✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

निरोप

च — चलत मुसाफिर, Sun, 07/02/2023 - 20:52
रस्त्यावरून या तू चालू नकोस आता निक्षून ती म्हणाली हातात हात होता (आला सुवास तोच ती बैसता समीप पण साठवू कसा तो मन क्षुब्ध, हात कंप) हळवे जुने तमाम तू आठवू नको ते कसलाच अर्थ नाही उरला न जीव तेथे नाही मी राहिले ती तूही आता निराळा वेड्या मनास लागे वेडा निरर्थ चाळा मैत्री असेल अपुली भेटू अधूमधून नजरेस मात्र ठेव अपुल्या जरा जपून नजरेत ना दिसू दे ती ओल पावसाची एकांत तो मनस्वी ती रात्र मीलनाची वळुनी न पाहताही तत्काळ ती निघाली मी आर्त, स्तब्ध, सुन्न दाटून रात्र आली --- झाला बराच वेळ आहे इथे बसून तो गंध ओळखीचा आहे इथे अजून (टीप: आम्हाला इतपतच काव्य येते)

प्रतिक्रिया द्या
7091 वाचन

💬 प्रतिसाद (17)

ल ई डें ज र हाये भौ...

कर्नलतपस्वी
Sun, 07/02/2023 - 22:15 नवीन
कदाचित असाही विचार करत असेल. काय कुणाचा भरवसा द्यावा. झाला बराच वेळ आहे इथे बसून विचार करी मनासी आणू कोयता कुठून संभाळ गं बाई...
  • Log in or register to post comments

हो

चलत मुसाफिर
Sun, 07/02/2023 - 22:47 नवीन
कटू सत्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

बाब्बो!! अंगावर काटा आला.

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 07/03/2023 - 17:26 नवीन
प्रेमभंगाचे दुखः दारुत बुडविणारे साठोत्तरी कालखंडातले देवदास कुठे अन, "तू हां कर या ना कर तू है मेरी किरन" वाले आजचे प्रेमवीर कुठे. गटारातील घाणीत किड्यांचा बुजबुजाट पेठांच्या गल्ल्यात प्रेमवीरांचा सुळसुळाट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

हो

चलत मुसाफिर
Mon, 07/03/2023 - 17:51 नवीन
दुर्दैव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

साठ-सत्तरचा दशकातले भग्नर्‍हदयी दिवाणे ...

चित्रगुप्त
Wed, 07/05/2023 - 20:34 नवीन
साठ-सत्तरचा दशकातले दिवाणे "दिल का भवर करे पुकार" या स्थितीतून 'मेरे टूटे हुवे दिलसे" या अवस्थेत गेले की (दारू न पिणारे -) मजसारखे दीवाणे 'मुकेश के दर्दभरे नगमे' ऐकत रात्री अंधारात एकटे बसलेले असतात. घरच्यांना कळत नाही हे येडं अंधारात एकटं बसून काय करतं. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

खुप

चौथा कोनाडा
गुरुवार, 07/06/2023 - 17:08 नवीन
व्वा .... खुप सुंदर .... ! एक नंबर ! ❤ ❤️ ❤️ ❤️
  • Log in or register to post comments

झाला बराच वेळ

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/06/2023 - 20:18 नवीन
झाला बराच वेळ आहे इथे बसून तो गंध ओळखीचा आहे इथे अजून
छान
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चलत मुसाफिर
Fri, 07/07/2023 - 07:22 नवीन
आम्ही फक्त एक उत्साही कवी आहोत. प्रतिसादांतून प्रोत्साहन मिळताना पाहून आनंद झाला. मिपाकरांना धन्यवाद
  • Log in or register to post comments

आवडली!

राघव
Mon, 07/10/2023 - 14:00 नवीन
चांगली रचना! लिहित रहावे! पुलेशु. :-)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चलत मुसाफिर
Mon, 07/10/2023 - 15:09 नवीन
प्रोत्साहन दिल्याबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

या कवितेवरून आणि वृत्तावरून एका कवितेची आठवण झाली.

हणमंतअण्णा शंक…
Mon, 07/10/2023 - 16:40 नवीन
हातातुनी सुटोनी जातात हात तेव्हा वेढ्यात अंगठीच्या अडकून काय राही? मैत्रातले वसंत उमलून संपले की कुठलाच प्राणपक्षी बहरून गात नाही कवयित्रीचे पूर्ण नाव विसरलो. आडनाव भट की काहीतरी आहे. कवयित्री मुंबईत जर्मन दूतावासात की कल्चरल सेंटर मध्ये काम करतात हेही अंधुकसे आठवते. ग्रेसमय कविता आहेत पण खूप सुंदर वाटतात.
  • Log in or register to post comments

खूपच छान ओळी

चलत मुसाफिर
Mon, 07/10/2023 - 18:49 नवीन
ओळी आवडल्या. कवयित्री कोण मलाही कल्पना नाही. पण एकूणच माझे काव्य- साहित्य क्षेत्रातील ज्ञान जेमतेम आहे. लिहिताना मी वृत्त वगैरेवर काही लक्ष दिले नव्हते कारण तितकी क्षमताच नाही. मनात आले ते लिहिले. प्रतिसादाबद्दल सप्रेम धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

छान.. छानच

सागरसाथी
Sat, 07/29/2023 - 19:31 नवीन
छान.. छानच
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चलत मुसाफिर
Sat, 07/29/2023 - 20:48 नवीन
प्रोत्साहन दिल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरसाथी

छानच कविता

सौन्दर्य
Mon, 07/31/2023 - 18:39 नवीन
@ चलत मुसाफीर - मी ही कविता आधी वाचली नव्हती पण तुम्ही माझ्या कवितेवर जी प्रतिक्रिया दिली त्यावरून ही कविता वाचावीशी वाटली. प्रियकराच्या मनातील भावना तुम्ही छानच मांडल्या आहेत. एकुणात कविता सुंदरच. असेच लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक धन्यवाद

चलत मुसाफिर
Tue, 08/01/2023 - 08:01 नवीन
कविता वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

मनःपूर्वक धन्यवाद

चलत मुसाफिर
Tue, 08/01/2023 - 08:02 नवीन
कविता वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा