✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गटारी स्पेश्यल : अ‍ॅबसिन्थ - एक हरिताप्सरा

स
सुनील यांनी
Mon, 07/24/2017 - 08:46  ·  लेख
लेख
एक श्वान आणि एक कच्छप वगळता सांप्रत काहीही पाळत नाही, श्रावण तर दूरची गोष्ट. सबब, "गटारी" साजरी करण्याचे काहीही कारण असण्याची आवश्यकता नाही, नसावी. तरीही "गटारी" साजरी होतेच! म्हणजे कसं आहे की, आपण चवथीला मोदक किंवा होळीला पुरणपोळी खातो ती काय त्या दिवसांनतंर बराच काळ मोदक वा पुरणपोळी खायला मिळणार नाही म्हणून नव्हे, तर एक रिवाज म्हणून. तसेच माझ्या "गटारी"चेही! एक रिवाज म्हणून साजरी करायची. खेरीज, यंदा खास आकर्षण होते ते म्हणजे - अ‍ॅबसिन्थ. चेक रिपब्लिकमध्ये बनलेले हॅप्सबर्ग अ‍ॅबसिन्थ. तब्बल ७२.५% ABV असलेले हे हिरवट द्रव्य भलतेच जहाल आणि मादक! किंचित साखर आणि थंड पाणी मिसळून घेतलेत की सातवा स्वर्ग काही दूर नाही! HA अवांतर - एखादी गोष्ट आरोग्यास हितकारक किंवा अहितकारक आहे, हे सिद्ध करणारी वैद्यकीय संशोधने ही काही नवलाईची गोष्ट नव्हे! किंबहुना, एक गोष्ट एकाच वेळेस योग्य आणि अयोग्य आहे असे सिद्ध करणारी परस्परविरोधी संशोधनेदेखिल पहायला मिळतात. अ‍ॅबसिन्थही त्यास अपवाद नाही. असे सांगतात की फ्रान्समध्ये अ‍ॅबसिन्थ सेवनाचे फॅड इतके वाढले होते की वाईन उत्पादकांच्या पोटात गोळा आला. अखेरीस त्यांनी काही "संशोधकांना" हाताशी धरून अ‍ॅबसिन्थची यथेस्त नालस्ती आरंभली. परिणाम त्यांना हवा तोच झाला. फ्रान्ससहीत अनेक देशांनी यावर बंदी घातली. फ्रान्सचा वाईन उद्योग पुन्हा बहरला. २१ व्या शतकात पुन्हा एकवार "संशोधन" होऊन अ‍ॅबसिन्थ तितकीशी घातक नाही असे सिद्ध झाले!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
थंड पेय
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6720 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

खत्रा

टवाळ कार्टा
Mon, 07/24/2017 - 12:15 नवीन
खत्रा
  • Log in or register to post comments

काय सुंदर बाटली आहे.. रंग,

पुंबा
Mon, 07/24/2017 - 12:38 नवीन
काय सुंदर बाटली आहे.. रंग, लोगो सुरेख.. एन्व्ही यू..
  • Log in or register to post comments

वा! हे संशोधन भलतेच आवडले आहे

एस
Mon, 07/24/2017 - 12:40 नवीन
वा! हे संशोधन भलतेच आवडले आहे. :-D
  • Log in or register to post comments

वा! हे संशोधन भलतेच आवडले आहे

एस
Mon, 07/24/2017 - 12:40 नवीन
वा! हे संशोधन भलतेच आवडले आहे. :-D
  • Log in or register to post comments

अति कौतुक झालेय. इतकी काय

अभ्या..
Mon, 07/24/2017 - 12:41 नवीन
अति कौतुक झालेय. इतकी काय भारी वाटली नाही.
  • Log in or register to post comments

Artist Edgar Degas. (1875–76)

चित्रगुप्त
गुरुवार, 08/24/2023 - 04:08 नवीन
Image removed. Artist Edgar Degas. (1875–76) Oil on canvas. 92 cm × 68 cm (36.2 in × 26.8 in). Location Musée d'Orsay, Paris 'अ‍ॅबसिंथ' हा शब्द वाचल्यावर लगेच वरील चित्र आठवले. याखेरीज इतर चित्रकारांची चित्रे, पोस्टर्स वगैरे पण पुष्कळ आहेत. Image removed..Image removed. Image removed..Image removed. Image removed. Toulouse-Lautrec and Lucién Metivet drinking absinthe c.1885 Image removed. Absinthe is an alcoholic beverage made from herbs such as anise, fennel and wormwood. The drink is high in alcohol and can cause mild hallucinations, making it a popular recreational drug of the late 19th century. The Tipsy History of Absinthe Wormwood was used by the ancient Greeks and Egyptians for use in medicinal tinctures. Over time, other herbs were added to the drink and the distillation process refined until in the 18th century, absinthe was produced. For the next century, absinthe was recommended by doctors as a healing elixir. In the 1840s, French troops were even given absinthe as a malaria preventative. The soldiers returned home with a taste for the aniseed-flavored wine, and the popularity of absinthe spread rapidly throughout France and Europe. Above: An antique illustration of the green fairy, the personified symbol of absinthe.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
गुरुवार, 08/24/2023 - 10:06 नवीन
छान फोटो आणि माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा