✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(अ)निती-श चे अभंग

ब — बाजीगर, Mon, 01/29/2024 - 12:00
नवव्यांदा बोहल्यावर। लोकशाहीची भेळ। सारा संख्येचा खेळ। मुख्यमंत्री।। विरोधकांना फोडा। भाजपा टाकी गळ। असो विरोधी गरळ। मोठा मासा।। नवल करीती लोक। कधी शिवतो सूट? शपथ घे ऊठसूट। दर्जी म्हणे। पाहोन ह्याचा रंगबदल। लाजला तो सरडा। लाल हिरवा करडा। सोय जशी।। महाराष्ट्री उध्वस्त 'यू-टर्न'। आहे खातो मनी मांडे। ताकाला जाऊनही भांडे। लपवतो।। कसली मूल्ये तत्वे? झोक्यांचा सम्राट। पुन्हा मांडी खाट। भाजपाशी ।। गुलजार हसे नितीश । लाजायचे काय काम। म्हणे तो पलटूराम। अखंडसत्तावती।।

प्रतिक्रिया द्या
1928 वाचन

💬 प्रतिसाद (3)

मस्त

मुक्त विहारि
Mon, 01/29/2024 - 13:36 नवीन
छान आहे...
  • Log in or register to post comments

मस्त !!

अहिरावण
Mon, 01/29/2024 - 15:00 नवीन
मस्त !! पण नितीशकुमारच्या पलटी मुळे इंडींमांडेखाऊंचे तोंड पहाण्यालायक झाले होते =)) आता उधोजीराव आणि उंबरठ्यावर उभी असलेली शरदीनी माप ओलंडून आत गेले की नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीविचारी लोकांचे हाल होणार हे निश्चित !!!!
  • Log in or register to post comments

व्वाह

कर्नलतपस्वी
Fri, 02/23/2024 - 14:47 नवीन
अखंडसत्तावती.... लईच भारी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा