✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डासबोध

र — रम्या, Tue, 02/27/2024 - 11:51
गालावरी हसू, मुखावरी दाढी । राजकारणे गुढी, बांधू पाहे ।। दाढीचे वजन, दाढीचेच भजन । करू आम्ही नमन, दाढीचेच ।। दाढीचाच फोटो, दाढीचीच मूर्ती । सांगावी अपकीर्ती, नेहरूंची ।। पाजू आमुचे रक्त, आम्ही अंधभक्त । करू मशागत, दाढीचीच ।। कपिला गाय, करोनिया माय । गळ्यातच पाय, आमच्याच ।। ईडीचाच टेकू, घेऊनिया फेकू । विरोधकांचे दमन, करू पाहे ।। जे का ईडीसी घाबरले, त्यांसी म्हणे जो आपुले । समीप येता म्हणावे, शुद्ध जाहले ।। चोरावे धनुष्य, लांबवावे घड्याळ । हाती द्यावे टाळ, जनतेच्या ।। प्राणप्रतिष्ठेचा कावा, विरोधकांचा चावा । दाढीतल्या उवा, ठेचू पाहे ।। मस्तवाल खोंड, पाळोनिया गुंड । निर्भयांचे तोंड, फोडू पाहे ।। जनता अडानी, मतदार अडानी । अडानीच अडानी, चहूकडे ।। हुकूमशाहीचा वास, येताच डास । राष्ट्रप्रेमाची गुणगूण, करू पाहे ।।

प्रतिक्रिया द्या
6104 वाचन

💬 प्रतिसाद (24)

एक नंबर रम्या भाऊ !!!

अहिरावण
Tue, 02/27/2024 - 11:53 नवीन
एक नंबर रम्या भाऊ !!! फक्कड जमलंय !!!
  • Log in or register to post comments

माननीय मोदींवर हुकूमशाहा

महिरावण
Tue, 02/27/2024 - 12:06 नवीन
माननीय मोदींवर हुकूमशाहा झाल्याची टिका ह्या कवितेत आहे. वरून धनुष्य, घड्याळ चोरल्याचे आरोपही आहेत. इडी विरूध्द गरळ ओकून झाल्यावर रम्या हा आयडी आता अदानीवरही घसरलाय. संपादक मंडळ मात्र काहीही करायला तयार नाही. किती खालची पातळी गाठल्यावर संपादक मंडळ एक्टीव होणार?? -महेंद्र रावणबळी
  • Log in or register to post comments

+१

वामन देशमुख
Tue, 02/27/2024 - 13:08 नवीन
महिरावण यांच्याशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महिरावण

अरे व्वा. लैच भारी. स्वागत.

अमरेंद्र बाहुबली
Tue, 02/27/2024 - 12:48 नवीन
अरे व्वा. लैच भारी. स्वागत. अजून येऊद्या. भक्त पिसाळतील पण अजून असे डासबोध टाकून त्यांच्या जखमेवर मिठ चोळा. :)
  • Log in or register to post comments

बाझीगर यांच्या अशाच पण

महिरावण
Tue, 02/27/2024 - 12:55 नवीन
बाझीगर यांच्या अशाच पण विरुद्ध आशयाच्या कवितेवर तुम्ही टीका करत असताना येथे मात्र तुमचा दांभिकपणा दिसून येतो. तिकडे गुलाम पिसाळले असेही म्हणता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

जनता अडानी, मतदार अडानी ।

वामन देशमुख
Tue, 02/27/2024 - 13:07 नवीन
जनता अडानी, मतदार अडानी । अडानीच अडानी, चहूकडे ।।
पुरोगाम्यांना वाटतंय जनता अडानी राहावी. पण भारताचे प्रचंड लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मात्र "सबका साथ सबका विकास" असा ध्यास घेतलाय. फरक आहे!
  • Log in or register to post comments

विडंबन भारी,

कर्नलतपस्वी
Tue, 02/27/2024 - 13:39 नवीन
बंडाचा झेंडा तिकिटाचा घोळ कार्यकर्त्यांला म्हणती सतरंजीवर लोळ मानकरी तिकीटाचे अदुगरच ठरले कार्यकर्त्यांच्या ओठावर मधाचे बोट फिरले मतदार राजा म्हणजे शिराळशेठ पाच वर्षांत एकदा विनम्र भेट एक दिवसाच राज्य एक दिवसाचा राजा नंतर मात्र टका सेर भाजी टका सेर खाजा तेव्हां मतदार, कार्यकर्त्यांनी आपली जागा ओळखावी आणी आपसातली तू तू मैं मैं थांबवावी.
  • Log in or register to post comments

पाजू आमुचे रक्त, आम्ही

अमरेंद्र बाहुबली
Tue, 02/27/2024 - 13:47 नवीन
पाजू आमुचे रक्त, आम्ही अंधभक्त । करू मशागत, दाढीचीच ।। हे विशेष आवडले. तसेच मिपावरील काही लोक आठवले. त्यांच्यावर हे वर्णन हुबेहुब बसते. काही अल्ट्रा प्रो अंधभक्त तर आकाने दाढी खाजवली तरी तिला मास्टरस्ट्रोक म्हणतात.:)
  • Log in or register to post comments

आमच्या पण चार ओळी....

मुक्त विहारि
Tue, 02/27/2024 - 18:36 नवीन
करी ३७० रद्द, तोच आमचा नेता. आता आणील UCC, हाच आमचा नेता. CAA आणि NRC ला विरोध जरी अपार. आम्हीच निवडून आणू चारशे पार.
  • Log in or register to post comments

करी भ्रष्टांना पावन, तोच आमचा

अमरेंद्र बाहुबली
Tue, 02/27/2024 - 19:39 नवीन
करी भ्रष्टांना पावन, तोच आमचा नेता, सोडेल पाळीव ईडी, तोच आमचा नेता. बोलले खोटं नी वाढवेल पेट्रोलचे दर अपार असं करून आणेल ४०० पार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जन पळभर म्हणतील, हाय हाय...

मुक्त विहारि
Tue, 02/27/2024 - 22:33 नवीन
नाही पर्याय लोकसंख्या नियंत्रणाला आणि शत्रूच्या मुसक्या आवळायला पाकिस्तान थकला, चीनही आला जेरीस आर्थिक उन्नती सुरू जाहली वेगवान रेल्वे सुरू जाहली बघुनी ही प्रगती जनता वेडावली काही लोकांची भांडी फुटकी दोष द्यायला आहेच मग ईडी. कर नाही तर डर कशाला? ही भूमिका नाहीशी झाली तोंड वेंगाडूनी पळपुटे निघाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तथास्तू

बाजीगर
Tue, 02/27/2024 - 23:23 नवीन
https://www.lokmat.com/national/caa-news-caa-will-be-implemented-across-the-country-in-the-first-week-of-march-online-portal-is-ready-a-a732/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मस्तच

मुक्त विहारि
Tue, 02/27/2024 - 23:34 नवीन
आता CAA आणि NRC
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर

अरे व्वाह मु.वी.जी...

कर्नलतपस्वी
Tue, 02/27/2024 - 19:02 नवीन
+
  • Log in or register to post comments

(No subject)

अमरेंद्र बाहुबली
Tue, 02/27/2024 - 21:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

गालावर खळी डोळ्यात धुंदी

वामन देशमुख
Wed, 02/28/2024 - 07:59 नवीन
गालावर खळी डोळ्यात धुंदी चेहऱ्यावर खुंटे आहेत दाढीची कधी सुरु कधी बंद भारतयात्रा वाट पाहतो मी सत्ता प्राप्तीची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझी पायपीट तू घे तुझी सत्ता मला दे
  • Log in or register to post comments

आमच्या पण दोन ओळी....

मुक्त विहारि
Wed, 02/28/2024 - 15:43 नवीन
आधीच चाल ती मंद त्यात घराणेशाहीची झूल तशांत गुलामांची टोळी साथीला नुसतीच दाढी वाढवून नाही येत अक्कल आता ज्ञानामृत देती, पीठ लीटरमध्ये मोजायची शक्कल. असे शास्त्रज्ञ आणि त्यांच्या शिष्यांचा विजय असो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

हा हा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/28/2024 - 09:09 नवीन
आशय छान आहे. भिडली रचना. अभंग रचना आकृतीबंध कमी-जास्त झालाय. पण, चालायचंच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आशय छान आहे. भिडली रचना.

वामन देशमुख
Wed, 02/28/2024 - 16:09 नवीन
आशय छान आहे. भिडली रचना.
धन्स्!
अभंग रचना आकृतीबंध कमी-जास्त झालाय.
माझ्यासारख्या गद्य-गर्दभाने चार ओळींचं विडंबनकाव्यसदृश्य काहीतरी गिरवलं म्हणजे माळरानातल्या कातळावर अंकुर उगवला म्हणा की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्यासारख्या गद्य-गर्दभाने

वामन देशमुख
Wed, 02/28/2024 - 16:16 नवीन
माझ्यासारख्या गद्य-गर्दभाने चार ओळींचं विडंबनकाव्यसदृश्य काहीतरी गिरवलं म्हणजे माळरानातल्या कातळावर अंकुर उगवला म्हणा की!
बाकी, कविता करण्याचा खूपदा प्रयत्न केला पण तो काही आपला प्रांत नाही हे लक्षात येऊन अनेक दशके झाली. आम्ही आपले गद्य-गर्दभच बरे; पद्य-मृगः काही आम्ही या जन्मी तरी होणे नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

तो प्रतिसाद तुमच्या ओळींना नसून

स्वधर्म
Wed, 02/28/2024 - 17:28 नवीन
मूळ कवितेला असावा, असे दिसते. डॉ. बिरूटे स्पष्ट करतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

ED, बाबतीत सुप्रीम कोर्ट देखील EDच्या पाठीशी...

मुक्त विहारि
Wed, 02/28/2024 - 17:33 नवीन
https://www.livehindustan.com/national/story-supreme-court-said-that-ed-summons-will-have-to-be-respected-pmla-law-updates-9416245.html कर नाही तर डर कशाला?
  • Log in or register to post comments

सत्यवचन आहे.

पाषाणभेद
Tue, 03/19/2024 - 13:09 नवीन
सत्यवचन आहे.
  • Log in or register to post comments

उपसर्ग राहिला वाटते

नठ्यारा
Tue, 03/19/2024 - 23:08 नवीन
डासबोधास सम्यक या अर्थीचा सम् वा सं असा उपसर्ग लावावासा वाटतो. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा