✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

२०२४ लोकसभा निवडणूक.

अ
अमरेंद्र बाहुबली यांनी
Mon, 04/22/2024 - 23:02  ·  लेख
लेख
लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील. पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल. चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल. पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल. सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल. सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल. महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34520 वाचन

💬 प्रतिसाद (396)

प्रतिक्रिया

त्यापेक्षा ते दक्षिण उत्तर

अमर विश्वास
Wed, 04/24/2024 - 21:37 नवीन
त्यापेक्षा ते दक्षिण उत्तर आणि पूर्व पश्चिम यात्रा करणाऱ्यांना जमिनीबद्दल जास्त माहिती असणार ना ? किंवा मग जमीन व्यवहारातले तज्ञ जवाऊबापूंना विचारू शकता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

१९९७ ते २०१५ पंतप्रधान

विवेकपटाईत
Fri, 05/03/2024 - 17:30 नवीन
१९९७ ते २०१५ पंतप्रधान कार्यालयात काम केले आहे. एवढेच म्हणेल दूरदृष्टी असलेला सर्वात शिक्षित प्रधानमंत्री म्हणजे श्री नरेंद्र मोदी. बाकी ज्यांना दहा वर्षात देशात झालेली प्रगती आणि कमी झालेला भ्रष्टाचार दिसत नाही आणि स्वतः ला शिक्षित म्हणवून घेतात मला फक्त त्यांची कीव येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

दहा वर्षात देशात झालेली

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/03/2024 - 17:52 नवीन
दहा वर्षात देशात झालेली प्रगती आणि कमी झालेला भ्रष्टाचार दिसत नाही काही पुरावे आकडे आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

मिळाला का?

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 21:17 नवीन
मिळाला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कुणालाही मत द्या. भाजपला नको.

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/25/2024 - 13:37 नवीन
कुणालाही मत द्या. भाजपला नको. - विचारवंत श्री.विश्वंभर चौधरी.
  • Log in or register to post comments

एम आय एम ला किंवा मुस्लिम

सुबोध खरे
Fri, 04/26/2024 - 10:12 नवीन
एम आय एम ला किंवा मुस्लिम लीगला सुद्धा मत दिले तर चालेल म्हणा कि काही लोक खायला काळ आणि भुईला (विश्वाला) भार असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काही लोक खायला काळ आणि भुईला

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/26/2024 - 10:34 नवीन
काही लोक खायला काळ आणि भुईला (विश्वाला) भार असतात असेच लोक भाजपला सपोर्ट करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

काही लोक खायला काळ आणि भुईला

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/26/2024 - 10:34 नवीन
काही लोक खायला काळ आणि भुईला (विश्वाला) भार असतात असेच लोक भाजपला सपोर्ट करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बरोबर...

बाबुराव
Sat, 04/27/2024 - 00:03 नवीन
कुणालाही मत द्या. भाजपला नको
बरोबर. दहा वर्षातल्या विकासाच्या मुद्द्यावर लढण्याऐवजी हे, गाय,गोबर, हिंदु-मुस्लिम याच्या पलीकडे यांच्याकडे मुद्देच नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

श्री ध्रुव राठी ह्यांचा हा

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/26/2024 - 13:40 नवीन
श्री ध्रुव राठी ह्यांचा हा व्हिडीओ पहिला. भारतीय मीडिया गोदी मीडिया झाल्यामुळे खरं आपल्या पर्यंत पोहोचत नाहिये. श्री. ध्रुव राठी मोदींचे अनेकक घोटाळे तसेचक मोदिनी बोललेलं खोटं बाहेर काढत असतात. ध्रुव राठी नसते तर्क कदाचित आपल्याला मोदींचे आर्थिक घोटाळे कधीही कळाले नसते. https://youtu.be/9Gmp2BAB3VA?si=zhy1K3qZTq9JNlmu
  • Log in or register to post comments

ध्रुव राठीच्या व्हॉट्सअँप

आग्या१९९०
Fri, 04/26/2024 - 14:01 नवीन
ध्रुव राठीच्या व्हॉट्सअँप चॅनेलला शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

त्या शालेय विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क आहे का?

Trump
Fri, 04/26/2024 - 14:31 नवीन
ध्रुव राठीच्या व्हॉट्सअँप चॅनेलला शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
त्या शालेय विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

शालेय विद्यार्थ्यांना

आग्या१९९०
Fri, 04/26/2024 - 14:55 नवीन
शालेय विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क जरी नसला तरीही योग्य वयात विषारी , विखारी आणि खोट्या प्रचारापासून दूर राहतील. भविष्यात विचार करून मतदान करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

+१ भाजपा आणी संघाच्या कॅच देम

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/26/2024 - 16:18 नवीन
+१ भाजपा आणी संघाच्या कॅच देम यंग हया षडयंत्रातून वाचतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हो. चॅनलचे सब्सक्रिप्शन ही

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/26/2024 - 14:34 नवीन
हो. चॅनलचे सब्सक्रिप्शन ही खूप वाढले आहे नी व्हिडीओचे व्हायव्ह कोटींमध्ये गेलेत. शलाक आणिर कॉलेजच्या मुलात ध्रुव खूप प्रसिद्ध झालाय. गोदी मीडियामुळे खरी माहिती मिळवायला ध्रुव राठीचे व्हिडीओस लोक पाहताहेत. टॉप चे भारतीय युट्यूबर्सही ध्रुव राठीचा रिफरन्स देताहेत. उदा. lallantop.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

तो राहतो जर्मनीत , एवढी सखोल

चौकस२१२
Tue, 04/30/2024 - 10:04 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तो राहतो जर्मनीत , एवढी सखोल

चौकस२१२
Tue, 04/30/2024 - 15:35 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ध्रुव राठी बद्दल हे व्हिडियो देखील पहा

Nitin Palkar
Sat, 06/01/2024 - 13:17 नवीन
https://www.youtube.com/watch?v=Fnk-B4fci5A https://www.youtube.com/watch?v=OoDoNyZJ5rg https://www.youtube.com/watch?v=sF87Y_rumfs आणखी खूप आहेत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काँग्रेसच्या मेनिफिस्टोत

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/26/2024 - 13:56 नवीन
काँग्रेसच्या मेनिफिस्टोत कुठेही वेल्थ डिस्ट्रीबुशन शब्द नाही. भाजपचे अंधभक्तगण नी काही खोटारडे “फेकू” नेते खोटं पसरवताहेत. सावध राहा.
  • Log in or register to post comments

रिकाम्या खुर्च्या पाहून

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/26/2024 - 14:30 नवीन
रिकाम्या खुर्च्या पाहून फडणवीसांची सभेला दांडी. :) कोण एकायला जाणार रटाळ टेप? https://www.saamana.com/devendra-fadanvis-not-came-for-rally-because-of-less-people-turn-out-in-vardha/?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTEAAR0-58Wkd2Y6QqWoxhF-tS28p-Kuy1YA2t5gQD4M0dCHfjCwJNcrKXXGgwc_aem_AffWNHOyQosTZDfhJNJP-gSr0aFJwW-r2Lw8tXETc8G1i_YSR-8AfbWlJ6j65cSfUjDZf1KOmdIdXxKJaYVNJIjz#lvgfsgokzyqt8k5oiql
  • Log in or register to post comments

मंडपवाल्याने खुर्च्यांना

आग्या१९९०
Fri, 04/26/2024 - 16:25 नवीन
मंडपवाल्याने खुर्च्यांना खाजकुयली लावल्याचे सांगितले जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हाहाहा.

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/26/2024 - 16:25 नवीन
हाहाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

शिंदे, अजितदादा, अशोक चव्हाण,

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/26/2024 - 17:25 नवीन
शिंदे, अजितदादा, अशोक चव्हाण, असे अनेक लोक घेऊनही आणी शिवसेना, राष्ट्रवादीचे चिन्ह चोरूनही भाजप महाराष्ट्रात जिंकेल ह्याची शक्यता नसल्याने निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक पाच टप्प्यात आखली म्हणजे नरेंद्र मोदीना व्यवस्थित फिरता येईल. किती ती भीती?? ८० वर्षाच्या योध्याची नी बाळासाहेबांच्या सुपुत्राची?
  • Log in or register to post comments

नोएडा गाजियाबाद मेरठ तिन्ही

विवेकपटाईत
Sat, 04/27/2024 - 09:00 नवीन
नोएडा गाजियाबाद मेरठ तिन्ही जागा भाजपा हरणार. असेच ४५ ते ५५% मतदान होत राहिले तर भाजपा उत्तर प्रदेशात दहा जागा ही जिंकणार नाही. उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान राज्यात भाजपाच्या जागा निम्म्याहून कमी होणार. १६४ पैकी फक्त ५० जागा मिळतील.
  • Log in or register to post comments

इलेक्शन कमिशन इतकं उघडपणे

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/27/2024 - 12:11 नवीन
इलेक्शन कमिशन इतकं उघडपणे मोदीसाठी काम करतंय तर मतमोजणी निपक्षपातीपणे करत असेल का??
  • Log in or register to post comments

नाही ना?

सुबोध खरे
Sat, 04/27/2024 - 12:23 नवीन
नाही ना? मग आता मोदी येणारच! काय रडारड करायची त्याला सुरुवात आताच करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ंम्हणजे तुम्हाला माहितीय तर

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/27/2024 - 12:44 नवीन
ंम्हणजे तुम्हाला माहितीय तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अहद पेशावर तहद तंजावर???

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/27/2024 - 18:19 नवीन
अहद पेशावर तहद तंजावर??? मोदीना अभ्यासाची खूप गरज आहे.
  • Log in or register to post comments

अहद पेशावर तहद तंजावर... ह्या माहिती बद्दल धन्यवाद..

मुक्त विहारि
Sat, 04/27/2024 - 18:24 नवीन
https://www.kooapp.com/koo/guest_44172/5a3e1d89-1c2a-4ccd-bf93-b2e5ffe976cc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अजून एक भर घालतो ....

मुक्त विहारि
Sat, 04/27/2024 - 18:27 नवीन
https://www.kooapp.com/koo/%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87/c0327f64-2720-466f-a756-68d284239d86 ----
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

सर तुमचे लाडके शेठ उलट बोलले.

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/27/2024 - 18:50 नवीन
सर तुमचे लाडके शेठ उलट बोलले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

काय म्हणाले?

मुक्त विहारि
Sat, 04/27/2024 - 19:47 नवीन
मला लिंक मिळाली नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

दिल्ली आणि पंजाबात वीज, पाणी

कंजूस
Sat, 04/27/2024 - 18:35 नवीन
दिल्ली आणि पंजाबात वीज, पाणी फुकट यामुळे आआप पार्टी लाडकी झाली आहे. पण केजरीवाल तुरुंगात हे लोकांना खपले नाही.
  • Log in or register to post comments

दिल्ली आणि पंजाबात वीज, पाणी

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/27/2024 - 18:51 नवीन
दिल्ली आणि पंजाबात वीज, पाणी फुकट यामुळे आआप पार्टी लाडकी झाली आहे. जनतेचा टैक्स चा पैसा फिरून पुन्हा जनतेकडे येतोय म्हणून जनता खुश आहे. भाजपशासित राज्यात अदानी, अंबानी, नी भाजप नेत्यांकडे जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अगदी अगदी....

मुक्त विहारि
Sat, 04/27/2024 - 19:51 नवीन
"व्हेनेझुएला" आठवले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

आजच्या कोल्हापूर सबेत मोदी

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/27/2024 - 19:25 नवीन
आजच्या कोल्हापूर सबेत मोदी धडधडीत खोटं बोलत होते.
  • Log in or register to post comments

काय म्हणाले?

मुक्त विहारि
Sat, 04/27/2024 - 19:47 नवीन
लिंक देता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मी लाइव्ह पाहिली टीव्ही वर

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/27/2024 - 20:09 नवीन
मी लाइव्ह पाहिली टीव्ही वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

Ok...

मुक्त विहारि
Sat, 04/27/2024 - 20:18 नवीन
लिंक मिळाली की पाठवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

छापील लिंक कधी देता?

मुक्त विहारि
Sat, 04/27/2024 - 23:08 नवीन
छापील लिंक कधी देत आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पत्रकार नेहा पुरव यांना

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/27/2024 - 22:47 नवीन
पत्रकार नेहा पुरव यांना अज्ञात व्यक्तींनी दिलेल्या धमकीचा मुंबई प्रेस क्लब निषेध करतो. मुंबई उत्तर मुंबई भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्याबद्दल बातम्या दिल्याबद्दल पत्रकाराला दिलेल्या धमकीच्या घटनेचा मुंबई प्रेस क्लब तीव्र निषेध करतो. गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी पत्रकार नेहा पुरव यांच्या निवासस्थानी प्रवेश केला आणि त्यांना पीयूष गोयल यांच्यावर टीका करणारी बातमी प्रकाशित न करण्याचा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी, नवाकाळ सोबत काम करणाऱ्या पूरवने बातमी दिली होती की, गोयल यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान उत्तर मुंबईतील मासळी मार्केटला भेट देताना माशांच्या वासाने अस्वस्थता व चिंता व्यक्त केली, नाक मुरडले होते.. पत्रकार नेहा पुरव यांना धमकावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी आमची मुंबई पोलिसांना विनंती आहे.
  • Log in or register to post comments

अज्ञात व्यक्ती आणि पियूष गोयल आणि नेहा पुरव...

मुक्त विहारि
Sat, 04/27/2024 - 23:02 नवीन
ये बात कुछ हजम नही हुई...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

“नरेंद्र मोदींना पुन्हा संधी

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/27/2024 - 23:16 नवीन
“नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं”, शरद पवारांचं मोठं विधान. https://politicalmaharashtra.in/sharad-pawars-big-statement-is-that-giving-another-chance-to-narendra-modi-is-dangerou-79343/
  • Log in or register to post comments

शरद पवारांचं मोठं विधान.

मुक्त विहारि
Sat, 04/27/2024 - 23:40 नवीन
काय बोलणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

शरद पवार जे बोलतात त्याच्या

अहिरावण
Sun, 04/28/2024 - 10:34 नवीन
शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुध्द खरे असते. आजवरचा अनुभव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

"उद्धव ठाकरे हे औरंगजेबाला मानणाऱ्यांबरोबर..”

मुक्त विहारि
Sat, 04/27/2024 - 23:45 नवीन
पंतप्रधान नरेंद्र मोंदींची घणाघाती टीका, “उद्धव ठाकरे हे औरंगजेबाला मानणाऱ्यांबरोबर..” https://www.loksatta.com/elections/uddhav-thackeray-is-sitting-with-those-who-believe-in-aurangzeb-says-pm-narendra-modi-in-kolhapur-scj-81-4342218/ ---- आमची तर लिंक आली बाबा... ---
  • Log in or register to post comments

डीएमके हा काँग्रेसचा जवळचा पक्ष त्यांनी काय म्हटलं? सनातन धर्म ड

मुक्त विहारि
Sat, 04/27/2024 - 23:50 नवीन
डीएमके हा काँग्रेसचा जवळचा पक्ष त्यांनी काय म्हटलं? सनातन धर्म डेंग्यूसारखा आहे. अशा लोकांचा सत्कार काही लोक महाराष्ट्रात बोलवून करतात. हे पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती यातना होत असतील. काँग्रेसचे युवराज आहेत त्यांनी घोषणा केली आहे की ते तुमच्या संपत्तीची, महिलांचे दागिने यांची चौकशी करणार आहेत. काँग्रेस अशा लोकांना तुमची संपत्ती वाटतील ज्यांचा या देशावर पहिला हक्क आहे हे सांगितलं जातं. लांगुलचालनासाठी काँग्रेसचे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. काँग्रेसने घोषणा केली आहे की जे आयुष्यभर कमवाल, जी काही जमापुंजी ठेवाल ती तुमच्या मुलांना, पुढच्या पिढीला मिळणार नाही. काँग्रेसच्या युवराजांनी फॉर्म्युला आणला आहे की तुम्ही हयात नसाल तर तुमच्या जमापुंजीतला अर्धा हिस्सा वसुल करण्यासाठी तयार आहे. ही सरळ सरळ लूट आहे ---- दीवार, सिनेमा आठवला.... कांग्रेसला आणि त्यांच्या मित्रपक्षाना, मी कधीच मत देणार नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

भाजपमधेही घराणेशाही चालते

हुप्प्या
Sun, 04/28/2024 - 04:28 नवीन
भाजपमधेही घराणेशाही चालते म्हणणार्या लोकांसाठी एक नव्याने घडलेली घटना. भाजपने पूनम महाजन, प्रमोद महाजन यांच्या कन्येचे तिकिट बिनदिक्कत कापून त्याजागी उज्वल निकम या गाजलेल्या वकिलांना तिकिट दिले आहे. आता हा निर्णय योग्य की अयोग्य ते काळच सांगेल. पण भाजपच्या गणितानुसार पूनम महाजन यांच्यापेक्षा निकम यांचे पारडे जड आहे. म्हणून पूनम महाजन यांची पूर्वपुण्याई किंवा वारसाहक्क याचा विचार न करता सरळ त्यांचे तिकिट कापले. तसेही पक्षात पूनम महाजन ह्या मोठ्या वाटाघाटी, राजकीय समीकरणे, तिकिट वाटप अशा महत्त्वाच्या कामात सहभागी होताना दिसत नाही. त्यांचे वडिल एक उच्चपदस्थ भाजप अधिकारी होते आणि ते अशा गोष्टी करत असत. पण असे अधिकार भाजपमधे वंशपरंपरेने हस्तांतरित होत नाहीत ही बाब येथे अधोरेखित होताना दिसते. या पार्श्वभूमीवर हे आठवा की आदित्य ठाकरे यांना वरळीतून निवडून येता यावे म्हणून शिवसेनेने आपल्या एक दोन सिटा बळी म्हणून राष्ट्रवादीला देऊन टाकल्या होत्या.
  • Log in or register to post comments

व्यवहार्य निर्णय. तसंही पूनम

रामचंद्र
Sun, 04/28/2024 - 05:13 नवीन
व्यवहार्य निर्णय. तसंही पूनम महाजनांमागे भाजपमध्येही फारसं पाठबळ असेल असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

एक दोन प्रतिसाद सोडता,

गणेशा
Sun, 04/28/2024 - 09:35 नवीन
एक दोन प्रतिसाद सोडता, विश्लेषणात्मक, आकडेवारी पुर्ण लिखान मिळाले नाही..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा