✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काथ्याकूट: आपण केलेल्या 'चुकांचे' फळ आपल्याला 'याच जन्मी' भोगावे लागते का ?

च
चित्रगुप्त यांनी
Mon, 02/12/2024 - 07:02  ·  लेख
लेख
मित्रहो, जगभरातले धर्मग्रंथ, पुराणे इत्यादी प्राचीन साहित्यात, मानव करत असलेल्या विविध 'पुण्यकर्मांचे' तसेच 'पापांचे' ' फळ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 'स्वर्गसुख' अथवा 'नरकयातना' या स्वरूपात मिळत असते, असे सांगितलेले दिसते. तसेच त्या त्या देशातील कायद्याप्रमाणे काही 'चांगले' कृत्य केल्याबद्दल बक्षीस, पुरस्कार, सन्मान इत्यादि, आणि 'गुन्हा' किंवा 'दुष्कृत्य' केल्याबद्दल कमीजास्त कठोर शिक्षा दिली जात असते. याखेरीज आपल्या रोजच्या जीवनात 'आळस' (- जे करायला हवे ते न करणे) किंवा 'प्रमाद' (- जे करायला नको, ते करणे) यातूनही विविध मनो- शारीरिक व्याधी, ताणतणाव, परस्पर संबंध बिघडणे असे परिणाम घडून येत असलेले दिसतात, आणि त्यांच्या कार्य-कारण भावाविषयीही तर्क करता येतो. परंतु हा काथ्याकूट वरील तिन्ही गोष्टींविषयी नाही. मग कशाविषयी आहे ? तर : आपल्या माहितीततल्या लोकांवर जेंव्हा काही गंभीर स्वरूपाचे संकट अकस्मातपणे कोसळते, आणि बघता बघता त्या व्यक्तीचे आयुष्य बरबाद होते - तेंव्हा आपण अवाक होतो, आणि हे कशामुळे घडले असावे, यामागील कार्यकारण भाव काय असावा, असा प्रश्न आपल्याला पडतो. हे संकट आरोग्यविषयक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे असू शकते. यावर उपाय म्हणून वैद्यकीय उपचार, गंडेदोरे-ताईत, देवाचा धावा, बाबा-स्वामींची काकळूत, मनो-चिकित्सकांचे उपचार, ज्योतिष, राजकीय नेत्यांची लोकांची ओळख-वशिला, वगैरे प्रयत्न करूनही जेंव्हा कशाचाच काही उपयोग होत नाही, तेंव्हा माणूस हतबुद्ध होतो आणि 'नशिबा' ला दोष देत ते सोसण्याचा प्रयत्न करतो. तर इतर लोक "त्याच्या अमूक तमूक कर्माचे फळ त्याला मिळते आहे" असा निष्कर्ष काढताना दिसतात. – मोठ्यांचे ऐकले नाही, वडीलधाऱ्यांचा अपमान केला, आई - वडिलांना घराबाहेर काढले, सुनेचा छळ केला, मित्राची फसवणूक केली, लहान मुलांना मारझोड केली, पूज्य विभूतींविषयी अनुद्गार काढले, नादिष्टपणा- छंदिफंदीपणा - बाहेरख्यालीपणा केला, देशद्रोहीपणा केला …. असे विविध प्रकारचे प्रमाद त्या व्यक्तीवर कोसळलेल्या संकटाला कारणीभूत आहेत, असे मानले जाते. हा काथ्याकूट त्याबद्दलचा आहे. लहानपणापासून आपल्यावर जे जे 'संस्कार' आपले पालक, शिक्षक, गुरु वगैरे करत असतात, पुस्तके, प्रवचने, चर्चा, वगैरेतून योग्य-अयोग्य वर्तनाबद्दल आपल्याला जो काही बोध होत असतो, त्याचे पालन कळत-नकळत आपल्याकडून जर घडून आले नाही, तर अशा विविध 'चुकांचे' फळ आपल्याला याचि जन्मी - याचि देही सोसावे लागणार आहे का ? मंडळी, तुम्हाला काय वाटते ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32933 वाचन

💬 प्रतिसाद (133)

प्रतिक्रिया

ऑ?

कॉमी
गुरुवार, 02/22/2024 - 10:48 नवीन
बाकी काही म्हणणे नाही, पण इथे राजकारण तुम्ही आणले आहे. तुम्ही पाहिला लिहिले, त्यावर बाहुबलींनी प्रतिक्रिया दिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कॉमी बुवा

सुबोध खरे
गुरुवार, 02/22/2024 - 11:44 नवीन
कॉमी बुवा जरा प्रतिसादांच्या कालावधी कडे लक्ष दिलं असतं तर कुणाचे प्रतिसाद पहिले आलेले आपल्याला समजले असते. पण आपली कट्टर डावी विचारसरणी तसे करायला प्रतिबंध करत असावी असे वाटते. मागच्या एप्रिलमध्ये नानासाहेब 21 Feb 2024 - 9:37 am | अमरेंद्र बाहुबली हं. 21 Feb 2024 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे कोणत्याहि धाग्यात आपले 21 Feb 2024 - 11:21 am | सुबोध खरे कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण 21 Feb 2024 - 12:55 pm | सुबोध खरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

इतरांनी काय लिहिले आणि कधी

कॉमी
गुरुवार, 02/22/2024 - 11:54 नवीन
इतरांनी काय लिहिले आणि कधी लिहिले ह्याचा काय संबंध ? तुम्ही एक अत्यंत प्रक्षोभक राजकीय प्रतिसाद दिला. त्याला राजकीय उत्तर आले. मग त्यावर तुम्ही "राजकीय विचका करू नका" म्हणून तक्रार करू लागलात तर तो तुमचा दुटप्पीपणा आहे. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे किंवा बाहुबली ह्यांनी राजकीय विचका केला असा आरोप कोणावर केला नाही, तो तुम्हीच केला. तुम्हाला जर राजकीय लिहू नये असे मांडायचे होते तर तुम्ही स्वतः न लिहायचे भान ठेवायचे. ते तर तुम्हाला ठेवायचे नाही, अगदी प्रक्षोभक लिहायचे आणि वर तक्रार करायची ! बाकी काही बोलायला सुचत नसले की कडवी डावी विचारसरणी इत्यादी निरर्थक रडगाणे चालू द्या. तुमची साफ सरळ हीपॉक्रसी दाखवणे ह्यात कसलीही कडवी डावी विचारसरणी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुम्ही पाहिला लिहिले, त्यावर

सुबोध खरे
गुरुवार, 02/22/2024 - 11:57 नवीन
तुम्ही पाहिला लिहिले, त्यावर बाहुबलींनी प्रतिक्रिया दिली. कुणी पहिले लिहिलं आहे हे मी सप्रमाण दाखवलं आहे तोंडघशी पडल्यावर या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायला डाव्या लोकांकडून शिकावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

धर्माधिकारी ह्यांच्या

कॉमी
गुरुवार, 02/22/2024 - 12:02 नवीन
धर्माधिकारी ह्यांच्या सत्काराच्या घटनेचा आणि तुम्ही लिहिलेल्या प्रतिसादाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. तुम्ही पूर्णपणे वेगळा प्रतिसाद दिला. कोण थुंकी इकडची तिकडे करते आहे सरळ दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कमाल आहे.

कॉमी
गुरुवार, 02/22/2024 - 10:55 नवीन
समाजात जाती जातीत तेढ निर्माण करून समाजाची वाताहत करणारे हरामखोर राजकारणी सहस्त्र चंद्र दर्शन ( ८० वर्षे पूर्ण) सारखा सोहळा साजरा करतात
इतके प्रक्षोभक राजकीय प्रतिसाद लिहून वर दुसऱ्याकडे "राजकारण आणून विचका केला" म्हणून बोटे दाखवत आहात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुमची डावी विचारसरणी एका

सुबोध खरे
गुरुवार, 02/22/2024 - 11:52 नवीन
तुमची डावी विचारसरणी एका विशिष्ट एकांगी तर्हेने चालते म्हणून तुम्ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रापुरते ते सुद्धा श्री शरद पवार यांच्याबद्दल विचार करत आहात. ( त्यांच्या बद्दल वेगळा प्रतिसाद मी लिहिलेला असला तरीही) श्री विप्र सिंह, मुलायम सिंह,चंद्रशेखर, चरण सिंह, प्रकाश सिंह बादल, एम करुणानिधी, मणिशंकर अय्यर असे असंख्य राजकारणी भारतात आहेत त्यांनी विशिष्ट जातीची आणि धर्माची मते मिळ्वण्यासाठी काय काय केले हे जगजाहीर आहे. त्यात प्रक्षोभक काहीच नाही. त्याबद्दल लिहिले असताना केवळ द्वेषमूलक प्रतिसाद देण्यासाठी आपली संकुचित वृत्ती आपण सिद्ध करून दाखवलीत. असो बाकी भुजबळ बुवांबद्दल काही लिहिण्यात हशील नाहीच. ते अगोदर लिहितात आणि मग कधी कधी विचार करतात. त्यामुळे त्यांना बरेच मिपाकर सिरियसली घेत नाहीतच. तुम्ही पण त्यांच्या नादाला लागलात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

काय हास्यास्पद बचाव आहे.

कॉमी
गुरुवार, 02/22/2024 - 11:57 नवीन
काय हास्यास्पद बचाव आहे. "माझा प्रतिसाद प्रक्षोभक नाही, कारण मी केवळ एका नेत्याला हरामखोर असा शब्द वापरला नाहीये, तर त्यासकट इतर अनेक लोकांना मी हरामखोर म्हणले आहे ! मी अनेकांना शिवी दिली असल्यामुळे, मिलोर्ड, माझा प्रतिसाद प्रक्षोभक नाही."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तोंडघशी पडल्यावर या बोटावरची

सुबोध खरे
गुरुवार, 02/22/2024 - 11:58 नवीन
तोंडघशी पडल्यावर या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायला डाव्या लोकांकडून शिकावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

काहीही बोलायचे उरले नाही की

कॉमी
गुरुवार, 02/22/2024 - 12:04 नवीन
काहीही बोलायचे उरले नाही की डावे डावे म्हणून कांगावा करायला तुमच्याकडून शिकावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

काॅमी जाऊद्या. त्यांची चूक

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 02/22/2024 - 13:03 नवीन
काॅमी जाऊद्या. त्यांची चूक दाखवली की तुन्ही डावे विचारवादी (ज्याचा वास्तवीक इथे चाललेल्या चर्चेशी काहीही संबंधं नाही) अशी वयक्तिक टिका होते, ना माझ्यावरही डाॅ साहेब वयक्तिक ऊतरलेत. वास्तविक मी पवारांचा ऊल्लेख कुठेहा केला नव्हता. तरीही त्यांनी पवारांचे नाव घेतले. पण इथे लाॅजीकला तिलांजली दिली जातेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

व्वा. मानलं तुम्हाला वर एका

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 02/22/2024 - 11:23 नवीन
व्वा. मानलं तुम्हाला वर एका ८० वर्षीय राजकारण्यावर प्रक्षोभक लिहून आपला द्वेष प्रकट केलात ह्यावर मी ऊलटही असू शकतं इतकं लिहीलं तर मी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणतोय?? व्वाह. तुम्ही हुशार आहात पण मिपावरील ईतर लोक मुर्ख नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मुळ मुद्द्यांवरून...

कर्नलतपस्वी
Fri, 02/23/2024 - 14:40 नवीन
मुळ मुद्यापासून धागा भटकणे हे धाग्याचे प्रारब्ध, पुर्वसंचित म्हणायचे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

किंवा एकाच आजारात (तोंडाच्या

चौथा कोनाडा
Wed, 02/21/2024 - 17:32 नवीन
किंवा एकाच आजारात (तोंडाच्या कर्करोगामुळे) एकाच पक्षाचे दोन नेते यापैकी श्री आबा पाटील यांचे देहावसान झाले आणि श्री शरद पवार जिवंत आहेत
हे दु:खदायकच म्हणायचे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

??

सोत्रि
Sun, 04/20/2025 - 18:52 नवीन
कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण भाव सहजासहजी सापडत नाही.
हे विधान खालीलपैकी कसे इंटरप्रीट करायचे? १. कार्यकारण भाव सहजासहजी सापडत नाही पण अथक प्रयत्न केल्यावर सापडू शकतो २. हे विधान फक्त पाप पुण्य ह्या परिप्रेक्षात वाचावे, त्यापलीकडे अर्थ शोधू नये PS : कार्यकारण भाव = cause and effect ह्यावरून वरील प्रश्न पडला आहे. - (प्रश्नांकित) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

संसारातील वाईट घटना मात्र

कंजूस
Mon, 02/12/2024 - 16:39 नवीन
संसारातील वाईट घटना मात्र बाजूच्यांना, नातेवाइकांना पिडण्यासाठीच असतात.
  • Log in or register to post comments

संस्कार आणि पाप-पुण्य

तुषार काळभोर
Mon, 02/12/2024 - 20:46 नवीन
लहानपणापासून आपल्यावर जे जे 'संस्कार' आपले पालक, शिक्षक, गुरु वगैरे करत असतात, पुस्तके, प्रवचने, चर्चा, वगैरेतून योग्य-अयोग्य वर्तनाबद्दल आपल्याला जो काही बोध होत असतो, त्याचे पालन कळत-नकळत आपल्याकडून जर घडून आले नाही, तर अशा विविध 'चुकांचे' फळ आपल्याला याचि जन्मी - याचि देही सोसावे लागणार आहे का ?
समजा एका मुलावर असे आईवडिलांनी लहानपणापासून संस्कार केले, की चोरी करणे पाप आहे. त्याने चोरी केली तर ते त्याच्यासाठी पाप असेल. समजा दुसऱ्या घरातील आईवडिलांनी मुलाला चोरी करायला शिकवलं, दरोडा टाकायला शिकवलं. हे आपण आपलं पोट भरण्यासाठी करत आहोत, आपलं पोट भरण्यासाठी आपण जे काम करतो त्यामध्ये कोणी आडवा आल्यास त्याला इजा करणे अथवा मारून टाकणे यात चुकीचं काही नाही, असे संस्कार केले. आणि त्या मुलाने चोरी अथवा खून केला, तर त्याने पाप केले का? आपण करत आहोत, ते चुकीचे आहे, हेच त्याला माहिती नाही. असा दरोडा घालून आपण आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करत आहोत, त्यांना सांभाळत आहोत, त्यांना सुख समाधान देत आहोत, या विचारांनी तो चोरी, दरोडे, खून करत राहिला, तर ते पुण्य आहे का? आपण कर्म करत राहायचं, ते आपलं काम आहे. ते पाप आहे की पुण्य, त्याचे काय फळ मिळेल, याचा विचार आपण नाही करायचा. फळाच्या अपेक्षेने कर्म करू नये.
  • Log in or register to post comments

पाप-पुण्य, चूक-बरोबर, चांगले - वाईट वगैरे सर्व मानवी कल्पना ...

चित्रगुप्त
Tue, 02/13/2024 - 21:43 नवीन
पाप-पुण्य, चूक-बरोबर, चांगले - वाईट वगैरे सर्व मानवी कल्पना. निसर्गचक्रात त्यांचे काहीही स्थान नाही. ब्रम्हांडाचा गाडा नियत निसर्गनियमांप्रमाणे अव्याहत चालत रहातो, त्यानुसारच मानवी जीवनातल्याही सगळ्या घटना घडत असतात . यालाच 'नियति' म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

खरं तर या जन्मात आठवूनही न

रामचंद्र
Tue, 02/13/2024 - 00:07 नवीन
खरं तर या जन्मात आठवूनही न सापडणारी कुठलीही दुष्कर्मे न करूनही अमर्याद दु:ख ज्यांच्या वाट्याला आलं आहे अशा कितीतरी व्यक्ती आपल्या आजूबाजूला दिसतात. मग हे या जन्मीचं नाही तर मागच्या जन्मीचं पाप एवढाच तर्क लागू होतो. पण जसं चांगल्या कृत्याची अनुभूती येईलच असं नाही पण वाइटाची मात्र लगेच प्रचिती येते हा मात्र बहुतेकदा अनुभव येतोच. एकूण काय, तर कर्म आणि भोग यांची संगती लावता येत नसली तरी त्या भीतीने का होईना सरळ मार्ग अवलंबणेच इष्ट.
  • Log in or register to post comments

या विषयावर सुरवातीलाच...

कर्नलतपस्वी
Tue, 02/13/2024 - 05:51 नवीन
प्रारब्ध आणी कर्म हा लेख लिहीलाय https://misalpav.com/node/48505 कार्यकारणभाव न समजणार्‍या घटनांबद्दल गोविंदाग्रजांची( रामगणेश गडकरी), ‘एखाद्याचे नशीब’ नावाची अर्थपूर्ण कविता. झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती, स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती; सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते, एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !
  • Log in or register to post comments

@कर्नल तपस्वी: खूप छान लेख आहे तुमचा.

चित्रगुप्त
Tue, 02/13/2024 - 22:01 नवीन
लेख वाचला. खूपच चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

ज्यांना आपण चुका समजतो त्या

अहिरावण
Tue, 02/13/2024 - 19:45 नवीन
ज्यांना आपण चुका समजतो त्या खरोखर चुका असतात का? जी कृत्ये योग्य समजतो आणि करतो त्यांची फळे खरोखर चांगलीच असतात का? कर्मे आणि फळे यांचा एकमेकांशी संबंध खरोखर असतो का?
  • Log in or register to post comments

@ अहिरावणः चुका आणि त्यांची फळे वगैरे.

चित्रगुप्त
Tue, 02/13/2024 - 21:59 नवीन
ज्यांना आपण चुका समजतो त्या खरोखर चुका असतात का?
आपले एकादे कृत्य हे काहीएक विशिष्ट संदर्भात आपण 'चूक' केली असे स्वतःला/ इतरांना वाटत असते. संदर्भ बदलले की तीच गोष्ट 'बरोबर' वाटू शकते.
जी कृत्ये योग्य समजतो आणि करतो त्यांची फळे खरोखर चांगलीच असतात का?
'योग्य-अयोग्य, चांगले-वाईट याच मुळात मानवी कल्पना आहेत. (असे आम्हास वाटते)
कर्मे आणि फळे यांचा एकमेकांशी संबंध खरोखर असतो का?
- कोणतेही 'कर्म' घडून आले, की आणि त्याचा कोणता ना कोणता, (कधी ना कधी) 'परिणाम' हाही घडून येतच असतो. अर्थात या दोन्ही गोष्टींचा संबंध असल्याचेच दिसून येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

'मृत्यु' ही शिक्षा नसून वरदान आहे.

टर्मीनेटर
Wed, 02/14/2024 - 17:58 नवीन
'मृत्यु' ही शिक्षा नसून वरदान आहे.
+१००० मौत को तो युहीं बदनाम करतें हैं लोग... तकलीफ तो जिंदगी देती हैं! - संत आयुषमान ठाकुर (रोनीत रॉय) चित्रपट 'बॉस'
  • Log in or register to post comments

सुरेश भट असेच काही म्हणले होते.

कर्नलतपस्वी
Sun, 02/18/2024 - 07:53 नवीन
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी नुसतेच शब्दांचे बहर उधळले होते.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

तोडगा असतो. बटवा सैल करा.

कंजूस
Fri, 02/16/2024 - 14:45 नवीन
तोडगा असतो. बटवा सैल करा.
  • Log in or register to post comments

काही लोकांनी धाग्याची अगदी

Trump
गुरुवार, 02/22/2024 - 14:40 नवीन
काही लोकांनी धाग्याची अगदी गटारगंगा केली आहे.
  • Log in or register to post comments

पुनर्जन्मा बद्दल बोलण्याचा

राघव
गुरुवार, 02/22/2024 - 21:28 नवीन
पुनर्जन्मा बद्दल बोलण्याचा मला तरी बुवा काही अधिकार नाही असं वाटतं. बाकी कर्मसिद्धांता बद्दल हरिभाई ठक्कर यांचे विचार गहन आणि तर्कपूर्ण वाटले. इच्छुकांनी जरूर वाचून बघावे - लिंक
  • Log in or register to post comments

कर्म आणि फळ

कॉमी
Sat, 02/24/2024 - 11:28 नवीन
कर्म आणि फळ अनेकदा ही विचारसरणी किती घातक आहे, हे लोकांच्या रडार खालून जाते. कर्मविपाक विचारसरणी अतिशय घातक आहे आणि अनेक रिग्रेसिव विचारांचा मुळाशी आहे. त्यात न्याय नाही, उलट जे काय होते आहे ते न्यायच समजून सरळ दिसणाऱ्या अन्यायाला जस्टिफाय करण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक युगात आपण ज्याला आर्थिक, सामाजिक न्याय म्हणतो त्याच्या संपूर्ण विरोधात जाणारी ही विचारसरणी आहे. समजून घ्या -
  • फायनान्स मध्ये थियरी आहे, effecient market theory. तिचे तत्व आहे market discounts everything. तशीच आहे ही विचारसरणी. जे काही अन्याय आहेत ते तुमच्या काल्पनिक संचित कर्मामुळे.
  • तुम्ही काही त्रासातून जाताय, किंवा जन्मतः काही समजनिर्मित किंवा शारीरिक अडथळे तुमच्या मार्गात आहेत, तर ह्या गोष्टींना कारणीभूत ठरणारे संचित खरंच होते की नाही हे बघण्याची गरजच नाही, कारण की तुम्ही त्रास भोगताय ह्याचाच अर्थ तुमचे पूर्वसंचित तश्या प्रकारचे होते असा आहे.
  • Effecient market थियरी नुसार ओव्हर व्हॅल्यूड आणि अंडर व्हॅल्युड ह्या भ्रामक कल्पना आहेत. कारण जी काही व्हॅल्यूएशनशी संबंधित माहिती आहे ती "मार्केट"ने आलरेडी विचारत घेतली आहे, आणि ती माहिती चालू दरात आधीच प्रतिबिंबित होत आहे, त्यामुळे उगाच तुम्ही माथाफोडी करून fair value काढणे मूर्खपणाचे आहे, असे ही थियरी म्हणते. त्यामुळे किमतीचे बुडबुडे वैगरे काही नसतात, सगळे आलबेलच असते, असे ही थियरी म्हणते.
  • कर्मविपाक सुद्धा तसेच. तुम्हाला दिसणारे जग हे न्याय्यच आहे, कारण हे सगळे काल्पनिक संचिताचे परिणाम झालेले जग आहे.
  • जाती असोत, वर्ग असोत, सो कॉल्ड वर्ण असोत, सगळे ह्या कर्म आणि संचिताच्या मुळांवर उभे आहेत. त्यामुळे कर्म - संचित ह्या सगळ्या भ्रामक कल्पनांवर सगळ्यांनी तार्किक विचार करणे, पुरावे शोधणे, नाही मिळाले तर ह्या गोष्टींचा धिक्कार करणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments

त्यात न्याय नाही, उलट जे काय

राघव
Tue, 02/27/2024 - 08:02 नवीन
त्यात न्याय नाही, उलट जे काय होते आहे ते न्यायच समजून सरळ दिसणाऱ्या अन्यायाला जस्टिफाय करण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक युगात आपण ज्याला आर्थिक, सामाजिक न्याय म्हणतो त्याच्या संपूर्ण विरोधात जाणारी ही विचारसरणी आहे.
हे म्हणणं जरा धारिष्ट्याचं आहे. कर्मविपाकामागील हेतू बघणे महत्त्वाचे आहे. कर्मविपाक हा स्विकृतीसाठी (Acceptance) बनलेला सिद्धांत आहे. जे आहे, जसं आहे, आपल्या पटो वा न पटो, आवडो वा न आवडो.. ते आहे आणि त्याची स्विकृती गरजेची आहे. तसे केले नाही तर माणूस केवळ चिडचिड करतच जगेल आणि मरेल. आणि स्विकृती जरी असली तरी जी परिस्थिती आहे ती तशीच रहावी असे कर्मविपाक सांगत नाही. आहे त्यात बदल घडवण्यासाठी हा सिद्धांत नाही म्हणत नाही.
जे काही अन्याय आहेत ते तुमच्या काल्पनिक संचित कर्मामुळे.
काल्पनिकच असेल असं कशावरून? नसूही शकेल की. केवळ आपल्याला माहीत नाही, समजत नाही किंवा आठवत नाही म्हणून ती गोष्टच नाही असे गरजेचे नाही.
त्यामुळे कर्म - संचित ह्या सगळ्या भ्रामक कल्पनांवर सगळ्यांनी तार्किक विचार करणे, पुरावे शोधणे, नाही मिळाले तर ह्या गोष्टींचा धिक्कार करणे गरजेचे आहे.
हे पटत नाही. माझ्या पूर्वसुकृताचे पुरावे शोधत बसण्यात माझा वर्तमानकाळ आणि पर्यायानं माझा भविष्यकाळ बुडतो त्याचं काय? तसेही या धिक्कारातून केवळ असूया आणि द्वेष/तेढ हेच निर्माण होणार. त्यापेक्षा आहे त्यातून चांगलं घडवायचा संकल्प घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करणे सर्वोत्तम.
  • Log in or register to post comments

कर्मविपाक हा स्विकृतीसाठी

कॉमी
Tue, 02/27/2024 - 09:23 नवीन
कर्मविपाक हा स्विकृतीसाठी (Acceptance) बनलेला सिद्धांत आहे. जे आहे, जसं आहे, आपल्या पटो वा न पटो, आवडो वा न आवडो.. ते आहे आणि त्याची स्विकृती गरजेची आहे. तसे केले नाही तर माणूस केवळ चिडचिड करतच जगेल आणि मरेल.
फक्त स्वीकृती नाही, जस्टिफिकेशन सुद्धा. तुम्ही गरीब घरात जन्माला आला. ह्यात चिडचिड करून हातात काही लागणार नाही, परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत इतपर्यंत ठीक आहे. पण ही परिस्थिती तुमच्याच agency मुळे आली, काल्पनिक पूर्वसंचित असल्यामुळे आली हे त्या परिस्थिती चे जस्टीफिकेशन झाले. तुम्ही तुमच्या पूर्वसंचीतामुळे गरीब जन्माला येणे हा सामाजिक डिफेक्ट नसून वैश्विक न्याय आहे असे पटवण्याचा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे.
आणि स्विकृती जरी असली तरी जी परिस्थिती आहे ती तशीच रहावी असे कर्मविपाक सांगत नाही. आहे त्यात बदल घडवण्यासाठी हा सिद्धांत नाही म्हणत नाही.
वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्थेत कर्मविपाक सिद्धांत असेच सांगतो. त्यात बदल घडवायचा नाहीच.
काल्पनिकच असेल असं कशावरून? नसूही शकेल की. केवळ आपल्याला माहीत नाही, समजत नाही किंवा आठवत नाही म्हणून ती गोष्टच नाही असे गरजेचे नाही.
ज्या गोष्टींचा पुरावा नाही त्या काल्पनिक. एखादी गोष्ट नसल्याचा पुरावा नाही म्हणून त्या गोष्टी आहेत असे होत नाही. जोवर पुरावा मिळत नाही तोवर पूर्वसंचित काल्पनिक आहे. तुम्ही जो बेसिस मांडत आहात त्याच्यात काय खरे काय खोटे तपासण्याची काहीही सोय नाही. काहीही खरे असू शकते, पुरावा गरजेचा नाही.
माझ्या पूर्वसुकृताचे पुरावे शोधत बसण्यात माझा वर्तमानकाळ आणि पर्यायानं माझा भविष्यकाळ बुडतो त्याचं काय?
एक सेकंद केवळ लागतो. पुरावा आहे का ? असे स्वतःला विचारायचे. उत्तर -नाही. संपला विषय. वर्तमान आणि भविष्य बुडत नाही.
तसेही या धिक्कारातून केवळ असूया आणि द्वेष/तेढ हेच निर्माण होणार. त्यापेक्षा आहे त्यातून चांगलं घडवायचा संकल्प घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करणे सर्वोत्तम.
द्वेष आणि तेढ कशी काय ? एक चुकीचा विश्वास जर सगळे बाळगत असतील तर त्याबद्दल योग्य तो विचार करून विश्वास काढून टाकण्यात द्वेष आणि तेढ कुठून तयार होईल ? धिक्कार त्या विचारांचा करायचा असे सुचवत होतो. उलट असे विचार अजूनही जिवंत आहेत त्यामुळे समाजात तेढ आणि द्वेष आहेत. ही गळवे मोकळी केली तर उलट द्वेष आणि तेढ किमान ह्या बाबत तरी कमी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

पण ही परिस्थिती तुमच्याच

राघव
Tue, 02/27/2024 - 17:40 नवीन
पण ही परिस्थिती तुमच्याच agency मुळे आली, काल्पनिक पूर्वसंचित असल्यामुळे आली हे त्या परिस्थिती चे जस्टीफिकेशन झाले. तुम्ही तुमच्या पूर्वसंचीतामुळे गरीब जन्माला येणे हा सामाजिक डिफेक्ट नसून वैश्विक न्याय आहे असे पटवण्याचा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे.
वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्थेत कर्मविपाक सिद्धांत असेच सांगतो. त्यात बदल घडवायचा नाहीच.
बरं. पुर्वी लोकं असंच धरुन चालत असं गृहित धरू. ते चूक आहे असं सरळ सरळ दिसतं. मग आताही तेच करणार काय? वाद घालत बसून त्यातनं चांगल्यात चांगलं निष्पन्न काय म्हणता येईल? कर्मविपाक सिद्धांत चूक, इतकेच. इतके होऊनही त्यामुळे माणसाची परिस्थिती बदलेल काय? त्यासाठीचे प्रयत्न वेगळे लागणारच ना? माझं इतकंच म्हणणं आहे की कर्मविपाक बरोबर का चूक या वादात न पडता, आहे त्यातून चांगलं घडवण्याचं कर्म करणं जास्त गरजेचं आहे.
एक सेकंद केवळ लागतो. पुरावा आहे का ? असे स्वतःला विचारायचे. उत्तर -नाही. संपला विषय. वर्तमान आणि भविष्य बुडत नाही.
इतके ते सोपे नाही. पण त्यावर वाद घालून उपयोगच नाही कारण पुर्वसुकृत शोधत बसणे हेच मुळात चूक आहे.
एक चुकीचा विश्वास जर सगळे बाळगत असतील तर त्याबद्दल योग्य तो विचार करून विश्वास काढून टाकण्यात द्वेष आणि तेढ कुठून तयार होईल ? धिक्कार त्या विचारांचा करायचा असे सुचवत होतो. उलट असे विचार अजूनही जिवंत आहेत त्यामुळे समाजात तेढ आणि द्वेष आहेत. ही गळवे मोकळी केली तर उलट द्वेष आणि तेढ किमान ह्या बाबत तरी कमी होईल.
एखाद्याचं आयुष्य चांगलं आणि दुसऱ्याचं वाईट याचं कारण जर सांगताच येणार नसेल, तर मग ज्याच्या आयुष्य वाईट तो दुसऱ्याच्या आयुष्याकडे बघेल तेव्हा असूया (आणि त्यातूनच पुढे उत्पन्न होऊ शकणारी तेढ) कशी येणार नाही? पुन्हा सांगतो, कोणताही सिद्धांत चूक वा बरोबर हे मांडत बसल्यानं अडचणी सुटत नाहीत. आधीच्या चुका ओळखण्यापुरतीच त्यांची गरज खरेतर, पण ते तेवढ्यापुरता मर्यादित राहत नाहीत. भविष्य नीट होण्यासाठी भूतकाळातून शिकून वर्तमानात चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करणं हे ठीक. यापलिकडे यावर मांडण्यासाठी माझ्याकडे काही नाही. त्यामुळे आता थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

.

कॉमी
Tue, 02/27/2024 - 21:18 नवीन
वाद घालत बसून त्यातनं चांगल्यात चांगलं निष्पन्न काय म्हणता येईल? कर्मविपाक सिद्धांत चूक, इतकेच. इतके होऊनही त्यामुळे माणसाची परिस्थिती बदलेल काय? त्यासाठीचे प्रयत्न वेगळे लागणारच ना?
बरोबर, परिस्थिती अशी काही बदलणार नाही. पण ही थियरी कशी चुकीची आहे हे लक्षात आल्यावर जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगलाच बदलेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

स्पष्टीकरण व समर्थन

नठ्यारा
Tue, 02/27/2024 - 19:58 नवीन
कॉमी,
काल्पनिक पूर्वसंचित असल्यामुळे आली हे त्या परिस्थिती चे जस्टीफिकेशन झाले.
या विधानाशी पार असहमत आहे. हे परिस्थितीचं समर्थन नाही. होऊही शकंत नाही. ते केवळ स्पष्टीकरण आहे. माझ्यावर झालेला अन्याय हा इतरांवर अन्याय करायचा परवाना नव्हे, याचं भान राखण्यासाठी निर्माण केलेली सोय आहे. ती सोय केवळ त्याच कामासाठी वापरायला हवी. परिस्थितीच्या समर्थनासाठी तिचा वापर वर्ज्य आहे. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

नाठयारा,

कॉमी
Tue, 02/27/2024 - 20:18 नवीन
एखादा माणूस तुरुंगात आहे. तो त्याच्या पूर्व गुन्ह्यांमुळे तुरुंगात आहे - हे विधान तो माणूस तुरुंगात असण्याला जस्टिफाय करत आहे. त्याने गुन्हा केला म्हणून तो तुरुंगात आहे हे त्या व्यक्तीच्या तुरुंगात असण्याचे समर्थन आहे. फरक इतकाच की पूर्व गुन्हे कोर्टात सिद्ध व्हावे लागतात. इथे तसा काही विषय नाही, उलट मागून निष्कर्ष काढला जातो, माणूस तुरुंगात आहे म्हणजे त्याने गुन्हा केला असलाच पाहिजे. हे लॉजिक जेल बाबत चालू शकेल कारण की गुन्हा घडला आहे का, तो त्यानेच केला आहे का हे बघण्यासाठी एक व्यवस्था आपण तयार केली आहे. जर नवीन पुरावे मिळाले तर माणूस जेल मधून बाहेर पण येतो. कर्मविपाक पूर्णपणे काल्पनिक आधारावर आहे. पूर्वसंचित कर्म हेच मुळात काल्पनिक आहे त्यामुळे ते तपासण्यासाठी असलेली यंत्रणा वैगरे तर आणखी दूर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

गृहीत धरणे म्हणजे समर्थन करणे नव्हे

नठ्यारा
Tue, 02/27/2024 - 22:35 नवीन
कॉमी,
फरक इतकाच की पूर्व गुन्हे कोर्टात सिद्ध व्हावे लागतात. इथे तसा काही विषय नाही, उलट मागून निष्कर्ष काढला जातो, माणूस तुरुंगात आहे म्हणजे त्याने गुन्हा केला असलाच पाहिजे.
रोचक विधान आहे. समजा पोलिसी तपास झाल्याखेरीज न्यायालयात गुन्हा शाबीत होणारा नसेल. तर पोलिसी तपासातही संशयित गुन्हेगार आहे हे गृहीत धरूनंच तपास करावा लागतो. त्याच न्यायाने कोण्या माणसाने त्याच्यावरील ओढवलेला अनावस्था प्रसंगासाठी कर्मविपाकास गृहीत धरलं तर काय बिघडलं? कर्मविपाकास गृहीत धरून स्वस्थ बसायचं नाहीये. परिस्थिती पालटण्यासाठी प्रयत्न तर करावे लागतातच. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

तपास वेगळा आणि जजमेंट वेगळे.

कॉमी
Wed, 02/28/2024 - 06:57 नवीन
तपास वेगळा आणि जजमेंट वेगळे. तुमच्या कर्मविपाक थियरी मध्ये आधी परिस्थिती येते (जजमेंट) आणि मग परिस्थिती अनुकूल संचित असणार असा उलटा निष्कर्ष काढला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

अंदाज आणि तपास

नठ्यारा
Wed, 02/28/2024 - 19:03 नवीन
अंदाज ( जजमेंट ) बांधल्याशिवाय तपास पुढे सरकू शकंत नाही. आज असंख्य लोकांना देवतांचा जप केल्याने व्यावहारिक अडचणी दूर झाल्याचे अनुभव आले आहेत. कर्मसिद्धांताशिवाय त्यांचं स्पष्टीकरण अशक्य आहे. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

अंदाज बांधणे वेगळे.

कॉमी
Wed, 02/28/2024 - 19:24 नवीन
अंदाज बांधणे वेगळे. कर्मविपाकात अंदाज बांधला जात नाही, तर जी परिस्थिती आहे तो निवाडा आहे, पूर्व कर्मांचा. बास. शब्द छळ करण्यात रस नाही. माझा मुद्दा पुरेसा क्लियर आहे. तुमची पेटंट स्टाईल आहे वाचून मनाजोगता अर्थ काढण्याची, पुढच्याला अर्थ काय अभिप्रेत आहे ह्याकडे साफ दुर्लक्ष करून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

मी ही थांबतो

नठ्यारा
Wed, 02/28/2024 - 20:36 नवीन
तुम्हांस जो अर्थ अभिप्रेत आहे तो मला अभिप्रेत नाही. त्यामुळे मी देखील थांबतो. तुम्ही दाखवलेल्या समजूतदारपणाबद्दल आभार ! :-) -ना.न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

हुश्शार लोकांची हुश्शार चर्चा

अहिरावण
Wed, 02/28/2024 - 10:57 नवीन
हुश्शार लोकांची हुश्शार चर्चा. काही घंटा कळत नाही कोण योग्य कोण अयोग्य. सालं पुर्वजन्मातलं पापच आड येतंय.
  • Log in or register to post comments

काही घंटा कळत नाही कोण योग्य कोण अयोग्य.

मुक्त विहारि
Fri, 03/01/2024 - 21:09 नवीन
अगदी अगदी... काल आमच्या बाबा महाराज डोंबोलीकर यांना हाच प्रश्न विचारला. बाबा महाराज म्हणाले की, उत्तम कार्य केले की उत्तम पेय मिळते. 'मुखी कुणाच्या सिंगल माल्ट.. कुणा मुखी पहिली धार." त्यामुळे हातात आलेले पेय, मुकाट प्यायचे. हाती कुठलेही पेय असो, स्वर्गसुख हे ठरलेलेच. तस्मात्, जास्त विचार न करता, आलेला क्षण आनंदाने जगा. ------ त्यामुळे आम्ही पण मध्यमवर्गीय असल्याने, बार्ली वॉटर पितो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

एक निरिक्षण

स्वधर्म
Wed, 02/28/2024 - 17:47 नवीन
धार्मिक ग्रंथातील कर्मविपाक सिध्दांत हा मानवी ज्ञानाची व आयुर्ष्याची मर्यादा लक्षात घेता पडताळून पाहता येत नाही. सबब त्याविषयी आज रोजी कोणीही काहीही बोलले तरी त्यावर ठाम विश्वास ठेवणे शक्य नाही. प्रश्न फक्त इतकाच आहे, की त्यावरील विश्वासामुळे समाजात काय घडले व घडत आहे. वर्णाश्रम व्यवस्था टिकून रहावी, लोकांनी आपआपली विहित कर्मेच करत रहावीत व उतरंडीच्या अन्यायकारक समाजव्यवस्थेशी लढण्याचा विचारही त्यांच्या मनात येऊच नये, यासाठी कर्मविपाक सिध्दांताचा प्रचंड उपयोग झाला. त्यामुळे हिंदू समाजाची प्रचंड हानी झाली, हे मात्र स्पष्ट आहे.
  • Log in or register to post comments

+१

कॉमी
Wed, 02/28/2024 - 19:38 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

अन्यायकारक उतरंड ?

नठ्यारा
Wed, 02/28/2024 - 20:35 नवीन
अन्यायकारक उतरंड हा काय प्रकार आहे ? आणि तिचा वर्णाश्रमाशी काय संबंध ? विहित कर्मे म्हणजे ज्यातून आत्म्याचं हित होतं अशी कर्मे. ती करायलाच हवीत. ती करायची नसतील तर आळशीपणा गळ्यांत पडेल. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

वर्णव्यवस्था = अन्यायकारक उतरंड

स्वधर्म
गुरुवार, 02/29/2024 - 21:26 नवीन
अन्यायकारक उतरंड म्हणजे वर्णव्यवस्था म्हणायचे होते आणि विहित कर्मे म्हणजे प्रत्येकाला आपआपल्या वर्णाप्रमाणे करावयाची कर्मे. वैदिक काळात हीच समाजव्यवस्था होती. मी का म्हणून ही हीन (समजली जाणारी) कामे करायची आणि मला ज्ञानाचा, लढाई करण्याचा अगर व्यापार करण्याचा का अधिकार नाही? हे प्रश्न शूद्र वर्णात जन्मलेल्या व्यक्तीला पडून तो या व्यवस्थेशी भांडायला उठेल ना! ते होऊ नये म्हणून त्याला पूर्वजन्मीच्या कर्मामुळे तुला हा वर्ण मिळाला व म्हणून तुला क्षमता असली तरी दुसरी कामे करण्याचा अधिकार नाही हे समजावणे, कर्मसिध्दांत समाजात सर्वमान्य असल्यामुळे शक्य झाले. हेच उलट पध्दतीने ब्राम्हण वर्णाच्या बाबतीतही झाले असणार. त्याला समजा लढण्याची किंवा व्यापार करण्याची आवड व क्षमता असली तरी काम ते केले तर हीन समजले जाऊ अशी भिती. परकीय मुघल व इंग्रज आल्यावर लढायला आपल्याकडचे फक्त १०% क्षत्रिय! म्हणून त्यांनी कधीही आपल्या धर्मव्यवस्थेत (वर्णव्यवस्था, कर्मसिध्दांत इ.) ढवळाढवळ केली नाही, व त्यामुळेच ते अनेक शतके आपल्यावर राज्य करू शकले. हे आपल्या समाजाचे फार मोठे नुकसान झाले व अजूनही होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

जर पूर्वसंचित, पूर्वकर्म

गवि
गुरुवार, 02/29/2024 - 08:14 नवीन
जर पूर्वसंचित, पूर्वकर्म यांनुसार प्रत्येक व्यक्तीला फळ मिळणारच असेल तर मग पोलीस, न्यायव्यवस्था, तुरुंग, अटक, फाशी असल्या भानगडी निर्माण करून मनुष्य त्यात ढवळाढवळ कशाला करतोय ? ;-) कॉमी यांची मांडणी अगदी योग्य आहे. आपण जे काही करतो त्याचे शास्त्रीय परिणाम (भौतिक, रासायनिक, जैविक इ) वगळता नैतिक परिणाम किंवा दीर्घकाळ हिशोब ठेवून कोण्या नियतीने त्याचे बक्षीस अथवा शिक्षा, चालू अथवा पुढील जन्मात बहाल करणे .. हे सर्व तर्कदुष्ट असण्याचे मुख्य कारण म्हणजे.. जगाचे (विश्वाचे) रहाट गाडगे चालू ठेवण्यासाठी हे सर्व सव्यापसव्य करण्याची निसर्गाला काही गरज असल्याचे दिसत नाही. कोणी ईश्वर, नियती, निसर्ग किंवा शक्ती असेलच तर तिला काय पडलीय ? नोंदवही ठेवा, फळ द्या. काय फरक पडतो ? कोणी कशाला असला उपद्व्याप करेल? आपण चांगले काही केले की समाधान देणारा, आणि वाईट काही केले की मनाला कुरतडणारा जो कोणी असतो तो म्हणजे आपणच. आपल्याच आत असतो तो. मानो या न मानो.
  • Log in or register to post comments

बतोकापि

नठ्यारा
गुरुवार, 02/29/2024 - 20:37 नवीन
गवि, विनोदाचा भाग सोडला तर हा बळी तो कान पिळी या नियमास उत्तेजन देणारा संदेश वाटतो. तुम्ही उपरोधाने लिहिलंय ते कळतंय. पण नेमक्या याच युक्तिवादाचा आधार घेऊन अनेक नरपशूंनी असंख्य निरपराध्यांवर क्रूर अत्याचार केले आहेत. द्वेष्टे या कथेतला उमराव दु:खाच्या भरात अशीच काहीशी मांडणी करतो आहे. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हे सर्व सिद्धांत आणि

सुबोध खरे
गुरुवार, 02/29/2024 - 11:56 नवीन
हे सर्व सिद्धांत आणि काथ्याकूट मला समजत नाही आणि त्याच्यात फारसा रस ही नाही. पण सिगरेट प्यायल्याने कर्करोग होतो हा कार्यकारण भाव सोपा आहे पण "जीवनभर मैने एक भी सिगरेट नही पिया ना कभी तंबाखू का सेवन किया फार मुझे ये कॅन्सर क्यूँ हुआ हे प्रश्न विचारणाऱ्या रुग्णाला समर्पक उत्तर देणे कठीण आहे. स्तनाच्या कर्करोगाने नुकतीच माझी पुतणी २५ व्या वर्षी निवर्तली. पैसा असूनही आणि जगातील उत्तमात उत्तम उपचार करूनही काहीही उपयोग झाला नाही. अशा वेळेस प्राक्तन,दुर्दैव सोडून काय सांगणार? कालच चार वेळेस गर्भपात झाल्यानंतर गरोदर राहिलेल्या मुलीला पाचव्यांदा गर्भ आतच दगावला आहे हे सांगणे आणि तिला ते स्वीकारणे किती कठीण आहे हे दुरून पाहणाऱ्याला समजत नाही. तिच्यात आणि नवर्यात काहीही दोष सकृतदर्शनी दिसत नाही( सर्व उपलब्ध तपासण्या केल्यावरही). random bad luck सोडल्यास कोणतेही कारण देता येत नाही. असं माझ्याच बाबतीत का घडतंय? आमचं पुण्य कुठे कमी पडतंय? असा टाहो फोडणाऱ्या मुलीला कसं समजवायचं. प्रत्येक गोष्टीत शास्त्र कामास येत नाही. तेथे अध्यात्मच थोडं फार उपयोगी येतं. ईश्वरेच्छा किंवा पूर्वकर्म हेच सांगावं लागतं. कोणतेही ठोस कारण देता येत नाही. अगतिक झालेल्या मानवी मनावर फुंकर घालण्यासाठी अध्यात्माचाच आधार घ्यावा लागतो. फुंकर घातल्याने जखम बरी होण्यात कोणताही हातभार लागत नसला तरी जखमी माणसाच्या मनाचे समाधान तर होते.
  • Log in or register to post comments

जाउ द्या हो...

अहिरावण
गुरुवार, 02/29/2024 - 13:32 नवीन
ज्यांना नाही होत जखमा कधी त्यांच्याच कडून दुस-यच्या दु:खाला दिलासा देणा-या गोष्टींची खिल्ली उडवली जाते. प्रत्येक गोष्ट तरतमभावात बसवण्याचा अट्टाहास असलेल्या लोकांना समजावणे गैर असते. आपण फुंकर घालून दिलासा द्यावा जसे जमेल तसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा