध करून दाखवा. २ ) आपण वरील एका प्रतिसादात मातृत्व याबद्दल जे निकष मांडले आहेत . ... त्याला मातृत्व म्हणतात, हे सिद्ध करून दाखवा . ३ ) केवळ अपत्य जन्माला घालणे म्हणजे मातृत्व असते हे सिद्ध करून दाखवा. ४) <<<< माणसाने "शुक शुक" केले तर चिडचीड करू नये. >>> असा इतरांना सल्ला देण्याइतपत तुमची काय पात्रता आहे, हे सिद्ध करून दाखवा. ५) तुम्ही दिलेला सल्ला इतरांनी ऐकावा... इतके ते अपात्र कसे आहेत हे सिद्ध करून दाखवा. किंवा ६) इतरांना प्रश्न विचारून त्यांनाच सिद्ध करायला सांगणे . .. यासाठीच तुमचा जन्म झाला आहे . ... हे तरी सिद्ध करून दाखवा. ====== मी तुमचा गुलाम नसल्याची माझी खात्री असल्याने मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास अथवा सिद्ध करून दाखवण्यास बांधील नाही. सबब . .. आपण दुसरा वेठबिगार शोधून त्याचेशी असे वर्तन करावे . .... हि आग्रहाची विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

इतकी चिडचिड करू नका.

सुबोध खरे
गुरुवार, 10/24/2024 - 20:18 नवीन
इतकी चिडचिड करू नका. विधान सिद्ध करता येत नसेल तर सरळ क्षमस्व म्हणून पुढे जावे. उगाच शब्दांचा डोंगर उभा करून दुसर्यालाच त्याचे विधान सिद्ध करून दाखवा हा अट्टाहास आणि दुराग्रह कशासाठी. माझे विधान मी सहज सिद्ध करून दाखवू शकतो परंतु तुमच्या धाग्याचं काश्मीर करायची इच्छा नाही. एक साधे उदाहरण देऊन मी थांबतो राणी मुंगी किंवा राणी माशी केवळ हजारो लाखो अंडी घालते आणि पुढे त्यांचे काहीच करत नाही. तिचा आणि वात्सल्याचा काहीही संबंध नाही त्यांचे सर्व पालनपोषण कामकरी मुंग्या किंवा माश्याच करतात. मानवी मादी असे काही करत नाही. उत्क्रांती मध्ये जसे जसे वर जाता तसा आईचा संगोपनात सहभाग वाढत जातो. हे मूलभूत विधान तुम्हाला मान्यच नसेल तर पुढे चर्चा होणारच नाही बाकी तुमचे आत्मकुंथन आणि "मीच कसा हुशार" चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

पुन्हा सल्ला दिलेल्याच आहे.

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 20:31 नवीन
पुन्हा सल्ला दिलेल्याच आहे. सल्ला देण्याशिवाय ही दुसरी तुम्हाला काही येते का? दुसऱ्याला सिद्ध करायला सांगणार आणि तुम्ही सिद्ध करून दाखवा म्हटलं की दुनियाभराच्या पळवाटा शोधणार. तुमच्यात काही कौशल्य आणि पात्रता असेल तर मी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. नाहीतर क्षमस्व असे म्हणून वाट पकडा. गाठ माझ्याशी आहे. यापूर्वी बरेचदा मी तुमच्याकडे दुर्लक्ष केले. यावेळेस तसे होणार नाही. फैलावर घेतले जाईल याद राखा. स्वतःची थोडीशी तारतम्य जागे करा आणि हा कवितेचा बाफ आहे, इथे कवी बद्दल नव्हे तर कवितेची चर्चा करायची असते इतके उमजून घ्या. कवितेची थोडी जरी जाण असेल आणि थोडी जरी कविता कळत असेल तर तुमच्या आयपतीप्रमाणे कवितेचे पूर्ण अर्थ लिहून दाखवा. वाचायला आवडेल. दरवेळेस कवितेचा धागा फालतूची बडबड करून भरकटवायची तुमची शैली यावेळेस खपवून घेतली जाणार नाही. याद राखा. पुन्हा दुसरे असे की, तुम्ही मला सल्ला सांगावा अशी कोणतीही पात्रता तुमच्यात नाही. त्यामुळे जास्तीचे शहानपण पाजळणे बंद करा. यानंतर मरेस्तोवर मला शहाणपणा शिकवायला यायचे नाही. आणि सल्ला तर अजिबात द्यायचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

राणी मुंगी किंवा राणी माशी

सुबोध खरे
गुरुवार, 10/24/2024 - 20:41 नवीन
राणी मुंगी किंवा राणी माशी केवळ हजारो लाखो अंडी घालते आणि पुढे त्यांचे काहीच करत नाही. तिचा आणि वात्सल्याचा काहीही संबंध नाही त्यांचे सर्व पालनपोषण कामकरी मुंग्या किंवा माश्याच करतात. मानवी मादी असे काही करत नाही. हे वाचलं च नाही का? इतकी चिडचिड नुसतं एक चूक दाखवली तर आणि काय आपली भाषा सुद्धा? दुनियाभराच्या पळवाटा तुमच्यात काही कौशल्य आणि पात्रता असेल गाठ माझ्याशी आहे. स्वतःची थोडीशी तारतम्य जागे करा कवितेचा धागा फालतूची बडबड करून भरकटवायची तुमची शैली यावेळेस खपवून घेतली जाणार नाही. याद राखा. तुम्ही मला सल्ला सांगावा अशी कोणतीही पात्रता तुमच्यात नाही. त्यामुळे जास्तीचे शहानपण पाजळणे बंद करा. यानंतर मरेस्तोवर मला शहाणपणा शिकवायला यायचे नाही. आणि सल्ला तर अजिबात द्यायचा नाही. मुटे बुवा इतकी अर्वाच्च भाषा मला सुद्धा सहज वापरता येते. पण मी सभ्य भाषेत सांगतो आहे तुम्हाला जे करायचं ते करून दाखवाच "याद राखा." "उगाच माझ्याशी गाठ आहे" सारखी फडतूस गावगुंडांची वाक्ये बोलून आपले हसे करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

मुटे बुवा इतकी अर्वाच्च भाषा ....

चौकस२१२
Fri, 10/25/2024 - 06:34 नवीन
सहमत ( कवित्ते वरील टीकेला थोडे जरी समजून घेतले असते या महाशयांनी तरी सकारात्मक बोलणी झाली असती ) त्या ऐवजी "माणूस आणि पशु यातील मातृर्त्व " या बद्दल एक शिक्षित विदयाला हे अक्कल समजावत आहेत ! धन्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

स्पष्ट बोलतो,मुटे साहेब आपला तोल ढासळतोय. सांभाळा.

कर्नलतपस्वी
गुरुवार, 10/24/2024 - 20:53 नवीन
आपली कविता ज्याना आवडली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्यांना नाही पटली त्यांनी न पटणारे मुद्दे उपस्थित केले. आपल्याला ज्या प्रतिक्रीया अनुकूल वाटल्या त्याला स्विकारले व चान चान म्हणले. ज्या प्रतिक्रिया प्रतिकूल होत्या त्यांनाच पचवणे कठिण जात आहे. लिपस्टिक लावून खिडकीत बसलात तर रस्त्यावरून जाणारा शुक शुक करणार हे नागडे सत्य आहे. आपण आपली कविता चव्हाट्यावर आणलीत मिळणाऱ्या प्रतिसादानां सहर्ष सामोरे जावे. अन्यथा..... आपण डाॅ सुबोध खरे यांच्यावर व्यक्तिगत हल्ला केला. तोच प्रश्न आपली लायकी काय हे विचारण्यास उद्युक्त करतो. बरेच सदस्य डाॅ सुबोध खरे यांना अनेक वर्षांपासून ओळखतात.आपण त्यांच्या पात्रतेवर शंका उपस्थित करून आपलीच आपलीच पात्रता चव्हाट्यावर आणली आहे. इतरांना सल्ला देण्याइतपत तुमची काय पात्रता आहे, हे सिद्ध करून दाखवा. मिपावर सर्व सदस्य सन्मानीय, म्हणून कुणालाही कुणाची पात्रता काय हे विचारण्याचा अधिकार नाही. आपला तोल जातोय,सांभाळा स्वताला. नाहीतर डोक्यावर घेणारे केव्हां कुठे कचऱ्यात फेकून देतील कळणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

छान !

धर्मराजमुटके
Wed, 10/23/2024 - 22:06 नवीन
छान ! कवितेत एकूण १६ परिच्छेद (की कडवी) आहेत. त्यापैकी पहिले १० परिच्छेद शृंगार रसाला वाहिले आहेत, ११ व्या परिच्छेदात पहिल्या १० चे सार सांगीतले आहे. १२ व्या कडव्यात वीररस, आणि पुढील ४ परिच्छेदात मातृरस जाणवतो. म्हणजे जर १६ घड्यांत पाणिपुरीचे पाणी आहे. तिखट पाणीपुरी (शृंगार) जास्त लोकांना आवडते त्यामुळे त्याचे प्रमाण जास्त घेतले आहे. ज्यांना वयोमानानुसार तिखट झेपत नाही त्यांच्यासाठी गोड पाणी ठेवले आहे. जर दोन्ही चवी एकत्र घ्यायच्या असतील तर ११ व्या परिच्छेदात दोन प्रकारच्या रसांची घुसळण करुन अमृतरस बनविला आहे. तस्मात वेगवेगळे रस एकत्र केले आहेत असे जाणवत नाही. ११ पर्यंत आणि १२-१६ अशी दुसरी वेगळी कविता आहे. त्यामधे एक अदृश्य रेखा आहे ती फक्त कवीमनालाच जाणवते. एकंदरीत मजकूर पाहता "मातृत्वाचा शृंगाररस" ऐवजी "शृंगाराचा मातृत्वारस" हे शीर्षक जास्त शोभून दिसले असते असे वाटते. असो, मुटे साहेब बरेच दिवसांनी परत आलात याबद्दल अभिनंदन ! लिहिते रहा. राजकीय धागे बंद झाल्यापासून मिपावर होणारी विचारांची घुसळण थांबली होती ती या कवितेच्या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळाली हेही नसे थोडके ! (अवांतर : दहावीच्या मराठीच्या परीक्षेत कवीतेचे रसग्रहण करा हा प्रश्न सोडविल्याचा आनंद मिळाला.)
  • Log in or register to post comments

विस्तृत अभिप्राय बद्दल

गंगाधर मुटे
Wed, 10/23/2024 - 23:12 नवीन
विस्तृत अभिप्राय बद्दल मनपूर्वक आभार. नक्कीच भेटत राहू. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

भेसळ

चौकस२१२
गुरुवार, 10/24/2024 - 08:20 नवीन
११ पर्यंत आणि १२-१६ अशी दुसरी वेगळी कविता आहे. हो हेच तर म्हणणे आहे काहीसे ( तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने मांडलेत ), आणि त्यांची भेसळ विचित्र वाटते एवढेच म्हण्णे आहे पण कवी महाशय मखलाशी करीत राहतात ....असू दे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

"ही रंगीली नटवी नार"

चौकस२१२
गुरुवार, 10/24/2024 - 08:16 नवीन
मातृत्व अर्थात म्हणजे स्त्री आणि स्त्रीचे शारिक सौंदर्य या दोन ची विचित्र भेसळ कशाला हा साधा मुद्दा आहे डॉ खरे यांचं प्रतिक्रयेत "जसे आपल्या आईवडिलांची वासना हि आपल्या जन्मास कारणीभूत आणि अत्यावश्यक असली तरी त्याचे सार्वजनिक अनावरण/ वाचन हे अप्रस्तुत असते. " असा उल्लेख आहे तसेच म्हणेन कि " आईवडिलांचं संभोगातुन आपण निर्माण झालो पण म्हणून एकाच रचनेत "संभोगाचे सौंदर्य आणि आमचे आई वडील " लिहिणे विचित्र वाटते "कुणी म्हणाले शेंग चवळीची कुणी म्हणाले पेवंदी आम" "ही रंगीली नटवी नार" आणि "अहिल्या ( बाई होळकर) एकत्र ? पहिले १० परिच्छेद शृंगार रसाला वाहिले आहेत, आणि ती मस्तच आहेत
  • Log in or register to post comments

<<<मातृत्व अर्थात म्हणजे

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 16:30 नवीन
<<<मातृत्व अर्थात म्हणजे स्त्री>>>> काहीच्या काही वाक्य आहे हे. ----- कुणी म्हणाले शेंग चवळीची कुणी म्हणाले पेवंदी आम" "ही रंगीली नटवी नार" ही रमतारामांची दृष्टी आहे. अहिल्या ( बाई होळकर) हे मातृत्वाने दिलेले उत्तर आहे. ही कविताच रमता राम आणि मातृत्व यांचा संवाद असल्याने दोन्ही एकाच कवितेत एकत्र येणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

डॉक्टर खरे यांचे विधान

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 16:33 नवीन
डॉक्टर खरे यांचे विधान तुमच्यासाठी प्रमाण असेल तर तुम्ही त्यानुसार वर्तन करावे माझी कुठेही मनाई नाही. पण माझ्यासाठी जर प्रमाण नसेल किंवा मला अजिबात पटणारे नसेल तर मी का ऐकावे? तुम्ही आणि डॉक्टर खरे दोघे मिळून का बरं सृष्टीचे नियमन करू पाहता? तुमच्या इशाऱ्यावर अख्खीच्या अख्खी दुनिया चालणार नाही इतके भान ज्या दिवशी तुम्हाला येईल तो दिवस सोन्याचा समजावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

तुम्ही आणि डॉक्टर खरे दोघे

सुबोध खरे
गुरुवार, 10/24/2024 - 19:11 नवीन
तुम्ही आणि डॉक्टर खरे दोघे मिळून का बरं सृष्टीचे नियमन करू पाहता? तुमच्या इशाऱ्यावर अख्खीच्या अख्खी दुनिया चालणार नाही इतके भान ज्या दिवशी तुम्हाला येईल तो दिवस सोन्याचा समजावा. हा निष्कर्ष आपण कशावरून काढला हे समजत नाही. पण आपल्या कवितेला फक्त छान छान म्हणवून घ्यायचं असेल तर सार्वजनिक न्यासावर ती टाकू नये. एखाद्या कविसंमेलनातच वाचन करावे म्हणजे श्रोत्यांचे म्हणणे ऐकायची गरजच राहणार नाही. लिपस्टीक लावून खिडकीत बसलात तर रस्त्यावरून जाणारे "शुक शुक" करणारच एवढे लक्षात ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

कसले नियम ठरवतोय ,, सरळ साधी

चौकस२१२
गुरुवार, 10/24/2024 - 19:20 नवीन
कसले नियम ठरवतोय ,, सरळ साधी टिपण्णी केली कि जरी दोन्ही रसांचे वर्ण ( कि तीन काय ते तुमचच्या डोक्यात असावे ) स्वतंत्ररित्या चांगले असले तरी त्याची विचित्र मिसळ झाली आहे ,, खरेंनी त्यांच्या पद्धतीने हा मुद्दा मांडला मी माझ्या ... कुणी म्हणाले कामुक मैना आणि भिमाई जिजाई ,,,, काय संबंध पुरुषाला स्त्री कामुक वाटते आणि या दोन्ही स्त्रिया होत्या हा बादरायण संबंध लावताय तुम्ही ..आणि विचारला तर विचार स्वातंतरी वैगरे तुंबड्या लावताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

जो कवी वाचक घडवतो, वाचकांना

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 17:24 नवीन
जो कवी वाचक घडवतो, वाचकांना घडवतो, वाचकांची विचार करण्याची दिशा बदलून टाकतो, वाचकांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतो... तो जातिवंत कवी असतो. जो कवी वाचकांना काय रुचेल, काय आवडेल, काय समजेल, काय पटेल याचा विचार करून लिहितो तो बाजारू कवी असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

"कलेसाठी कला" घायचे तर घ्या नाहीतर फूटा "......!

चौकस२१२
गुरुवार, 10/24/2024 - 08:42 नवीन
या सर्व स्त्रिया अप्रतिम लावण्यवती असतील ( असे धरुयात, आपण कुठं बघितलंय ) त्या स्त्रिया असल्यामुळे त्यांच्यापढे साहजिकच पुरुषाला लोभावणारे शारीरिक शरीरसौष्ठव असेल ( पहिली काही कडवी) तरीही त्या स्त्रिया त्यांच्या भक्ती/ वीर / मातृत्व या रसांमुले जास्त परिचित आहेत असे धरायला हरकत नसावी .. मग असे असताना काव्यात "हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार हृदय-चक्षूंना वेधून घेते" किंवा "कुणी म्हणाले कामुक मैना" यासाठी हीच उदाहरणे का सापडली हा साधा प्रश्न आहे १) शृंगारिक काय अगदी कामुक ( पण दर्जेदार ) कविता जरूर करा हो ,, मग ती मस्तानी वर असो किंवा कुना काल्पनिक अप्सरेवर असो २) भक्ती/ वीर / मातृत्व यावर कविता जरूर करा हो ,,, "कलेसाठी कला" किंवा "कवी मनाला काय वाटेल ते तो लिहू शकतो घायचे तर घ्या नाहीतर फूटा " असा पवित्रा असेल तर काही बोलण्यात अर्थ नाही पण रसिक का टीका करतोय ह्याकडे जर कोणी निर्माता लक्षच देणार नसेल तर अशी कलाकृती एक तर कचऱ्यात जाईल किंवा विसरली जाईल , किंवा तद्दन भम्पकपणा म्हणून ( मूलतः चांगली असूनही) त्यावर राग काढलं जाईल
  • Log in or register to post comments

कविता मी परत एकदा वाचली...

कर्नलतपस्वी
गुरुवार, 10/24/2024 - 10:33 नवीन
कानडाऊ योगेशू यांनी केलेल्या रसग्रहणाशी सहमत आहे. कविता दोन दृष्टीकोनातून बघावी लागेल. एक वयस्क नर जो नायिकेचा कुणीही नाही, तीच्या कडे रंगीली नटवी नार, फक्त भोग्या या नजरेने बघत आहे. त्याच्या नजरेला उत्तर देताना नारी स्वीकार करते ,होय मी नटवी नार आहे,कुण्या ऋषींची तपस्या भंग करण्याची शक्ती माझ्या मधे आहे.परंतू माझी इतरही अनेक रूपे आहेत. मी फक्त मोहिनी नसून मी विवीध रूपा आहे. तव वदली ती प्रसन्नवदना हो मी आहे नटवी नार खळखळ वाहत असतो माझ्या नसानसातुनी रस शृंगार विरक्तीला लुब्ध कराया करीत पीयुषाची पखरण सजणेधजणे, लटक, मटकणे प्रीत लालित्याची उधळण जरी दिसतो तुम्हां दुरुनी माझ्याठायी हा एकच रस परी मी आहे सर्व रसांचा जणू घुसळला अमृतरस या कडव्यानंतर, स्त्रीची विवीध रूपे उद्धृत केली आहेत. कवितेचा शेवट स्त्री ही जननी,जगत्जनीनी आहे हे सांगीतले आहे ही कवीता तुकड्यात नसून एकसंध वाटते. कदाचित कवितेचे शिर्षक व कवितेतील भाव या मधे तफावत असल्याने कवी रसिकांपर्यंत पोहचत नसावा. सर्व रस आपापल्या जागी आहेत कुठेही सरमिसळ वाटत नाही. शृंगार, वासनेची परिणीती मातृत्व-पितृत्व मधे होते. ती सार्वजनिक करू नये एक समाज संकेत आहे. पण तो कवीला लागू पडतो का,कवी आणी कवितेला मर्यादित करतो का? कवीने याचे पालन करावे किवां नाही,रसिकांनी ते स्विकारावे किंवा नाही हा सर्वस्वी वैयक्तिक मुद्दा आहे. मातृत्व एक पवित्र भावना. आई बद्दल कुणीच वाईट, अश्लील, शृंगारिक शब्द वापरत नाही.परंतू, महाकवी ग्रेस यांनी आपल्या एका कवितेत आईचे वर्णन करताना काय शब्द वापरलेत ते वाचून मती गुंग होते. अर्थात त्यांनी कुठल्या दृष्टीकोनातून ही कवीता लिहीली हा भाग थोडावेळ बाजूला ठेवूया. ग्रेस समजला नाहीच मुळी कधी.. तो भावला.. प्रकर्षाने जाणवला..!! आई माझी कृष्णकळीतील विष विसरला कंस देवकीच्याही पुढे निघाला शुभ्र पांढरा हंस... आई माझी रांगोळीतील टिंब हरवली टिकली कशास पाडू दार, कराया भिंत घराची मधली... माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा ~ग्रेस (संग्रह " सांजभयाच्या साजणी") सरतेशेवटी,कवी आणी रसिक यांचे स्वातंत्र्य अबाधित असून कलाकार जेव्हां आपली कलाकृती रसिकांपर्यंत पोहचण्यास सक्षम ठरतो त्या कलाकृतींना रसिक डोक्यावर घेतो.
  • Log in or register to post comments

खालील दोन ओली वाचल्या आणि एक

चौकस२१२
गुरुवार, 10/24/2024 - 11:29 नवीन
खालील दोन ओली वाचल्या आणि एक विचार मनात आला आईचा स्त्री म्हणून समजेने वापर केला असावा आणि तिचे ते दुर्दैव बघून काविला अशी रचना सुचली असावी ? जर गरिबीचा बापू कादंबरीतील बाप्या ने आपली आई वर कविता लिहली तर कदाचित अशी असेल का??? आई माझी झुळझुळतांना तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

"कदाचित कवितेचे शिर्षक व

चौकस२१२
गुरुवार, 10/24/2024 - 11:20 नवीन
"कदाचित कवितेचे शिर्षक व कवितेतील भाव या मधे तफावत असल्याने कवी रसिकांपर्यंत पोहचत नसावा." काहींना नाही पोचलला पण त्याची थोडी का होईन जबादारी ती कविता निर्माण करणाऱ्यवर नाही का असत? आगम्य लिहणे हे प्रत्येकाचा हकक जरी असला तरी बहुतेकांना साधारण पने कळेल असे लिहिण्यात तर कवी / लेखकांची खरी कसोटी असते वैयक्तिक मुद्दा हे कारण पुढे केलं जाते, मग असे असेल तर कवी ने आपले हे प्रसिद्ध करूनच नये स्वतः सुखायच असेल तर छापता कशाला!
  • Log in or register to post comments

बहुतेकांना साधारण पने कळेल

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 16:23 नवीन
बहुतेकांना साधारण पने कळेल असे लिहिण्यात तर कवी / लेखकांची खरी कसोटी असते मी आजपर्यंत 700 ते 800 कविता लिहिल्यात. त्यापैकी बहुतांश सरसकट सर्वांना समजेल अशा कविता आहेत. त्यापैकी शेकडो कविता मिसळ पाव वर उपलब्ध आहेत. आपण त्या साध्या शिध्या सुलभ कविता का नाही वाचत? हीच कविता साध्या सोप्या भाषेत असावी असा आग्रह कशाबद्दल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

हीच कविता साध्या सोप्या भाषेत

चौकस२१२
गुरुवार, 10/24/2024 - 16:44 नवीन
हीच कविता साध्या सोप्या भाषेत असावी असा आग्रह कशाबद्दल? म्हणजे हि साधी सुधी नाही असा दावा आहे का? पण म्हणजे आमची टीका कळली नाही तुम्हाला ... पिंगा खेळतो द्वाड पवन ते अहिल्याबाई ! काय बोलायचे राहा तुमच्या ८००+ कवितांचा पाऊस पाडत. संपादित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

हो. ही कविता नक्कीच साधीसुधी

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 17:19 नवीन
हो. ही कविता नक्कीच साधीसुधी नाही. अनेक क्लिष्ट शब्द या कवितेत आहेत. ज्या वाक्यांचा सहजासहजी उलगडा होणार नाही असे वाक्य या कवितेत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

अहंकार

चौकस२१२
गुरुवार, 10/24/2024 - 18:09 नवीन
अहंकार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

<<< राहा तुमच्या ८००+

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 17:22 नवीन
<<< राहा तुमच्या ८००+ कवितांचा पाऊस पाडत >>> या देशात दीडशे कोटी जनता आहे. ती तुम्हालाही विचारत नाही आणि मलाही विचारत नाही. तुमच्याही इशाऱ्यावर नाचत नाही आणि माझ्याही इशाऱ्यावर नाचत नाही. ते त्यांच्या मर्जीने जगतात. त्यामुळे आपले वरील वाक्य अत्यंत अनावश्यक स्वरूपाचे ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

@चौकस भाऊ, थोडासा मतभेद.

कर्नलतपस्वी
गुरुवार, 10/24/2024 - 12:29 नवीन
आईचा स्त्री म्हणून समजेने वापर केला असावा आणि तिचे ते दुर्दैव बघून काविला अशी रचना सुचली असावी ? कवी ग्रेस यानी लिहीलेली कवीता फक्त उदाहरण .त्यांनी ती कुठल्या परिप्रेक्षातून लिहीली हा भाग वेगळा असे मी आगोदरच म्हणले आहे. मुटे यांची कवीता स्त्रीपुरूष मधला संवाद म्हणून बघीतली तर मातृत्व एक त्यातला छोटासाच भाग आहे. कवी आणी रसिक हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी त्यामुळे दोघांच्या मर्यादा वेगळ्या. आता हलवायाने जिल्बी पाडावी व खाणार्‍याने ती खावी. कुणाला किती गोड लागेल हा ज्याचा त्याचा प्रश्न. हलवाई बनवताना आपल्याच पद्धतीने बनवणार. हलकेच घ्या. मी पण तुमच्याच कुळीतला वाचक,फक्त आपले मत मांडतो.
  • Log in or register to post comments

यस सर,

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 15:53 नवीन
यस सर, ही कविता रमताराम आणि मातृत्व यांच्यातील संवाद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

हलवाई बनवताना आपल्याच

चौकस२१२
गुरुवार, 10/24/2024 - 16:46 नवीन
हलवाई बनवताना आपल्याच पद्धतीने बनवणार. बरोअबर पण त्याची चव घेणाऱ्याने " अरे हि जिलबीच आहे का किंवा या जिलबीत हे काय घातलाय " असे विचारायचे म्हणजे महापाप कि काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

तुम्ही काढलेला निष्कर्ष हाच

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 20:20 नवीन
तुम्ही काढलेला निष्कर्ष हाच जगमान्य असून तोच सर्वांनी शिरसावंद्य मानला पाहिजे का? अर्थ काढण्याचा जसा तुम्हाला अधिकार आहे तसा आपापल्या परीने निष्कर्ष काढण्याचा, अर्थ लावण्याचा प्रत्येकाला अधिकार नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

लिहिते राहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/24/2024 - 18:13 नवीन
पुकाशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आभार सर

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 20:01 नवीन
आभार सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता आवडली. भावनांतर तर

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 10/24/2024 - 19:47 नवीन
कविता आवडली. भावनांतर तर विशेष आवडले. खर तर वरकरणी परस्पर विरोधी वाटणार्या भावना हा भावनाकल्लोळ संचातील घटक असतात.कार्येषु मंत्री करुणेषु दासी शयनेषु रंभा भोजनेषु माता हा स्त्रीचा आविष्कार तरी काय दाखवतो? फ्रॉईडच्या इड इगो सुपर इगो च्या त्रयीत एखादी आवडती स्त्री सहज संचार करते तेव्हा मला तर चक्क तिचे पाय धरावेसे वाटतात. अर्थात ही माझी फँटसी आहे.
  • Log in or register to post comments

आपले मनःपूर्वक आभार

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 20:02 नवीन
आपले मनःपूर्वक आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

कार्येषु मंत्री करुणेषु दासी

सुबोध खरे
गुरुवार, 10/24/2024 - 20:10 नवीन
कार्येषु मंत्री करुणेषु दासी शयनेषु रंभा भोजनेषु माता या चारही गोष्टी एकत्र असू नयेत हे तारतम्य आहे. नाही तर शयनेषु माता आणि भोज्येषु रंभा झालं तर गोची होईल. वाघीण आपल्या पिल्लांची वात्सल्यपूर्ण माता असतेच पण शिकारीच्या वेळेस तिने वात्सल्य दाखवले तर स्वतःला आणि पिल्लाना उपाशी मरावे लागेल
  • Log in or register to post comments

काही आयड्याकडून नेहमीप्रमाणे

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 20:40 नवीन
काही आयड्याकडून नेहमीप्रमाणे कवितेशी संबंध नसलेले अनावश्यक व फालतू प्रतिसाद टाकून कवितेचा धागा भरकटवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे. माझ्या सवयीप्रमाणे मी जशास तसे उत्तर देणार आणि मग धागा भरकटवण्यात माझाही हातभार लागणार. त्यावर पर्याय म्हणून आठ दिवस मी मिसळपाव वरून विश्रांती घेत आहे. कवितेची संबंध नसलेले असंबंद्ध प्रतिसाद माझे तरी पडायचे थांबतील. धन्यवाद! भेटूयात आठ दिवसानंतर!!
  • Log in or register to post comments

हा आरोप अमान्य आहे , तुम्ही

चौकस२१२
Fri, 10/25/2024 - 06:21 नवीन
हा आरोप अमान्य आहे , तुम्ही आमच्या टीकेशी सहमत नसाल पण केवळ मुद्दे समजावून ना घेत तुम्ही उत्तर आणि वयक्तिक टीकेवर वसकन उतरलात दोन उत्तम कविता आहेत हे पाहिचलेच सांगतले, तेवढे लिहिण्याची प्रतिभा पण आम्चि नाही पण तुम्ही पुढे माणूस आणि पशु यांचे मातृत्व ... एकच असे फालतू प्रतिसाद तारे तोडू लागतात ... विश्रन्ती ह्या नाही तर रोज टंकआ हू केंअर्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

चोला माटी के राम...एकांतवासात खालील कविता जरूर वाचा.

कर्नलतपस्वी
Fri, 10/25/2024 - 07:52 नवीन
एकांतवासा साठी शुभेच्छा. झारखंड राज्यातील श्री गंगाराम तिवारीजी यांची कवीता,श्री हबीब तन्वीर यांनी जनमानसात आणली.पुढे श्री अमिर खान यांनी आपल्या सिनेमात वापरली. करोना काळात बर्‍याच लोकांना धैर्यशील बनवले. द्रोना जईसे गुरू चले गए करन जईने दानी संग, करन जईसे दानी बाली जईसे वीर चले गए, रावन जस अभिमानी चोला माटी के राम एकर का भरोसा? चोला माटी के रे कोनो रिहिस ना कोनो रहै, भईया ही सबके पारी एक दिन आई सबके पारी काल को नोला छोड़े नाहीं, राजा, रंक, भिखारी चोला माटी के राम एकर का भरोसा? चोला माटी के रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

कवितेचे नाव वाचूनच ऑन द रॉक्स

सौंदाळा
Fri, 10/25/2024 - 11:43 नवीन
कवितेचे नाव वाचूनच ऑन द रॉक्स सिवाज रिगल मधे कोजागिरी पोर्णिमेचे मसाला दूध मिसळल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments

हो ना किंवा उत्तम तांबड्या

चौकस२१२
Sat, 10/26/2024 - 06:12 नवीन
हो ना किंवा उत्तम तांबड्या वारुणीत कोका कोला मिसळणे म्हणजे दोन्ही ची हि मजा घालवली , पण कवीश्वरांना कोण सांगणार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा