✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाकिस्तानचा सम्मान करण्याचे उपाय

व
विवेकपटाईत यांनी
गुरुवार, 05/16/2024 - 16:26  ·  लेख
लेख
पाकिस्तान हा भारताचा शेजारी आहे. एका अर्थाने भारताचा लहान भाऊ. पण सध्याच्या घटकेला पाकिस्तानची आर्थिक परिस्थिति बिकट आहे. महागाई 33 टक्क्यांनी वाढत आहे. जनता महागाई, बेरोजगारी इत्यादीने ने त्रस्त आहे. पाकिस्तानात सर्वत्र अराजकता पसरलेली आहे. दुसरी कडे भारताची अर्थव्यवस्था तिसर्‍या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाची झपाट्याने प्रगति होत आहे. पण आपल्या लहान भावाची मदत करणे सोडून भारत त्याच्या छताडावर बंदूक रोखून उभा आहे. पाक व्याप्त कश्मीर मध्ये अराजकता माजवत आहे. पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राइक करत आहे. अज्ञात व्यक्ति तिथल्या प्रसिद्ध शांतिपूर्ण लोकांची हत्या करत आहे. भारताचे पाकिस्तान सोबत असे वागणे निश्चितच उचित नाही. या परिस्थितीवर भारताच्या एका प्रसिद्ध अहिंसावादी नेता मणिशंकर यांनी विधान केले, हे असेच चालू राहिले तर तिथल्या पागल लोकांचे माथे भडकतील. त्यांच्या जवळ अणु बॉम्ब आहे. त्यांना तो बॉम्ब भारतावर फोडायला वेळ लागणार नाही. जर त्यांनी लाहोर मध्ये फोडला तरी अमृतसर नष्ट होणार. आपल्या देशाचे किती नुकसान होईल याची कल्पना करा. हा विनाश थांबवायला असेल तर आपल्याला पाकिस्तानचा सम्मान केला पाहिजे. आता प्रश्न येतो. पाकिस्तानचा सम्मान कोणत्या रीतीने केला पाहिजे जेणे करून तो भारतावर अणु बॉम्ब टाकणार नाही. पाकिस्तानची भारताकडून काय अपेक्षा आहे यावर विचार करून काही उपाय शोधले. 1. भारताने पाकिस्तान सोबत वार्ता पुन्हा सुरू करावी. 2. पाकिस्तानची सीमा पुन्हा खुली करून व्यापार सुरू करावा. 3. ज्या प्रमाणे भारत आपल्या 80 कोटी लोकांना राशन फ्री देतो तसेच पाकिस्तानच्या जनतेला ही देण्यासाठी काही कोटी टन गहू, तांदूळ आणि साखर उपहार स्वरूप पाकिस्तानला द्यावे. 4. भारताने पाकिस्तान मध्ये शांतिपूर्ण लोकांची हत्या करणे त्वरित बंद करावे. 5. भारतातील जेलांमध्ये बंद पाकिस्तानच्या शांतिपूर्ण नागरिकांची सुटका करून त्यांना पाकिस्तान मध्ये परत पाठविले पाहिजे. 6. पाकिस्तान मधून शांततेचा संदेश घेऊन भारतात येण्याचा प्रयत्न करणार्‍या शांतिपूर्ण पाकी नागरिकांची हत्या करणार्‍या सुरक्षा दलांच्या जवानांवर हत्येचे केसेस दाखल करून त्यांना दंड दिला पाहिजे. बहुतेक पूर्वी असे होत होते. त्या वेळी कश्मीर घाटीतील भारतीय सुरक्षा दलांत एक म्हण प्रचलित झाली होती. "मर गये तो पेन्शन, बच गये तो टेंशन". 6. नद्यांवर बांधलेले बंधारे तोडून सर्व पाची नद्यांचे संपूर्ण पाणी पाकिस्तानला दिले पाहिजे. जेणे करून तिथल्या शेतकर्‍यांना भरपूर पानी मिळेल. अन्न उत्पादन वाढल्याने तिथली महागाई दूर होईल. तिथल्या जनतेला स्वस्त अन्न धान्य मिळेल. 7. सर्वात शेवटी कश्मीरचा भाग अत्यंत आनंदाने पाकिस्तानला सौपविला पाहिजे. असे केले की पाकिस्तान अत्यंत प्रसन्न होईल आणि भारतावर अणु बॉम्ब फोडणार नाही. जो पर्यन्त तानाशाह मोदीजींची सत्ता भारतात आहे. पाकिस्तानचा सम्मान होणे शक्य नाही. कारण आजच्या अशिक्षित सत्ताधीशांना विदेश नीतीचे ज्ञानच नाही. आपल्या शेजार्‍याला कसे प्रसन्न ठेवावे हेच कळत नाही. येत्या जून 4 नंतर मोदीजी पुन्हा सत्तेत आले तर पाकिस्तान मध्ये अराजकता माजवून पीओके घेण्याचा प्रयत्न भारत करू शकतो. अश्या परिस्थितित निराश होऊन पाकिस्तानी सैन्य भारतावर अणु बॉम्ब फोडू शकतो. येत्या निवडणूकीत पाकिस्तानचा सम्मान करणार्‍याच्या इरादा ठेवणार्‍यांना मत दिले तरच भारतावर अणु बॉम्ब पडणार नाही. पाकिस्तानचा सम्मान करण्याचे आणिक काही उत्तम उपाय असतील तर ते प्रतिसादात सांगावे ही अपेक्षा. असो.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2433 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

उपहासात्मक लेख आवडला....

मुक्त विहारि
गुरुवार, 05/16/2024 - 17:22 नवीन
हिंदुंच्या आणि शिखांच्या शिरकाणावर जन्म झालेल्या पाकिस्तानची, जितकी गळचेपी करता येईल तितकी केली पाहिजे, हे माझे वैयक्तिक मत आहे
  • Log in or register to post comments

धन्यवाद. मी स्वतः२५

विवेकपटाईत
गुरुवार, 05/16/2024 - 18:36 नवीन
धन्यवाद. मी स्वतः२५ वर्षापूर्वी SPG त deputation सुरक्षा अधिकारी राहिलो आहे. (कार्यालयीन कामांसाठी). सुरक्षा दलांतून SPG त येणाऱ्याच्या तोंडून काश्मीर मध्ये कार्यरत जवानांचे कसे हाल होत होते,अनेक किस्से ऐकले होते. तीच परिस्थिती पुन्हा येऊ नये हीच प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

त्या सीमा हैदरचे अनुकरण करून भारतातील एक कोटी मुलींनी

चित्रगुप्त
गुरुवार, 05/16/2024 - 18:43 नवीन
त्या सीमा हैदरचे अनुकरण करून भारतातील किमान एक कोटी मुलींनी पबजी का काय त्याद्वारे तिकडल्या तरुणांशी संधान बांधून तिकडे जाऊन रहावे म्हणजे ते शांत होतील आणि अणुबंबाचे संकट टळेल. तोपर्यंत भाविकांनी देव पाण्यात घालून बसावे आणि सगळ्या बाबा -बुवा - स्वामी वगैरेंना साकडे घालावे. सीमेवर (म्हणजे सीमा हैदरवर नव्हे, - भारत -पाक सीमेवर) अहर्निश संकट मोचन स्तोत्रे, आरत्या, वगैरे मोठ्याने लाऊडस्पीकरांवर वाजवावे. या सगळ्यामुळे अणुबंबाचे अरिष्ट नक्कीच टळेल.
  • Log in or register to post comments

अणुबॉम्ब चा बागुलबुवा उभा

अमर विश्वास
गुरुवार, 05/16/2024 - 18:49 नवीन
अणुबॉम्ब चा बागुलबुवा उभा करून पाकिस्तानचा आतंकवाद सहन करावा का ?
  • Log in or register to post comments

मी काय म्हणतो.. पाकिस्तानला

अहिरावण
गुरुवार, 05/16/2024 - 19:22 नवीन
मी काय म्हणतो.. पाकिस्तानला बांगड्या पाठवून द्याव्या. म्हणजे अणुबंब उचलायला लागले की त्यांचा आवाज होईल आपल्याला आधीच कळेल. आपण पटकन पळत जाऊन बांगलादेशात जाऊन बसु आणि तिथून पाकिस्तानने अणुबंब भारतावर टाकला की आम्ही तिथे नाहीच असे म्हणून टुक टुक करु. हाकानाका
  • Log in or register to post comments

अणुबंब

कांदा लिंबू
गुरुवार, 05/16/2024 - 22:01 नवीन
"अणुबंब" हा शब्दप्रयोग रोचक आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा