एका राजकीय पक्षाची हि पण भारी युक्ती?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
5 Jun 2024 - 5:47 pm
गाभा: 

इंडिया टुडेच्या अभिषेक डे यांचे New Delhi, UPDATED: Jun 5, 2024 14:08 IST चे वृत्त

खालील वृत्तांशाचा अनुवाद मुख्यत्वे गुगल ट्रान्सलेटरच्या साहाय्याने. मूळवृत्ताची खातरजमा इंडिया टूडेच्या वेबसाईटवरूनच करावी. फॅक्टचेक करून वृत्त विपर्यस्त असल्यास प्रतिसादातून नमूद करावे. उत्तरदायित्वास नकार लागू

"हेडलाईन : 1 लाख रुपयांच्या 'गॅरंटी कार्ड'साठी महिला (प्रदेश नाव, राजकीय पक्षाचे नाव) कार्यालयात रांग लावत आहेत,

त्या (राजकीय पक्षाचे नाव) ने प्रत्येक गरीब कुटुंबातील महिला प्रमुखाला दरवर्षी 1 लाख रुपये देण्याचे आश्वासन देत अनेक घरांना 'गॅरंटी कार्ड' वितरित केले होते.

लोकसभा निवडणुकीत (राजकीय नाव) अलायन्स गटाने .... प्रदेशमध्ये अनपेक्षित यश मिळवले, (गावाचे नाव)मधील अनेक महिलांनी प्रचारादरम्यान पक्षाने वचन दिल्या प्रमाणे 'गॅरंटी कार्ड्स'ची मागणी करत (राजकीय पक्षाचे नाव) कार्यालयाबाहेर रांगा लावल्या.

निवडणुकीपूर्वी (राजकीय पक्षाचे नाव)ने प्रत्येक गरीब कुटुंबातील महिला प्रमुखाला दरवर्षी 1 लाख रुपये देण्याचे आश्वासन देत अनेक घरी 'गॅरंटी कार्ड' वितरित केले होते.

.... काही समुदाय विशेष उल्लेखाची ओळ देणे टाळले आहे जिज्ञासूंनी इंडिया टूडेचे मूळ वृत्त तपासावे ....

काही महिलांनी 'गॅरंटी कार्ड'ची मागणी केली, तर ज्यांना ते (कार्ड) मिळाले त्यांनी त्यांच्या खात्यात पैसे मिळण्यासाठी फॉर्म जमा केले. काही महिलांनी दावा केला की, पैसे मिळविण्यासाठी तपशीलांसह फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यांना (राजकीय पक्षाचे नाव) कार्यालयातून (फॉर्म मिळाल्याच्या) पावत्या मिळाल्या आहेत. ..."

इंडिया टुडे किंवा संबंधीत वार्ताहर कथित ** मिडियाशी संबंधीत आहेत का ते माहित नाही. मिपाची चर्चा लेखास किमान मजकुराची अट नसती तर मी केवळ दुवा देऊन धागा काढला असता.

एकुण बातमीत दिल्या प्रमाणे शक्य असेल तर युक्ती भारी आहे, अशी अ‍ॅडव्हान्स कार्ड सुविधा (जमल्यास अजून अधिक रकमांची) खरीखुरी असल्यास संबंधीत राजकीय पक्षाने आणि बाकी राजकीय पक्षांनी सुद्धा इतर भारतीय राज्यातून देण्यास हरकत नसावी. हाय काय (जलने का कारन) नाय काय. :)

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आभार.
* मूळवृत्ताची खातरजमा इंडिया टूडेच्या वेबसाईटवरूनच करावी. फॅक्टचेक करून वृत्त विपर्यस्त असल्यास प्रतिसादातून नमूद करावे. उत्तरदायित्वास नकार लागू

प्रतिक्रिया

काँग्रेसने दिलेल्या छापील 'गॅरंटी कार्ड' बद्दलचे विडियो.

Muslim Woman में Bank Account खुलवाने की मची होड़, Rahul Gandhi से जुड़ी इस अफवाह ने मचाया हड़कंप
https://youtu.be/qLtLSLRLprw?si=TlsQ5XarSiHeT6-G

चुनाव नतीजों के बाद 'गारंटी कार्ड' लेकर यूपी Congress ऑफिस पहुंची मुस्लिम महिलाएं | Aaj Tak News
https://youtu.be/CRmdLW2jquk?si=DYrMdj9cuTQwR54b

Congress Guarantee Card : हाथ में लिए कांग्रेस का गारंटी कार्ड महिला लगा रही गुहार, वादा पूरा करो...
https://youtu.be/S5KSaKmbpz4?si=rXlK6DrerCOj41ca

चित्रगुप्त's picture

6 Jun 2024 - 6:49 am | चित्रगुप्त

.

.

निव्वळ तोंडी आश्वासनापेक्षा लेखी केव्हाही चांगल्याच, अर्थात न पाळलेली आर्थिक प्रलोभने आणि टॅक्स कलेक्शन ने सपोर्ट न करता मनी प्रिंटींगच्या बळावर आश्वासने पाळून वाढलेली महागाईचे खर्च निवडूणूकांना उभारहाणार्‍यांच्या आणि त्यांच्या घराण्यांयील सर्वांच्या प्रॉपर्टीतून पुढील दोन पिढ्यांपर्यंत वसूलीची व्यवस्था असावी. ( राजकीय पक्ष आणि नेते कुणिही असोत हे वेगळे सांगणे न लगे.)

अहिरावण's picture

6 Jun 2024 - 7:19 pm | अहिरावण

कॉग्रेस जिथे निवडून आली तिथल्या लोकांना लाभ मिळणार्‍ आहे का?

असल्यास - कशाच्या जोरावर?
नसल्यास - ज्यांनी मत दिले त्यांची फसवणू़क नाही काय ?