Skip to main content

मनोरथाच्या वाटेवर जरी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 07/06/2024 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
भू-कवचा विंधून धरेच्या गाभ्याशी जाईन शून्य गुरुत्वाकर्षण तिथले अधांतरी मोजेन निंबोणीचे रोप कोवळे चन्द्रावर रुजवीन अंगाईचे शब्द बदलूनी पुन्हा लिहून काढीन जर्द तांबडी मंगळमाती शनीवरी शिंपीन शनि-मंगळ मग युती अनोखी एकवार पाहीन राहू-केतुची जोडगोळी मग समक्ष बघण्यासाठी चंद्रसूर्य कक्षांच्या अलगद सोडवीन निरगाठी सात अश्व सूर्याचे - त्यांना थोपटीन प्रेमाने त्यांचा दाणा , पाणी , खरारा करीन मी निगुतीने कृष्णविवर सैराट , भटकते हुडकून मग काढीन गळाभेट घेईन तयाची - त्यात विरुन जाईन मनोरथाच्या वाटेवर जरी वास्तव पसरी काटे त्या काट्यातून फूल फुलवी जो त्याचे संचित मोठे
लेखनविषय:

वाचने 3483
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनोरथाच्या वाटेवर जरी वास्तव पसरी काटे त्या काट्यातून फूल फुलवी जो त्याचे संचित मोठे
-दिलीप बिरुटे

ही कविता इंग्रजीत गूगल भाषांतर करून कृबु प्रतिमेसाठी वापरली असता खालील चित्रे आली: (हे प्रयोदाखल करून बघितलेले आहे, बाकी हेतु काही नाही) . . .

In reply to by चित्रगुप्त

टाईमपास कवितेला चार चाँद लावल्याबद्दल चित्रगुप्ताय नम: सूर्याच्या सात घोड्यांपैकी १-२ गायबलेत. बहुधा माझी नजर चुकवून चरायला गेले असावेत.

कवीता सुंदर आहे. चित्रगुप्तांचे उद्योग खतरनाक वाटले, पण तरी सुद्धा पुरक आहेत.

In reply to by कर्नलतपस्वी

यात (आपले डोके अजिबात न वापरता) भाषांतर आणि चित्रनिर्मितीत संपूर्णपणे कृबुचाच वाटा आहे. नवनवीन प्रयोग करण्यातून ज्ञान मिळत राहील.

खूप सुंदर. एकदा सुरुवातीला "करेन" मग पुढील कडव्यांत "करीन" असे झाले आहे ते पुढील आवृत्तीत सर्वत्रच "करीन" करून घ्या.