पापा कि परी
गोष्ट अगदी अलीकडली. अगदी ८१ सालातली असेल. कोकणातील गुहागर तालुक्यातील एक छोटंसं खेडं .गुहागर हुन ४/५ किमी आरे गावचा फाटा आणि त्याही पुढे दीड एक किलोमीटर खोतांच घर. अगदी आजही जिथे दिवसातून एखादीच एस टी जाते. एक घर या इथे तर दुसरं घर कमीत कमी अर्धा किमी मागे/पुढे. आसपास काय ती नारळी पोफळीची वाडी. आजही पाटाचं पाणी इथे वाहतं. वीज केव्हा असते केव्हा नाही. मोबाईल च्या रेंजची तीच कथा. रिंग गेली तरी कॉल पूर्ण होईल याची शाश्वती नाही. इथल्या खोतांच्या घरी जन्माला आल्या दोन पऱ्या. मोठी प्राजक्ता तर दुसरी मुग्धा. आई बाबांच्या लाडक्या. तेव्हा सुद्धा दोन्ही मुलीचं का ? म्हणून लोकांनी विचारलं. पण खोतांच दोन्ही मुलींवर जीवापाड प्रेम होत. आरे गावातल्याच मराठी शाळेत दोघी शिकत होत्या. पुढे हायस्कुलसाठी गुहागर तालुक्यात एस टी ने ये जा करीत. तेव्हासुद्धा घरातून मुख्य रस्त्यावर चालत येत तेव्हा कुठे एस टी मिळे. घरात सगळं भरभरून असलं तरी खोतीचा माज कधीच नव्हता. उलट गावात अडल्या नडल्याला मदत करायला खोत कायम तयार असत. त्यामुळे भरपूर माणसं जोडून ठेवली होती. मुलींना घरात न बसवता शहरात पाठवून चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं.
यथावकाश मुलींची लग्न झाली. त्यांना मुलं झाली. दोघे आईवडील आता एकटे पडले. पण तरीही रोजची शेतीची, बागेची काम होतीच. गडीमाणस अवतीभोवती होती. माहेरपणाला मुंबईहून येणाऱ्या मुली चांगल्या महिनाभर राहायच्या. आई बाबांना आणि नाळ जोडलेल्या गावाला मनसोक्त भेटायच्या. शहरात शहरी तर गावात गावकरी बनून राहायच्या.आई बाबांच्या आजारपणात तर यायच्याच धावून.
अचानक खोतांच्या छातीत दुखायला लागल्याचं निमित्त झालं. शहरातल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. मुली - जावई तातडीने धावून आले. दोन दिवसांचं आजारपण आणि खोत जग सोडून गेले. जवळचे सगळे नातेवाईक आसपास होते. मुलींना आणि त्यांच्या आईला धीर देत होते. घरी कळवल्यावर घरच्या गड्याने आणि शेजाऱ्यांनी पुढची तयारी करायला घेतली. हॉस्पिटल मधून सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून खोतांना घरी आणलं. पुढचे विधी करण्याची चर्चा सुरु झाल्यावर मोठी प्राजक्ता पुढे झाली. "बाबांचे अंत्यसंस्कार मी करणार " ठामपणे म्हणाली. कोकणातल्या एका छोट्याश्या खेड्यात एखादी मुलगी ठामपणे आपले म्हणणे मांडते हीच मोठी गोष्ट होती. गुरुजींनी होकार दिल्यावर पुढचे विधी सुरु झाले. तिथे उपस्थितांमध्ये चर्चा सुरु झाली. पण मुली किंवा आई कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही. इतर पुरुषांबरोबर ती एकटी कशी जाणार म्हणून मी आणि एक वहिनी बरोबर गेलो. स्मशानात जाण्याची नि ते विधी बघण्याची पहिलीच वेळ. आजकाल सगळ्याच सिनेमात आणि सिरीयल मध्ये सर्रास सगळं दाखवतात. पण हीच वेळ जेव्हा आपल्या प्रियजनावर येते तेव्हा खरंच कठीण असत. माझ्यापेक्षा थोडीशी मोठी माझी बहीण हे सगळं करताना पाहून अंगावर काटा येत होता. चितेवर त्या माणसाला ठेवणं, त्याभोवती प्रदक्षिणा घालणं आणि सगळंच खूपच शहारे आणणारं होत. डोळ्यातून अश्रू न गाळता ती हे सगळं करीत होती. सुदैवाने पाऊस अजिबात नव्हता. काकांना त्यांच्याच जागेत अग्नी दिला जावा हि इच्छा त्यांनी बऱ्याच आधी बोलून दाखवली होती. त्याप्रमाणे गड्याने आयत्यावेळी जागा साफसूफ केली होती. तरीही खाली काटेकुटे, काही झाडांची बारीक खोडं, मुंगळे असं काही ना होतंच. चितेला प्रदक्षिणा घालताना तिच्या पायाला ते सगळं टोचतंय याची जाणीव सारखी मनाला होत होती. चितेला अग्नी दिला मात्र एवढा वेळ आवरून धरलेला धीर सुटून ती मनसोक्त रडली. तिला जवळ घेऊन आम्ही देखील रडलो. सगळं दृश्य बघताना वारंवार मन भरून येत होत. डोळे पाझरत होते. स्मशातला हा पहिला अनुभव विदारक असाच होता.
दहा मिनिटे थांबून तिला घेऊन आम्ही घरी परतलो. घरी आल्यावर इतर बायकांनी तिला थोडं पाणी पाजलं, थोडं शांत केलं. थोड्याच वेळात ती सावरली. धाकटी सुद्धा सावरली. परत निघालेल्या लोकांना निरोप देत होत्या. आता आईला सावरायची मोठी जबाबदारी अंगावर होती. ज्या धीराने दोघी या प्रसंगाला सामोऱ्या गेल्या त्याच धीराने त्या आईला सावरतील याची खात्री आहे. आम्हीही आहोतच जवळ. तरीही कौतुकाच्या, लाडाच्या मुली अगदी पापा कि परी असलेली मुलगी जेव्हा धीराने असं काही करते तेव्हा इतरांना हि बळ मिळतं.
कदाचित काहींना वाटेल त्यात काय मोठं ? आजकाल बऱ्याच मुली करतात. पण शहरात हे मुलीने वडिलांना अग्नी देणं आणि एका छोट्याश्या खेड्यात हि घटना घडणं हि खूप मोठी गोष्ट आहे. गावातल्या कितीतरी लोकांना हे पसंत पडणं कठीण आहे. अगदी आमच्याच नातेवाईकांमध्ये "काय गरज आहे ?" म्हणणारे होते. यांच्याकडे चाललं, आमच्याकडे हे नाही चालायचं असंही कुणी म्हटलं. अश्या वेळी ठामपणे आपल्याला पाहिजे ते करणं आणि बाकीच्यांकडून करून घेणं सोपं नक्कीच नाही. कारण जर भटजींनी नकार दिला असता तर ? इतर लोकांनी मदत करायला नकार दिला असता तर ? पण त्याही लोकांना समजावणं आणि त्याप्रमाणे करून घेणं, एकीकडे स्वतःला आणि आईला सांभाळणं हे खरंच आव्हानात्मक आहे. आणि या बाबांच्या लाडक्या लेकीने ते करून दाखवलं. अभिमान आहे अश्या बहिणीचा. पापा की परी म्हणून बऱ्याच वेळा मुलींना हिणवलं जात पण त्याच मुली आपल्या बापासाठी काहीही करू शकतात हे प्राजक्ताने आज दाखवून दिलं.
वाचने
18436
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
ठाम रहाणे कधीही महत्वाचे.
व ते संस्कारांवर खूप अवलंबून
ह्रद्य अनुभव आहे. प्राजक्ता
उगाचच
Privileged sir,
In reply to उगाचच by प्रसाद गोडबोले
privilege
In reply to Privileged sir, by भृशुंडी
पुनश्च ..
In reply to privilege by प्रसाद गोडबोले
चितेला अग्नी देणे हे
In reply to पुनश्च .. by भृशुंडी
.
In reply to चितेला अग्नी देणे हे by प्रसाद गोडबोले
धाडसी सरसकटीकरण
In reply to Privileged sir, by भृशुंडी
वैयक्तिक नाही.
In reply to धाडसी सरसकटीकरण by सतिश गावडे
मग हरकत नाही. :)
In reply to वैयक्तिक नाही. by भृशुंडी
सवर्ण / अवर्ण
In reply to Privileged sir, by भृशुंडी
।
In reply to सवर्ण / अवर्ण by वामन देशमुख
जग कुठे चालले आहे आणि काही
In reply to । by भृशुंडी
जातपात
In reply to जग कुठे चालले आहे आणि काही by वामन देशमुख
विचित्र प्रतिसाद ... या वरील
In reply to उगाचच by प्रसाद गोडबोले
विचित्र प्रतिसाद?
In reply to विचित्र प्रतिसाद ... या वरील by चौकस२१२
हास्यास्पद
In reply to विचित्र प्रतिसाद? by प्रसाद गोडबोले
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
In reply to हास्यास्पद by कपिलमुनी
अगदी
In reply to विचित्र प्रतिसाद? by प्रसाद गोडबोले
सकारात्मक बदल...
*बदल
In reply to सकारात्मक बदल... by सतिश गावडे
उत्तम निर्णय घेतला ....
अग्नी
+१
In reply to अग्नी by कपिलमुनी
+१
In reply to अग्नी by कपिलमुनी
गुरजी लई फॉरवर्ड विचारांचे आहेत
In reply to अग्नी by कपिलमुनी
"पापा की परी"
क्रीतपुत्र, श्राद्ध वगैरे
आपले विचार पटत नाहीत
In reply to क्रीतपुत्र, श्राद्ध वगैरे by गामा पैलवान
अंत्यसंस्कार करावेत का ....
In reply to आपले विचार पटत नाहीत by धर्मराजमुटके
तर त्याने दिलेले नियम पाळायला हवेत ना.
In reply to अंत्यसंस्कार करावेत का .... by गामा पैलवान
मृत आणि यम काय ते पाहून घेतील.
आपलं समाधान म्हणजे नेमकं काय
In reply to मृत आणि यम काय ते पाहून घेतील. by धर्मराजमुटके
खेड्यात एका स्त्रीनं
In reply to आपलं समाधान म्हणजे नेमकं काय by गामा पैलवान
गामा
नियम, विधिनिषेध, समानता वगैरे
नियम
In reply to नियम, विधिनिषेध, समानता वगैरे by गामा पैलवान
अगदी.
In reply to नियम by कपिलमुनी
ब्राह्मणी रुढाचार ?
In reply to नियम by कपिलमुनी
रुढाचार नाही , प्रिव्हलेज
In reply to ब्राह्मणी रुढाचार ? by गामा पैलवान
अजूनही हिंदू धर्मात अग्नी
In reply to नियम by कपिलमुनी
फक्त ब्राह्मणी रुढाचार म्हणजे
In reply to नियम by कपिलमुनी
फक्त ब्राह्मणी रुढाचार म्हणजे
In reply to नियम by कपिलमुनी
गामा
हल्लीचे अंत्यसंस्कार गरुड
In reply to गामा by धर्मराजमुटके
असे कोठेही नि:संदिग्धपणे लिहिलेले नाहीये.
In reply to हल्लीचे अंत्यसंस्कार गरुड by प्रचेतस
+१००
In reply to गामा by धर्मराजमुटके
यात काही बसवता येतंय का बघा...
रोचक आहे !
In reply to यात काही बसवता येतंय का बघा... by सतिश गावडे
आचार, शास्त्राधार वगैरे
पूर्वीचे लोक विधिनिषेध
In reply to आचार, शास्त्राधार वगैरे by गामा पैलवान
धर्मराज जी
In reply to पूर्वीचे लोक विधिनिषेध by धर्मराजमुटके
शुष्क चर्चा, तारतम्य, क्रीतपुत्र, वंचना, शास्त्राधार, वगैरे ....
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
मेल्यावर यम दिसेलच असे नसावे कदाचित...
In reply to मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही by प्रमोद देर्देकर
तुम्हाला ५ हजार वर्षं जुन्या
कोविडच्या तिसर्या लाटेत
कोविडच्या तिसर्या लाटेत
१९८१...