✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काथ्याकूट: आपण केलेल्या 'चुकांचे' फळ आपल्याला 'याच जन्मी' भोगावे लागते का ?

च
चित्रगुप्त यांनी
Mon, 02/12/2024 - 07:02  ·  लेख
लेख
मित्रहो, जगभरातले धर्मग्रंथ, पुराणे इत्यादी प्राचीन साहित्यात, मानव करत असलेल्या विविध 'पुण्यकर्मांचे' तसेच 'पापांचे' ' फळ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 'स्वर्गसुख' अथवा 'नरकयातना' या स्वरूपात मिळत असते, असे सांगितलेले दिसते. तसेच त्या त्या देशातील कायद्याप्रमाणे काही 'चांगले' कृत्य केल्याबद्दल बक्षीस, पुरस्कार, सन्मान इत्यादि, आणि 'गुन्हा' किंवा 'दुष्कृत्य' केल्याबद्दल कमीजास्त कठोर शिक्षा दिली जात असते. याखेरीज आपल्या रोजच्या जीवनात 'आळस' (- जे करायला हवे ते न करणे) किंवा 'प्रमाद' (- जे करायला नको, ते करणे) यातूनही विविध मनो- शारीरिक व्याधी, ताणतणाव, परस्पर संबंध बिघडणे असे परिणाम घडून येत असलेले दिसतात, आणि त्यांच्या कार्य-कारण भावाविषयीही तर्क करता येतो. परंतु हा काथ्याकूट वरील तिन्ही गोष्टींविषयी नाही. मग कशाविषयी आहे ? तर : आपल्या माहितीततल्या लोकांवर जेंव्हा काही गंभीर स्वरूपाचे संकट अकस्मातपणे कोसळते, आणि बघता बघता त्या व्यक्तीचे आयुष्य बरबाद होते - तेंव्हा आपण अवाक होतो, आणि हे कशामुळे घडले असावे, यामागील कार्यकारण भाव काय असावा, असा प्रश्न आपल्याला पडतो. हे संकट आरोग्यविषयक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे असू शकते. यावर उपाय म्हणून वैद्यकीय उपचार, गंडेदोरे-ताईत, देवाचा धावा, बाबा-स्वामींची काकळूत, मनो-चिकित्सकांचे उपचार, ज्योतिष, राजकीय नेत्यांची लोकांची ओळख-वशिला, वगैरे प्रयत्न करूनही जेंव्हा कशाचाच काही उपयोग होत नाही, तेंव्हा माणूस हतबुद्ध होतो आणि 'नशिबा' ला दोष देत ते सोसण्याचा प्रयत्न करतो. तर इतर लोक "त्याच्या अमूक तमूक कर्माचे फळ त्याला मिळते आहे" असा निष्कर्ष काढताना दिसतात. – मोठ्यांचे ऐकले नाही, वडीलधाऱ्यांचा अपमान केला, आई - वडिलांना घराबाहेर काढले, सुनेचा छळ केला, मित्राची फसवणूक केली, लहान मुलांना मारझोड केली, पूज्य विभूतींविषयी अनुद्गार काढले, नादिष्टपणा- छंदिफंदीपणा - बाहेरख्यालीपणा केला, देशद्रोहीपणा केला …. असे विविध प्रकारचे प्रमाद त्या व्यक्तीवर कोसळलेल्या संकटाला कारणीभूत आहेत, असे मानले जाते. हा काथ्याकूट त्याबद्दलचा आहे. लहानपणापासून आपल्यावर जे जे 'संस्कार' आपले पालक, शिक्षक, गुरु वगैरे करत असतात, पुस्तके, प्रवचने, चर्चा, वगैरेतून योग्य-अयोग्य वर्तनाबद्दल आपल्याला जो काही बोध होत असतो, त्याचे पालन कळत-नकळत आपल्याकडून जर घडून आले नाही, तर अशा विविध 'चुकांचे' फळ आपल्याला याचि जन्मी - याचि देही सोसावे लागणार आहे का ? मंडळी, तुम्हाला काय वाटते ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32933 वाचन

💬 प्रतिसाद (133)

प्रतिक्रिया

संत तुलसीदास....

कर्नलतपस्वी
Mon, 02/12/2024 - 07:24 नवीन
पहले रचा प्रारब्ध, पिछे रचा शरीर तुलसी क्यूं चिंता करे भज ले श्री रघुवीर || विषय गहन आहे. पक्षीदर्शन करता निघालोय,रुमाल टाकून ठेवतो. मी पयला.....
  • Log in or register to post comments

पहले रचा प्रारब्ध.....

चित्रगुप्त
Mon, 02/12/2024 - 22:50 नवीन
पहले रचा प्रारब्ध, पीछे रचा शरीर ... म्हणजे मनुष्य (देह) जन्माला येण्यापूर्वीच त्याच्या जीवनात क्षणोक्षणी काय घडणार, हे 'लिहून' ठेवले आहे ... असे आहे तर मग कशाबद्दलच कोणताही प्रश्नच उरत नाही. -- मला स्वतःला हे मान्य करण्याइतपत अनुभव आलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

नाडीग्रंथाच्या अनुभवातून

शशिकांत ओक
Wed, 03/06/2024 - 14:58 नवीन
नियमांपैकी काही नियम मनुष्याला (निरिक्षण, अनुमान, शास्त्रीय कसोट्या इ. तून) ठाऊक झालेले असले तरी त्याखेरीज असंख्य नियम हे नेहमीच मानवी आकलनापलिकडले राहतील. या अज्ञात निसर्गनियमांच्या परिणामी घडून येणार्या घटनांना सुटसुटीत शब्द 'देवाची' इच्छा/लीला/करणी ... असा आहे असे वाटते.
मानवी बुद्धीच्या पलिकडे जाऊन जेव्हा भारतीय प्रज्ञालोकातील माहिती ज्याला प्राचार्य अद्वयानंद गळतगे सर आणि अनेक विचारक ज्याला आकाशिक रेकॉर्ड म्हणतात ते वाचून व्यक्तिच्या जन्माच्या आधीच त्याचे, माता पिता, पत्नी /पतीची नावे जन्मतारीख, शिक्षण, नोकरी, व्यवसाय वगैरे तमिळ भाषेतील ताडपट्ट्यावरील नोंद करण्याची त्यांची क्षमता याचा अभ्यास केला की देवाची लीला, करणी ही अगाध आहे. याचा प्रत्यय येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

तुमचे अनुभव नक्की लिहा

स्वधर्म
Wed, 03/06/2024 - 17:51 नवीन
कुणाला पटतील न पटतील, तरी रोचक असतील. लिहा जरूर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

धन्यवाद चित्रगुप्त, स्वधर्म जी

शशिकांत ओक
Wed, 03/06/2024 - 20:06 नवीन
नाडी ग्रंथ भविष्य - चक्रावून टाकणारा चमत्कार पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे. त्यातील मला आणि इतरांना आलेले अनुभव आणि घटना काही वर्षांपूर्वी मिपावर सादर केलेल्या होत्या. आहेत. शिवाय इथे https://alkaoaksebookshoppy.online/ आता यावर इंग्रजी, हिंदी, गुजराती, तमिळ आणि मराठीत ई बुक्स उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

आपल्याकडून कमीत कमी चुका

श्वेता व्यास
Mon, 02/12/2024 - 10:13 नवीन
आपल्याकडून कमीत कमी चुका व्हाव्यात म्हणून 'याच जन्मात चुकांचे फळ मिळते' असं मानणे सोयीस्कर आहे, आणि आयुष्यात काही संकट आले, कसलीतरी शिक्षा भोगतोय असे वाटले आणि काय चुका केल्या ते आठवत नसेल तर 'मागच्या जन्मीच्या चुकांचे फळ' आहे असं मानणे सोयीस्कर आहे :)
  • Log in or register to post comments

सहमत आहे ...

मुक्त विहारि
Mon, 02/12/2024 - 21:09 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास

श्वेत व्यासः असं मानणे सोयीस्कर आहे ... हे एकदम सोयिस्कर आहे.

चित्रगुप्त
Mon, 02/12/2024 - 22:58 नवीन
तुम्ही प्रतिसादात मांडलेला विचार एकदम सोयिस्कर आहे. 'आपल्या बर्‍या-वाईट कर्मांची फळं आपल्याला याच जन्मी मिळणार' हा विचार (आणि धाक सुद्धा) मनुष्याला औचित्यपूर्ण कर्मे करण्यासाठी आणि अनुचित कर्मे करण्यापासून रोखण्यासाठी प्रेरित करणारा ठरतो, हे खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास

आपण केलेल्या 'चुकांचे' फळ

गवि
Mon, 02/12/2024 - 10:27 नवीन
आपण केलेल्या 'चुकांचे' फळ इतर कोणालातरी , ताबडतोब भोगावे लागते हेही अनेकदा सत्य ठरते. किमान तेवढे टाळले तरी इतरांवर उपकार होतील. तशी तर आपल्या अनेक चुकांची फळेही आपल्याला बहुतांश वेळा लवकरच मिळत असतातच, पण आपल्याला ती कळतच नाहीत. आपले मन आपल्याला खाते, त्यापासून सुटका कधीच नसते. कारण आपल्या आतच तो न्यायाधीश असतो.. त्याला आपण किती काळ दाबून ठेवू शकता यावर आपले पॅरोलचे दिवस ठरतात. पुढचा जन्म, मागचा जन्म याबद्दल काय बोलावे? ..दिल के खुश रहेने के लिये ए गालिब...
  • Log in or register to post comments

@ गवि : एकदम चपखल प्रतिसाद.

चित्रगुप्त
Mon, 02/12/2024 - 23:02 नवीन
आपण केलेल्या 'चुकांचे' फळ इतर कोणालातरी , ताबडतोब भोगावे लागते हेही अनेकदा सत्य ठरते.
-- या प्रश्नाबद्दलचा एक वेगळाच आयाम या प्रतिसादातून व्यक्त झाला आहे. झकास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कधीकधी फक्त कळ्यांवर सुटका

कंजूस
Mon, 02/12/2024 - 10:39 नवीन
कधीकधी फक्त कळ्यांवर सुटका होते. आपल्या बरोबरच्या इतर व्यक्तींमुळे. म्हणून लोक महाराजांच्या मागे लागतात.
  • Log in or register to post comments

@ कंजूसः फक्त कळ्यांवर सुटका होणे ...

चित्रगुप्त
Mon, 02/12/2024 - 23:07 नवीन
म्हणून लोक महाराजांच्या मागे लागतात
भल्याची संगती धरीना । आपणासी शाहाणे करीना । तो आपला आपण वैरी जाणा । स्वहित नेणे .. -- (श्री दासबोधः करंटलक्षणनिरूपण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

बहुतांश घडणाऱ्या घटना आपल्या

कॉमी
Mon, 02/12/2024 - 10:51 नवीन
बहुतांश घडणाऱ्या घटना आपल्या हाताबाहेर असतात. माणसा माणसात न्याय ही कल्पना असते, मानवी विश्र्वासाबाहेर न्याय नावाचे काही अस्तित्वात नसते. कोणतीही कॉस्मिक स्केल अस्तित्वात नाही. पापपुण्याचा हिशोब ठेवणारा कोणताही चित्रगुप्त अस्तित्वात नाही. आपल्या सोबत वाईट का घडले ह्याचे सरळ साधे उत्तर नसते. उत्तर असेलच असेही नाही. दरड कोसळून पूर्ण गाव बेचिराख होते, ह्यात माणसांच्या कर्मफलाचा दुरान्वये संबंध येत नाही. दरड कोसळली फिजिक्स मुळे. त्या दर्डिखली माणसे नसती तरी ती कोसळली अस्तीच. अश्या कितीतरी पॉसिबल दुर्घटना घडत असतील जिथे माणूस असता तर जीवितहानी झाली असती. खाली पापी माणूस असल्याने दरड स्वतःहून कोसळणार नाही की पुण्यवान माणूस आहे म्हणून कोसळायला थांबणार नाही. त्यामुळे, ज्या ठिकाणी दुर्घटनेमुळे जीवित हानी होते तिकडे बघून माणसाच्या कर्माचा त्या घटनांशी संबंध जोडणे हा माणसाचा ego झाला, की आपल्याभोवती जगाच्या घटना घडतात, त्यासाठी माझ्या कर्म परिपाकापुढे दुसरे काही कॉज आणि इफेक्ट नाहीच. थोडक्यात, ह्या बाबत युनिव्हर्सल सत्य असे काही नाही. तुमच्या वाईट कृतीचे परिणाम कदाचित तुम्हाला चावायला येतील, पण येतीलच असे नाही. तुम्ही कितीही चांगले, परिपूर्ण वागला तरी तुम्हाला कॅन्सर होणार नाही ह्याची खात्री नाही.
  • Log in or register to post comments

@ कॉमी : मनुष्याच्या आकलन-क्षमतेच्या मर्यादा ....

चित्रगुप्त
Mon, 02/12/2024 - 23:13 नवीन
आपल्या सोबत वाईट का घडले ह्याचे सरळ साधे उत्तर नसते. उत्तर असेलच असेही नाही...... ह्या बाबत युनिव्हर्सल सत्य असे काही नाही...... तुम्ही कितीही चांगले, परिपूर्ण वागला तरी तुम्हाला कॅन्सर होणार नाही ह्याची खात्री नाही...
... अगदी. मनुष्याच्या आकलन-क्षमतेच्या मर्यादा यातून स्पष्ट होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

100 % सहमतआहे.

बाजीगर
Wed, 02/21/2024 - 07:48 नवीन
पूर्वजन्म, पूर्वसंचित, कर्म, पापपुण्य हे सर्व माणसाच मॅन्यूपुलेटींग वाटतं मला.एखादी गोष्टं का झाली याचा तर्क देता आला नाही की द्या ठोकून मागच्या जन्मातील भोग वगैरे. दोन दिवसापूर्वी वाचले, पंढरपूरला चालले होते, गाडीचा अपघात झाला.3 मेवे.इथं सरळसरळ वाहनचालन, झोप,वेग,रस्तापरीस्थिती,वाहन परिस्थिती ही कारणं असतात.पण देवाला जातानाही त्यांचच काही चूकलं असं विचार करणारी मंडळी भेटतील. काही लोक सर्व दुराचार,अन्याय करुनही काही वाईट न होता सुखाने जगून गेली अशी ही उदाहरणे दिसतात. जगात न्याय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

मागच्या एप्रिलमध्ये नानासाहेब

अमरेंद्र बाहुबली
Wed, 02/21/2024 - 09:37 नवीन
मागच्या एप्रिलमध्ये नानासाहेब धर्माधिकार्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देताना वीसेक लाख लोक जमवले होते, हा संपुर्ण राजकीय खेळ होता, मंडप टाकू शकत असूनही फक्त ज्रोन कॅमेराने गर्दीचे फोटो घेता यावेत म्हणून मंडप टाकला गेला नाही. भर एप्रीलच्या ऊन्हात लाखो लोक दुपारच्या रनरनत्या ऊन्हात एका पक्षाच्या प्रचारासाठी बसवले गेले. तिथे १०० ते १५० लोक मेलो, सरकारी आकडा नेहमीप्रमाणे कमी दाखवला गेला. पण मेलेले लोक हे नशिबवान होते कारण त्यांना अश्या महान कार्यक्रमात मृत्यू आला अश्या गोष्टी पसरवल्या गेल्या. घटनेचे दुःखं म्हणून नानासाहब धर्माधिकारी ह्या माणसाने दारापुढची रांगोळी पूसली. (किती मोठा त्याग करावा एखाद्याने)) मुर्ख लोकांना अक्कल येईल तो सुदीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर

हं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/21/2024 - 10:58 नवीन
भर उन्हा़ळ्यात पुण्य संचय करणा-या लोकांची कीव आली होती. हेच म्हणुन नव्हे, अशा कितीतरी ठिकाणी मेंदू नावाच्या गोष्टींचा किंचितही वापर न करता आपलं भलं होईल या आशेने अशा मेंदुत भुसा भरलेल्या लोकांच्या टोळ्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सुदीन यावा इतकेच अपेक्षित. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हे तर काहीचनाही, त्या

अमरेंद्र बाहुबली
Wed, 02/21/2024 - 11:20 नवीन
हे तर काहीचनाही, त्या अप्पांच्या शेतात फूकट कामाला जातात, पुण्य जमवण्यासाठी इतके भयानक मेंदू गहाण ठेवलेले लोक आहेत. अप्पांच्या दृष्टाने त्या भक्तांची किंमत किती तर मेलेल्यांना एक रूपडाडी दिला नाही किंवा सरकारलाही द्यायला नाही लावला, फक्त रांगोळी पूसून दुःखं व्यक्त केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणत्याहि धाग्यात आपले

सुबोध खरे
Wed, 02/21/2024 - 11:21 नवीन
कोणत्याहि धाग्यात आपले पूर्वग्रह आणि राजकारण आणून धाग्याचा विचका कसा करावा हे वरील दोन्ही आय डी परत परत सिद्ध करून दाखवत असतात. का? कशासाठी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोक कसे फसतात हे दाखवले होते.

अमरेंद्र बाहुबली
Wed, 02/21/2024 - 11:41 नवीन
लोक कसे फसतात हे दाखवले होते. वर कुठल्याही पक्षाचा किंवा व्यक्तिचा ऊल्लेख नाही. मरनार्या लोकांपेक्षा पक्षाची काळजी वाटणे चिंताजनक आहे. आणी अप्पा धर्माधीकारी कुठल्याही पक्षात नाही हे आवर्जून सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

>>>अप्पा धर्माधीकारी

अहिरावण
Wed, 02/21/2024 - 12:11 नवीन
>>>अप्पा धर्माधीकारी कुठल्याही पक्षात नाही हे आवर्जून सांगतो. म्हणजेच ते सर्व पक्षात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

>>>का? कशासाठी ?

अहिरावण
Wed, 02/21/2024 - 12:13 नवीन
>>>का? कशासाठी ? असते काही जणांना समाजसेवेची आवड. शे दोनशे वर्षानि आपली आठवण काढावी लोकांनी म्हणून जसे देशमुखरानडे खस्ता खात होते त्याच पठडीतले. त्यांना प्रोत्साहन देणे सोडा... तुम्ही त्यांचे पाय ओढताय... कुठे फेडाल या कर्माची पापे.... !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

प्रबोधन...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/21/2024 - 13:59 नवीन
>>> का? कशासाठी ? डॉक्टर साहेब, आपला कटाक्ष आमच्या कड़े असेल तर, आम्ही आपल्या निदर्शनास आणु इच्छितो की, महाराष्ट्राला प्रबोधनाची फार थोर परंपरा आहे. आपण जमेल तसं लोकांचे प्रबोधन केले पाहिजे, यात काही चूक आहे असे वाटत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

महाराष्ट्राला प्रबोधनाची फार

सुबोध खरे
गुरुवार, 02/22/2024 - 10:25 नवीन
महाराष्ट्राला प्रबोधनाची फार थोर परंपरा आहे. हो पण आपण कीर्तनाला जाऊन तमाशातील शृंगारिक लावणी कशाला बेसुरात गाताय. फडावर उभे राहा आणि गाजवा की! कर्म आणि त्याचे फळ इ अध्यात्मात राजकारण आणून कशाला घाण करताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि भुजबळांच्या कुठे नादाला

सुबोध खरे
गुरुवार, 02/22/2024 - 10:27 नवीन
आणि भुजबळांच्या कुठे नादाला लागताय? ते फक्त खांद्याखाली बळकट आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अच्छा म्हणजे तुमच्या आवडत्या

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 02/22/2024 - 10:31 नवीन
अच्छा म्हणजे तुमच्या आवडत्या विचारसरणीला, तुमच्या आवडत्या पक्षाच्या विचारसरणीला विरोध म्हणजे खांद्याखाली बळकट असणे असते व्हय. छान छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आमचं ते घाण आणि तुमचं ते छान?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/24/2024 - 09:55 नवीन
कर्म आणि त्याचे फळ अध्यात्मात राजकारण आणून कशाला घाण करताय? कर्म आणि फळ केवळ अध्यात्मातच नसतं, आता ते तुम्हाला कळत नाही. समजत नाही त्याला आम्ही काही करू शकत नाही. कारण मेंदुत भुसा भरलेल्या टोळ्यांचा परिणाम केवळ अशिक्षित लोकांवर होत नाही तर, सुशिक्षितावरही व्हायला लागतात तेव्हा असे विचार थोपवणे हे प्रबोधानाचे कार्यआहे. भगवद्गीतेतील 'कर्मण्येवाधिकारस्ते....' चा विचार केवळ अध्यात्मिक लोकांसाठी नाही तर, सकल मानवासाठी आलेला विचार आहे. 'अध्यात्म असो की राजकारण' फळाची अपेक्षा न करता काम करीत राहा हा संदेश अधिक महत्वाचा आहे. आता कोणते कर्म केले पाहिजेत. त्यावर कधीतरी पुढे सांगेन. आत्ता इतकं पुरे आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सहमत आहे.

अहिरावण
Sat, 02/24/2024 - 10:42 नवीन
सहमत आहे. आता आपणच हा प्रबोधनाचा वारसा आणि वसा पुढे चालवावा आणि चुकलेल्या मेंढरांना योग्य दिशा देऊन कळपात आणावे. सर्व मिपा, नव्हे महराष्ट नव्हे भारत नाही नाही अखिल विश्व आपल्याकडे आस लावून पहात आहे. बोला गु रुदेव प्राडॉ की जै.... आता सगळ्यांनी उभे राहून आरती म्हणावी. जय देव जय देव जय दिलीप शेट समोरच्यावर करती वार थेट दावू योग्य मार्ग मेंढरे हाकलती कर्माचे फळ याच जन्मी म्हणती दिसेल कुणी अभिजन चुकार वाह्यात हाणती लाथा आणि बुक्की पेकाटात जनहो तुम्ही स्विकारा हाच मार्ग तत्काळ मिळेल तुम्हा इथेच स्वर्ग जय देव जय देव जय दिलीप शेट समोरच्यावर करती वार थेट गुरुदेवांच्या पाया पडून देणगी माझ्याकडेच द्यावी... गुरुदेवांना जड उचलायची मनाई आहे आणि जडावर त्यांचा लोभ सुद्धा नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>सुदीन यावा इतकेच अपेक्षित.

अहिरावण
Wed, 02/21/2024 - 12:10 नवीन
>>>सुदीन यावा इतकेच अपेक्षित. तुमच्या आमच्या हयातीत येईल असे वाटत नाही. मला वाटते आता तुम्हीच पुढाकार घेऊन प्राडॉ ची झूल काढा आणि तुमची ती फेमस डबल बॅरल घेऊन फायर करा तर काही होईल. फक्त जरा भगवी कापडं अंगावर घेतलीत तर इफेक्ट फास्ट होईल... कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ती मेंढरं नव्हती.

बाजीगर
Sat, 02/24/2024 - 06:35 नवीन
त्या सभेत आणलेली माणसं भाड्याने आणली असणार, पैसे (त्यांच्या भाषेत हजेरी) सभा संपल्यावर मिळणार असेल. उन लागतय हे कळतय पण हजेरी / काम न करता बसून पैसे मिळताहेत हे त्यांना इझीमनी वाटतं असणार. सनस्ट्रोक झाला, रक्तातील प्रथीन उकडून शिजलं,पण हजेरी पाहीजे म्हणून बसून राहीले, मेले. सभा न सोडण्याची चूक याच जन्मातली, शिक्षा याच जन्मात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

नाही. माझी आईपण गेली होती

अमरेंद्र बाहुबली
Sat, 02/24/2024 - 08:27 नवीन
नाही. माझी आईपण गेली होती त्या खारघरच्या कार्यक्रमाला. तिने आपबीता सांगातली. खरं तर त्या सेकंदापर्यंत मलाही हे लोक चांगले वाटायचे. त्या दिवसानंतर अप्पांचा खरा चेहरा समोर आला, हे सर्व बंदं करायला सांगीतलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर

तुम्ही पुरोगामी विचारांचे

अहिरावण
Sat, 02/24/2024 - 10:56 नवीन
तुम्ही पुरोगामी विचारांचे आहात असा डंका सर्वत्र आहे. मग ही घटना घडायची का वाट पाहिली? आईला आधीच योग्य मार्गावर का आणले नाही? एक कुतूहल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मी पुरोगामी असा डंका आहे???

अमरेंद्र बाहुबली
Sat, 02/24/2024 - 12:15 नवीन
मी पुरोगामी असा डंका आहे??? मोठे व्हा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

बर आजपासून तुम्ही सनातनी.

अहिरावण
Sat, 02/24/2024 - 12:15 नवीन
बर आजपासून तुम्ही सनातनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

>>>त्या सभेत आणलेली माणसं

अहिरावण
Sat, 02/24/2024 - 10:55 नवीन
>>>त्या सभेत आणलेली माणसं भाड्याने आणली असणार कोण भाड्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर

मी आधी असाच विचार करायचे

Bhakti
Mon, 02/12/2024 - 11:32 नवीन
मी आधी असाच विचार करायचे.आपल्यावर संस्कार आहेत आपण चूका करायच्या नाहीत, समजून घ्यायचं.पण हे जग इतकं प्रक्टिकल आहे की खुप थोडे बोटावर मोजता येतील एवढेच तुमच्या चुका पोटात घेतात.बाकी जग चुका न करताही किडकं फळं देऊ शकतं...मग त्यांच्याशी कसं वागायचं? एखाद्याला गंभीर काही तरी रोग होतो,ते आरोग्य हे जेनेटिक,डिसिप्लिनड असतं त्यात चुका झाल्याने. नातेसंबंध रूक्षपणाने बिघडतात.आर्थिक संकट लोभीपणा,बावळटपणा,आळशीपणा मुळं येतं.इत्यादी इत्यादी तेव्हा या जन्मात फळं वगैरे कसं काही असतं,असं वाटतं नाही. पण संस्कारांच म्हणाल तर मात्र खुप matar करतात.काही गोष्टी विसाव्या वर्षी कान पकडून सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments

पाप पुण्य देखील समजावर

अमरेंद्र बाहुबली
Mon, 02/12/2024 - 11:35 नवीन
पाप पुण्य देखील समजावर अवलंबून असते. ऊदा. एका धर्माच्या दृष्टीने कुठलाही माणूस मारणे पाप तर दुसर्या धर्माच्या दृष्टीने आपल्या देवाला न माननारा माणूस मारला तर ते पुण्य ठरते.
  • Log in or register to post comments

दिलेले उदाहरण चूकलं आहे...आता

Bhakti
Mon, 02/12/2024 - 12:55 नवीन
दिलेले उदाहरण चूकलं आहे...आता काय फळ मिळणार अबाला ;);) कृ.ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ऊदाहरण चुकलंय? :(

अमरेंद्र बाहुबली
Mon, 02/12/2024 - 13:45 नवीन
ऊदाहरण चुकलंय? :( बघतो काय फळ मिळतं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

चुकांचे फळ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/12/2024 - 14:35 नवीन
प्यारे बहनो और भाईयो, आपण केलेल्या 'चुकांचे' फळ आपल्याला 'याच जन्मी' भोगावे लागतात. >>>का ? कारण आपण चुका केलेल्या असतात म्हणुन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लग्न झालेल्या व्यक्तीला

विवेकपटाईत
Mon, 02/12/2024 - 15:08 नवीन
लग्न झालेल्या व्यक्तीला चांगले माहीत असते या जन्माच्या कर्माचे फळे या जन्मीस भोगावे लागतात. बाकी जे आपल्या दृष्टीने ठीक, दुसऱ्याच्या दृष्टीने चूक आणि जे आपल्या दृष्टीने चूक, दुसऱ्याच्या दृष्टीने ठीक होऊ शकते.
  • Log in or register to post comments

संत रामदास...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/12/2024 - 16:21 नवीन
याबाबतीत काय म्हणतात ? अधिक माहिती उपलब्ध असल्यास वाचायला आवडेल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

हाहाहा.

अमरेंद्र बाहुबली
Mon, 02/12/2024 - 21:15 नवीन
हाहाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठीचे प्राध्यापक असून संत

अहिरावण
Fri, 02/16/2024 - 14:21 नवीन
मराठीचे प्राध्यापक असून संत रामदासांच्या साहित्याचा अभ्यास नाही हे पाहून ड्वाळे पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जी अर्भकं

तिमा
Mon, 02/12/2024 - 16:32 नवीन
जी अर्भकं/ मुलं, एक वर्षांची व्हायच्या आंत मरतात त्यांनी कुठे चुका केलेल्या असतात ? त्यांना म्रुत्युची शिक्षा का मिळते ?
  • Log in or register to post comments

जी अर्भकं/ मुलं, एक वर्षांची

चौथा कोनाडा
Mon, 02/12/2024 - 22:20 नवीन
जी अर्भकं/ मुलं, एक वर्षांची व्हायच्या आंत मरतात त्यांनी कुठे चुका केलेल्या असतात ? त्यांना म्रुत्युची शिक्षा का मिळते ?
पुर्वसंचित किंवा मागच्या जन्मीचं पाप. भारतीय संस्कृती फार थोर आहे .... त्यात इतक्या भन्नाट कल्पना इतकी बस ! कधी कधी वेडगळ वाटतात पण नीट तर्क लावून तपासल्या तर्क लावून तर एकदम ओके. त्यामुळे हेच लईच बेस्ट ! उगाच कारण बिरण शोधायला जात नाहीत ... डायरेक्ट "मागच्या जन्मीचं पाप / पूर्वसंचित / पत्रिकेत खोट / पत्रिकाच वाईट / वेळच वाईट / ग्रहमानच वाईट" असली शेकडो कारणं दिली की कुठल्याही सायकॉलॉजिस्टकडे जावं लागत नाही ! आहे ना भन्नाट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

'मृत्यु' ही शिक्षा नसून वरदान आहे.

चित्रगुप्त
Tue, 02/13/2024 - 21:34 नवीन
मानवाला निसर्गाकडून मिळालेले सर्वोत्तम वरदान म्हणजे मृत्यु. त्यात कोणाच्या चुकीचा काही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण

सुबोध खरे
Wed, 02/21/2024 - 12:55 नवीन
कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण भाव सहजासहजी सापडत नाही. सोनोग्राफी करताना जन्माला न आलेल्या अर्भकाच्या पोटात असलेला कर्करोग पाहून असा विचा र येतो कि ज्या बाळाचा जन्मही झालेला नाही त्याने असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे जन्माचं अगोदरच त्याला असा भयंकर रोग झाला असावा? आणि दुसऱ्या टोकाला समाजात जाती जातीत तेढ निर्माण करून समाजाची वाताहत करणारे हरामखोर राजकारणी सहस्त्र चंद्र दर्शन ( ८० वर्षे पूर्ण) सारखा सोहळा साजरा करतात त्यांनी या जन्मात असे कोणते पुण्य केले आहे कि त्यांना दीर्घायुष्य मिळावे? किंवा एकाच आजारात (तोंडाच्या कर्करोगामुळे) एकाच पक्षाचे दोन नेते यापैकी श्री आबा पाटील यांचे देहावसान झाले आणि श्री शरद पवार जिवंत आहेत. यात कुणाचे पूर्वजन्मीचे/ या जन्मीचे पुण्य जास्त कि पाप जास्त याचा हिशेब कसा देणार? या दोन्ही टोकाच्या उदाहरणावरून असे वाटू लागते कि जर पुनर्जन्म असला तर पूर्वजन्मीचे पाप किंवा पुण्य या जन्मात आपल्याला फळ देत असावे. अर्थात गदिमा यांनी लिहिले आहे त्याप्रमाणे "मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा" म्हणजेच मृत्यू नंतर काय पुनर्जन्म आहे का याचे उत्तर संत महात्म्याना सुद्धा देता येत नाही. तेंव्हा आपण काय सांगणार? I AM NEITHER FORWARD NOR BACKWARD, I AM JUST AWKWARD. सत्कृत्य आणि दुष्कृत्य याची व्याख्या सुद्धा नक्की करता येणार नाही. पाप आणि पुण्याचे फळ मिळेल का याच जन्मात मिळेल का ? किंवा पुनर्जन्म आहे का आणि ते फळ पुढच्या जन्मात मिळेल का? याचे कोणतेही उत्तर मला माहिती नाही. पण अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं, परोपकार: पुण्य: पापाय: परपीडनं,-- महर्षी व्यास अठरा पुराणांचे सार दोन वाक्यात सांगतात -- दुसऱ्यावर उपकार करणे हे पुण्य आणि दुसऱ्याला त्रास देणे हे पाप आहे. याप्रमाणे आपला व्यवहार ठेवला कि निदान आपल्याला मानसिक शांती मिळते असा माझा अनुभव आहे. शेवटी आयुष्य म्हणजे काय? ज्याचा त्याचा अनुभवच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

दुसऱ्या टोकाला समाजात जाती

अमरेंद्र बाहुबली
Wed, 02/21/2024 - 14:21 नवीन
दुसऱ्या टोकाला समाजात जाती जातीत तेढ निर्माण करून समाजाची वाताहत करणारे हरामखोर राजकारणी सहस्त्र चंद्र दर्शन ( ८० वर्षे पूर्ण) सारखा सोहळा साजरा करतात त्यांनी या जन्मात असे कोणते पुण्य केले आहे कि त्यांना दीर्घायुष्य मिळावे? ऊलटही असू शकतं ना?? अनेक जाती जातीत सामंजस्य तयार करून, कुठलीही जात श्रेष्ठ नाही असं समाजात बिंबवलं. त्यामुळे लोकांच्या प्रेमाने पुण्य कमावून ते सहस्त्र चंद्रदर्शन (८० वर्षे पुर्ण) करू शकले?? जातीवादी जळफळाटाशिवाय काय करू शकले??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भुजबळ बुवा

सुबोध खरे
गुरुवार, 02/22/2024 - 10:30 नवीन
भुजबळ बुवा कुठल्याही गोष्टीत राजकारण आणून विचका करायची आपण शपथच घेतली आहे का? तसंही तुम्हाला कोणी सिरियसली घेत नाहीच. फक्त तुम्ही अट्टाहासाने ते सिद्ध करताय एवढंच. बघा विचार करून जमतंय का? नाही तर द्या सोडून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा